Maharashtra News Live Updates : ठाण्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ४ रुग्ण

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 4 june 2025 : आज, बुधवार दिनांक ४ जून २०२५, आरसीबीने आयपीएलवर नाव कोरलं, महाराष्ट्रात पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

ठाण्यात कोरोनाचे आढळले ४ रुग्ण

आजचे कोरोना रुग्ण - ०४

आजच्यासह आतापर्यंतचे एकूण रुग्ण - १३०

(९२ रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण)

रुग्णालयात दाखल रुग्ण - एकूण १२ - (प्रकृती स्थिर)

(त्यापैकी ०९ खाजगी रुग्णालयात आणि ०३ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल.)

गृह विलगीकरण - २५ रुग्ण प्रकृती स्थिर आहे.

Pune : पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय.

बेंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

ननNashik News: सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून बॅनरबाजी

नाशिक ब्रेक -

- सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून बॅनरबाजी

- सुधाकर बडगुजर यांचे नाशिकच्या सिडको परिसरात बॅनर

- भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण या आशयाची बडगुजर समर्थकांची बॅनरबाजी

- बॅनरवर सुधाकर बडगुजर यांच्यासह मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांचा फोटो

- एकनिष्ठता काय असते आता आम्ही दाखवू संघर्ष हा आम्हाला काय नवीन नाही

- भाऊ आता तुम्ही फक्त लढ म्हणा

- बडगुजर यांच्या समर्थनार्थ सिडको परिसरात बॅनरबाजी

Bengaluru Stampede : बेंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून भाजपनं काँग्रेस सरकारला घेरलं

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विजयी मिरवणुकीवेळी एम चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरी झाली. यात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेवरून भाजपने कर्नाटक सरकारवर टीका करताना गंभीर आरोपही केले. काँग्रेसचे नेते फोटो काढण्यात दंग होते. त्याचवेळी मैदानाबाहेर लोक मरत होते, अशी टीका भाजपने केली आहे. गर्दीचे नियोजन न करता आल्यानं चेंगराचेंगरी झाली, असं प्रल्हाद जोशी म्हणाले. सरकार जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले, असंही ते म्हणाले.

Delhi Building collapse : दिल्लीत इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण दबल्याची भीती

दिल्लीतील रोहिणी परिसरात सेक्टर ७ मध्ये व्यावसायिक इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली चार ते पाच जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव आणि शोधकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

Pune News : पुण्यात नाट्यगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास मनाई

पुण्यातील नाट्यगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात येणार आहे. पुणे महालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पुण्यातील यशवंतराव नाट्यगृहातील प्रकारानंतर आधीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

बेंगळुरूत आरसीबीच्या विजयी रॅलीआधी चेंगराचेंगरी, अनेक जखमी; मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

बेंगळुरूमध्ये आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या रॅलीआधी प्रचंड गर्दीच्या रेट्यामुळं चेंगराचेंगरी झाली. यात सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री सिद्धारमय्या हे जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.

Kalyan News: कल्याण -डोंबिवलीत कोरोनाचा तिसरा बळी

कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा तिसरा बळी

आज एका 77 वर्षीय इसमाचा मृत्यू

मयत इसमाला सहव्याधी होती

कोरोनामुळे मयत रुग्णाची संख्या तिनवर

Anjali Damania : अंजली दमानिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चौकशीला हजर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागात चौकशीला हजर

मागील चार तासापासून अंजली दमानिया याची चौकशी सुरूच

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत

त्यासाठी पेपर घेऊन अंजली दमानिया या एसीबी कार्यालयात चौकशीला सामोरे गेले आहेत

Maharashtra News Live Updates : शशांक हगवणे यांच्या अडचणीत आणखी भर

शशांक हगवणे यांच्या अडचणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक फसवणुकीप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची तयारी करण्यात आली आहे.

२०२२ मध्ये पोकलेन मशीनच्या तीन लाख रुपयांच्या भाड्याचे चेक बाऊन्स करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. चाकणमधील भोसले लँड डेव्हलपर्सकडून पोकलेन मशीन भाड्याने घेतले, मात्र दिलेले चेक वटले नाहीत.

