Ambadas Danave: केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिला आहे. नाव आणि चिन्ह मिळाल्यावर शिंदे गटातील आमदार सक्रिय झाले आहेत. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिपचा मुद्दा उपस्थित करत त्यातून कोणीही सुटणार नाही असे विधान केले होते.
यावर ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला असून "आम्हाला पदाची चिंता नाही, साहेबांनी सांगितलं तर आत्ता पद सोडू मात्र नियम आणि कायद्यानूसार असे काही होणार नाही," अशी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धवजी हाच आमचा ब्रँड...
यावेळी अंबादास दानवे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचे चिन्ह गेल्याचा फटका बसेल का असे विचारण्यात आले, यावर बोलताना त्यांनी "शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली झळाळून निघेल, आम्ही गावा गावात जाऊ आणि चिन्ह चोरल्याचे जनतेला सांगू , असे म्हणत उद्धवजी (Udhav Thackeray) हाच आमचा ब्रँड असून मशाल किंवा जी काही निशाणी मिळेल ती घेवू आणि लढू" असा विश्वासही व्यक्त केला.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह...
संजय राऊत यांनी २००० कोटींचा सौदा झाल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना अंबादास दानवे यांनी "संजय राऊत सांगतात ते खरच आहे. कारण मी 50 खोके घेतले नाही अस एकही आमदार सांगत नाही, निवडणूक आयोगात पासवान यांच्या मुलाची केस पेंडींग आहे, अनेक केस पेंडींग असतांना ही केस एवढ्या लवकर का लागते ?" असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
त्याचबरोबर "निवडणूक आयुक्ताच्या नेमणूकीवरही सुप्रीम कोर्टाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे," असेही ते यावेळी म्हणाले. (Shivsena)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.