Maharashtra Politics: बाबा सिद्धिकी खरंच अजित पवार गटात प्रवेश करणार का? सुनिल तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics News: मुंबई काँग्रेसला मोठं खिंडार पडल असून बाबा सिद्धिकी उद्या १० फ्रेब्रुवारीला अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

Maharashtra Politics

मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ देत बाबा सिद्धिकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. दरम्यान बाबा सिद्धिकी उद्या १० फ्रेब्रुवारीला अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचंही ते म्हणाले.

अजित पवार गटाकडून राज्यसभेवर अल्पसंख्यांक चेहरा पाठवला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. त्यामुळे अजित पवार गटाकडून राज्यसभेवर जाणारा अल्पसंख्यांक चेहरा बाबा सिद्दीकीच आहेत का? अशी चर्चाही आता सुरु झाली आहे. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेसला मुंबईत मोठं खिंडार पडल असून काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ हातून जाण्याची शक्यता आहे.

स्वराज्य सप्ताहाची सुरुवात १२ पासून

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत तीन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने निकाल दिला. कायदेशीर निर्णय जाहीर झाला आहे.त्या दृष्टीने आमची पुढची वाटचाल असणार असून स्वराज्य सप्ताह आयोजित करायचे ठरवले आहे. १२ तारखेला गेट वे ऑफ इंडिया येथून सप्ताहाची सुरवात होईल. शिवगायन, ऐतिहासिक पोवाडे असणार आहेत. ज्योत निघाणार आहे. ती ज्योत चेंबूर पर्यंत जाईल.शिवज्योत अनेक ठकाणी फिरून शिवनेरी ला जाईल. नंतर परत निघून सिहंगड येथे मुक्काम आणि मग सातारा, १७ ला साताराहून प्रतापगड आणि मग पोलादपूर, महाड छत्रपती शिवाजी महाराज चौक. नंतर पाचाडला मुक्कामी राहिल आणि १९ ला रायगडावर कार्यक्रम होईल याठिकाणी सप्ताहाचा समारोप होणार आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत बिघाडी? नाशिक लोकसभा जागेवर ठाकरे गटानंतर शरद पवार गटाचा दावा

लोकसभा लढण्याची तिव्र इच्छा

पक्ष आणि चिन्ह मिळण्याआधी काही जणांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली यायचं होत. त्यांची अस्वस्थता भविष्यात दिसेल. त्यांची काही नाजूक अडचण होती. पण ती आता दुर झाली. माझ्याशी काही जणांचा संपर्क झाला असेल.अजित पवार यांच्याशी काही जणांचा संपर्क झाला असेल . पक्षप्रवेशाविषयी योग्य वेळी सर्व माहिती देईन असंही तटकरे म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुक लढवण्याची आपली तिव्र इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Maharashtra Politics
Raj Thackeray: हेच औदार्य दाखवावं; बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा...' राज ठाकरेंची मोदी सरकारकडे मोठी मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com