Maharashtra Live News Update : दूषित पाणीपुरवठ्याला पुणेकर हैराण

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक ३० जून २०२५, महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन, हिंदी सक्तीवरून राजकारण, आषाढी वारी, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

दूषित पाणीपुरवठ्याला पुणेकर हैराण

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळा समोरील भागात असणाऱ्या 50 ते 60 घरांना दूषित पाणीपुरवठा

गेले तीन महिन्यांपासून मैला मिश्रित दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप

नागरिकांना उलट्या, जुलाब आणि पोटाचे अजार वाढल्याचा तक्रारी

नळाला पिवळे आणि मैला मिश्रित पाणी येत असल्यामुळे या सगळ्या घरांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचा आरोप

टँकरच्या किंमती वाढल्यामुळे वापरायला वेगळे आणि पिण्यासाठी वेगळे पाणी विकत घेण्याची नागरिकांवर वेळ

लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने तरुणीवर केला चाकूहल्ला

- हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी

- सावंगी रुग्णालयात उपचार सुरू

- वर्धा शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल

- आरोपी युवक पोलिसांच्या ताब्यात

- दोन वर्षापासून दोघांमध्ये होते प्रेम संबंध तरुणीने दिला होता लग्नास नकार

- वर्धेच्या विठ्ठल मंदिर मार्गावरील घटना

- तरुणी खाजगी रुग्णालयात होती नर्स म्हणून कामावर

जनशक्ती शेतकरी संघटनेचे मुक्कामी आंदोलन अजूनही जलसंधारण कार्यालयात सुरूच

सकाळी ठीक अकरा वाजता जनशक्ती शेतकरी संघटना आंदोलक शेतकरी हे मृद जलसंधारण विभाग अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता मृद जलसंधारण येरवडा पुणे यांच्या कार्यालयात दंडवत घालत कार्यालयाच्या दारापर्यंत आले व गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत आपल्या मागण्या संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या आणि पुढील कार्यवाहीसाठी त्यांना काही वेळ देऊन आंदोलक शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली त्यानंतर दिलेल्या अवधीमध्ये प्रशासनाने लेखी देण्याचे आश्वासन दिले व त्यावर आंदोलकांनी आश्वासन मान्य नसल्याने एका शेतकरी आंदोलने स्वतःवर ऑइल वतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मालेगावात सभापती-व्यापारी-आडतदार यांच्यात वाद, व्यापा-यांनी पुकारला बंद

नाशिकच्या मालेगाव बाजार समितीत बाजार समिती सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी भाजीपाला व्यापारी यांची दुपारी बैठक बोलवली होती त्यावेळी सभापती यांनी व्यापा-यांना उद्देशून शिवीगाळ केल्याचा आरोप व्यापा-यांनी केला असून जो पर्यंत सभापती माफी मागत नाही तो पर्यंत भाजीपाला विक्रेत्यांनी बंद पुकाण्याचा इशारा दिला आहे.तर व्यापारी मनमानी आणि खोटा आरोप करत असल्याचे सभापती यांचे म्हणणे आहे.

नागपूर दंगलीतील 70 पेक्षा अधिक आरोपींना जामीन मंजूर

नागपूर दंगलीतील 70 पेक्षा अधिक आरोपींना जामीन मंजूर

17 मार्च 2025 रोजी घडलेल्या नागपूर दंगलीच्या प्रकरणातील आरोपीना जामीन....

सर्व 80 आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन देण्याचा निर्णय

जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायमुर्ती ए आर कुलकर्णी यांचा निर्णय

उद्या किंवा परवा मध्यवर्ती कारागृहातून आरोपी सुटणार.

मात्र नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खान याच्या जामीनाविषयी निर्णय 4 जुलै रोजी होणार...

विनयभंग प्रकरणातील पिडीतेच्या कुटुंबीयांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दिले निवेदन.

विनयभंग प्रकरणातील पिडीतेच्या कुटुंबीयांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दिले निवेदन.

- निवेदनातून महत्त्वाच्या मागण्या.

- एसआयटी मार्फत चौकशी व्हावी.

- आयपीएस महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.

- पिडीतेला विशेष जबाब नोंदवायचा आहे यासाठी वरिष्ठ महिला अधिकारी तपासात असावा.

-अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन पीडितेच्या कुटुंबीयांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी काय माहिती दिली पाहूयात.

