पुरंदर विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे.
फुरसुंगी येथील ‘रॉयल स्टे ईन लॉजिंग’ या लॉजवर शिवतारे यांनी निवडणूक प्रचारासाठी हवेत ‘एअर बलून’ बांधला आहे. ज्यावर शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण तसेच विजय शिवतारे शिवतारे यांच्या संदर्भातील प्रचाराचा मजकूर आहे. आचार संहितेच्या काळात बॅनर लावणे तसेच होर्डिंग लावणे यावर राजकीय पक्षांना तसेच उमेदवारांना प्रतिबंध आहे.
त्यामुळे या संदर्भातील व्हिडीओ तसेच फोटोही सुरवसे पाटील यांनी प्रसारित केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार असा सवाल सुरवसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
शहरात एकीकडे विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवांचे कॉलमुळे विमान प्रशासनाला हैराण करून सोडल्याची घटना मागील काही दिवसात घडल्या त्यातच आता बुधवारी कात्रज परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयालाही धमकीचा ई-मेल आला आहे.
Maharashtra Marathi News Live Updates : भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या (महिला आघाडीचा) प्रदेश सरचिटणीस हंसा खोब्रागडे यांनी प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला.एकेकाळी जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती राहिलेल्या हंसा खोब्रागडे नाना पटोले यांच्या खंदे समर्थक मानले जातात. जिधर नाना.. उधर जाना.. अशा प्रकारचे श्लोगन देत भाजपमधून त्या नाना पटोलेंसोबत काँग्रेसमध्ये गेल्या होत्या. अनेक वर्षापासून ते कॉंग्रेस विविध पदांवर काम करीत होत्या.मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराज असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस हंसा खोब्रागडे यांनी पदाचा राजीनामा देत कॉंग्रेस ला रामराम ठोकलं.
कन्नडचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची पोलिसात तक्रार केली आहे. काही गाड्या माझा पाठलाग करत आहेत काही लोक अपहरणाचा कट रचत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या मागे भाजप नेते रावसाहेब दानवे असल्याचा त्यांचा आरोप आहे. या मतदारसंघात तुमची मुलगी निवडणुकीत उभी आहे, तुम्ही निवडणुकीसारखे निवडणूक लढा मला पराभूत करा हरकत नाही. मात्र असं कमरे खालचा मारू नका असं हर्षवर्धन जाधव म्हणालेत. गुंडगिरी ,मारण्याची धमकी खून करण्याचा प्रयत्न करणं हे आपल्याला शोभत नाही, त्यामुळे असले धंदे करू नका पोलिसांनी मला सुरक्षा द्यावी आणि माझ्या तक्रारीची दखल घ्यावी अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे..
भुलेश्वर परिसरातून २.३ कोटींची रोकड जप्त
१२ संशयितांना घेण्यात आलं ताब्यात
गोपनीय माहितीच्या आधारावर
एल टी मार्ग पोलिसांची कारवाई
निवडणूक आयोगाला दिल्या पोलिसांनी सूचना
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची मोठी कारवाई
बिश्नोई गँगकडून सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक कक्षाला धमकीचा मेसेज आलाय.
आठ दिवसात पंधरा लाख प्रवाशांनी केला प्रवास
एसटीला 17 कोटी पेक्षा जास्त उत्पन्न
दिवाळीच्या काळात राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधील प्रवाशाला प्रवाशांनी पसंती दिल्याचे दिसून आले.
पुणे विभागाने सोडलेल्या बसमधून 15 लाख प्रवाशानी प्रवास केला असून पुणे विभागात 17 कोटी 80 लाख रुपयांची उत्पन्न मिळाले आहेत.
यंदा प्रवासी संख्या वाढली असली तरी उत्पन्नामध्ये घट झाली असल्याचे दिसून आले.
पुणे विभागातून दिवाळी काळात 24 ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान 15 लाख 7 हजार प्रवेशानी एस टी मधून प्रवास केला
ऐरोलीमधील शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचा भाजपासह शिवसेना ठाकरे गटाला धक्का.3 माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजय चौगुले यांना दर्शविला पाठिंबा. माजी नगरसेवक विजयानंद माने, माजी नगरसेवक जब्बार खान आणि माजी नगरसेवक रामदास पवळे यांचा विजय चौगुले यांना पाठिंबा. माजी नगरसेकांसह काही पदाधिकाऱ्यांनी देखील चौगुले यांना दिला पाठिंबा.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते सुरज वाजगे यांच्या कार वर रात्रीच्या वेळी दोन अज्ञातांनी दगडफेक केली असून यात वाजगे यांच्या कार चे मोठे नुकसान झाले आहे.मात्र चालक आणि वाजगे यातून सुखरूप बचावले आहेत.सूरज वाजगे रात्री जुन्नर वरून नारायणगाव कडे प्रवास करत होते.या वेळी हा हल्ला झालाय.यावेळी खासदार अमोल कोल्हेंनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
सारंगी महाजन यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, निवडणुकीचे औचित्य साधून ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना बदनाम केले जात असल्याचे गोविंद मुंडे यांनी माध्यमांची बोलताना सांगितले. परळीच्या जिरेवाडी भागात माझी जमीन होती व त्या जमिनीचा व्यवहार मला अंधारात ठेवून फसवणूक करून करण्यात आला, असे सारंगी महाजन म्हणाल्या होत्या. त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोपही केले होते.
अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या अल्पसंख्याक दर्जाविषयी सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार
सुप्रीम कोर्टाचे ७ न्यायाधिशांचे घटनापीठ देणार निकाल
अलीगड मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याकांच्या संस्थेचा दर्जा दिला जाऊ शकत नाही कारण ते केंद्रीय विद्यापीठ आहे असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता
त्याविरोधात अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि तत्कालीन यूपीए सरकार हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते
सुप्रीम कोर्टाच्या ७ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर अनेक दिवस सुनावणी केल्यानंतर निकाल राखून ठेवला होता
आज मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं घटनापिठ हा निकाल सुनवणार आहे
पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
पूजा खेडकरविरोधात युपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळला जावा अशी मागणी केली आहे
पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण होईपर्यंत दरवेळी पुढील तारखेपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण मिळते आहे
पूजा खेडकरने खोटी कागदपत्र देत अनेक वेळा परीक्षा दिल्याचा आरोप आहे
- नाशिकमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार
- नाशिकच्या तपोवन परिसरातील मोदी मैदानावर आज पंतप्रधान मोदींची सभा
- मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन
- जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारांसह महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची दुपारी १ वाजता जाहीर सभा
- मोदींच्या सभेसाठी तब्बल १ लाख लोक जमवण्याच महायुतीचं नियोजन
- तर सभे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एसपीजी कमांडो, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात
- शहरातील वाहतूक मार्गातही मोठ्या प्रमाणात बदल
- सभा स्थळी येणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांची असणार करडी नजर
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर मद्यपी वाहनचालकांंविरुद्ध मोठी कारवाई.
पोलिसांकडून रात्री नाकाबंदी करून तपासणी करण्यात येत आहे.
गेल्या चार महिन्यांंत मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या 2 हजार 500 जणांंविरुद्ध कारवाई करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात 500 जणांचा वाहतूक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला आहे.
संबंधित वाहनचालकांंचे परवाने किमान सहा महिन्यांंपर्यंत निलंबित होणार.
तसेच वाहन चालविण्यास बंदी असणार आहे.
या कारवाईमुळे मद्यपी वाहनचालकांची आता झिंग आता उतरणार आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद गांधी आणि दापोली मतदारसंघातील मनसे उमेदवार संतोष अबगुल यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे गुहागरच्या दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात स्वतंत्र लढत अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना जोरदार मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ आणि दापोली विधानसभा मतदारसंघ या ठिकाणच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सकाळी 10 वाजता राज ठाकरे गुहागरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.
जालन्याच्या परतूर शहरात आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलंय. परतूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आसाराम बोराडे यांच्या प्रचारार्थ आज परतूर शहरात उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलीय. सायंकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं असून या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आज परतूर मध्ये होणाऱ्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार या कडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री सव्वा अकरा वाजता अमित शहा कोल्हापुरात दाखल झाले. आज सकाळी ते सांगली जिल्ह्यातील सभांसाठी रवाना होणार आहेत. तर दुपारी साडेचार वाजता ते पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं सभेसाठी दाखल होणार आहेत. अमित शहा आपल्या सभांमध्ये महाविकास आघाडी संदर्भात नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी आज शिवाजीनगर येथे सायंकाळी घेणार सभा
सकाळी 10 वाजल्यापासून खासदार सुप्रिया सुळे यांचा पुण्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी रोड शो... रोड शो ची सुरुवात शिवाजीनगर मतदार संघातून होणार
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुनील टिंगरे याच्यासाठी वडगावशेरीत दुपारी 12 वाजता सभा
केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभांचा धडाका असेल. कोल्हापूरवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केलेय.
पंढरपुरात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमने सामने आला आहे. जाहीर सभांमधून एकमेकावर टीका केली जात आहे. २ दिवसांपूर्वी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भागीरथ भालके यांच्या प्रचारात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि त्यांच्या उमेदवाराला आम्ही मोजत नाही, अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली होती. खासदार प्रणिती शिंदे यांच्या या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. पंजाब मध्ये जावून सलूनच दुकान काढून माझंच दूकान चांगलं आहे असं म्हणत असतील तर ते दूकान चाललं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं म्हणत त्यांनी खासदार शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.