Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आमदार, खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार, विनायक राऊत काय म्हणाले, जाणून घ्या

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात १८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची महाराष्ट्रातील आमदार, खासदार भेट घेणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली
Maratha Reservation
Maratha ReservationSaam Digital
Published On

Maratha Reservation

महाराष्ट्रातील सध्याचा ज्वलंत विषय म्हणजे मराठा आरक्षण आहे. धनगर आरक्षणाचाही तेवढाच गंभीर प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे यासंदर्भात १८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि सरकारी पक्षांचे आमदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेणात येणार आहे.

अकोल्यातून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. मागच्या निवडणुकीत ज्या पक्षाने जागा जिंकल्या आहेत त्या जागा त्याच पक्षाला देण्यात येणार आहेत. काही अपवादात्मक परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीत ज्या पक्षाच्या उमेदवारात निवडून येण्याची क्षमता असेल, त्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत समोपचाराने जागा बदलण्याबाबत चर्चा झाली असून अपक्षांनाही जागा देण्यात येणार आहेत. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार आहेत आणि ते जिंकून येतील अशी शक्यता आहे. मेरिटवर जागा वाटप झाली पाहिजे यामध्ये दुमत नाही. पण उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितले आहे की ज्या जागा ज्यांच्याकडे आहेत त्या त्यांच्याकडेच राहतील पण समोपचाराने जागा बदल्याबाबत चर्चा सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी निमित्त 30 नाेव्हेंबरपर्यंत घेता येणार विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन

डिसेंबरमध्ये राजकारणात मोठा स्फोट

एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट केवळ आणि केवळ ईडीच्या दबावापोटी सत्तेत सामील झाले आहेत. भाजपला सत्तेची हाव असते त्यामुळे दोघांवर दाबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. यावरून डिसेंबरमध्ये राजकारणात मोठा स्फोट घडून येईल, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे. आज अजित पवार यांच्यासारखा कार्यक्षम उपमुखमंत्री असल्यामुळे ज्यांना काही कळत नाही ते निष्प्रभ ठरतील यामुळे बोलत आहेत. अजित पवार यांना सुद्धा हे कळालं असाव यासाठी ते काहीतरी प्रयत्न करत असावेत. अजित पवार यांना ठाकरेंनी फ्री हॅन्ड दिला होता. आता त्यांची गळचेपी होत असल्यामुळे ते दिल्लीत जातात, अशी खोचक टीका करतानाच अजित पवार यांनी शिंदेंचं मुख्यमंत्रीपद गेल्यावर ते पद मिळावं यासाठी अमित शाह यांच्याकडे चर्चा केली असल्याचंही ते म्हणाले.

Maratha Reservation
Bhaubeej 2023 : 'स्वाभिमानी'च्या महिला आघाडीची मंत्री हसन मुश्रीफांना खर्डा भाकरीची ओवाळणी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com