Maharashtra News Live Updates: रायगडच्या रेवदंडामध्ये एका घरातून दीड लाखांचा गांजा जप्‍त

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 27 May 2025: आज , मंगळार दिनांक २७ मे २०२५, महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन, पावसाची धुवांधार हजेरी, राजकीय घडामोडी, कोरोना अपडेट अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

Raigad : रायगडच्या रेवदंडामध्ये एका घरातून दीड लाखांचा गांजा जप्‍त

अलिबाग तालुक्‍यातील रेवदंडा थेरोंडा फाटा इथं पोलीसांनी टाकलेल्‍या धाडीत दीड लाखांचा गांजा जप्‍त करण्‍यात आला आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्‍यात पतीपत्‍नीविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. रेवदंडा पोलीस आणि स्‍थानिक गुन्‍हे शाखेने संयुक्‍तरित्‍या ही कारवाई केली आहे.अर्चना तळेकर आणि आशीष तळेकर अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 5 किलो गांजा सापडला.

Satara News : वजराई धबधब्याजवळ भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला

प्रसिद्ध असलेला वजराई धबधब्याजवळ भीषण अपघात...

टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळली...

चार ते पाच गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती...

जखमींना सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केले दाखल...

कोल्हापूर वरून पर्यटक वजराई धबधबा पाहण्यासाठी आले असताना घडला अपघात...

टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये 14 ते 15 जण असल्याची माहिती...

मोठ्या प्रमाणात कास बामनोली या परिसरात प्रचंड धुके असल्याने ड्रायव्हरला अंदाज न आल्याने अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती...

Chhatrapati sambhaji nagar : अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरण; सीआयडीकडून तपासणी सुरु

संशयित आरोपी अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरण

अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरणाची तपासणी सुरू

अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरणाची सीआयडी कडून होणार तपासणी

सीआयडी मार्फत चौकशी करण्याचा प्रशासनाचा निर्णय

संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील आरोपी खोतकरचा केला होता एन्काऊंटर

एन्काऊंटर प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल

एन्काऊंटर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय

Solapur : सोलापुरात मुसळधार! वाहतूक ठप्प, बोरगावचा संपर्क तुटला 

बोरगाव–वागदरी मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरगाव–वागदरी मुख्य रस्त्यावरील पुलावरून जोरदार पाणी वाहू लागले आहे.

यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून बोरगावचा संपर्क तुटला आहे.

मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

लातूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसाचा फटका जिल्ह्यातल्या अनेक भागात बसताना पाहायला मिळत आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल आहे. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तू पाण्यात गेल्या आहेत.

शिरुर तालुक्याच्या मांडवगण फराटा, सादलगाव परिसरात ढगफुटीदृष्य पाऊस

मांडवगण फराटा परिसरात शेतातलं पाणी थेट घरात शिरलं असुन कलिंगड,प्लॉवर पिकं पाण्यात गेल्याने पहिल्याच पाऊसात शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने हतबल झालाय.

राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या ५ जणांना न्यायालयीन कोठडी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला आसरा देणाऱ्या पाच जणांना पुणे न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय.

रूपाली चाकणकर यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार

रूपाली चाकणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्या सोनाली गाडे यांच्याविरोधात पुण्यातील एका महिलेने थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. संगीता भालेराव या महिलेने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फक्त महिला आयोगाचे अध्यक्षा यांचे सक्षम नेतृत्व असायला पाहिजे, अशी पोस्ट केली होती. यानंतर सोनाली गाडे यांनी १८ फोन करून मला धमकी दिली असा आरोप या महिलेने केलाय.