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे ठिय्या आंदोलन

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे थकीत वेतन लवकरात-लवकर देण्यात यावे आणि कायमस्वरूपी हक्काचा रोजगार देण्यात यावा या मागण्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

लवकरात-लवकर निर्णय न झाल्यास येत्या काळात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा देखील आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ४ तारखेला पुणे दौऱ्यावर

४ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

३ तारखेला गृहमंत्री अमित शहा पुण्यात रात्री मुक्कामी

४ तारखेला पुण्यातील एका रुग्णालयाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार

गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती

दूषित पाणीपुरवठ्याला नागरिक हैराण

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळा समोरील भागात असणाऱ्या 50 ते 60 घरांना दूषित पाणीपुरवठा

गेले तीन महिन्यांपासून मैला मिश्रित दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप

नागरिकांना उलट्या, जुलाब आणि पोटाचे अजार वाढल्याचा तक्रारी

नळाला पिवळे आणि मैला मिश्रित पाणी येत असल्यामुळे या सगळ्या घरांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचा आरोप

टँकरच्या किंमती वाढल्यामुळे वापरायला वेगळे आणि पिण्यासाठी वेगळे पाणी विकत घेण्याची नागरिकांवर वेळ

Ashadhi Wari : श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन

श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात पोहोचलीय.

पालखीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी, भंडारा उधळत पालखीचे स्वागत

करमाळा तालुक्यातील रावगाव येथे पालखीचा पहिला मुक्काम

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात 56 दिंड्या सहभागी

Nagpur : नागपूर दंगलीतील 70 पेक्षा अधिक आरोपींना जामीन

17 मार्च 2025 रोजी घडलेल्या नागपूर दंगलीच्या प्रकरणातील आरोपीना जामीन

सर्व आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचा निर्णय

जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती ए आर कुलकर्णी यांचा निर्णय

उद्या किंवा परवा मध्यवर्ती कारागृहातून आरोपींची सुटका होणार

नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान याच्या जामीनाविषयी निर्णय 4 जुलै रोजी होणार

भाजपा आमदार बबन लोणीकर विरोधात काँग्रेसचे आंदोलन

भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजनाचा उल्लेख करत शेतकऱ्यांना अर्वाच भाषेत संबोधले. या वक्तव्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धेच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

कल्याण पश्चिम मेमन मस्जिद परिसरात गुलजार टांगेवाली चाळीतील एका घराला भीषण आग

शॉर्टसर्किटमुळे लागली आग; संपूर्ण घर जळून खाक

जीवितहानी टळली, मात्र एक व्यक्ती किरकोळ जखमी

तर सिलेंडर ब्लास्ट होण्याच्या भीतीने परिसरात मोठी धावपळ; नागरिकांनी आपल्या घरातील सिलेंडर घराबाहेर फेकले

अग्निशामक दल घटनास्थळी पोहचत आगीवर मिळवलं नियंत्रण..

उपराजधानी नागपुरात पावसाला सुरुवात

* दोन दिवसापासून अधून मधून येणारा तुरळक पावसानंतर आज शहरातील काही भागात पावसाची हजेरी...

* नागपुर हवामान विभागाने आज नागपूर जिल्ह्यासह भंडारा गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे..

* तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे..

मुख्यमंत्रीपदसाठी एकनाथ शिंदे भाजपमध्ये सामिल होतील, संजय राऊतांचा निशाणा

मुख्यमंत्रीपदसाठी एकनाथ शिंदे भाजपमध्ये सामिल होतील, संजय राऊतांचा निशाणा

गुलबाराव पाटलांच्या खात्यात बेकायदेशीरपणे ५० कोटी जमा झालेत

मिरारोडमध्ये मनसेचा खळखट्याक, मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याने फेरीवाल्याला बेदम चोप

मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याने मनसेचा चोप

मसाला डोसा विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांला चोप

मिरारोड मधील बालाजी हॉटेल समोरील घटना

मनसेचे मिरारोड उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांचा खळखट्याक

धाराशिवमध्ये जन्मदात्या बापानेच कुऱ्हाडीचे घाव घालत केला पोटच्या मुलीची हत्या

धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील माणिकनगर शेळगाव येथील हादरवणारी घटना

मुलीचा खून करून मृतदेह २४ तास घरातच ठेवला

ज्ञानेश्वर महादेव जाधव याने पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीला संपवलं

मुलगी सतत आजारी पडत असल्याने व ती सायकल वरून पडल्याने रागाच्या भरात कुराडीचे घाव घालून हत्या

हक्काचं घरं वाचविण्यासाठी थेरगावच्या नागरिकांचा पिंपरी- चिंचवड महापालिकेवर धडक मोर्चा

घनदाट लोक वस्ती असलेल्या थेरगाव परिसरामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेनं टाकलेल्या चुकीच्या विकास आराखड्यातील रस्त्यांचा विरोधात हजारो नागरिक आज हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.