पिडीत बबन भोसले यांनी २०२२ मध्येच चाकण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता

आता या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यात, हगवणे यांच्यावर आणखी कायदेशीर कारवाई होण्याचे संकेत

भंडाऱ्यात बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

बियाणे कंपनीनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील मांगली चौरास इथं समोर आला आहे. मांगली चौरस येथील काही शेतकऱ्यांनी आसगाव येथील एका कृषी केंद्रातून रब्बी हंगामात भातपीक लागवडीसाठी केदार सीड्स कंपनीच्या के एस गोल्ड नावाचं भात पिकाचं वाण घेवून त्याची लागवड केली. हे भात पिकाची लागवड केल्यानंतर १०० दिवसात त्याचं उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार असल्याची बतावणी कृषी केंद्र संचालक आणि कंपनीकडून सांगितलं. मात्र, १२५ दिवस लोटूनही भातपीक हाती आलेलं नाही. परिणामी, शेतकऱ्याला या भात पिकासाठी आणखी २० ते २५ दिवस थांबावं लागणार आहे. याची तक्रार कृषी विद्यापीठ आणि कृषी अधिकाऱ्यांना केल्यानंतर एका कृषी तज्ञांच्या टीमनं पिकाची पाहणी केली. यात त्यांनी दिलेल्या अहवालानंतर आता शेतकऱ्यांनी त्याची फजगत झाल्यानं आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी ग्राहक मंचात दाद मागण्यात आली आहे.

भंडाऱ्यात तीन दिवसाचा विश्रांती नंतर मुसळधार पावसाची हजेरी

मेघागर्जना आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह भंडाऱ्यात तीन दिवसाचा विश्रांती नंतर मुसळधार पावसाची हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात वेळोवेळी मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं भात पिकासह पालेभाज्यांची शेतीही धोक्यात आली आहे. आज परत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला. यामुळं हाती आलेल्या भात पिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक वस्तूंची होणार फॉरेन्सिक चाचणी

वैष्णवीआत्महत्या करण्यासाठी जो स्टूल वापरला त्या स्टूलची होणार फॉरेन्सिक लॅब मध्ये चाचणी

स्टूल बरोबरच वैष्णवीला मारहाण करण्यात आलेल्या पहार आणि पाईप सह साडीची होणार फॉरेन्सिक लॅब मध्ये चाचणी

या वस्तूंच्या तपासणीनंतर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाचा दुवा बाहेर येण्याची शक्य

Pune News: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मनसेची महत्त्वाची बैठक

पुण्यात मनसे लागली कामाला

पुण्यातील शहर कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडली बैठक

पुणे महानगरपालिकेतील सर्व जागांवर मनसे निवडणूक लढण्याची शक्यता

मनसे पुणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती

राज ठाकरे 9 जून रोजी पुणे दौऱ्यावर

राज ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांची पुण्यात घेणार बैठक

बैठकीत शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या होणार नेमणुका

Pune: पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट

पुढील ३-४ तासांत पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पालघर, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता

आज सकाळी ११ पासून पुण्यात संतधार पाऊस सुरू आहे

शहरातील मध्यवर्ती भागात आणि उपनगरात संतधार

पुणे अहिल्यानगर महामार्गावर कारेगाव येथे ट्रकने महिलेसह दोन लहान मुलांना चिरडल्याची धक्कादायक घटना

पुणे अहिल्यानगर महामार्गावरुन शिरुरकडे जात असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने दुचाकीवरुन चाललेल्या असताना धडक दिली यावेळी टेम्पो चालकाने या महिलेसह दोन मुलांना चिरडत पुढे निघुन गेला या अपघातात महिलेचा जागीच मृत्यु झाला असुन दोन मुले गंभीर जखमी असुन त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे आरती सावंत असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे तर जखमी स्वराज आणि स्वराली असे बहिण भावाची नावे आहे

