Eknath Shinde on Maharashtra political crisis : जवळपास वर्षभरापासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल जाहीर करू शकते. याबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी माहिती दिल्याचं 'लाईव्ह लॉ'ने म्हटले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत माहिती समोर आल्यानंतर पत्रकारांनी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. यावर ते म्हणाले आहेत की, ''सुनावणी झाल्यानंतर तुम्हाला भेटतो आणि तुमच्याशी बोलतो.'', असं म्हणत त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे.
सत्तासंघर्षावरील निकालाबाबतच्या सुनावणीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''आमच्या सर्वोच्च न्यायालयामधील वकिलांनी न्यायालयात योग्य ती बाजू मांडली आहे. आम्ही योग्य पुरावा दिला आहे. न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर बोलणं योग्य नाही.'' (Latest Political News)
ते म्हणाले, ''निकाल देणे हा सर्वोच्च न्यायालयचा अधिकार आहे. सगळे पुरावे सगळी कागदपत्र देऊन आमची बाजू आम्ही भक्कम केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून योग्य निकाल येईल हीच अपेक्षा आम्हाला आहे.''
दरम्यान याबाबत शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. उद्या निकाल येणार आहे तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न विचारल्यानंतर अदित्य ठाकरे यांनी 24 तास थांबूया अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.