नंदुरबार शहरात आणि परिसरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात

- दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा शहरात पावसाला सुरुवात....

- हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशारा दिला आहे त्यामुळे वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.....

- जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाले आहेत....

- पावसामुळे धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे....

- पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना चांगला फायदा होणार आहे.....

- जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.....

जालना शहरात धुव्वाधार पावसाची हजेरी, तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस

जालना शहरासह जिल्ह्यात आज तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात धुव्वाधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान, आजच्या पावसामुळे काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात बरसला जोरदार पाऊस

शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी तब्बल पाच ते सहा दिवसानंतर जोरदार पाऊस

जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आणि बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी

शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांना मिळाले जीवनदान

पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

दत्ता गाडे याचा अर्ज कोर्टाने फेटाळला

पुणे न्यायालयात गाडे याच्या वकिलाने अर्ज दाखल केला होता

आज सुनावणी दरम्यान कोर्टाने गाडे याचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने गाडे येरवडा कारागृहात कायम

11th Admission: अकरावीची प्रवेश प्रक्रिया, विज्ञान शाखेच्या सर्वाधिक जागा रिकाम्याच

विज्ञान शाखेमध्ये सर्वाधिक 88 हजार 400 जागा उपलब्ध

त्यापैकी 35 हजार 227 जागा पहिल्या फेरीत जाहीर करण्यात आल्या आहेत

अकरावीच्या पहिल्या फेरीतील प्रवेश जाहीर केल्यानंतर सध्या जिल्ह्यामध्ये विज्ञान शाखेच्या 53 हजार जागा रिक्त

वाणिज्य शाखेच्या 72 हजार 821 जागा जिल्ह्यात उपलब्ध आहेत

यापैकी पहिल्या फेरीच्या प्रवेशानंतर वाणिज्य शाखेच्या 25 हजार जागा रिक्त

कला शाखेसाठी 39 हजार 85 जागा असून यापैकी पहिल्या फेरीत केवळ 7 हजार 729 जागा जाहीर

कला शाखेच्या तब्बल 32 हजार जागा रिक्त

Badlapur: दहागावच्या नदीत बदलापूरचा तरुण बुडाला

बदलापूरजवळच्या दहागाव नदीवर मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आलेला तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडलीये. मात्र 4 दिवस उलटूनही या तरुणाचा शोध लागलेला नाही. त्यामुळं एनडीआरएफ आणि फायर ब्रिगेडकडून अजूनही शोधकार्य सुरू आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरात बरसला जोरदार पाऊस

शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी तब्बल पाच ते सहा दिवसानंतर जोरदार पाऊस

जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आणि बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी

शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांना मिळाले जीवनदान

पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

हिंदी विषय सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्या बद्दल मनसेकडून जल्लोष

राज्यात पहिली पासून हिंदी विषय सक्ती करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला होता. या निर्णया विरोधात मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले होते. हिंदी विषय सक्तीला

सर्व स्थरातून विरोध होताना पहायला मिळत आहे. यामुळे अखेर भाजपा सरकारने हा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या विरोधामुळे आणि मराठी माणसापुढे सरकारला झुकावे लागल्याने मनसेने याचे स्वागत केले आहे. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेने जल्लोष केला. यापुढेही सरकारने हिंदी लागल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेने दिलाय.

भंडाऱ्यात मुसळधार पावसाची रिपरिप सुरूच

जून महिन्याच्या अखेरीस आता भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात दोन दिवसा पासून पावसाची रिपरिप सुरूच आहे . भात पिकाची नर्सरी पाण्याअभावी करपायला लागली होती. मात्र, मुसळधार पाऊस होत असल्यानं नर्सरीला जीवदान मिळालं असून भंडाऱ्यातील पेरणीची आता लगबग बघायला मिळणार आहे.

उमा किरण विनयभंग प्रकरणातील तपास आयपीएस महिला अधिकाऱ्याकडे वर्ग सूत्रांची माहिती

बीड शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस उमाकिरण विनयभंग प्रकरणातील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती आणि यानंतर या प्रकरणातील तपास आयपीएस महिला पोलीस अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली असून विनयभंग प्रकरणातील तपासता वरिष्ठ अधिकारी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रीपेड मीटर विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून विरोध

प्रीपेड मीटर विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितिने विरोध करत केलं आंदोलन.

नागपूरच्या व्हेरायटी चौकात प्रीपेड मीटरची प्रतिकृती जाळत केलं आंदोलन.