अशाराणी भोसले आत्महत्या प्रकारणातील आरोपीना मोहोळ तालुका न्यायालयात दाखल

मोहोळ पोलीस स्टेशनमधून आरोपीना घेऊन पोलीस न्यायालयाकडे झाले रवाना

आरोपी नवरा, सासू आणि सासऱ्यांना घेऊन पोलीस न्यायालयाकडे झाले रवाना

दरम्यान, अशाराणी भोसलेचा मृतदेह ही शवविच्छेदनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात करण्यात आला आहे दाखल

याप्रकारणात मोहोळ न्यायालय काय सुनावणी करत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेच्या बैठका सुरू

मनसे निवडणूक स्वबळावर लढवणार का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जाणार याकडे लक्ष

अंतिम कुठला ही निर्णय झाला नसला तरी सुद्धा मनसे कडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे

आज मनसेच्या शहर कार्यालयात मनसे चे नेते आणि पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली

निवडणुकीत स्वबळावर लढायच का युती करायची याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील असं मनसेच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे

Kalyan: कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्गाडी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे

दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजासह संरक्षक भिंतीचे देखील सुरू होते काम

अवघ्या अर्धा तासाच्या पावसामुळे किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली

हिंदुत्ववादी संघटनांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

विशाळगडावर भरवण्यात येणाऱ्या उरुसवर कायमस्वरूपी बंदी घालावी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

विशाळगड अतिक्रमण मुक्त करा हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

शिवसेना ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेला थोड्याच वेळा सुरुवात

- थोड्याच वेळात शिवसेना ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेला होणार सुरवात

- जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी घेणार आहेत पत्रकार परिषद

- पत्रकार परिषदेला महानगरप्रमुख विलास शिंदे उपस्थित राहणार तर उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित राहण्याची शक्यता

- पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा बडगुजर यांनी काल केला होता गौप्यस्फोट

- मात्र आज होणाऱ्या पत्रकार परिषदेला विलास शिंदे राहणार उपस्थित

- नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर असल्याने पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नसल्याची बडगुजर यांची माहिती

सांगलीत गेल्या पाच दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाची पुन्हा हजेरी.

गेल्या पाच दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून पुन्हा हजेरी लावली अचानकपणे पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली आहे. तर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून पावसाची रिपरिप सांगली जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. गेल्या पाच दिवसापासून पावसाने उघडीत दिली होती. मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण आणि पुन्हा एकदा पावसाची आगमन झाल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी वर्गाच्या पेरण्या सुरू आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्यामुळे या पावसाची शेतकऱ्यांना उत्सुकता होती.

सुशील हगवणे आणि शशांक हागवणे यांचा ताबा मिळावा म्हणून पुणे पोलीस आज कोर्टात अर्ज करणार....

शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याबाबत कोथरूड आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय....

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शशांक हलवणे आणि सुशील हगवणे यांचा ताबा मिळावा यासाठी पुणे पोलीस आज न्यायालयात अर्ज करणार आहेत.....

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात यापूर्वी सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे....

रुख्मिणी माता पालखीचे युवा स्वाभिमान कडून स्वागत...

विदर्भाची पंढरी आणि आई रुख्मिनी मातेची पालखी काल सायंकाळी अमरावतीत दाखल झाली.. रात्री एकविरा मंदिरात पालखीच मुक्काम झाल्यावर आज सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. आज सकाळी राजापेठ चौकात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टी कडून सुनील राणाकडून या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.. आई रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडीचं 431 व वर्ष आहे.. आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केल्या जाते...

सरकारने पालख्यांना देण्यात येणार अनुदान आणि विमा नाकारला,वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

यावर्षी सरकारने पालख्यांना देण्यात येणार अनुदान आणि विमा नाकारला.. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला..

पुरोगामी महाराष्ट्राला पालखीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची पारंपारिक परंपरा आहे..

मागील वर्षी प्रत्येक पालख्यांना 20 हजार रुपयाचे अनुदान देण्यात आले.. यासोबतच पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा विमा देखील काढण्यात आला..

