Gaganbawda Ghat : सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद; प्रवाशांचे हाल; नेमकं कारण काय?

Maharashtra News : गगनबावडा घाटात दरड कोसळल्यामुळे सिंधुदुर्ग-कोल्हापूर जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Gaganbawda Ghat : सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद; प्रवाशांचे हाल; नेमकं कारण काय?
Maharashtra NewsSaam Tv
Published On
Summary
  • गगनबावडा घाटात दरड कोसळल्याने १२ सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंद

  • प्रवाशांसाठी भुईबावडा आणि फोंडा घाट मार्ग पर्याय

  • दरडीमुळे दुरुस्तीचे काम सुरू

  • प्रशासनाने सावधगिरीचे आवाहन केले

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा तळेरे-गगनबावडा घाट सध्या दरड कोसळल्यामुळे धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा घाट रस्ता १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गगनबावडा घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली. त्यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला आणि अनेक वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्याची वेळ आली. दरड हटविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले असले तरी संध्याकाळी ते थांबवावे लागले. मात्र आज सकाळपासून पुन्हा दरड हटवण्याचे काम सुरु झाले आहे.

Gaganbawda Ghat : सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद; प्रवाशांचे हाल; नेमकं कारण काय?
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, कोकण - घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट; इतर ठिकाणी काय परिस्थिती?

गगनबावडा घाट हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे. त्यामुळे या घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी तसेच मालवाहतूक वाहने ये-जा करतात. मात्र, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे डोंगरकड्यांमधील माती सैल झाली असून त्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. स्थानिक प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे घाटाच्या सुरक्षेसाठी तातडीचे उपाय सुरू केले आहेत.

Gaganbawda Ghat : सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद; प्रवाशांचे हाल; नेमकं कारण काय?
Maharashtra Weather : कोकण, घाटमाथ्यासह 'या' ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर

घाटातील रस्त्याच्या अनेक ठिकाणी दुरुस्तीची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरडीमुळे रस्त्याचा मोठा भाग नुकसानग्रस्त झाला आहे, त्यामुळे केवळ दरड हटविणे पुरेसे ठरणार नाही, तर घाट सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम करणे आवश्यक आहे. याच कारणामुळे गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Gaganbawda Ghat : सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणारा गगनबावडा घाट १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद; प्रवाशांचे हाल; नेमकं कारण काय?
Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गतील विरंगुळ्याचे ठिकाण, जोडीदारासोबत घालवा निवांत संध्याकाळ

दरम्यान, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. या काळात वाहतूक भुईबावडा घाट व फोंडा घाट या मार्गांनी वळविण्यात येणार आहे. पोलिस आणि वाहतूक विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, अनावश्यक प्रवास टाळावा आणि दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करूनच प्रवास करावा.

गगनबावडा घाट हे केवळ प्रवासाचे साधन नसून पर्यटनाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचे ठिकाण आहे. निसर्गरम्य दऱ्या, डोंगर आणि हिरवाईमुळे येथे दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. या सर्व घडामोडींमुळे गगनबावडा घाटाचा रस्ता पुन्हा सुरक्षित होईपर्यंत प्रवासात अडथळे कायम राहणार आहेत. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि सावधगिरी बाळगणे हेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com