सरकारने आधी प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द केला होता.

मात्र आता प्रीपेड मीटर लावले जात आहे.

या मीटरच्या माध्यमातून जनतेची लूट होत असल्याने हा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीची मागणी सरकार विरोधात घोषणाबाजी करत करण्यात केलं आंदोलन.

२ जुलैपासून महाराष्ट्रातील शाळा बस मालकांचा कार्यबंद; सेवा बंदची घोषणा

राज्यातील शाळा बस मालकांनी २ जुलै २०२५ पासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय वाहतुकीसंदर्भातील अनेक समस्यांकडे शासनाचे व वाहतूक खात्याचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शाळा बस ऑनर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.शासनाने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर २ जुलैपासून आम्ही संपूर्ण राज्यभर शाळा बस सेवा बंद ठेवू. आमच्या संघटनेची भूमिका सेवा थांबवण्याची नसली, तरी शाळा बस व्यवसायात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे शाळा बस ऑनर्स असोसिएशनने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Kolhapur: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक

बैठकीत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ

कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांकडे राजीनामा देण्यासाठी आग्रह

शिवसेनेत कोल्हापूर जिल्ह्यात खांदेपालट झाल्याने शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी

शिंदे गटात जाण्यासाठी बहुतांश शिवसैनिक आग्रही

Thakurli: रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपूलाबाबत मनसे सह ठाकरे गट आक्रमक

डोंबिवली जवळील ठाकुरली येथील 90 फीट ला जोडणारा उड्डाणपूल हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे .बाधितांच्या मोबदल्याअभावी हा पूल रखडल्याचे बोलले जात आहे . गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ हा पूल पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही पुलाचे काम पूर्ण न झाल्याने याबाबत मनसे आणि ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय .डोंबिवलीत पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र येत या अर्धवट पुलावर आज आंदोलन केलं

बांगुर नगर मेट्रो स्थानकात मोठा अनर्थ टाळला, २ वर्षीय बालकाला मेट्रो कर्मचाऱ्याने वाचवले!

मुंबईच्या मेट्रो 2 च्या बांगुर नगर मेट्रो स्थानकात मेट्रोच्या कर्मचाऱ्यांमुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली.अवघ्या दोन वर्षांचा एक चिमुकला प्रवासी मेट्रोच्या दरवाजातून आत जात असताना दरवाजे अचानक बंद झाले.यामुळे मुलगा दरवाज्यात अडकून राहिला. मेट्रो सुरू होणार इतक्यात मेट्रोस्थानकात कार्यरत असलेल्या मेट्रो कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. संकेत चोडणकर यांच्या तात्काळ प्रतिसादाने मोठा अपघात टळला. संकेत यांनी प्रसंगावधान राखत क्षणार्धात ट्रेन ऑपरेटरला सूचना दिली आणि दरवाजे पुन्हा उघडून चिमुकल्याला सुरक्षित हातात घेतले.

Nashik: नाशिकचे मनसे नेते शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यलयात दाखल

- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मनसे नेत्यांमध्ये होणार बैठक

- 5 तारखेला मुंबईत होणाऱ्या विजयी मोर्चा आणि सभेच्या तयारीबाबत होणार चर्चा

- हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर 5 तारखेला मुंबईत होणार आहे विजयी मोर्चा आणि सभा

- स्थानिक पातळीवर देखील दोन्ही पक्ष्याच्या नेत्यांमध्ये वाढतेय जवळीक

Kandivli: कांदिवलीतील केईएस शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

कांदिवली पश्चिमेतील केईएस शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे.

आज सकाळी 7 वाजता शाळेला ईमेल द्वारे मिळाली.धमकी

धमकीनंतर कांदिवली पोलिसांचे पथक शाळेत पोहोचले आणि तपासानंतर पोलिसांना काहीही सापडले नाही.

ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती, सध्या वातावरण शांत आहे, शाळेत कोणत्याही प्रकारचा बॉम्ब ठेवलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले

MNS: हिंदी सक्तीचा जीआर रद्द; राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसैनिकांचा जल्लोष

काल हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. त्यानंतर मनसेने जल्लोष साजरा केला आहे. आज राज ठाकरेंच्या घराबाहेरच मनसैनिकांनी जल्लोषकेला आहे.

Pandharpur: पंढरीच्या वाटेवर शाळकरी चिमुकल्यांचा वैष्णवांचा मेळा निघालाय...

