लर ने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झालाय.
नारायण भोईर असे मृत तरुणाचे नाव आहे. कामावरून नवीन शेवा येथील आपल्या घरी स्कुटी वरून निघालेल्या नारायण भोईर याचा ट्रेलरने धडक दिल्याने मृत्यू झालाय..
मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी दिला नकार.
रंजीत कासले यांनी स्वतः सोशल माध्यमातून ते रात्री नऊ वाजता पुणे विमानतळावर येणार असल्याची दिली होती.
नागपूर पोलिसांनी व्यस्ततेचे कारण सांगून संधीची विनंती केली. आता 23 एप्रिल रोजी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने नागपूर पोलिसांना फहीम खान याच्या जामीन अर्जावर आपली बाजू मांडण्याची अखेरची संधी देण्यात आलीय.
हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी या वेळी लगत असलेल्या एैतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यासंदर्भात छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टकडून तातडीने तक्रार देण्यात आली आहे.
ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा ६ पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर
ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समिती ने अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि डॉ घैसास यांच्यावर ठपका ठेवला नाही
पुणे पोलिसांनी अहवालातील ४ मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससून कडून मागितला अभिप्राय
२ जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भोसरी मधून घेतलं ताब्यात
२ दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोड परिसरात भरदिवसा घातला होता दरोडा
बंदुकीच्या धाकाने तीन दरोडेखोरांनी लुटलं होतं २५ ते ३० तोळे सोनं
सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात येत बंदुकीचा धाक दाखवत केली चोरी
धुळे शहर तरुणाच्या निर्घृण हत्येने पुन्हा हादरलं आहे. दोघा संशयतांनी १७ वर्षीय तरुणाची सिमेंटच्या रस्त्यावर डोके आपटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे, फैजल अहमद अन्सारी असं मृत तरुणाचं नाव आहे, नंदी रोड परिसरामध्ये दोघा संशयतांनी फैजलला दुचाकीने जोरदार धडक दिली, आणि त्यानंतर रस्त्यावर फैजलचे डोके आपटून त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत दिले रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. शहरातील काठे गल्ली सिग्नलवर मुजोर रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांवर दगडफेक करणारे आणखी 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल 14 आणि आज 16 जणांना कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या एकूण 30 जणांना पोलीस कोठडी सुनावलीय. आज 16 जणांना कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या विरुद्ध शिवाजनगर येथील सत्र न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 893 पानांचे हे दोषारोपपत्र आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने 52 दिवसात हा तपास पुर्ण केला आहे. एकूण 82 साक्षीदार तपासले.त्यातील पाच साक्षीदारांचे कोर्टासमोर जबाब नोंदविण्यात आले आहेत. तसेत 12 पंचनामे करण्यात आले आहेत. गुगल सर्च हिस्ट्री पंचनामा, ध्वनीचा तुलनात्मक तीव्रता पंचनामा करण्यात आला आहे.
सोनगिरी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांना सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणं चांगलंच भोवल आहे, सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीची दखल घेत, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी जिल्हा प्रशासनातर्फे झाल्यानंतर यामध्ये संबंधित सरपंच महिला दोशी आढळल्यानंतर, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे, ही तक्रार संबंधित अपात्र झालेल्या महिला सरपंचांच्या ननंदनेच केली होती.
महामार्गावर चालत्या कारच्या खिडक्यांमधून बाहेर निघून कारमध्ये सुरू असलेल्या गाण्यांवर डान्स करत तरुणांचा धिंगाणा सुरू आहे. पुणे-सातारा महामार्गावर साताऱ्याच्या दिशेने जात असताना नवले ब्रिज ते कात्रजचा नवीन बोगदा यादरम्यान हा प्रकार सुरू होता. महामार्गावरील मुख्य 2 लेन अडवून कारच्या खिडकीमधून बाहेर निघून स्वतः सह महामार्गावरील इतरांचा जीव धोक्यात घालून चालत्या गाडीत तरुणांचा सुरू होता.
