Maharashtra Politics : महायुतीमध्ये दरार पडणार? राज्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी

Maharashtra Political News : साताऱ्यात महायुतीत दरार पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics x
Published On
Summary
  • साताऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यातील शीतयुद्धामुळे महायुतीत दरार पडण्याची चर्चा रंगली आहे.

  • गोरे यांनी मकरंद पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेत नाव न घेता डिवचणारी टीका केली, तर पाटील यांनीही प्रत्युत्तर देत गोरे यांना टोला लगावला.

  • दोघांचे कार्यक्रम आणि टीका-प्रत्युत्तर यामुळे अजित पवार गट व भाजपमध्ये ठिणगी पडल्याचे बोलले जात असून पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.

ओंकार कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : राज्यातील सातारा जिल्ह्यात महायुतीमध्ये दरार पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यात खडाजंगी सुरु आहे. दोघांनी एकमेकांच्या मतदार संघात राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या शीतयुद्धाची चर्चा रंगू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी मकरंद पाटील यांच्या वाई मतदारसंघातील बावधनमध्ये एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. त्यांनी मंत्री मकरंद पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. कोणीही बाभळीच्या झाडाखाली उभे राहत नाही. त्याला आंब्याची सावली लागते. बावधन गावाची ताकद राजकारण बदलवण्याची आहे आजची सभा परिवर्तनाची, असे म्हणत गोरे यांनी मकरंद पाटलांना डिवचले होते.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा हादरा! बडा नेता शिंदेसेनेत जाणार, माजी आमदारांचाही होणार पक्षप्रवेश

या घडामोडीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी देखील उद्या मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतल्यामुळे महायुतीमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाविषयी विचारल्यावर मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे हे त्यांचा पक्ष वाढवत आहेत, मी माझा पक्ष वाढवतोय, असे वक्तव्य केले.

Maharashtra Politics
Supriya Sule : पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम: सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया | VIDEO

वाईचे मतदार मला नेहमीच वाढीव मताधिक्याने मतदान करत असतात. मी दोन, तीन हजाराने निवडून आलो नाही, असा टोला मंत्री मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे यांचे नाव न घेता लगावला. या एकूणच परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये खडाजंगी सुरु असल्याचे म्हटले जात आहे. हे शीतयुद्ध लवकरच थांबेल की वाढेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics
Crime : सूरतमध्ये अपहरण, मुंबईत हत्या अन् ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मृतदेह... ५ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचं गूढ कसं उकललं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com