महादेव मंदिरावर वीज पडली; जालन्यातील घटना

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील महादेव मंदिरावर विज पडल्याची घटना समोर आली आहे, आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान गावातील महादेव मंदिरावर वीज पडून मंदिराचं नुकसान झालं आहे.अशी माहिती पानेवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान पानेवाडीच्या तलाठी आणि ग्रामसेवकांनी देखील महादेव मंदिरावर वीज पडल्याची माहिती दिली आहे.आज जालना जिल्ह्यात भारतीय हवामान खात्याच्या वतीने रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

नांदेडच्या हदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

वरवट गावातील ओढ्याला आलेल्या पुरात आईसह मुलगी आणि पुतणी वाहून गेल्याची घटना घडलीय. शेतातून घरी येत दुर्दैवी घटना घडली. 10 वर्षीय दुर्गा बळवंत शकिर्गे हिचा मृतदेह सापडलाय. तर अरुणा बळवंत शकिर्गे वय 37 व समीक्षा विजय शकिर्गे वय 7 वर्ष यांचा शोध सुरू आहे.

राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने नाशिकचे आरोग्य विभाग सतर्क

राज्यात विविध ठिकाणी कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. त्यानिमित्ताने जिल्हा रुग्णालया आणि महानगरपालिकेने खबरदारी घेत जिल्हा रुग्णालयात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात विशेष कक्ष निर्माण केले आहेत. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आढळून आली आहेत. बदलत्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासन खबरदारीचे उपाय म्हणून सिविल हॉस्पिटल तसेच द्वारका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात विशेष कोरोना कक्ष निर्माण केलेत.

हिंगोलीत एक हजार पेक्षा अधिक रहिवासी दाखल बोगस

हिंगोलीत 1000 नागरिकांना अनधिकृतितरित्या रहिवाशी दाखले दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे, महसूल विभागाच्या नायब तहसीलदारांनी अधिकार नसताना हे दाखले ऑनलाईन पद्धतीने दिल्याचं पुढे आल आहे या संदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली असून नायब तहसीलदारांची आता हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चौकशी सुरू केली आहे

धूळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणात गोटे यांनी राहुल नार्वेकरांशी साधला संपर्क

धुळे शासकीय रेस्ट हाऊस कॅश प्रकरणाबाबत धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क केला असून, आपण आदेश देऊन देखील दोन दिवस उलटले परंतु अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे म्हणत, या प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिरंगाई केल्याचा आरोप करत पोलिस अधीक्षकाचे निलंबन करण्याची मागणी गोटे यांनी केली आहे

शिरूर तालुक्यातील धामारी येथे बेल्हे जेजुरी महामार्ग पाण्याखाली

आज सकाळपासूनच उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊसाने हाहाकार माजवला असून या मुसळधार पावसाने बेल्हा जेजुरी महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली असून याचा मोठा फटका प्रवाशांना बसतोय

जालना जिल्हासह अंबड तालुक्याला रेड अलर्ट, पुढील तीन ते चार तासात जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

अंबड तालुक्यासह जालना जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलाय, पुढील तीन ते चार तासात जिल्ह्यात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे . तर विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जालना जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचा आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

NDRF ची टिम रायगडमध्ये दाखल

आपत्कालीन परिस्थिती बाबत शासन यंत्रणा सतर्क झाली असून याच पार्श्वभुमीवर NDRF ची टिम रायगडच्या महाडमध्ये दाखल झाली आहे. सद्या रायगडमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची भिती आहे. दक्षिण रायगडमध्ये श्रीवर्धन, हरिहरेश्वरमध्ये वादळ, महाड, पोलादपुरमध्ये दरड, महापुराच्या घटना घडत असतात. अशा वेळी मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF ची हि टिम तैनात करण्यात आली आहे.

जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तल रोखण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे निर्देश

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोसेवा आयोगाने राज्यभरात जनावरांच्या अवैध वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी कठोर निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९९५ आणि गोवंश हत्याबंदी कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

राज्यात मुसळधार पावसाचा जोर; उद्यापासून होणार कमी – हवामान तज्ज्ञांची माहिती

राज्यात पुणे, मुंबई, सोलापूरसह इतर भागांत मान्सून दाखल झाला असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाचे तज्ञ एस.डी. सानप यांनी माहिती दिली की, उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

पानशेत मध्ये तब्बल १०० मिलिमीटर पाऊस! धरणातील पाणी पातळीत वाढ

पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण म्हणजेच पानशेत गावात १०० मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. या पावसामुळे पानशेत धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय. मे महिन्यातच मॉन्सूनचे आगमन झाल्यामुळे धरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दक्षता घेण्यात येतेय. गेल्या २ दिवसांपासून पानशेतमध्ये मुसळधार पाऊस होतोय. पानशेत धरण पाहण्यासाठी जून, जुलै महिन्यात मोठी गर्दी होत असते. पण यावेळेस मे महिन्यातच मोठा पाऊस बरसला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, नागरिकांना सर्तकतेचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात आज, २७ मे २०२५ रोजी, हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या अलर्टनुसार, जिल्ह्यात अतिवृष्टी, वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे पपईची बाग भुईसपाट;सोलापुरातील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे राहत असलेले शेतकरी मल्लिनाथ पटणे यांचे पपई बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

Dhule News: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी फाट्याजवळ झालेल्या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

गेवराई तालुक्यातील गढी परिसरात रात्री झाला होता अपघात.

- अपघाताचा सीसीटीव्ही साम टीव्ही च्या हाती.

- सुरुवातीला पाण्यामुळे चार चाकी गाडीचा झाला होता अपघात.

- अपघात झालेली चार चाकी गाडी काढत असताना भरधाव वेगात आलेल्या आयशरने सहा जणांना चिरडलं.

- सहा जणांचा मृत्यू एक गंभीर तर दोन किरकोळ जखमी.

Vaishnavi Hagawane: फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत करणे पाच जणांना भोवले

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे याला आसरा देणाऱ्या पाच जणां विरोधात बावधन पोलिसांनी केला गुन्हा दाखल

-माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील (कर्नाटक) यांचा मुलगा प्रीतम पाटील,मावळ मधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक,साताऱ्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव,अमोल जाधव,तळेगांव दाभाडे येथील मोहन भेगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Raigad: पुढील 3 ते 4 तासात रायगडला दक्षतेचा इशारा

रायगडमध्ये हावामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असला तरी आता जारी केलेल्या सुचनांप्रमाणे पुढील 3 ते 4 तासात रायगडमध्ये काही ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना खबरदारी घ्यावी अशा सुचना देखील हवामान खात्याने दिल्या आहेत.

सोलापूरमध्ये धुवाधार पाऊस, नागरिकांच्या घरात शिरले पाणी

सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे तडवळे गावातील ग्रामस्थांच्या घरात शिरले पाणी

या नुकसानग्रस्त ग्रामस्थांची बातमी साम टीव्हीने दाखवल्या नंतर प्रशासन लागले कामाला

नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या घरांची बार्शी तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून केली जातं आहे पहाणी

या सर्व नुकसानीची पाहणी करून पुढील पंचनामा केला जाईल अशी माहिती तडवळे गावाच्या तलाठ्याने दिलीय

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान

-

- द्राक्ष बागांच्या गर्भधारणेच्या काळात पाऊस झाल्याने द्राक्ष बागांवर परिणाम

- वैराग मधील तडवळे गावातील द्राक्ष बागेत पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.

- गर्भधारणेसाठी उनाची गरज असते मात्र पावसामुळे त्यावर परिणाम झालाय

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

राज्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात फळांचे नुकसान झालेलं आहे मुसलदार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्राहक नसल्यामुळे फळ पडून आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पपई अननस कलिंगड आंबे पेरू इत्यादी यांचे नुकसान दिसून येत आहे

बुलढाणा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घर व पाणीकर माफ..