भरदिवसा पवई परिसरात रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पवई पोलिसांनी अटक केली. पवई पोलिसांकडून 24 तासाच्या आत 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 दिवसांपूर्वी दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत रस्त्यावर असलेल्या 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासून दोन आरोपींना अटक केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या च्या एकीकरणा संदर्भात सुनील तटकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे. अजित पवार व शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र, यावी यासाठी मी विठुरायाला कोणतही मागणं घातलेलं नाही आणि ते घालण्याचं कोणतं कारण ही नाही, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळून एनडीएसोबत जाण्याचा सामुदायिक निर्णय घेतलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलाय. उद्याच्या राजकीय भविष्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यात आम्हाला यश मिळत राहो. आमच्या या विचारांशी जे असतील त्यांच्यासोबत आहोत, असं ही तटकरे यांनी स्पष्ट केलं.
घणसोली गावातील रस्त्याने जाताना तरुणीला धक्का देणाऱ्या त्रिकुटाला जाब विचारणाऱ्या तरुणाला सदर त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. राकेश मोरे असे जखमी तरुणाचे नावं असून त्याच्यावर जे.जे.रुग्णालयात उपचार करण्यात येतायत. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक केलेय तर दोघांनी पळ काढलाय.
19 वर्षीय तरुणी आपल्या आईसह बिल्डींगमध्ये जात असताना त्याठिकाणी उभ्या असलेल्या तिघांचा तरुणीला धक्का लागला. यावरुन तरुणीचे त्रिकुटासोबत वाद सुरु असताना राकेश ने मध्यस्थी करत जाब विचारला असता याचा राग अनावर झाल्याने तिघांनी मिळून राकेश ला जबर मारहाण केलेय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेतायत.
धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारे गेले आहे. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली आहे ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडाव, असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्री यांनी केला आहे. तसेच भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केले आहे. म्हणून तुम्ही त्याच टेन्शन घेऊ नका. मोठा कार्यक्रम करू आपण, असेही नामदेव शास्त्री म्हणाले. तसेच नारळी सप्ताहाला धनंजय मुंडे उपस्थित का राहिले नाही याचे कारण सांगितले.
4 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या रात्री अमरावती शहरातील रवी नगर परिसरात तीर्थ वानखडे या 20 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली.. या हत्यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली.. मात्र या हत्येने रवी नगर परिसर हादरला..परिसरात संतापाची लाट पसरली..त्यामुळे आज रवी नगरातून नागरिकांनी थेट राजापेठ पोलीस स्थानकावर मोर्चा काढत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय..या हत्येच्या प्रकरणाचा तातडीने न्याय निवाडा करावा अशी मागणी देखील करण्यात आली..
पुण्यातील साखर संकुल येथे होणाऱ्या AI विद्याच्या बैठकीसाठी दोन्ही पवार एकत्र
दहा दिवसात दोन्ही नेते तिसऱ्यांदा एकत्र येणार
अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्यात शरद पवारांनी उपस्थिती लावली होती
यानंतर साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र आले होते
नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रानंतर विरोधात आज काँग्रेसतर्फे नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालाय समोर धरने आंदोलन करण्यात आलय. दरम्यान आमेरिकेने भारतावर येवढा मोठा टेरीप लावला आहे. मोदी सरकार आमेरिके विरोधात बोलन होत नाही. तसेच जे अनावश्यकर कर देशावर लावण्यात आले आहे. ते कुठेतरी झाकण्यासाठी असे प्रकरण उकरून काढुन भाजप राहुल गांधी व सोनिया गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.असा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे मुखपत्र असलेले नेशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने न्यायालयात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे.ज्या प्रकरणात सोनिया गांधी आणी राहुल गांधी यांचा काहीच समावेश नसताना हेतूपूरस्पर त्यांना अडकविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोप करत वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकार लोकशाही विरोधी काम असच सुरु ठेवेल तर काँग्रेस रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरेंनी आज सहकुटुंब महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतलं.यावेळी तटकरेंची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी असे साकडे पुजाऱ्याकडून देवीला घालण्यात आले.तर आपण सार्वजनिक जीवनात वागत असताना अजित पवार असो की वैयक्तिक काहीही मागत नाहीत जनतेचे हित व्हावे असे तटकरे यावेळी म्हणाले.
मुरबाड तालुक्यातील सरळगांव इथं घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासांत बेड्या ठोकल्या.
