Rohit Pawar News: एका सर्व्हेने झोप उडाली... शरद पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांचा बंडखोरांना टोला

Rohit Pawar On Sakal Saam Survey: जनतेचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या विचारांचा मूड आणि भूमिका मात्र “क्रिस्टल क्लिअर” आहे." असा टोला त्यांनी लगावला आहे.
Rohit pawar
Rohit pawar saam tv
Published On: 

Rohit Pawar Tweet On Sakal Saam Survey: राष्ट्रवादी पक्षात बंड पुकारणारे अजित पवारांसह आमदारांसह आज शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले असून या भेटीनंतर आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत बंडखोरांना टोला लगावला आहे.

Rohit pawar
Ahmednagar Crime News : गुंडागर्दीवर पोलिसांचा धाकच उरला नाही, राष्ट्र्वादीच्या आमदाराची गृहखात्यावर टीका

याबाबत अधिक माहिती अशी की, नवोदीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नवीन मंत्र्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना प्रफूल पटेल यांनी शरद पवार आमचे दैवत असून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आल्याचे प्रफूल पटेल यांनी सांगितले.

तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बंडखोर आमदारांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले. तसेच या परिस्थितीवर मार्ग काढण्याची विनंती केली असल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीनंतर आता रोहित पवार यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे.

Rohit pawar
Chhatrapati sambhaji nagar News: सिनेमाला लाजवेल असा प्रकार, चक्क 4 वर्षांपूर्वी खोदलेली विहीर गेली चोरीला; शेतकऱ्याची हायकोर्टात धाव

काय म्हणाले रोहीत पवार...

"एका माध्यमसमूहाच्या कालच्या सर्व्हेने महाराष्ट्राच्या जनतेचा मूड दाखवून दिला आहे. एकदा नाहीतर दोन वेळा एवढ्या कुरापती करूनही अपेक्षित असा परिणाम मिळत नसल्याने हा सर्व्हे बघून काहींची झोप मात्र नक्कीच उडाली असणार. जनतेचा आणि जनतेसाठी लढणाऱ्या विचारांचा मूड आणि भूमिका मात्र “क्रिस्टल क्लिअर” आहे." असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच "सत्ता आणि पैसा कधीही जनतेसमोर आणि विचारधारेसमोर टिकाव धरू शकत नाही, हेच या सर्व्हेतून अधोरेखित झालं. येणाऱ्या निवडणुकांमध्येही त्याचं प्रतिबिंब दिसल्याशिवाय राहणार नाही...' असा विश्वासही रोहित पवार यांनी या ट्वीटमधून व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.