Jalna Lathicharge Reason : जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला कशासाठी? 'सामना' अग्रलेखात सगळं उलगडून सांगितलं

Maratha Andolan : सरकारने आंदोलन दडपण्यासाठी लाठीहल्ल्याच्या मार्ग स्वीकारला असा आरोप विरोधक करत आहेत.
Jalna Lathicharge
Jalna Lathicharge Saam TV
Published On

Mumbai News :

जालना येथे मराठा आंदोलकांनावर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी गाड्यांना आग लावली. तर आजही राज्यात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळला जात आहे.

विरोधकही सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. सरकारने आंदोलन दडपण्यासाठी लाठीहल्ल्याच्या मार्ग स्वीकारला असा आरोप विरोधक करत आहेत. सामनाच्या अग्रलेखात तर या लाठीहल्ल्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करण्यात आली. सामनातून हा हल्ला नेमका कशासाठी झाला, याचं कारणही देण्यात आलं आलं आहे. (Latest Marathi News)

Jalna Lathicharge
Maratha Reservation: गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण? जालन्यातील घटनेवरून ठाकरे आक्रमक; फडणवीसांवर गंभीर आरोप

मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला का?

'शासन आपल्या दारी’ हा मिंधे सरकारचा भंपक कार्यक्रम येत्या 8 तारखेला जालना येथे होणार आहे. त्या कार्यक्रमात आंतरवाली सराटीच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद उमटू नयेत, म्हणून शांततेने सुरू असलेले हे आंदोलन चिरडण्याचा निर्णय सरकार पातळीवर झाला आणि तसे निर्देश फडणवीसांच्या गृहखात्याने पोलीस यंत्रणेला दिले, असा आरोपही सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Jalna Lathicharge
Ajit Pawar Upset : अजित पवार महायुतीत नाराज?, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?

जालियनवाला बाग घडवण्याचे फर्मान फोनवरून कोणी सोडले?

पोलिसांच्या लाठीहल्ल्यावर सामनातून प्रश्चचिन्हही उपस्थित करण्यात आलं आहे. मराठा आंदोलक सदैव संयम बाळगूनच आंदोलने करत असताना आंतरवाली सराटीत पोलिसांचा फौजफाटा घुसवून जालियनवाला बाग घडवण्याचे फर्मान फोनवरून कोणी सोडले? आंतरवालीत अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण? याचा छडा लागलाच पाहिजे", असं सामनात म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com