Maharashtra Politics: ठाकरे गटात इनकमिंग सुरू, भाजप आमदाराचा पुतण्या आज शिवबंधन बांधणार; उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार

Maharashtra Political Latest News: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते ठाकरे गटाच्या गळाला लागले आहेत.
Maharashtra Politics BJP Mla Babanrao Pachpute nephew sajan pachpute will join To uddhav thackeray Group
Maharashtra Politics BJP Mla Babanrao Pachpute nephew sajan pachpute will join To uddhav thackeray GroupSaam TV
Published On

गिरीष कांबळे, साम टीव्ही

Maharashtra Political Latest News:

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून नवीन पक्ष उभारणीला करण्यास सुरूवात केली आहे. शिंदे गट आणि भाजपवर नाराज असलेले काही माजी आमदार तसेच पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद वाढताना दिसून येत आहे. आज भाजप आमदाराच्या बड्या आमदाराचा पुतण्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics BJP Mla Babanrao Pachpute nephew sajan pachpute will join To uddhav thackeray Group
Jalna Lathicharge Reason : जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला कशासाठी? 'सामना' अग्रलेखात सगळं उलगडून सांगितलं

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते ठाकरे गटाच्या गळाला लागले आहेत. साजन पाचपुते हे शिवसेना ठाकरे गटात आज प्रवेश करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे राज्यात आणखी एका काका विरुद्ध पुतण्याची राजकीय लढत पाहायला मिळू शकते.

कारण, साजन पाचपुते यांना ठाकरे गटात (Uddhav Thackeray) मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. बनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडलेली पाहायला मिळत होती. त्याचा फटका आमदार पाचपुते यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत बसला.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत साजन पाचपुते विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळविला. त्यावेळी पाचपुते कुटुंबात वादाची ठिणगी पडली.

Maharashtra Politics BJP Mla Babanrao Pachpute nephew sajan pachpute will join To uddhav thackeray Group
Maratha Reservation: गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण? जालन्यातील घटनेवरून ठाकरे आक्रमक; फडणवीसांवर गंभीर आरोप

मध्यंतरी साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकलीही होती. साजन पाचपुते काष्टी तालुक्यातील सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते.

त्यांचे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मागील महिन्यात मुंबईत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साजन पाचपुते यांनी भेट घेतली. त्यावेळी साजन हे ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती होती.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com