भडगाव ग्रामपंचायतचा अनोखा निर्णयः पालकांकडून निर्णयाचे स्वागत

आपल्या मुलामुलीना जर स्थानिक जिल्हा परिषद शाळेत प्रवेशीत केले, तर अश्या गावातील या वर्षीचा पालकांचा घरकर व पाणी कर माफ करण्यात येईल, असा अनोखा व स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी निर्णय स्थानिक ग्रामपंचायतने नुकताच घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाकडे विद्याध्थ्यांचा कल वाढणार असून ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचा ग्रामीण पालकांकडून स्वागत होत आहे.

Kankavli: कणकवलीत घरावर झाडाची फांदी पडल्याने मोठे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर फणसाच्या झाडाची फांदी पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. जाणवली येथील अनिल कदम यांच्या राहत्या घरावर झाडाची फांदी पडून त्यांचे मोठे नुकसान झाले. फांदी पडलेल्या खोलीत त्यावेळी कोणीच नसल्यामुळे सुदैवाने घरातील व्यक्ती बचावले आहेत. मात्र घराच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यास दिसत आहे.

Pune Rain: पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात

पुणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट तर घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

पुण्यात सकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरू

मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाची संतधार सकाळपासून पाहायला मिळत आहे

करमाळ्यात पावसाने केळी बागेचे नुकसान

मागील दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारे आणि पावसामुळे करमाळा तालुक्यातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

करमाळ्यातील शेटफळ , चिखलठाण या भागातील केळी पिकाला मोठा फटका बसला आहे. येथील शेतकरी तुकाराम पोळ यांच्या काढणीस आलेल्या दोन एकर केळी बागेचे मोठं नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकर्यांना सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

राज्य सरकारने नुकसान झालेल्या कांद्याला २ हजार अनुदान द्यावं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

- मे महिन्यात झालेल्या पावसानं शेतातील कांद्यासोबतच साठवलेल्या कांद्याचं देखील पूर्ण नुकसान

- साठवलेल्या कांद्याचा शेतातच झाला लाल चिखल

- कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

- संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

- नुकसान झालेल्या कांद्याला २ हजार रुपये अनुदान आणि नाफेडकडून लवकरात लवकर कांदा खरेदीची शेतकऱ्यांची मागणी

Ujani: उजनी धरण वजा क्षमतेमधून प्लसमध्ये...

सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वरदायिनी उजनी धरण आता प्लस मध्ये आले आहे. 122 टीएमसी चे असणारे उजनी धरण गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे वधारून प्लस मध्ये आले आहे. सोमवारी दिवसभरात उजनी धरण तब्बल सात टक्क्यांनी वधारले गेले. काल सकाळी वजा सात टक्के असणारे उजनी धरण आता प्लस मध्ये येऊन पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणाचा साठा जवळपास 65 टीएमसी इतका प्लस मध्ये आल्यावर झालेला दिसून येतोय.

Solapur News: सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली

मागच्या अनेक महिन्यापासून भोगावती नदी पडली होती कोरडी

मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मान्सूनच्या पावसामुळे भोगावती नदी तुडुंब भरून लागली वाहू

दरम्यान,या नदीकाठावरील वाळूज, मनगोली, तडवळे ढोराळे, यावली इर्लेवाडी, इरले, साकत या गावांना सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे

मागील 40 वर्षांच्या काळामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये भोगावती नदी दुथडी भरून वाहत असल्याच चित्र सध्या दिसून येत आहे.

Nashik: लासलगावसह परिसरात विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस...

कांदा व्यापाऱ्याचे कांद्याचे शेड तसेच रस्त्यावरील झाडे कोसळले.

नाशिकच्या लासलगाव शहर परिसरात काल सोमवारी सायंकाळी झालेल्या विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवीला असून पावसा सोबत चक्रीवादळ देखील होतं त्यामुळे कांदा व्यापाऱ्याचे कांद्याचे शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा भिजला अनेक ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्माळून पडली शिवाय मुख्य बाजार पेठेतील दुकानात पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचेहीं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Amravati News: अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये पाचशे फूट खोल दरीत क्रेटा कार कोसळताना थोडक्यात बचावली..

