उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटींचा खर्च, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Maharashtra Council Election 150 Crore Allegation Sanjay Raut: विधानपरिषदेत महायुतीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्या...मात्र यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा मोठा आरोप करण्यात आलाय...हे आरोप नेमके कोणी केले आहेत? कोणत्या जागेसाठी नेमके किती पैसे खर्च झाले?
Sanjay Raut alleges massive cash transactions behind unopposed victories in Maharashtra Legislative Council elections.
Sanjay Raut alleges massive cash transactions behind unopposed victories in Maharashtra Legislative Council elections.saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

राज्यातली सध्या सुरू असलेली विधानपरिषदेची निवडणूक ही लढण्यापेक्षा माघार घेण्यामुळेच जास्त गाजतेय. विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून उमेदवार जाहीर झाले असताना त्यातील 6 जागा बिनविरोध निवडून आणण्यात महायुतीनं यश मिळवलंय. मात्र, याच बिनविरोध निवडीवरून मोठा वाद पेटलाय. निवडणुकीत माघार घेण्यासाठी तब्बल 150 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.

राज्यभरात महाविकास आघाडीनं अक्षरशः शरणागती पत्करल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्यात कुठेकुठे बिनविरोध निवडणूक झालीये ते पाहूया.

विधान परिषदेत

महायुतीचे उमेदवार बिनविरोध

विक्रम काकडे, राष्ट्रवादी (AP)

पुणे

अनिकेत तटकरे राष्ट्रवादी (AP)

कोकण

रवींद्र फाटक, शिंदेसेना

ठाणे-पालघर

अरुण लाखानी, भाजप

वर्धा चंद्रपूर गडचिरोली

दृष्यंत चतुर्वेदी, शिंदेसेना

यवतमाळ

प्राजक्त तनपुरे, भाजप

अहिल्यानगर

आतापर्यंत निवडणुकां घराणेशाहीच्या आरोपामुळे गाजत होत्या. मात्र आता निवडणुकांनाच फाटा देऊन थेट माघार घ्यायला लावून बिनविरोधचा पॅटर्न राज्यात गेल्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांपासून सुरू झालाय. निवडणुकांमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा थेट विरोधी उमेदवारच खरेदी करून निकालापासून सुटका मिळवण्याचा नवा पायंडा पडत असल्याची चर्चा यानिमित्तानं सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com