
नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पावसानंतर धरणातून पाणी सोडण्यात आलं.
हसनाळ गाव पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने सर्व घरं जमीनदोस्त झाली.
या घटनेत ५ ते १० लोकांचा मृत्यू, अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला.
पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनावर स्थानिकांनी निष्काळजीपणाचा आरोप केला.
नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार उडालाय. ढगफुटीसदृश्य पावसामुळे मुखेड तालुक्यातील पाच ते सात गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. अनेक नद्यांना पूर आला असून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला गेल्याने एक अख्खं गाव पाण्यात बुडालंय.
यावरुन पाटबंधारे विभागावर निष्काळजीपणाचा आरोप केला जातोय. मुखेड तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पाण्यात हसनाळ गाव बुडाले आहे. गावील सर्व घरं जमीनदोस्त झाली आहेत. पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यावेळी गावात ३०० नागरिक होते. धरणातून सोडण्यात येणार नसल्याची खात्री पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली होती, मात्र अचानकपणे पाणी सोडण्यात आलं, असा दावा ग्रामस्थ करत आहेत. धरणाच्या पाण्यामुळे गावातील सर्व घरं जमीनदोस्त झाली आहेत. सर्वांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
दरम्यान आता गावात बचाव आणि मदत कार्य करण्यात येत आहे. लष्कराचे ९५ जवान आणि एनडीआरएफचं पथकाकडून मदत कार्य करत आहे. हसनाळ गावात मुखेड ते भाजपचे आमदार तुषार राठोड पाहणीसाठी २४ तासानंतर आले. यामुळे त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. धरणाचे पाणी सोडण्यात आले तेव्हा काही लोक झोपले होते. जे लोक जागे होते त्यांनी इतरांना उठवून गावातून पलायन केलं. परंतु यात ५ ते १० लोक गावात राहिलेत त्यांचा यात मृत्यू झालाय, अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थाने दिलीय. या दुर्घटनेला कोण जबाबदार अशा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
आतापर्यंत एकूण ८ जणांचा बळी गेलाय. ३००हून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे . नांदेड जिल्ह्यातील पाच लोकांचा मृत्यू यामध्ये झाला. तेलंगणामधील काही लोक देखील वाहून गेली आहेत. एका रात्रीत झालेल्या पावसाने अनेकांचे संसार उध्वद्स्त केलेत.
नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी यंत्रणा कार्यान्वित केली. अनेकांचे जीव प्रशासनाने वाचवले. दुर्दैवाने नांदेड जिल्ह्यातील पाच लोकांचा मृत्यू यात झाला. तेलंगणामधील काही लोक देखील वाहून गेली आहेत. दक्षिणेतील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या सुरू आहे. लेंढी धरण क्षेत्रात ३० टक्के पाणीसाठा करण्याचा विचार होता. या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पूर कसा करण्यात आला. या संदर्भात पाटबंधारे विभागाला चौकशी करण्यास आदेश दिलेत. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.