सुदैवाने कार मधील चारही युवकांचे प्राण वाचले पोलीस व वन विभागाने कारला काढले बाहेर..

गाडीमध्ये बसले होते चार तरुण अचानक पावसामुळे माती खसल्याने उभी असलेली कार कोसळली असती दरीत..

उपस्थित पर्यटकांच्या प्रसंग वधानाने मोठी दुर्घटना टळली चिखलदराच्या गाविलगड किल्ला परिसरातील घटना.

बार्शी तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

- बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, तडवळे ग्रामस्थांचे संसार उघड्यावर

- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पावसाची तुफान हजेरी

- जोरदार पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर

- वैराग मधील 54 गावांचे जनजीवन विस्कळीत

- गहू, ज्वारी , मका अशी साठवणूक करण्यात आलेली अनेक धान्याची पोती पाण्यात

- तडवळे ग्रामस्थांवर अक्षरशः रात्र जागून काढण्याची वेळ

- यावेळी शेतकऱ्याचा हुंदका दाटून आल्याचं चित्र पाहायला मिळाल..

Maharashtra Rain: राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता

राज्यात 29 ते 31 मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी लगेच आज उद्या पेरणीची घाई करू नये. राज्यात साधारण 3 जून नंतर मॉन्सून चा पहिला टप्पा किंवा "पहिला स्पेल" संपेल त्यांनंतरच म्हणजे साधारण जून च्या पहिल्या आठवडच्या शेवटी शेतकरी वर्गाने पेरणीला सुरूवात करावी, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामान तज्न डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलाय.

पहिल्याच पावसात कोंडेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला

बदलापूरपासून 7 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर धबधबा आहे. पावसाळ्यात या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावत असतं. जून महिन्यात पावसाचं आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये कोंडेश्वर धबधब्यावर गर्दी पाहायला मिळते. मात्र यावेळी पहिल्यांदाच मे अखेरीस हा धबधबा ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोंडेश्वर धबधब्यावर गर्दी केली होती. या धबधब्यात आतापर्यंत अनेकांचा बुडून मृत्यू झालाय. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांना इथे येण्यास मनाई केली जाते. मात्र यंदा मान्सूनचं लवकरच आगमन झाल्यामुळे बंदी आदेश लागू होण्यापूर्वीच पर्यटकांची पावलं कोंडेश्वर धबधब्याकडे वळू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

Kasara Ghat: नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात दरड कोसळली

नवीन कसारा घाटात दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद पडली होती.

शहापूर तालुक्यातील नाशिक हून मुंबई कडे जाणाऱ्या नवीन कसारा घाटात मोठमोठी दगड पडले होते यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती

महामार्ग पोलीस यांच्या मदतीने चालक व पोलीस कर्मचारी यांनी हाताने ढकलत पडलेली दरड केली बाजूला

वाहतूक झाली सुरळीत

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात बोगस खते अन् बियाणे विक्री रोखण्यासाठी कृषी विभाग अलर्ट मोडवर

कृषी विभागाने संशयास्पद बियाणे खताचे 103 नमुने तपासणीसाठी घेतले

कृषी विभागाच्या भरारी पथकांनी तपासणीसाठी घेतले नमुने

सोयाबीनसह इतर बियाण्यांचे 69 तर खतांचे 34 असे 103 नमुने तपासणीसाठी परभणी आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले

बोगस खते,बियाणे विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून तालुकास्तरीय भरारी पथके तैनात

Sangli News: सांगलीतील गिरजवडेमध्ये बिबट्याचा वावर

सांगली .. शिराळा तालुक्यातील गिरजवडे मध्ये बिबट्याचा वावर.. शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण... वनविभागाने बंदोबस्त करावा शेतकऱ्यांची मागणी...

