Maharashtra Live Update: मुंबईत बाईकचा धक्का लागल्याने महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटात तुफान राडा

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 4th january 2025 : आज शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२५. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडीचा वेगवान आढावा, संतोष देशमुख हत्या प्रकरण, लाडकी बहीण योजना अपडेट, राज्यात थंडी परतली, हवामानात बदल, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Marathi
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Mumbai : बाईकचा धक्का लागल्याने महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटात तुफान राडा

बाईकचा धक्का लागल्याने महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटात राडा

मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदित्य निषाद दुर्गादेवी सराफ कॉलेज परिसरातील घटना

मारामारीमध्ये दोन ते तीन तरुण जखमी झाल्याची माहिती

पोलिसांनी मेडिकल करण्यासाठी दोन्ही गटातील जखमी तरुणांना रुग्णालयात नेले

भिवंडी - बागेश्र्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमात भगवती घेण्यासाठी उडाला गोंधळ

बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांचा आज भिवंडी येथील मानकोली नाका येथे कार्यक्रमाचे आयोजन

भभूती घेण्यासाठी आलेल्या महिलांना बाहेर काढण्यासाठी ओढत असताना चेंगराचेंगरी झाली

गर्दी जास्त प्रमाणात वाढल्याने धीरेंद्र शास्त्री स्टेजवरून उतरून निघून गेले

Nandurbar: अतिदुर्गम भागातील मोकस गावात रेशनचा काळाबाजार

अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील मोकस गावात रेशनचा काळाबाजार

रेशनचा गहू, तांदूळ गुजरातला विक्रीसाठी घेऊन जात असताना गावकऱ्यांनी पकडलं

गरीब आदिवासी बांधवांचे हक्काचं रेशन त्यांना कमी देऊन आणि अनेक वेळा रेशन न आल्याचं सांगत सुरू होता धंदा

Nitesh Rane: खोल समुद्रातील मासेमारीवर राहणार शासनाची करडी नजर, नितेश राणे यांचा महत्त्वाचा निर्णय

खोल समुद्रातील मासेमारीवर राहणार शासनाची करडी नजर

मस्त्य विकास व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा महत्त्वाचा निर्णय

ड्रोनच्या माध्यमातून समुद्रातील बोटींवर राहणार नजर

अनधिकृत बोटींवर कारवाईसाठी होणार ड्रोनची मदत

पुढील आठवड्यापासून ड्रोनचा वापर सुरु करणार

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 2 तासानंतर सुरळीत

राजापूर रेल्वे स्थानकावर थांबलेली राजधानी एक्सप्रेस तासानंतर मुंबईच्या दिशेने रवाना

निवसर ते आडवली दरम्यात तुटली होती ओव्हरहेड वायर

जवळच्या स्थानकात उभ्या करुन ठेवण्यात आल्या होत्या गाड्या

ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूकीवर झाला होता परिणाम

क्षुल्लक कारणावरून चार अल्पवयीन मुलांनी केली अल्पवयीन मुलाची हत्या

चंद्रपूर शहराच्या गौतमनगर भागात चार अल्पवयीन मुलांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका अल्पवयीन मुलाची हत्या केली. अंचलेश्वर परिसरात दुचाकीने जाताना दुचाकीचा कट लागून वाहनाचे नुकसान झाल्याचे कारण पुढे आले आहे.

तीवराच्या जंगलाला लागली आग

तीवराच्या जंगलाला लागलेल्या आगीत जंगलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

25 ते 30 कच्च्या झोपड्या जळून खाक

सुदैवाने जीवित हानी नाही

मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात लागली मोठी आग

मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात मोठी आग

वांद्रे पूर्वेकडील भारतनगर परिसरातील खाडी किनाऱ्यावरील कचराकुंडीला आग लागली आहे

भारत नगर परिसरात धुराचे प्रचंड लोट बघायला मिळत आहेत.

अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Beed Breaking : सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व सिद्धार्थ सोनवणे यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. थोड्याच वेळात न्यायालयातील सुनावणीला सुरुवात होईल. 

मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या चोरांना अंधेरी पोलिसांनी केली अटक

मुंबईत मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अंधेरी पोलिसांनी अशाच सराईत मोबाईल चोरांना आणि चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या अशा एकूण तिघांना अटक करून त्याच्याकडून तब्बल 120 मोबाईल हस्तगत केले आहेत

Rajan Salvi: राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक- वैभव नाईक

राजन साळवी हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांनी बाळासाहेबांपासून शिवसेनेमध्ये काम केल आहे. शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे त्यांची नाराजी असेल तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांची नाराजी दूर करतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मेट्रो मार्गाचा आढावा घेतला

सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; विलंब चालणार नाही

अनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेत, त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

अंबरनाथमधील 'त्या' रिक्षाचालकाची मृत्यूशी झुंज संपली!

अंबरनाथमध्ये भरधाव रिक्षा इलेक्ट्रिक पोलला धडकून झालेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. या रिक्षाचालकाची आठवडाभर मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली असून त्याचा उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय.

Maharashtra Live Update: सुदर्शन घुले व सुधीर सांगळे व अन्य एक आरोपी यांची केजच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. आता आरोपींना केज पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यानंतर आता केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. पोलीसांचा मोठा बंदोबस्त

Kokan Railway: रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

निवसर ते आडवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

12.30 च्या दरम्यानची घटना

काही रेल्वे गाड्या विविध स्थानकात थांबून

Santosh Deshmukh Murder Case: सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांची वैद्यकीय तपासणी सुरु

सुदर्शन घुले व सुधीर सांगळे व अन्य एक आरोपी यांची केजच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू

वैद्यकीय तपासणीनंतर करणार कोर्टामध्ये हजर

रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

तळोजा मध्ये त्याचा "आका"आहे ,महेश गायकवाड यांचा नाव न घेता गणपत गायकवाड यांना टोला

नराधम विशाल गवळीला फाशी द्या किंवा एकाउंटर करा ..कल्याण पूर्वेतील नागरिकांची स्टेशन परिसरात सह्यांची मोहीम

Devendra Fadnavis:फडणवीसांच्या त्या कृतीचे कोल्हेंकडून स्वागत..

आळंदी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात भेट म्हणून देण्यात आलेला जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नम्रपणे नकार दिला, जिरेटोपास श्रध्देने वंदन करून योग्य सन्मान केला ही कृती अतिशय स्तुत्य व स्वागतार्ह असल्याचे ट्विट करत कोल्हेंनी फडणवीसांच्या या कृतीचे स्वागत केलंय.

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण...सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला केज न्यायालयात हजर करणार

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघाची नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये सुरू असलेली चौकशी संपली

सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना केज न्यायालय मध्ये हजर करणार

सुदर्शन घुले आणि सुदर्शन सांगळे दोघाला केज कडे हलवले

BJP: भाजप पदाधिकाऱ्याची दुचाकी जाळली; आंबिवलीतील घटना

आंबिवली परिसरात धक्कादायक प्रकार

भाजप पदाधिकाऱ्याची दुचाकी जाळली

घटना सीसीटीव्हीत कैद

खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल

या आधी त्यांच्या दुकानावर देखील झाला होता हल्ला

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण... सिद्धार्थ सोनवणे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

मस्साजोग गावातून सिद्धार्थ सोनवणे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात..

सोनवणे यांची बीड पोलिसांच्या विशेष पथकाकडून कसून चौकशी सुरू..

नवीन आयफोन घेण्यासाठी अल्पवयीन मुलाने केली शेजारच्या घरात चोरी...

