Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Uddhav Thackeray And Eknath Shinde: सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाला भाजपने जोरदार धक्का दिला. अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतलं.
Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Uddhav Thackeray And Eknath ShindeSaam TV Nws Marathi
Published On

Summary -

  • कोकणात भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश

  • ठाकरे गट आणि शिंदे गटाला भाजपकडून जोरदार धक्का

  • सिंधुदुर्गमध्ये विक्रांत सावंत, मायकल डिसोजा, रुपेश पावसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली

कोकणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी कोकणात भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश येताना दिसत आहे. कोकणात भाजपने ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. सिंधुदुर्गमध्ये अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं आहे. त्यामुळे कोकणात भाजपची ताकद वाढत चालली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे. भाजपने शिंदेच्या शिवसेनेसह ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात अनेक बड्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का; ३ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष विकास सावंत यांचे पुत्र विक्रांत सावंत, ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूकांच्या तोंडावर भाजपने मित्र पक्षांसह ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला असल्याचे बोलल जात आहे.

Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, रत्नागिरीमध्ये भाजपचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुलीच्या प्रेमापोटी सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू आहे. राजेश सावंत यांची मुलगी शिवानी सावंत माने या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रत्नागिरी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असणार आहेत. मुलीने ही निवडणूक लढवावी यासाठी राजेश सावंत यांनी हा मोठा निर्णय घेतला. जरी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी देखील पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजपच्या उमेदवाराचेच काम करणार असल्याचे राजेश सावंत यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Politics: कोकणात मोठी राजकीय घडामोड, भाजपकडून ठाकरेसेना अन् शिंदेसेनेला धक्का; बड्या नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; एकाचवेळी दोन नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com