सरकारमध्ये असलेल्या लोकांनी केवळ निवडणुकीच्या तोंडावर वारकऱ्यांना अनुदान दिलं असा आरोप माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला..

हे सरकार केवळ मतासाठी राजकारण करतात.. निवडणूक नाही म्हणून हे सरकार पालख्यांना अनुदान देणार नाही.. असा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी केला.

नवी मुंबईत पावसाला सुरुवात

नवी मुंबईत पावसाला सुरुवात

खारघर बेलापूर वाशी या भागामध्ये पाऊस

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन सज्ज

चड्डी मोर्चा नाशिक ते मुंबई मंत्रालय मोर्चा ठाणे जिल्ह्यात दाखल .

नाशिक जिल्ह्यातील सातपुर M.I.D.C मध्ये असलेल्या ट्रॅक कंपोनंट्स प्रा.लि. या कंपनीत कामगार ऐकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेतृत्वाखाली प्रणीत मार्शल कामगार युनियन ची स्थापना केली कंपनीत युनियन केल्यामुळे कंपनी प्रशासनाने एकूण 80 कामगारांना कोणतीही पूर्व सूचना देताना कामावरून काढून टाकले. यामुळे हे सर्व कामगारांनी नाशिक कामगार आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालय असा पायी चड्डी मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेल मधील आरोपींकडून 300 कोटी मागितले - आमदार सुरेश धस

वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय..

नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता.. म्हणजे तुम्ही फॉल्टी आहात.. त्यांच्यात नैतिकता नाही... आता दीडशे कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचे काय करायचे? बाहेर आले तर यांना लोक शेण हाणणार आहे.. काही लोकांनी टमाटे हाणले मात्र त्याने काही होणार नाही.. हे बाहेर आल्यावर यांना कवट मारले पाहिजे असे धस म्हणाले

अवकाळी पावसाने कोबी पिकाचे नुकसान

राज्यासह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने सतत पंधरा दिवस हजेरी लावली होता.सततच्या पावसाने मात्र शेती पिकाचे मोठ नुकसान होऊन शेतक-यांना त्या मोठा फटका बसला,मनमाड च्या श्रीधर सांगळे या शेतक-याने एक एकरात कोबीची लागवड केली त्यासाठी साठ हजार खर्च केला मात्र अवकाळी पावसाने कोबी शेतातच सडून गेली त्यामुळे त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलय.

धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर

* काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी इगतपुरीत केली होती विपश्चना..

* आज देखील धनंजय मुंडे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल

* संध्याकाळी एका लग्न सोहळ्याला देखील लावणार हजेरी..

वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणच्या अडचणी वाढणार

वारजे पोलीस मागणार निलेश चव्हाण याचा ताबा

पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण याच्या विरोधात आर्मस ऍक्ट नुसार गुन्हा आहे दाखल

कसपटे कुटुंबीयांना बंदुकीने धमकवल्याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा करण्यात आला होता दाखल

बावधन पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या गुन्ह्यात MCR मिळताच वारजे पोलीस घेणार निलेश चव्हाण याचा ताबा

वारजे पोलीस निलेश चव्हाणला करणार अटक

Navi Mumbai: नवी मुंबईच्या घणसोली डेपो मध्ये परिवहन सेवेच्या बसला आग

नवी मुंबई परिवहन सेवेच्या पाच ते सहा बस आगीत जळून खाक

इलेक्ट्रिक बसला आग लागल्याने तिच्या बाजूला असलेली बस जळाली

जय भारत मोटर्स कडून परिवहन सेवेने बस विकत घेतल्या होत्या

बस खरेदीपासून वादाच्या भोवऱ्यात होत्या

सुदैवाने बस मार्गावर धावताना आग लागली नाही

धाराशीवमध्ये पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

धाराशिव मधील उमरगा तालुक्यातील गणेशनगर येथील घटना

अमित बाळू राठोड आणि सुरज अर्जुन पवार अशी मृत मुलांची नावे

तांड्या शेजारी असलेल्या खड्ड्यात पोहायला गेले पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू

