Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; या 7 मुद्द्यांवर होऊ शकतो युक्तिवाद

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच ठाकरे गट उद्या सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगासंदर्भात प्रकरण मेन्शन करणार आहे.
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisissaam tv

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सत्ता संघर्षांचं प्रकरण ७ न्यायाधीशांकडे सोपवायचं की ५ न्यायाधीशांकडे ठेवायचं याचा निर्णय मेरिटनुसार घेतला जाईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत घेतला होता. आता उद्यापासून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह हे शिंदे गटाला दिल्याने आता ठाकरे गटाने या निर्णयाविरोधातही सर्वोच्च न्यायालय गाठले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात ठाकरे गट उद्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरण मेन्शन करणार आहे. या प्रकरणावर देखील उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Political Crisis
Jayant Patil: 'पक्ष चोरणाऱ्यांना जनता धडा शिकवेल...' जयंत पाटील यांचा हल्लाबोल; भाजपवरही केली जोरदार टीका

उद्या सकाळी साधारण १०:३० वाजता ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात आपली केस सर्वोच्च न्यायालयात दाखल करेल. तर ११ वाजता सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरुवात होईल. (Latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयात या ७ मुद्द्यावर होणार सुनावणी...

1. स्पीकरच्या विरोधात अविश्वास नोटीस दाखल केली असेल तर उपाध्यक्षांना आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार राहतो का? नेबम रेबिया जजमेंट नुसार.

2. अपात्रता प्रलंबित असताना विधानमंडळातील कामकाज वैध आहे का? त्याचे काय स्टेट्स आहे.

3. जर स्पीकरने अपात्र घोषित केले असेल तर ज्या दिवशी आमदारांनी शिस्तभंग कारवाई केली त्या दिवशी लागू होते की ज्या दिवशी अपात्र केले त्या दिवसापासून. (Latest Political News)

Maharashtra Political Crisis
Bhagat Singh Koshyari: 'तर दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांची नियुक्ती केली असती…' कोश्यारींचे मोठे विधान

4. अध्यक्षाला नेता / व्हीप ठरवण्याचा अधिकार आहे का? याचा १० व्या अनुसूचीवर पक्षांतर बंदी कायद्यावर काय परिणाम होतो का ?

5. पक्षाच्या अंतर्गत निर्णय यात न्यायालयाने लक्ष घातले पाहीजे का ?

6. राज्यपालाचे एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास आमंत्रित करण्याचे काय अधिकार आहेत. असे अधिकार चॅलेंज करता येतात का ?

7. Split च्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगाला काय अधिकार आहेत. निवडणूक आयोगाचे कार्यक्षेत्र किती मोठे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com