मेघराज घुडे यांच्या घरी घरफोडी करत चोरट्यांनी 3 लाख 68 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. मुरबाड पोलिसांच्या पथकानं अवघ्या 2 तासांत या गुन्हयाचा छडा लावून गुन्हयातील आरोपी भाऊ घुडे याला मुद्देमालसह अटक केली. तसच आरोपीकडून चोरीला गेलेले 3 लाख 68 हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलय. चोरी प्रकरणात आणखी किती जणांचा हात आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील अकोला जिल्ह्यात
अकोल्यात ४३.७ अंश तापमानाची नोंद
ब्रह्मपुरी, चंद्रपूर मध्ये ४२.४, यवतमाळ मध्ये ४२.२, वाशिम मध्ये ४१ अंश तर नागपूर मध्ये ४० अंश तापमानाची नोंद
मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची नोंद बीड मध्ये. बीड मध्ये ४२.४ अंश तापमान
परभणी मध्ये ४१.५ तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ४१.४ अंश तापमानाची नोंद
मध्य महाराष्ट्राचा विचार करता पुण्यातील लोहगाव मध्ये ४३ अंश तापमानाची नोंद
जळगाव, मालेगाव, सांगली सातारा मध्ये पारा ४० अंशाच्या वर
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तबला पेटी क्लासला गेलेल्या नऊ वर्षांच्या मुलाचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने वेगवेगळ्या प्रकरणांत जप्त केलेला 477 किलो 969 ग्रॅम गांजा रांजणगाव एमआयडीसीतील 'महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लिमिटेड' या कंपनीच्या भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला.
राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण येत्या १ मे रोजी, महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने, मोठ्या थाटामाटात होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच एल्गार आंदोलन.
वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर.
केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादीकडून आंदोलन.
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन.
केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून घोषणाबाजी.
राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन.
पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास, वैदुवाडी परिसरातील गोपाळवाडी येथे एका टोळक्याने १५ ते २० वाहनांची तोडफोड केली.
रणजीत कासले याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत "मी पुणे विमानतळावर दाखल होणार आहे" अशी माहिती दिली आहे. त्यामुळे तो पुण्यात नेमका कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनाधिकृत बांधकामाच्या वादावरून सलग दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता आहे. दुसऱ्या दिवशीही संपूर्ण परिसर सील आहे. पोलिसांचा २४ तास बंदोबस्त तैनात आहे. संपूर्ण अनाधिकृत बांधकाम हटवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली.
महावितरण कार्यालयात हातात कोयता घेऊन एका तरुणाचा धुडगूस, कोयत्याने तोडफोड केली. नवीन मीटर मिळत नसल्याने तरुणाची महावितरण कार्यालयात गुंडगिरी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. जीन्सी पोलीस ठाण्यामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी तरुणावर गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगरच्या अहिंसानगर महावितरण कार्यालयातील प्रकार
कैसर शेख असं गुंडगिरी करणाऱ्या तरुणाच नाव
महावितरण कार्यात धुडघूस घालणारा तरुण सीसीटीव्ही कैद
महावितरण कार्यातील खुर्च्या आणि साहित्यांची कोयत्याने केली तोडफोड
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकात पथकात दोन नवे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. केज पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय या ठिकाणाचे हे कर्मचारी आहेत. याबाबतचे आदेश बुधवारी गृह विभागाने जारी केले.
सांगली महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून सत्यम गांधी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. सत्यम गांधी यांनी पहिल्याच दिवशी सांगलीत येत महापालिकेत आपल्या कामकाजाला सुरुवात केली. नागरिकांनी कोणत्याही तक्रारीबाबत कार्यालयात येऊन थेट संपर्क साधावा असा आवाहन त्यांनी केलंय. सहकारी कर्मचाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार त्यांना कामाच्या प्राथमिकता स्पष्ट केल्या असून त्यानुसार सर्व कार्यालयांमधील स्वच्छता, नागरिकांच्या तक्रारींची वेळीस दखल आणि निराकरण तसेच कार्यालयीन कारभारात पारदर्शकता आणावी असे संकेतही त्यांनी दिले.
