Maharashtra Politics: भाजपला मोठा धक्का! मंत्रिपद भूषवलेला बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?

Madhukar Pichad : विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केलीय. लोकसभेत महायुतीला धक्का दिल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा महायुतीला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचा प्रवेश करवून भाजप आणि महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत आहे.
Maharashtra Politics: भाजपला मोठा धक्का! मंत्रिपद भूषवलेला बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?
Madhukar Pichad
Published On

शरद पवार पु्न्हा एकादा महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गटाकडून लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये गेलेल्या लोकांशी संपर्क केला जात आहे. त्याचदरम्यान भाजपचे नेते मधुकर पिचड पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा सुरू झालीय. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार गटाने अहमदनगरमधील अकोलेत मार्चेबांधणीला सुरुवात केलीय.

पिचड पिता पुत्र यांनी २०१९ ला भाजपमध्ये प्रवेश केला होता. पिचड भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचा लामटे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. विधानसभेच्या जागा जिकंण्यासाठी शरद पवार हे मधुकर पिचड यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येतेय. या आठवड्यात शरद पवार अकोल्याचा दौरा करणार आहेत.

शरद पवार यांची राजकीय खेळी

मधुकर पिचड आणि त्यांचे चिंरजीव माजी आमदार वैभव यांनी २०१९मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव यांचा पराभव झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे यांचा विजय झाला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीतून फूट पाडत, वेगळी चूल मांडली होती. त्यानंतर महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर लहामटेही अजित पवार यांच्यासमवेत महायुतीमध्ये सामील झाले. आता आगामी विधानसभा निवडणुकीत लहामटे हे ‘महायुती’चे उमेदवार राहण्याची दाट शक्यता असल्याने पवार यांनी ‘अकोल्या’त मोर्चेबांधणी सुरू केली असून त्यांनी पिचड पिता पुत्राला आपल्या गटात घेण्याचा डाव टाकलाय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्या जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचा बालेकिल्ला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार अकोल्यातील शेतकरी मेळाव्यात उपस्थिती लावणार आहेत. अकोल्यातील दिवंगत नेते अशोक भांगरे यांच्या जयंतीनिमित्त १९ जुलैला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला मधुकर पिचड उपस्थिती लावणार आहेत.

Maharashtra Politics: भाजपला मोठा धक्का! मंत्रिपद भूषवलेला बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार?
Maharashtra Live News Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com