शाळेच्या शिक्षणाबरोबर वारकरी परंपरा आणि धार्मिक शिक्षणाची जोड घेऊन खेड तालुक्यातील जिल्हापरिषद शाळा चांडोली शाळेतील चिमुकल्यांची दिंडी निघालीय गावातला वारकरी मजलदरमजल करत पंढरीच्या विटेवरी उभाय अशात ग्रामीण भागातील शाळकरी चिमुकल्या मुलांनी गावागावात दिंडी सोहळ्यात भरवलाय यावेळी चिमुकले वारकरी पंढरीच्या वारी सोहळ्यात तल्लीन झालेले पहायला मिळाले

सोशल मीडियावरील अभद्र टिप्पणीनंतर शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने छत्री वाटपाचा कार्यक्रम फेसबुक वर लाईव्ह दाखवला यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाने केलेल्या अभद्र टीकेनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची व हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जोगेश्वरीतील रुची बार अँड रेस्टॉरंट बाहेर हे दोन्ही शिवसेनेचे गट आमने-सामने आले यावेळी शिवीगाळ आणि हाणामारी देखील झाल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र माफी मागितल्यानंतर हे प्रकरण मिटले असल्याचे समजते.

Aashadi Wari: आषाढी वारीत गर्दीचे 13 ठिकाणी ब्लॅक स्पाॅट

आषाढी यात्रेत गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी यांना पोलीस प्रशासनाने ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. दशमी आणि एकादशीला महाद्वार, नामदेव पायरी ,वाळवंट ,प्रदक्षिणामार्ग आणि 65 एकरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. मागील वर्षी काही ठिकाणी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी पोलीस प्रशासनाने 13 ब्लॅक हॉटस्पॉट शोधले आहे.

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर वारकऱ्यांच्या वेशात विधीमंडळात हजर

आज पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोपीचंद पडळकर वारकऱ्यांच्या वेशात विधीमंडळात हजर झाले आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने पायऱ्यांवर केला 'मी मराठी'चा गजर

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने पायऱ्यांवर मी मराठीचा गजर केला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन विरोधकांनी केले

पायऱ्यांवर माघार सरकार

यू टर्न सरकार अशा घोषणा दिल्या

राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे.

MNS: हिंदी सक्तीचा जी.आर. रद्द केल्यानंतर नाशिकमध्ये मनसेचा जल्लोष

- नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर मनसेचा जल्लोष

- ढोल ताशाच्या गजरात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव

Satara: साताऱ्यातील सज्जनगड रस्त्यावर झाड पडलं...

सज्जनगडकडे जाणारी वाहतूक ठप्प...

गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि जोराचा वारा सुरू असल्याने पडलं झाड...

अद्याप प्रशासन झाड हटवण्यासाठी पोहचले नाही....

सध्या भाविकांना सज्जनगडकडे जाता येत नाही..

मिरजेत पेडबुल जातीच्या श्वानाचा बैलावर हल्ला. भर रस्त्यात बैलाच्या जिभेचा तोडला लचका

सांगलीच्या मिरजेत पेडबुल जातीच्या श्वानाने बैलगाडीला बांधलेल्या बैलावर हल्लाकरून बैलाच्या तोंडाचा लचका तोडत मानेवरही हल्ला करून जखमी केले आहे. या घटनेने नंतर श्वान मालक घटनास्थळावरून गायब झाला आहे. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे श्वान मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

Tuljapur: तुळजापुर जवळील भाग्यश्री हॉटेलवर तुफान हाणामारी

हॉटेल मधील कामगार व तरुणामध्ये झाली हानामारी

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हॉटेल चालवून आपल्या मुलीच्या वाढदिवसाला चक्क फॉच्युनर एसयुव्ही गाडी भेट दिल्यानंतर भाग्यश्री हॉटेल आले होते राज्यभर चर्चेत

नाद करतो काय यावचं लागतयं म्हणत सोशल मिडीयावर भाग्यश्री हॉटेलची चांगलीच चर्चा

लोणार अभयारण्य देशात १० व्या तर राज्यात दुसऱ्या स्थानाव

बुलडाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि जैवविविधतेने नटलेले लोणार वन्यजीव अभयारण्य देशपातळीवर आणखी एका मानाच्या यादीत सामील झाले आहे, देशातील 438 राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांमध्ये लोणारने दहावा, तर राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या मूल्यांकनात लोणार अभयारण्यास 88.28 गुण मिळाले असून, त्याला 'उत्तम व्यवस्थापन' या सर्वोच्च श्रेणीत स्थान मिळाले आहे.. 2020 ते 2025 या कालावधीत देशभरातील विविध राज्यांतील अभयारण्यांमधील सुविधा, संरक्षणासाठी राबवले जाणारे उपाय, विकासकामे आणि व्यवस्थापन यांचा तज्ज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करण्यात आला.. समितीने देशातील संरक्षित जंगलांचे व्यवस्थापन चार गटांमध्ये वर्गीकृत केले असून, त्यात लोणार 'उत्तम' गटात आले आहे...