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन तिकिटांच्या काळाबाजाराचा प्रकार उघडकीस आला आहे. ६०० रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल दोन हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. २२ मार्चला निदर्शनास आला देणगी दर्शन पासच्या काळाबाजाराचा प्रकार होता.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ वेगाने वाढत आहे. बचत गटांना विविध व्यवसायासाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठाही करण्यात येत असून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२५ वर्षात 233 कोटींचे कर्ज वाटप झाले आहे. यामुळे महिला स्वावलंबी होत असून विविध उत्पादने घेऊन त्याची विक्री ही करत आहेत. जिल्ह्यात सध्या 90 हजारांवर महिला लखपती दिली झाल्या आहेत.
- काठे गल्ली सिग्नल परिसरातील अनाधिकृत बांधकामावरील महापालिकेच्या कारवाईला स्थगिती
- सर्वोच्च न्यायालयाने दिली महापालिकेच्या कारवाईला स्थगिती
- महापालिकेने बजावलेल्या अतिक्रमण नोटीसला ट्रस्टने दिलं होतं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
- महापालिकेच्या नोटीस विरोधात उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली नसल्याचा ट्रस्टकडून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
- महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन राबवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी
- या पुढील कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश
- उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी का केली नाही? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विचारला खुलासा
- 21 एप्रिलला होणार पुढील सुनावणी, सुनावणीत महापालिका काय बाजू मांडणार? याकडे लक्ष
वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली असून, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १०.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे . शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला काटकसरीने पाणी वापरण्याच आवाहन केल आहे
वाशिम तालुक्यातील 84 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आज आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. तहसील कार्यालयातील सभागृहात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. या प्रक्रियेत 21 पदे सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी, 21 पदे सर्वसाधारण महिलांसाठी, 10 अनुसूचित जाती पुरुष, 10 अनुसूचित जाती महिला, 9 नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) पुरुष, 10 OBC महिला, 1 अनुसूचित जमाती पुरुष आणि 2 अनुसूचित जमाती महिलांसाठी अशी आरक्षण यादी ठरवण्यात आली. सोडतीदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी सर्व चिठ्ठया लहान मुलांच्या हस्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत उघडण्यात आल्या.
- बोगस शिक्षक भरती प्रकरणात आरोपी असलेले विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्याकडून सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल
- उल्हासनगर यांच्याकडून वकिलाने केला कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल
- बेकायदेशीर अटक, प्रक्रियात्मक त्रुटी आणि अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी लक्ष्य करून कट रचल्याचा दावा जामीन याचिकेत केला आहे
- योग्यता नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यध्यापक पदाला मंजुरी दिल्या प्रकरणी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना पोलिसांनी अटक केली
- पाच दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर कोर्टाने उल्हासनगर आणि इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
- न्यायालयीन कोठडी सुनावताच उल्हासनगर यांच्याकडून जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे
- पुढील सूनवणीपूर्वी कोर्टाने तपास अधिकाऱ्याचा या जामीन प्रकरणी अभिप्राय मागितला आहे
मोहम्मद हमीद इंजिनिअर याच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी राज्य सरकारमुळे वारंवार पुढे ढकलावी लागत आहे त्यामुळे सत्र न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला फटकारले. मोहम्मद हमीद इंजिनियर हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष आहे.
17 मार्चला नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद हमीद इंजिनिअरला विविध गुन्ह्याखाली अटक केली आहे. हमीद इंजिनिअरने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र राज्य सरकारने यापूर्वी विविध कारणास्तव तीन वेळा तारीख वाढवून मागितली होती.
बुधवारी तपास अधिकारी न्यायालयात हजर राहू शकले नाही ज्यामुळे पुन्हा तारीख मागण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करत अंतिम संधी म्हणून अर्जावर येत्या 21 एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
शाळांमध्ये आता शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती या चार समित्या राहणार आहेत.
शाळास्तरावरील १२ समित्यांचे शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.
‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’नुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार
अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत.
जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
लॉटरी, बक्षीस लागल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या सायबर चोरांनी आता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा आधार घेऊन फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
पाणीपट्टी थकबाकी भरा, अन्यथा रात्री नळजोड तोडण्यात येईल, असे मेसेज आणि लिंक पाठवत नागरिकांना तातडीने थकबाकी भरण्यास सांगून फसवणूक केली जात आहे.
