Maharashtra MLC Election Results 2026: २३ तासांपासून मतमोजणी सुरू, आता धक्कादायक आकडेवारी समोर; मविआ ३ तर महायुती २ जागांवर आघाडीवर

Maharashtra MLC election result 2026 latest updates: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
Maharashtra MLC Election Results 2026: २३ तासांपासून मतमोजणी सुरू, आता धक्कादायक आकडेवारी समोर; मविआ ३ तर महायुती २ जागांवर आघाडीवर
Maharashtra MLC election result 2026 latest updatessaam tv
Published On: 
  • महाराष्ट्र विधान परिषदेसाठी मतमोजणी सुरू

  • २३ तासांपासून मतमोजणी सुरू आहे

  • पाचपैकी ३ मतदारसंघात मविआ आघाडीवर तर २ ठिकाणी महायुती आघाडीवर

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. २२ तासांपासून मतमोजणी सुरू असून अद्याप निकाल लागला नाही. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली ती अजूनही सुरूच आहे. आज आतापर्यंत आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी ३ जागांवर आघाडीवर तर महायुती २ जागांवर आघाडीवर आहे. कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहे आणि कुणाला किती मतं मिळाली आहेत हे आपण जाणून घेणार आहोत...

पुणे शिक्षक मतदारसंघ -

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात १९ उमेदवार एलिमिनेशन राउंडमध्ये बाद झाले आहे. पुण्यात कौस्तुभ गावडे आणि हर्षदा देशमुख यांचा विजय औपचारिकता बाकी आहे. पुण्यात अजूनही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतमोजणी सुरू आहे. शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांना विजय कोट्यासाठी २५ हजार ७५६ मते मिळाली आहे. तर पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख यांना विजयासाठी ७१३ मते कमी आहे. शिक्षक मतदारसंघात २५ हजार ७५६ इतका कोटा आहे.

भाजपचे कौस्तुभ गावडे यांना १७ हजार ६०० मतं मिळाली. शिंदेच्या शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांना ११ हजार ३२८ मतं मिळाली. राष्ट्रीय समाज पक्षाचे दत्तात्रय सावंत यांना १० हजार ३७७ इतकी मतं मिळाली. काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना ८ हजार ३५० मतं मिळाली.

पुणे पदवीधर मतदारसंघ -

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे. मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा जाधव यांना १ लाख १२ हजार ४०० मतं मिळाली आहेत. भाजपच्या स्मित जाधव यांना १ लाख २ हजार मतं मिळाली आहेत. हर्षदा जाधव यांना कोटा पूर्ण करण्यासाठी ७१६ मतांची आवश्यकता आहे. १ लाख १३ हजार ११३ कोटा पदवीधरसाठी ठरला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ -

मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा कोटा ८९ हजार मतांचा आहे. पहिल्या पसंतीची ७८,५४० मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत. २३ हजार ३६० मतांनी डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत. आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीवर निकाल अवलंबून आहे की कोण विजयी होणार आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी आता सुरू होणार आहे. आज दुपारनंतर अंतिम निकाल येणार आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणूक मतमोजणी तिसऱ्या फेरी निकाल -

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील - ७८,५४०

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण - ५५,१८०

रविराज साबळे - २०,४७०

दिलीप घुगे - ८,३६६

नागपूर पदवीधर मतदारसंघ -

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर आहेत. अधिकृत दुसऱ्या फेरीअंती

अभिजीत वंजारींना ५६,६३० मतं मिळाली आहेत. भाजपचे सुधाकर कोहळे यांना ६०,९२४ मतं मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना २४,२४९ मतं मिळाली आहेत. दुसऱ्या फेरी अखेरीस ४२९४ मतांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत.

अमरावती शिक्षक मतदारसंघ -

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघामध्ये गेल्या २३ तासांपासून मतमोजणी सुरू आहे. १९ व्या बाद फेरी अंती १६ उमेदवार बाद झाले असून शिवसेना महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किरण सरनाईक हे ३५३५ मतांनी आघाडीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखर उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. १९ व्या बाद फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना ८३४८ मतं मिळाली. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ४८१३ मतं मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना ४७८६ मतं मिळाली. विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा आहे. किरण सरनाईक यांना ७७९६ मतांचा कोटा गाठणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com