संजय जाधव
बुलडाणा : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी सरकारने (MVA) केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना नोटिसा बजावल्या आहेत. तर पुढील सुनावणी ११ तारखेला होणार आहे. एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने हा प्रकार शिवसैनिकांच्या फारच जिव्हारी लागला आहे. त्यानंतर शिवसैनिकांना आंदोलन, मोर्चा , बैठकांचा सपाटा लावला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलडाणा (Buldhana) येथे देखील शिवसैनिकांनी बैठक आयोजित केली, मात्र, या बैठकीला जिल्ह्यातील सेनेच्या खासदारांनी अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ( Maharashtra Political Latest News)
बुलडाण्यातील खासदार , पदाधिकारी, शिवसैनिकांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी व पुढील भूमिका ठरविण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार प्रतापराव जाधव हे मार्गदर्शन करून पुढील दिशा काय असणार आहे ? हे सांगणार होते. या बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी , शिवसैनिक मिळून जवळपास फक्त २०० जण हजर होते. या बैठकीत जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पाठ फिरवली आहे. तसेच खासदार प्रतापराव जाधव यांनी सुद्धा बैठकीला अनुपस्थिती दाखविल्याने जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या अनुपस्थितीवर शिवैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. एकंदरीत अजूनही बुलढाण्यातील शिवसैनिक संभ्रमात असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे.
नंदुरबारमध्ये बंडखोर आमदारांविरुद्ध जोरदार निदर्शने
दरम्यान, शिवसेनेचे मंत्री व गटनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांना फोडून वेगळा गट तयार केल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि नवापूर येथे शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात (Nandurbar News) जोरदार निदर्शने केली. महाराष्ट्रातील अनेक आमदार (ShivSena) शिवसेना पक्ष नावाने निवडून आल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासात न घेता वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. या बंडखोर आमदारांविरोधात शहादा आणि नवापूर येथे शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना नंदुरबारमधील शिवसैनिकांचा जाहीर पाठिंबा असल्याचे शिवसैनिकांनी जाहीर केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.