Aaditya Thackeray on Uday Samant: अमेरिकेतील नेते देखील त्यांच्या संपर्कात असतील; आदित्य ठाकरेंचा उदय सामंतांना टोला

Aaditya Thackeray on Uday Samant: "महाविकास आघाडीमधील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत त्याची महाराष्ट्राला प्रचिती येईल", असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं.
Aaditya Thackeray on Uday Samant
Aaditya Thackeray on Uday SamantSaam TV
Published On

Aaditya Thackeray on Uday Samant: "महाविकास आघाडीमधील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत त्याची महाराष्ट्राला प्रचिती येईल. ठाकरे गट राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेकजण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत", असं खळबळजनक विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.  (Latest Marathi News)

Aaditya Thackeray on Uday Samant
Supreme Court Hearing on ShivSena: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालय सत्तासंघर्षावरील निकाल उद्याच देणार

सगळ्याच पक्षांचे नेते त्यांच्या संपर्कात असतात. अमेरिकेतील नेते देखील त्यांच्या संपर्कात असतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांना लगावला. त्यांच काम काही ते करत नाहीत, म्हणून प्रोजेक्ट्स महाराष्ट्रातून बाहेर जातात, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांच्यावर केली.

आदित्य ठाकरे यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवानवर भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही सहा ते सात महिन्यात मुंबई महापालिकेचे अनेक भ्रष्टचार पुढे आणले आहेत. त्याची माहिती राज्यपालांना दिली आहे. प्रशासक या गोष्टीला जबाबदार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार बसले आहे. ६००० कोटींचा रस्ता घोटाळा झाला. १० रस्त्यांची काम देखील अद्याप सुरू झालेली नाही. गद्दार गँग सोडली तर सगळ्यांनी तक्रारी केल्या. मात्र कारवाई झाली नाही. खडी घोटाळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सामील आहेत, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aaditya Thackeray on Uday Samant
'The Kerala Story'ची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर Jitendra Awhad संतापले, म्हणाले, ज्यांच्या DNA मध्ये...

उदय सामंत काय म्हणाले होते?

राज्यातील सत्तासंघर्ष आणि १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय कधीही येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. याबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. १७२ आमदार आमच्या पाठिशी आहेत. आमची बाजू योग्य प्रकारे सुप्रीम कोर्टात मांडली आहे. कोर्ट योग्य तो निर्णय देईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर महाविकास आघाडीमधील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसांत त्याची महाराष्ट्राला प्रचिती येईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक जण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करत आहे, असे मंत्री उदय सामंत ठामपणे म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com