भरत गोगावले यांनी नारायण राणेंवर केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक

मंत्री भरतशेठ गोगावले यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सिंधुदुर्गातील भाजप आक्रमक झाली आहे. भाजपकडून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भरत गोगावले यांचा बंदोबस्त करण्यासाठी आमचे कार्यकर्ते पुरेसे असल्याच सांगत गोगावले यांनी या त्यांच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि ही माफी मागितल्याशिवाय जिल्ह्यातील महायुतीचा कोणताही निर्णय होणार नाही अशी भाजपची भूमिका असल्याचे म्हटले आहे. तर सावंतवाडीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गोगावलेंच्या विरोधात तिरडी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मंत्री भरतशेठ गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल बोलताना राणेंनी भानगडी केल्या, मारामारी केल्या, 'मर्डर' सगळं केल अस वक्तव्य केल होत. या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे.

Maharashtra Live News Update : विठ्ठल रुक्मिणी मातेचे व्हीआयपी दर्शन बंद

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आदेश.....

देवाच्या व्हीआयपी दर्शनासाठी समितीवर राजकीय दबाव येत असल्याच्या तक्रारी नंतर जिल्हाधिकारी यांचा आदेश...

2010 मधील शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना एकसमान दर्शन देण्याचा समितीला केल्या सूचना.....

शासन निर्णयाचे उल्लंघन केल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कारवाई करण्याचा मंदिर समितीला इशारा.....

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंदिर समितीकडून दर्शन बारीचे योग्य व्यवस्थापन सुरू

परदेशी शिष्यवृत्ती अभावी विद्यार्थ्यांचे हाल

शैक्षणिक खर्च भागवणे कठीण सरकार, प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका

गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती मिळवून प्रदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा सरकारी दुर्लक्ष आणि प्रशासकीय ढिसाळतेचा फटका बसत आहे

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यांच्यामार्फत महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते

या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेचे अनुदान वर्ष उलटणही विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही

परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी खर्च किंवा परदेशात पार्ट टाईम काम करावे लागत आहे

विश्वासाच्याच बियाण्याने दिला दगा. महामंडळाच महाबीज निघालं खोटं

शेतकऱ्याच्या विश्वासाच मानलं जाणार महामंडळाचे महाबीज यंदा ही,दगा देताना दिसत आहे.लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात महाबीज कंपनीचं सोयाबीन बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. तर लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.. मात्र याच जिल्ह्यात यंदा महाबीज कंपनीच्या काही विशिष्ट वरायटीच्या सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. पेरणी करून दहा ते बारा दिवस झाले ,मात्र अजून ही,बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत ..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न विश्वमांगल्य सभेचे दोन दिवसीय चर्चासत्र संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या विश्वमांगल्य सभा यांच्यावतीने शिर्डीमध्ये जनप्रतिनिधी परिवार संपर्क विभागाअंतर्गत दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.. या चर्चासत्रासाठी देशभरातील अनेक आजी माजी लोकप्रतिनिधींच्या परिवारातील महिला सदस्य उपस्थित होत्या.. राजकारणात काम करत असताना कुटुंबात संस्कार, सामर्थ्य, सदाचार आणि सेवाभाव अधिक वाढवण्यासाठी या चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले..

जळगावला ५०० रु. च्या बनावट १२ नोटा जप्त अन्य ४८ नोटा बाजारात खर्च

५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या शहरातील दोघा तरुणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा हजार रुपये मूल्याच्या ५०० रुपयांच्या १२ बनावट जप्त केल्या. विशेष म्हणजे, या दोघांनी एकूण ३० हजार रुपयांच्या बनावट नोटा छत्रपती संभाजीनगर येथून आणल्या. त्यापैकी २४ हजार रुपये जळगावात खर्च केल्याची कबुली त्यांनी पोलिसांनी दिली. दरम्यान, त्यांच्यासमवेत आणखी एक जण असल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. दोघे ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगून होते. ते या नोटा चलनात आणण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना जिल्हा रुग्णालय परिसरातून ताब्यात घेतले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी केली असता त्यांनी आणखी एका संशयिताचे नाव सांगितले. त्यालाही अटक केली. तिघे जण पोलिस कोठडीत आहेत. दोघांनी २४ हजारांच्या म्हणजेच ४८ नोटा जळगाव शहरात विविध ठिकाणी खर्च केल्याची माहिती दोघांच्या चौकशीतून पुढे आली आहे.