आयफोन जुना झाल्यानं नवीन आयफोन घेण्यासाठी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत नोटीस देऊन सुटका करण्यात आलीय...त्याच्याकडून शेजारच्या घरात ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पाचपावली पोलिसाना यश आले.. बाबाबुद्ध नगर येथील पुष्पांजली नागदिवे सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले असता.. त्यावेळी अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा नोंद केला होता.. तपासात मात्र हा धक्कादायक प्रकार समोर आला..

Jalgoan: जळगाव जामोदमध्ये गाडी लावण्याच्या वादातून वाहनाची तोडफोड ..

जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर चौकात पान टपरी शेजारी मालवाहू dj गाडी उभी करण्याच्या कारणावरून तीन व्यक्तींनी शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार स्थानिक आठवडी बाजार परिसरात राहणारे मोतीलाल सुंदरलाल गुप्ता यांनी जळगावजामोद पोलीसात दाखल केली आहे....

प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी तपोवन एक्सप्रेस एक किलोमीटर मागे आली...!

जर एखाद्या धावत्या  रेल्वेमधून जर कुणी पडले असेल तर त्याच्यासाठी रेल्वे थांबत नाही असे आपण नेहमीच बघतो मात्र आज याउलट घटना घडली आहे,मुंबई वरू सकाळी निघणारी मुंबई -नांदेड कडे जाणारी तपोवन एक्सप्रेस मनमाड स्टेशन (हद्दीत) 11 वाजेच्या दरम्यान येत असतांना एक प्रवाशी पडला असल्याचे समजले आणि काय मग रेल्वे ड्रायव्हर आणि गार्डने थेट एक ते दिड किलोमीटर मागे घेतली.

Pune: पुण्यात एका बिल्डिंगच्या पार्किंगमधील १० दुचाकींना आग

पुण्यात काल मध्यराञी एक वाजता आंबेगाव खुर्द, स्वामी नारायण मंदिर, मधुरांगण अपार्टमेंट येथे पार्किंगमधील 10 दुचाकींना आग

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात, जखमी कोणी नाही

Amravati: अमरावती जिल्ह्यात अनेक भागात तुर पिकावर दवाळ रोगाच सावट...

तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तूर उत्पादक शेतकरी संकटात..

तूर उत्पादनात मोठा फटका;उत्पादन घटनार.

झालेलं नुकसान विमा कंपनीच्या निकषात बसत नाही.

Waalmik Karad: वाल्मिक कराडला व्हीआयपी सेवा नकोच-निलेश लंके

वाल्मिक कराडला व्हीआयपी सेवा नकोच;

आरोपीला व्हीआयपी सेवा मिळत असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई करा,निलेश लंके

राजन साळवी यांना मातोश्रीवर बोलावले आहे - विनायक राऊत

विधानसभा निवडणूक वेळी लांजा किंवा राजापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा लावल्या होत्या. पण त्या त्यांनी नाकारल्या होत्या

राजन साळवी उद्धव ठाकरे यांना कधीही फोन करून बोलू शकतात - विनायक राऊत

Suresh Dhas: दोन आरोपींना पकडल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया

पकडलेले आरोपी हे प्यादे आहेत, मुख्य आरोपी आका आहे, मी म्हणालो होतो बकरे की अम्मा कब तक दुवा मागे गी म्हणालो होतो, आज दोन आरोपींना अटक केली आहे, एलसीबी न त्यांना अटक केल्याची माहिती मिळते एलसीबी चे अभिनंदन, असं त्यांनी म्हटलंय

Sharad Pawar: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर...

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असून बारामती येथे युगेंद्र पवार युवा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेला शरद पवार हजेरी लावणार आहेत बारामती येथील शारदा प्रांगणाच्या मैदानावर या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

Pune News: ठाण्यानंतर पुण्यात हिंदी-मराठी वाद पेटला

मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाज अहमद या टिम लीडरला मनसे स्टाईल चोप

एअरटेल च्या कर्मचारी वर्गाला फ्लोअर वर हिंदीच बोलायचं,मराठी बोलले तर कामावरून काढून टाकेल.

