

महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे प्रलंबित आहे. याप्रकरणी निर्णय देण्यासाठी नार्वेकर चालढकल आणि टाळाटाळ करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. आता यावर राहुल नार्वेकरांनी टीका करणाऱ्यांना चांगलंच ठणकावलंय. माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. (Latest Marathi News)
काय म्हणाले नार्वेकर?
मी कोणत्याही दबावाला बळी पडणारा नाही. सुनावणीला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा वेळ घेऊनच योग्य तो निर्णय दिला जाईल. ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही ते देखील या संदर्भातलं वक्तव्य करतायत. माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्या दबावाचा कोणताही उपयोग होणार नाही, अशा शब्दांत राहुल नार्वेकरांनी विरोधकांना फटकारलंय.
राहुल नार्वेकरांसमोर शिवसेना शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटाच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सुनावणी सुरू आहे. निकाल स्पष्ट असतानाही नार्वेकर टाळाटाळ करतायत, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिकाही दाखल केली. त्यामुळे नार्वेकरांना अपात्रतेसंदर्भात नोटीस बजावण्यात आल्याचं म्हटलं जातंय.
आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. पुढील युक्तीवाद १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ सचिवांनी सोमवारी नोटीस पाठवली. आपली कागदपत्रे पुढील आठवडाभरात सादर करण्यात यावीत अशा सूचना नोटीसमधून देण्यात आल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.