४००० रुपये शेकडा विकली जातेय कोथिंबीर

नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकावर त्याचा परिणाम होऊन भाज्यांच्या दरात वाढ झाली,मनमाड जवळच्या रायपूर येथिल शेतक-याने अडीच एकरात कोथंबीरची लागवड केली असून ही कोथंबीर घेण्यासाठी व्यापारी थेट बांधावरच येत असल्याने त्याला ४००० हजार रुपयाचा दर मिळाला आहे,विशेष म्हणजे ही सर्व कोथंबीर गुजरात,मध्यप्रदेश येथे विक्रीला जात असल्याने दर सुध्दा चांगला मिळत असल्याच व्यापारी सांगतात.

शक्तीपीठ महामार्ग विरोधात १ जुलै रोजी कोल्हापुरात महामार्ग रोको आंदोलन ; आंदोलन यशस्वी करण्याचा इंडिया आघाडीचा निर्धार

शक्तीपीठ महामार्ग विरोधात १ जुलै १२ जिल्ह्यातील शेतकरी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. कोल्हापुरात देखील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला. महामार्ग रोको आंदोलन संवेदनिक आणि शांततेत पार पाडण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. मात्र पोलिसांनी दडपशाही करू नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची जबाबदारी राहील. असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर भाताण बोगद्यात कारने पुढे चाललेल्या मोटार सायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला. रोहित कदम असं अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.

एसटी चालकांच्या माथी एक कोटी 33 लाखांचा दंड

पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसचा अतिवेग आणि लेनकटिंग आदी कारणांमुळे गेल्या सहा महिन्यात राज्याच्या मोटर परिवहन विभागाने 1 कोटी 33 लाख 34 हजार इतका दंड एसटी महामंडळाला केला आहे. कोल्हापुरातील एसटीला 13 लाख 80 हजार इतका दंड झाला आहे. नियमानुसार दंड वाहनाच्या मालकाला केला जातो. असे असूनही या दंडाची वसुली मात्र एसटी महामंडळाने एसटी चालकाच्या वेतनातून करणे सुरू केली आहे. त्यामुळे महामंडळाचे सचिव नामानिराळे राहिल्या असून कमी वेतनाच्या चालकांना मात्र दंडाचा फटका बसला आहे.

मान्सूनने नऊ दिवस आधीच व्यापला संपूर्ण देश

राज्यात 5 जुलैपासून वेग घेण्याची शक्यता,हवामान विभागाची माहिती

यंदा मान्सूनने अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढत सर्व राज्य विक्रमी वेळेत पादक्रांत केली..

संपूर्ण देश व्यापण्याची तारीख ही 8 जुलै आहे मात्र यंदा नऊ दिवस आधीच 29 जून रोजी मान्सूनने अवघा देश व्यापला आहे

राज्यात मान्सून 5 जुलै पासून वेग घेईल तोवर मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

३० लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना ६ टक्के कर

इतर इंधनावरील वाहनांसाठी एक टक्का कर आकारणी

एक जुलैपासून ३० लाख रुपयांपुढील इलेक्ट्रिक वाहने आणि पेट्रोल-डिझेलवर आधारित वाहनांच्या किमती वाढणार आहेत.

राज्याच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार उद्यापासून (१ जुलै) ३० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर राज्य सरकारकडून आकारला जाणार आहे

तर सीएनजी-एलपीजी, पेट्रोल-डिझेल इंधनावरील वाहनांसाठी मोटार वाहन कर एक टक्का अधिक आकारण्यात येणार आहे.

Maharashtra Live News Update : तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द - फडणवीस

राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास करुन तसेच भविष्यात महत्वाच्या ठरणाऱ्या अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटचे महत्त्व विचारात घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातील काढण्यात आलेले दोन शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर आज निर्णय येणार

- नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता

- नागपूर सत्र न्यायालयाने फहीम खानच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण केली...

- दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला...

- मुख्य आरोपींसह ८० आरोपीचे जामीन अर्ज

- नागपूर हिंसाचारानंतर पोलिसांनी फहीम खानला अटक केली होती, त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल...

