Maharashtra NCP News: शरद पवारांच्या इशाऱ्याकडे अजित पवार गटाचे दुर्लक्ष... प्रफुल पटेलांच्या बॅनरवर झळकले फोटो; चर्चांना उधाण

Sharad Pawar Vs Ajit Pawar: एकीकडे शरद पवार यांनी अजित पवार गटास फोटो वापरण्यास मनाई केली असतानाही त्यांच्या बॅनरवर पवार झळकताना दिसत आहेत.
Praful Patel On Sharad Pawar
Praful Patel On Sharad PawarSaam TV
Published On

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Maharashtra NCP Crisis: राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही फुट पडल्याने दोन गट तयार झाले आहेत. पक्षफुटीनंतर एकीकडे शरद पवार यांनी अजित पवार गटास फोटो वापरण्यास मनाई केली असतानाही त्यांच्या बॅनरवर पवार झळकताना दिसत आहेत. सध्या प्रफुल पटेल यांच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Praful Patel On Sharad Pawar
Ahmednagar Marriage News : लग्न झालेलं असताना दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढला, पत्नीने पतीला अशी अद्दल घडवली की आयुष्यभर लक्षात राहील

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडल्यानंतर खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) प्रथमच त्यांच्या भंडारा आणि गोंदिया या गृह जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. या मेळाव्यातून ते आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या दौऱ्याआधी प्रफुल पटेल यांचे भंडारा शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून स्वागत करण्यात आले आहे. या बॅनरवर खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांचेही फोटो झळकल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे राजकीय मैदानात एकमेकांवर कुरघोड्या सुरू असताना एकत्र बॅनर झळकल्याने राष्ट्रवादीत नेमकं चाललयं काय? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

Praful Patel On Sharad Pawar
Nashik Onion Market: नाशकातील कांदा लिलाव सलग तिसऱ्या दिवशीही बंद; व्यापाऱ्यांचे परवाने होणार रद्द?

शरद पवारांनी दिली होती ताकीद...

दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामिल झाल्यानंतर शरद पवार चांगलेच आक्रमक झाले होते. अजित पवार गटाला त्यांनी त्यांचे फोटो वापरण्यास मनाई केली होती. तसेच माझा फोटो वापरल्यास न्यायालयात जाण्याचीही ताकीद त्यांनी दिली होती. मात्र तरीही अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे फोटो वापरले जात आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com