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बिबट्याचा वावर आहे. याआधी अनेक वेळा बिबट्याने जनावरांना लक्ष केले आहे. आणि सतत नजरेत बिबट्या पडत असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. काल सायंकाळी शिराळा तालुक्यातील गिरजवडे येथील राजाराम सवादकर यांच्या शेतामध्ये बिबट्या शेतकर्यांना दिसला. शेतामध्ये हा बिबट्या बसला असल्याचे निदर्शनास आला.

जंगली हत्ती तेऊरवाडीत, ग्रामस्थांची धावपळ

चंदगड तालुक्यातील कौलगे इथल्या जंगलात तब्बल महिनाभर वास्तव्य करून कर्नाटक आणि सीमा भागात दहशत निर्माण केलेल्या हत्तीने काल थेट चिंचणी जंगलात प्रवेश केलाय. काल अचानक तेऊरवाडी या गावात जंगली हत्ती आल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली. गावातूनच चालत हत्ती जंगलाच्या दिशेने गेल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. गावात हत्ती आल्याचे समजताच लोकांची धावपळ उडाली. हत्तीला बघणाऱ्यांनी सावधगिरी बाळगत लांबूनच पाहणे पसंत केलं. शेतामधून काम करत असलेल्या लोकांना हत्तीची माहिती देण्यात आली. उभ्या पिकातून हत्ती जात होता. हत्ती शांतपणे चालत असल्याने पिकांचं कमी प्रमाणात नुकसान झालं. मात्र या जंगली हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केलेली आहे.

Wardha: वर्ध्यात ज्वारीचे फुटवे खालल्याने ६१ जनावरांना विषबाधा

ज्वारीचे नवे फुटवे खाल्ले; ६१ जनावरांना विषबाधा

वर्धमनेरी येथील घटना : चार जनावरांचा झाला मृत्यू

तालुक्यातील वर्धमनेरी शिवारात ६१ जनावरांना विषबाधा झाली. यात चार जनावरांचा मृत्यू झाला. ५७ जनावरांची प्रकृती उपचारानंतर व्यवस्थित झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. वर्धमनेरी शिवारात जनावरांचा कळप शेतशिवारात चरायला गेला होता. दरम्यान, शेतशिवारातील ज्वारीचे नवीन

Pune News: पुण्यातील पाऊस ओसरला...

पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस मात्र धरण पाणलोट क्षेत्रात जोर कमी

गेल्या ३ दिवसांपासून पुण्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस

धरण पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर नाही

पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा

खडकवासला: 46.97 टक्के

वरसगाव: 21.4 टक्के

टेमघर: 5.36 टक्के

पानशेत: 17.97 टक्के

Pune News: पुण्यात आज ऑरेंज अलर्ट

आज दिनांक 27/05/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, परभणी, पुणे , सांगली, सातारा, ठाणे या जिल्ह्यातपुढील ३ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे.

Kolhapur: राधानगरीत पावसाची रिपरिप

कोल्हापूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. कोल्हापूर शहरात पावसानं जरी उसंत घेतली असली, तरीही जिल्ह्याच्या इतर भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने इथलं जनजीवन विस्कळीत झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागूनच असणाऱ्या राधानगरी तालुक्यात गेली 8 दिवस पावसाची संततधार सुरू आहे.

Shirur: पाबळ थिटेवाडी परिसरात ढगफुटीदृष्य पावसाने शेतशिवारात हाहाकार

दुष्काळी संकटावर मात करत उन्हाळ्यात मिरचीची लागवड केली मात्र रात्रीच्या वेळी पाऊसाची जोरदार हजेरी लागली यामध्ये दिड एकर शेतातली मिरचीची शेती पाण्याखाली गेलीय मिरचीची तोडणी सुरु असताना पाऊसाने दैना केली असुन जास्तीच्या प्रमाणात पाऊस झाल्याने मिरचीवर रोगराईची भितीही व्यक्त होत आहे

Jalgaon: जळगावमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

जळगावच्या पारोळा तालुक्यातील सब गव्हाण येथील टोल नाक्यावर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

दोन्ही गटातील हाणामारीचा घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे...

हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे

टोलनाक्यावरील पाच जण गंभीर जखमी असून दुसऱ्या येथील टोळीमधले तीन जण गंभीर जखमी झाले आहेत....

याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नशिराबाद टोळीतील दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

एक दिवसांपूर्वी टोलनाक्यावर वाद झाला होता त्याच वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे.

संत गजानन महाराजांची पालखी ०२ जून रोजी पंढरपूर कडे जाणार

आषाढी वारीसाठी पालखी शेगाव येथून ०२ जून रोजी निघणार.

३३ दिवसांचा ७०० किमी पायी प्रवास करत ०४ जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे पोहचणार.

पालखीत शेकडो वारकरी होणार सामील.

Pandharpur: पंढरपुरात शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम

नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला पंढरपूर,मोहोळ तालुक्यातील शेतकर्यांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनीचे भू संपादन करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकर्यांनी घेतली आहे.

बाधित शेतकर्यांची पंढरपुरात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये बहुतांश शेतकर्यांनी विरोध दर्शवला आहे. तर काही शेतकऱ्यांनी समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर आर्थिक मोबदला तर विचार करू अशी भूमिका मांडली. दरम्यान एका सत्तर वर्षाच्या आजीने सरकार आमच्या जमिनी बळजबरीने घेत असल्याचा आरोप केला आहे.

Ambegaon: आंबेगावात सलग तिस-या दिवशी पाऊसाचा जोर वाढल्याने घोडनदी दुथडी भरुन वाहू लागली

कायमच कोरडीठाक असणारी घोडनदी खळखळ पाण्याने वाहत असुन घोडनदीचं पाण्याने भरलेले रुप डोळे भरून टाकणारं आहे इतिहासात पहिल्यांदाच घोडनदीला मे महिन्यात पुर आल्याने सर्वत्र आश्वर्च व्यक्त होत आहे

राहुरीतील तिरंगा यात्रेत सहभागी झाले ऑपरेशन सिंदूर मधील विंग कमांडर

भारतीय सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राहुरी शहरात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.. या तिरंगा यात्रेत ऑपरेशन सिंदूरमध्ये कामगिरी बजावणारे भारतीय वायू दलाचे विंग कमांडर विवेकानंद नलगे देखील सहभागी झाले होते.. भारत आता दहशतवादाविरोधात शांत बसणार नाही हा संदेश आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानसह संपूर्ण जगाला दिल्याचे यावेळी विंग कमांडर नलगे यांनी म्हंटलय..

जालन्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील तात्पुरता रस्ता गेला पाण्याखाली...

जालन्यातील शहागड - पैठण रस्त्यावर असणाऱ्या चांदसुरा नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. बाजूने तयार केलेला सिमेंटच्या नळ्या आणि मातीचा भराव टाकून केलेला तात्पुरता रस्ता पाण्याखाली गेला आहे.काल झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे परिसरातील गोरीगंधारी,डोमलगाव ,साष्टपिंपळगाव बळेगावसह गाव खेड्यांचा संपर्क काही काळ शहागडची तुटला होता.अनेक छोटे मोठे व्यापारी, दूध विक्रेते , मजूर , शेतकरी प्रवाशांना नदीचे पाणी उसरण्याची वाट पहावी लागणार आहे . जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून मान्सूनपूर्व पाऊस पडतोय. यामुळे जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या नद्यांना देखील पूर येत आहे...

मुंबई गोवा महामार्गावरील खड्डयात 2 बसेस अडकल्या

पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. कोलाड जवळ खांब येथे रस्त्याला पडलेल्या भल्या मोठ्या खड्डयात मध्यरात्रीच्या वेळी दोन बसेस अडकून पडल्या होत्या. बसची मागील चाके या खड्डयात रुतली होती. स्थानिक तरुणांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नानंतर क्रेनचा वापर करून या बसेस बाहेर काढण्यात आल्या दरम्यानच्या काळात या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती.