हिंदू सणांना सुट्टी न देणे तसेच गेले ३ महिने सदर मराठी पोरांचा पगार केला नाही.

Nandurbar News: स्टेट बँकेचे बनावट नियुक्ती पत्र देत बेरोजगार तरुणाला 12 लाखांचा गंडा....

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरातील धक्कादायक प्रकार.....

नोकरीचे आमिष देत बेरोजगार तरुणाला भामट्यांनी लावला 12 लाख 50 हजारांचा चुना....

फसवणुकीचा प्रकारात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भाऊ असल्याची माहिती...

जेवणाच्या ताटाला रोटीच पाहिजे म्हणून कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायिकाला बेदम मारहाण

जेवणाच्या ताटाला रोटीच पाहिजे या कारणावरून झाला वाद

11 तरुणांनी हॉटेल मालकाला केली मारहाण

हॉटेल मालक महिलेसह तिघेजण जखमी

Maharashtra Live Update: पुण्यात आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाचा व्हिडिओ केला रेकॉर्ड

पिंपरी चिंचवड शहरात एका तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एका ऑटो रिक्षा चालक तरुणाने एक व्हिडियो तयार करून तो व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे

Maharashtra Live Update: विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा आज सर्वपक्षीय सत्कार...

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा आज नगरमध्ये होणार सर्वपक्षीय सत्कार...

खासदार निलेश लंके आणि कर्जत-जामखेडचे महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार उपस्थित राहणार की नाही याची उत्सुकता....

Maharashtra Live Update: संतोष देशमुख खून प्रकरण... पुण्यातून घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळल्या

बीड पोलिसांच्या विशेष पथकाने दोघांना पुण्यातून उचलले

अधिक तपासासाठी सीआयडी च्या ताब्यात देणार

पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, दोन आरोपी मात्र फरार

नांदेड शहरात मागिल काही दिवसापासून जबरी चोरी आणि लुटमारीच्या घटनेत वाढ झालीय.

त्यांच पार्श्वभूमीवर पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केलीय.

नांदेड जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला...

नांदेड जिल्ह्यात तापमानात पुन्हा घसरण झालीय.नांदेड जिल्ह्यात 13 अंश सेल्सिअस एव्हढ्या कमी तापमानाची नोंद झालीय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिन्ही फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार ३ पैकी २ आरोपींना पकडल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती.

तर अन्य एकाला देखील ताब्यात घेतल्याची माहिती..

त्याने देखील आरोपींना फरार होण्यासाठी मदत केल्याची माहिती..

काही वेळात पोलीस अधीक्षक पत्रकारांशी साधणार संवाद

Maharashtra Live Update: धुळ्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला

धुळ्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे, धुळ्यात आज 6.8° इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे, गेल्या काही दिवसापासून धुळ्यात थंडीचा जोर कमी झाला होता, परंतू आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा हळूहळू घसरतांना दिसुन येत आहे,

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धुळ्यात तापमानाचा पारा 4 औंशा पर्यंत घसरला होता, परंतु त्यानंतर तपमानात पुन्हा बदल होत थंडीचा जोर कमी झाला होता, परंतु आता पुन्हा एकदा तापमानाचा पारा हळूहळू घसरत असल्याने धुळेकरांना वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे.

सांगली.. भिलवडी येथे ७ एकर ऊस आगीत भस्मसात.

सांगलीच्या भिलवडी येथील हाळभागात शेतातील ऊसाला अचानक आग लागली. या आगीत सुमारे सात एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. भिलवडी येथील शेतकरी जयवंत जोशी, कुमार वठारे, सना सुतार, बबन मगदूम,अण्णाप्पा मगदूम,सुधीर चौगुले, सुलतान डिग्रजे यांच्यासह आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे..

काल दुपारच्या सुमारास उसाला अचानक आग लागली. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर चितळे यांच्या अग्निशामकच्या गड्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com