परंडा शहरात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत, दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी

टाळ मृदंगाचा गजर,हरीनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे रवीवारी सायंकाळी धाराशिव च्या परंडा शहरात आगमण झाले यामुळे मोठ्या भक्तिभावाने नागरीकांनी पालखीचे स्वागत केले.पैठनहुन १८ जुन रोजी निघालेल्या या पालखी सोहळा परंडा शहरात दाखल होताच प्रशासनाच्या वतीने पुष्पवृष्टी करत स्वागत केले या पालखीचा राञी परंडा येथील पाटील वाड्यात मुक्काम होता या ठिकाणी परंपरेनुसार भजन किर्तन हरीजागर पार पडला आज सकाळी १० वाजता ही पालखी मुंगशी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.

हिंदी सक्तीचे जीआर रद्द केल्यानंतर उल्हासनगरात मनसेचा जल्लोष

महायुती सरकारने तीव्र विरोधानंतल अखेर हिंदी सक्तीचे जीआर रद्द केले. त्यानंतर उल्हासनगर मनसेचा जल्लोष पाहायला मिळाला, मनसेकडून शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत रात्री दहा वाजता फटाक्यानची आतिषबाजी करून पेढे वाटत आनंद साजरा केला, तसेच मराठी बहुल मराठा सेक्शन येथील जिजामाता उद्याना समोर फटाके फोडून आनंद साजरा केला,मनसेचे जिल्हा संघटक बंडू देशमुख तसेच राज्य उपाध्यक्ष सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला.

रावेर तालुक्याती वादळी तडाखा, महिन्यात तिसऱ्यांदा केळी बागा आडव्या,

रावेर आणि यावल तालुक्याला रविवारी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. त्यात रावेर तालुक्यात केळी नुकसान झाले असून महिनाभरात तिसऱ्यांदा वादळामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले. रावेर तालुक्यातील शेती शिवारात ३४२ हेक्टरवर ६८६ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नेमका तोंडी आलेला घास हिरावल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत कृषी विभागाने प्राथमिक अंदाजाची आकडेवारी महसूल प्रशासनाकडे माहिती दिली आहे.

उमरगा तालुक्यातील नाई चाकूर येथे जैन मंदिरात चोरी, मंदिरातील घंटा आणि मुर्ती गेली चोरीला

धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील श्री १००८ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडलीय. अज्ञात चोरट्याने मंदिरात बांधलेली पितळी घंटी व"नंदीश्वर"देवाची मूर्ती चोरुन नेली आहे. या प्रकरणी उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास पोलीस करत आहेत.

पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजली

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात भजनी साहित्य विक्रीची दुकानं सजली आहेत. येथील विणे गल्लीतील दुकानांमध्ये भजनी साहित्य निर्मिती केली जाते.

वारकरी संप्रदायामध्ये वीणा,टाळ आणि पखवाज या वाद्यांना महत्वाचे स्थान आहे. किर्तन आणि भजनामध्ये तर विण्याचे स्थान आग्रभागी असते. वारी काळात वीणा वाद्याला मोठी मागणी असते. याशिवाय पखावाज आणि टाळांना ही मागणी असते. पंढरपुरात सर्व प्रकारचे भजनी साहित्याची निर्मिती व‌ विक्री केली जाते. कच्च्या मालाचे व मजूरी दरात वाढ झाल्याने यंदा भजनी साहित्यामध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे रामेश्वर कोकाटे या विक्रेत्यांनी सांगितले.

जनसुरक्षा कायद्या विरोधात आज डाव्या पक्षांचे आंदोलन,   शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची माहिती

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांतर्फे आज मुंबईत आंदोलन केलं जाणार आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. जनसुरक्षा असं गोंडस नाव दिलं असलं तरी या विधेयकामुळे सर्वसामान्यांच्या घटनात्मक अधिकारावर गदा येणार आहे. सामाजिक चळवळी, जनआंदोलने आणि विरोधीपक्षांना दडपण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाणार आहे असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय.

यवतमाळ जिल्ह्यातील 15 प्रकल्पांमध्ये अजूनही ठणठणाट

यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी उन्हाचा चटका वाढला त्यातही पावसाने उशिरा हजेरी लावली परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पाचा साठा झपाट्याने कमी झाला सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील 15 लघु प्रकल्प कोरडे आहेत तर मोठ्या प्रकल्पात केवळ 26 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे जिल्ह्यात आणखी मोठा पाऊस बरसल्यास नंतरच प्रकल्पाची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

पिकविम्यासाठी ॲपवर नोंदणी आणि फार्मर आयडी बंधनकारक

डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपवर पिकाची नोंदणी असेल तर पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. शिवाय फार्मर आयडी देखील बंधनकारक आहे. कोकणात यंदाच्या खरीप हंगामात भात आणि नाचणी पिकाला विम्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी 31 जुलैची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com