Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; एकाचवेळी दोन नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Dharashiv Politics: स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका तोंडाशी आल्या असताना शरद पवार गटाला धाराशिवमध्ये मोठा धक्का बसलाय. तडकाफडकी दोन नेत्यांनी राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्षांकडे दिलाय.
Dharashiv Politics
Two senior leaders resign from Sharad Pawar group ahead of civic elections In Dharashivsaamtv
Published On
Summary
  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

  • दुधगावकर यांनी जिल्हाध्यक्ष पदासह सक्रिय सदस्य व प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला.

  • संजय निंबाळकर यांचाही सदस्यत्वाचा राजीनामा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय. राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्ष कामाला लागली आहेत. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी करत आहे. मात्र त्याचवेळी धाराशिवमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. एकाचवेळी दोन मोठ्या नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय.

Dharashiv Politics
Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

धाराशिवमधील शरद पवार गट राष्ट्रवादीचे, जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे पाठवलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावरच संजय पाटील आणि संजय निंबाळकर यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. दुधगावकर यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते संजय निंबाळकर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Dharashiv Politics
Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

निंबाळकर यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. या दोन्ही नेत्यांनी राजीनामा का दिला यांचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान दुधगावकर कोणता राजकीय निर्णय घेणार याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. संजय निंबाळकर यांनी आपला राजीनामा पत्र शशिकांतजी शिंदे यांच्याकडे पाठवले आहे. निंबाळकर यांनी आपल्या पत्रात २०१९च्या निवडणुकीचा उल्लेख केलाय.

Dharashiv Politics
रायगडनंतर नंदुरबारमध्येही महायुतीत राडा; शिवसेना-भाजपात तेढ,भाजप आमदाराला सेनेशी युती आवडेना

मी आपल्यासोबत पक्षाच्या चांगल्या व अडी-अडचणीच्या काळात काम केले आहे. तसेच सन २०१९ ची विधानसभा (धाराशिव-कळंब) लढविली पण थोडक्यात पराभूत झालो. पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आभारी आहे.परंतु काही अडचणीमुळे पक्षाचे यापुढील काम आपण करू शकत नाही, त्यामुळे मी माझ्या सक्रिय सदस्यत्वाचा व प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा आपणाकडे देत आहे, असं संजय निंबाळकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com