Bhagat Singh Koshyari: 'तर दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांची नियुक्ती केली असती…' कोश्यारींचे मोठे विधान

उद्धव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती, असेही ते यावेळी म्हणाले..
 Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Saam Tv
Published On

Maharashtra Politics: राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा कार्यकाळ अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली.

विशेष त्यांच्या काळात गाजलेला मुद्दा म्हणजे 12 आमदारांच्या फाईलवरील सही. जी अखेरपर्यंत त्यांनी केली आहे. त्यावरुन अजून वाद सुरुच आहे. आता पदावरुन पायउतार होताच त्यांनी यामागचे कारण स्पष्ट केलं आहे. (Bhagat Singh Koshyari)

 Bhagat Singh Koshyari
Uddhav Thackeray : 'शिवसेना नाव चोरलं तरी, ठाकरे नाव चोरू शकत नाही'; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

अलिकडेच माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्यांवर सविस्तरपणे उत्तरे दिली. यावेळी त्यांना १२ आमदारांबाबत शेवटपर्यंत निर्णय घेतला नाही? असं भगतसिंह कोश्यारींना विचारण्यात आले .

त्यावर कोश्यारींनी , “महाविकास आघाडीची शिष्टमंडळ येत राहिली. त्यांना सांगितलं, हे पाच पानांचं पत्र पहा. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत, कायदे सांगत आहात. शेवटी लिहतात १५ दिवसांत मंजूर करा.”

संविधानात कुठे लिहिलं आहे? ते जेव्हा समोर येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तसं पत्र पाठवलं नसतं, तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो. तुम्ही असली पत्र लिहिता, असा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला.

 Bhagat Singh Koshyari
Jayant Patil: 'पक्ष चोरणाऱ्यांना जनता धडा शिकवेल...' जयंत पाटील यांचा हल्लाबोल; भाजपवरही केली जोरदार टीका

सध्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये चाललेल्या वादावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तसेच "मी महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवलं होतं. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून काली उतरवलं आहे.” अशी खोचक टीकाही माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com