उमरगा पोलिसाचा आकस्मात मृत्यूची नोंद

 भंडाऱ्यात पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून अपघात...वाहन चालक किरकोळ जखमी

Anchor : भंडारा इथून साकोलीकडे जाणाऱ्या पोलिसाच्या वाहनाचा टायर फुटला. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रित सुटले आणि पोलीस वाहन डीव्हाईडरवर आदळून पलटली. या अपघातात पोलीस वाहन चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोरी फाटा इथं रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. चालकाला उपचाराकरिता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर वाहन चालक हा लॉक बुक भरण्याकरिता भंडाऱ्यात आला असल्याची माहिती आहे.

Nashik: कांदा निर्यातीवरील रोडटेप सवलत पुन्हा लागू

- २ जून पासून कांदा निर्यातीवरील १.९ टक्के रोडटेप सवलत रद्द झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये देखील पसरली होती नाराजी

- २ जून पासून कांद्यासह २६ नाशवंत कृषिमालावरील निर्यात प्रोत्साहन सवलत अर्थात रोडटेप करण्यात रद्द करण्यात आला होता

- मात्र शेतकरी आणि कांदा निर्यातदारांमध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर सवलत पुन्हा पूर्ववत

- ३ जून पासून कांद्यावरील रोडटेप पुन्हा पूर्ववत लागू, केंद्राकडून निर्णयावर पुनर्विचार करत सवलत पुन्हा लागू

Maharashtra News Live Updates : बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत घाटले वरती बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीडच्या सायबर विभागामधील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासले वेगवेगळ्या व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत मोठमोठे दावे करून आरोप प्रत्यारोप करणारे काही पुरावे समोर आणत आहेत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे रंजीत कसले विरोधामध्ये आता बीडच्या सायबर विभागामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे ही तक्रार संभाजी सुर्वे यांनी दिली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बेताल वक्तव्य आणि चुकीच्या पद्धतीने माहिती पसरवली आहे अशा पद्धतीने तक्रार दिली असून बीडच्या सायबर विभागात गुन्हा दाखल केला असून आता कसले यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली असून कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 1879 हेक्टर वरील पिकांचे नुकसान

जालना जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसलाय. जिल्ह्यातील 1 हजार 879 हेक्टर वरील पिकांवरचं नुकसान झालं असून मोसंबी डाळिंब या फळ पिकांसह उन्हाळी पिकांचा यामध्ये समावेश होता. जालना जिल्ह्यातल्या 3166 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून 211 मीमी पेक्षाही पाऊस जास्त झाला. विजांचा कडकडाट आणि वादळी वार असल्यामुळे 33 घरांची पडझड झाली आणि 122 जनावरांचा विज पडून मृत्यू झालाय. दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे सध्या संथ गतीने सुरू असून नुकसान भरपाई ची मदत मिळणार तरी कधी असा सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे...

संत एकनाथ महाराज पालखीचे १८ जूनला पंढरपूरला प्रस्थान

पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पादुका यावर्षी चांदीपासून बनविलेल्या रथातून पंढरपूरला जाणार आहेत. आषाढी वारीनिमित्त पैठणवरून संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे १८ जूनला विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. नाथांच्या पालखीला चांदीच्या रथाचा साज देण्याची पुण्यात जय्यत तयारी सुरु आहे. सागवानी लाकूड वापरून त्यावर १२० किलो शुद्ध चांदी चढविण्यात येणार आहे. आतापर्यंत लोकवर्गणीतून ८० किलो चांदी जमा झाली आहे. या रथासाठी ११० चौरस घनफूट सागवानी लाकडावर १२० किलो चांदी वापरण्यात येत आहे. त्यासाठी तब्बल २१ लाख रुपये मजुरी देण्यात येणार आहे. आणखी ४० किलो चांदीसाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांनी केले आहे. वारकरी, भाविक, भक्तांचे सहकार्य, लोकवर्गणीतून नाथ महाराजांच्या चांदीच्या रथाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रथ निर्मितीच्या कार्यासाठी पालखी सोहळ्यातर्फे समिती स्थापन करण्यात आली आहे. रथाचे काम पुणे येथील रथ निर्मिती तज्ज्ञ रमेशभाई मिस्री व राजूभाई मिस्री करीत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या रथाचे काम देखील त्यांनीच केले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 8 वर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ वर गेली आहे. यात महापालिका हद्दीतील ७ आणि ग्रामीण भागातील एका रुग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील हे रुग्ण सध्या शहरात वास्तव्यास आहे. या सर्व रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत शहरात महापालिकेकडून जवळपास ३५० संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव-1 डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी एका पत्राद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना कोरोनासंदर्भातील विविध खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. पेशवाई छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने ही नागरिकांना सतर्क राहून जर कोणाला लक्ष्मी आढळली तर तातडीने तपासून घ्यावे आणि कोरोना काळातील जी नियम होते त्या नियमाचे पालन करावं असे आवाहन केले आहे.