अशा पद्धतीने फसवणूक झाल्याच्या काही तक्रारी महापालिकेकडे आल्यात
त्यांनतर सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे
अकोल्यात उन्हाचा पारा आता 43 अंशावर गेलाय.. या उन्हाच्या तिव्रतेमूळ नव्याने लागवड केलेल्या केळी पिकांच्या रोपांची अवस्था नाजूक होऊ लागली.. त्यामुळ अकोल्यातल्या तेल्हारा तालूक्याला शेतकरी आता केळी रोपांना वाचविण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करताना दिसू लागलेये. तेल्हारा तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागात मार्चअखेर केळीच्या रोपांची लागवड केली गेलीये. विशेष म्हणजे हे केळीचे पीक अगदी नाजूक असल्याने उन्हापासून संरक्षण करणं अवघडच राहत. म्हणून आता पिक वाचविण्यासाठी शेतकरी रोपांच्या तीन किंवा चारही बाजूला काड्या लावून कागदाचा वापर करून रोपाला संरक्षण देताहेत..
अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरच पालिका शाळा क्रमांक १ च्या आवारात हा अनधिकृत मदरसा उभारण्यात आला होता. यानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संख्ये यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने कोणताही पोलीस बंदोबस्त न घेता या मदरशावर तोडक कारवाई केली आणि जेसीबीच्या साहाय्याने हा मदरसा जमीनदोस्त केला. या कारवाईनंतर शहरातील इतर शासकीय जागेतील अतिक्रमणांवरही कारवाई होते का? हे पाहावं लागणार आहे
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते विधीज्ञ अॅड. संदिप कागदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पंढरपुरातील विश्वभूषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. चार दिवसात अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याच्या तीन घटना रायगडमधुन समोर आल्या आहेत. बुधवारी रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात घरा शेजारी खेळत असलेल्या 10 वर्षीय मुलीला बांधकाम सुरु असलेल्या घरात बोलावून आरोपी गणेश रसाळ वय वर्ष 33 राहणार तळा याने अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे केल्याची घटना घडली. तर त्याच दरम्यान कर्जतमध्ये शाळेच्या बसमध्ये बस चालक करण पाटील याने दोन शाळकरी मुलींसोबत अश्लिल चाळे केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळा पोलीस ठाण्यात आरोपी गणेश रसाळ आणि कर्जत पोलिस ठाण्यात बस चालक आरोपी करण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 14 एप्रिल रोजी महाड शहरात शिकवणीवरून घरी परत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर सोसायटीच्या ऑफिसमध्ये लैंगिक चाळे केल्याची घटना पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. अल्पवयीन शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या सलग घडणाऱ्या या घटनांमुळे रायगडमध्ये शाळकरी सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उघड विरोधक चांगला पण घरातील छुपा विरोधक बरोबर नसतो आज आमच्यात राहून आमच्या विरोधात कोण होतं हे आम्हाला समजलं ही चांगली गोष्ट असल्याचं समजलं असं शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी म्हटलंय. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील आणि भाचे आस्वाद पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनतर जयंत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.या मेळाव्याला अलिबाग तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभा निवडणूकीत या लोकांनी आमच्या विरोधात काम केलं हे आज स्पष्ट झालंय असं जयंत पाटील म्हणाले. यापूर्वी असे अनेक धक्के पक्षाने सहन केलेत ज्यांना मोठं केलं ते खोटे निघाले. पक्ष सोडून गेले परंतु नवीन नेते तयार करण्याची ताकद पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच आमदार रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात येत आहेत. तर अजित पवारांच्या स्वागताचे रोहित पवार यांच्या नावाने बॅनर लागले आहेत. कर्जत जामखेडच्या पावन भूमीत सहर्ष स्वागत, स्वागतोत्सुक आमदार रोहित दादा पवार मित्रपरिवार आणि समस्त कर्जत जामखेडकर अशा अश्याचा झळकला बॅनर
जामखेड शहरात पोलीस स्टेशन रोड वर लावण्यात आला बॅनर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.