Maharashtra Politics: बीडचा तिसरा पुतण्या अजित पवारांच्या गळाला; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

Beed Political News: जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर हे अजित पवारांच्या गटात सहभागी होणार आहे.
Maharashtra Politics beed another nephew will join ajit pawar group ssd92
Maharashtra Politics beed another nephew will join ajit pawar group ssd92SAAM TV
Published On: 

Beed Political News: राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षातील काका-पुतण्यात फुट पडल्यावर दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही नेते काकाच्या तर काही नेते पुतण्याच्या गटात सहभागी झाले. दरम्यान, बीडमधील जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. आता त्याच जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर हे अजित पवारांच्या गटात सहभागी होणार आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics beed another nephew will join ajit pawar group ssd92
Maharashtra Politics: अजित पवारांच्या 'त्या' प्रश्नाने शिंदे गटात अस्वस्थता; नाराज आमदार भाजपकडे मोठी मागणी करणार

बीड जिल्ह्यातील पुतण्या फोडण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उद्या हॅट्रिक करणार आहेत. बीडचा तिसरा पुतण्या अजित पवारांच्या गळाला लागला असून उद्या मुंबईत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची दुसरा पुतण्याही साथ सोडणार असल्यानं बीड जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या माजी नगरसेवक योगेश क्षीरसागर हे उद्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे.

या अगोदर आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तर त्यापूर्वीही दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात ताकद देत मंत्री धनंजय मुंडे यांना आपलंसं करत अजित पवार यांनी मुंडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला होता.

Maharashtra Politics beed another nephew will join ajit pawar group ssd92
Political News : CM एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरुन राज्यपालांना मविआची १२ आमदारांची यादी परत पाठवली, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील उभ्या फुटी नंतर बीड जिल्ह्यातील एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटासोबत राहिलेले आहेत. यामुळे आता संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात अजित पवार हे योगेश क्षीरसागर यांना ताकद देणार असल्याचा देखील बोललं जात आहे.

यामुळे आता अजित पवारांनी बीड जिल्ह्यातील पुतण्या फोडण्यात हॅट्रिक केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बीडमधील अजित पवारांच्या सभेला, नक्कीच अधिक उत्साह आणि कार्यकर्त्यांची भर पाहायला मिळेल, असा देखील राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.