Balasaheb Thorat : अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची बनवाबनवी; काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची टीका

Ahilyanagar News : राज्यात समोर येत असलेल्या मतदार याद्यांमधील घोळ याच्या प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बनवाबनवीचा कार्यक्रम करत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहिल्यानगर) : संगमनेर मतदारसंघात साडेनऊ हजार नावांमध्ये दोष आढळून आला. या नावांची कोणतीही पडताळणी करण्यात आली नाही. तहसीलदार म्हणतात नावं वगळण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा अधिकार आम्हाला नाही. एका बाजूला चुका दुरुस्त करू असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला आम्हाला अधिकार नसल्याचे सांगतात. अर्थात अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोग बनवाबनवीचा कार्यक्रम करत असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी थोरात सहकारी साखर कारखाना स्थळावर कुटुंबियांसमवेत विधिवत लक्ष्मीपूजन केले. दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांमुळे संगमनेरचे अर्थकारण चांगले असून अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आम्ही त्यांच्या दुःखात देखील सहभागी आहे. दीपावली हा प्रेमाचा, बंधुभावचा सण. इथे द्वेषाला जागा नाही. मनातील द्वेष, मत्सर बाजूला ठेऊन अंतःकरण शुद्ध करण्याचा सण असल्याचे म्हटले. 

Balasaheb Thorat
Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

कर्जमाफीवरून राज्य सरकारवर निशाणा 

सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. मात्र ते कर्जमाफीचे आश्वासन विसरले आहेत. ही वेळ शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची असून तुम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र आता तुम्हाला ते आठवत नाही. विरोधकांनी कर्जमाफीची अपेक्षा करणे चुकीचे नाही. दिवाळीपर्यंत मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अद्याप तशी परिस्थिती दिसत नसल्याचे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

Balasaheb Thorat
Matheran : माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू; तीन दिवसांनंतर खोल दरीत सापडला मृतदेह

बच्चू कडूंची पाठराखण 
बच्चू कडू यांचे बोलणे शब्दशः घेऊ नका. आमदारांनी सरकारवर दबाव टाकला, तर कर्जमाफी लवकर होऊ शकते. तुमच्यावर जबाबदारी आहे, हा संदेश आमदारांना देण्यासाठी कडूंचे वक्तव्य असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांच्याकडून बच्चू कडू यांची पाठराखण करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com