कौडगाव येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्कला मोठी गती, 16 कोटी 54 लाख रुपये खर्च करुन मुलभूत सुविधा विकसित केल्या जाणार

धाराशिव च्या कौडगाव एमआयडीसीत उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या उभारणीच्या कामाला गती मिळाली असुन 16 कोटी 54 लाख रुपये खर्च करुन पायभूत रस्ते,पुल,पाणीपुरवठा, पाईपलाईन,वृक्षारोपण व विद्युतीकरण आदी मुलभूत सुविधा निर्माण केल्या जात असुन या कामाचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. कौडगाव एमआयडीसीत 308 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी एकुण 114 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 12.07 कोटींचा रस्ते विकास व उर्वरित रक्कम इतर खर्चासाठी मंजुर करण्यात आली आहे.मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस 2019 मध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान कौडगाव टेक्निकल टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली होती त्यामुळे हा प्रकल्प साकार होण्याच्या दृष्टीने पाउले उचलली जात आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे 'उमेद सावित्री' दालनाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील 'उमेद सावित्री' या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचे उद्घाटन झाले.

मान्यवरांनी दालनाची पाहणी करून महिलांशी संवाद साधला आणि दालनातील वस्तूंची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी बचत गटातील महिलांना शुभेच्छा दिल्या.

पुरंदर विमानतळ विरोधातील शेतकऱ्यांचे सासवड शहरात पोस्टर आंदोलन

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विरोध हा अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. विमानतळ विरोधातील आंदोलकांनी पुरंदर विमानतळ बाधित सात गावातील शेतकऱ्यांनी सासवड शहरातील मुख्य चौकात हातात फलक घेत उभे राहत पोस्टर हटके आंदोलन केले. सासवड शहरातील प्रत्येक चौकात विमानतळ बाधित गावातील शेतकरी, महिला नागरिक हातात विमानतळ विरोधातील मजकूर लिहिलेले फलक घेऊन उभे होते या आंदोलकांच्या पोस्टर आंदोलनाची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. ज्या ज्या चौकामध्ये हे आंदोलक हातात फलक घेऊन उभे होते त्या ठिकाणी रस्त्याने येणारे जाणारे वाहन चालक, नागरिक थांबून हे फलक वाचत होते. फलक हातात घेणाऱ्या आंदोलकांशी याबाबतीत विचारपूस करत होते. यामुळे विमानतळ विरोधातील आंदोलकांनी एक अभिनव असं आंदोलन आज सासवड शहरात केले. विमानतळ बाधितांच्या या पोस्टर आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. विमानतळ बाधित जे आंदोलन या पोस्टर आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात 13 जून पर्यंत कलम 144 लागू असून जमावबंदीचे आदेश आहे त्यामुळे पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊ शकत नाही या आदेशामुळे विमानतळ विरोधात आंदोलन करण्यास मर्यादा येत आहे. प्रशासनाने विमानतळ विरोधातील आंदोलने दडपण्यासाठीच ही जमावबंदी पुणे जिल्ह्यात लागू केली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com