Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत धुसफूस! राष्ट्रवादीकडून शिंदेसेनेला जोरदार धक्का, २०० पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Mahayuti Tensions in Raigad: रायगडमध्ये सुनील तटकरे यांनी शिवसेना शिंदेगटाला मोठा धक्का दिला. २०० पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत धुसफूस! राष्ट्रवादीकडून शिंदेसेनेला जोरदार धक्का, २०० पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On: 
  • सुनील तटकरे यांची रायगडमध्ये राजकीय खेळी

  • महेंद्र दळवी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा धक्का

  • रायगडमध्ये शिंदेसेनेच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मोठी खेळी करत शिवसेना शिंदेगटाला मोठा धक्का दिला. रायगडामध्ये शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवींना राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार धक्का दिला. शेणवई गावातील शेकडो ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगटामध्ये शाब्दील वादासोबत कार्यकर्ते फोडण्याचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अलिबागचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना जोरदार धक्का दिला आहे. २०० पेक्षा अधिक शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत धुसफूस! राष्ट्रवादीकडून शिंदेसेनेला जोरदार धक्का, २०० पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics: ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघातील शेणवई आदिवासी वाडीतील २०० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील तटकरे यांनी या सर्वजणांचा पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वादानंतर आता ग्रामिण भागात ताकद वाढवण्याचे काम सुरु झाले असून जोरदार पक्ष प्रवेश घेतले जात असल्याचे चित्र रायगडमध्ये पाहायला मिळत आहे.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत धुसफूस! राष्ट्रवादीकडून शिंदेसेनेला जोरदार धक्का, २०० पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com