जालन्यात महावितरण कार्यालयाला बांधले बेशरम आणि कंदीलाचे तोरण

जालना शहरात काही दिवसांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे . त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयास बेशरम आणि कंदिलाचे तोरण बांधून गांधीगिरी आंदोलन केल.जालना शहर आणि परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.शहरांमध्ये तब्बल वीस तास वीजपुरवठा खंडित होतो. वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काल मराठा महासंघाच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला बेशरम आणि कंदीलाचे तोरण बांधून गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं

Pune Rain : पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे तीन बळी

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात घराची भिंत पडून महिलेचा मृत्यू तर शहरात कुजलेले झाड पडून एका तरुणाचा गेला जीव

पुण्यातील कर्वेनगर भागात झाड कोसळून एक दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू काल संध्याकाळी झाला

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात मासेमारी करणाऱ्या तरुणाचा वीज कोसळून मृत्यु झाला

लिफ्टमध्ये अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

रात्री बारा वाजता पुण्यातील मार्कटयार्ड येथील नंदनवन हॉटेल व लॉजिंग येथे चार मजली इमारतीत दुसर्‍या मजल्यावर एक ज्येष्ठ नागरिक लिफ्ट बंद पडल्याने सुमारे अर्धा तास अडकल्याची माहिती गंगाधाम अग्निशमन केंद्र यांना मिळाली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

जवान घटनास्थळी पोहचताच प्रथम अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाशी संवाद साधत त्यांची लवकरच सुटका करू असा धीर देत वर लिफ्ट रूममधून काही जवानांनी मॅन्युअली फिरवत लिफ्टमधून या व्यक्तीची अवघ्या ५ मिनिटात सुखरूप सुटका करत आपले कर्तव्य बजावले.

Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्यात पावसाची संततधार

धाराशिव जिल्ह्यात काल पासुन पावसाची संततधार सुरू असुन उमरगा,लोहारा,तुळजापूर,धाराशिव,कळंब,परंडा या भागात पावसाने हजेरी लावली तर लोहारा व उमरगा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली यामध्ये उमरगा शहरातील सकल भागात पाणी शिरले अनेकांच्या दुकानात व घरात देखील पाणी शिरले तर शहरातील गटारी तुंबल्याने अनेक ठिकाणी गटारिचे पाणी रस्त्यावर आले तालुक्यातील अचलेर,कोरेगाव वाडी,चिंचोली भुयार परीसरात देखील अनेक नदी नाले तुडुंब भरुन वाहुन लागले आहेत.गाव शिवारात पाणी पाणी अस चित्र पाहायला मिळाले या पावसामुळे अनेक भागता विजपुरठा देखील खंडीत झाला आहे.

Rain News : पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

दोन दिवसापूर्वी फलटण तालुक्या मध्ये जो ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसामध्ये अनेक ठिकाणचे ओढे नाले, नद्या, बंधारे, तलाव भरून ओसंडून वाहताना पाहायला मिळाले. फलटण तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या धुमाळवाडी या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसाने शेतकऱ्यांची मात्र दैना केली.शेतकऱ्यांच्या शेतात बऱ्याच ठिकाणी पाणी साठवून राहिले आहे. या पावसाचे प्रमाण इतकं प्रचंड होतं की केवळ एका पावसामध्येच धुमाळवाडी ला पाणी देणारा तलाव अक्षरशा ओसंडून वाहताना आता पाहायला मिळतोय. धुमाळवाडी येथून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी

मुसळधार पावसात बार्शीत रेल्वे ब्रिजखाली अडकलेल्या बसमधील सर्व 27 प्रवासी सुखरूप! बार्शी पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

बार्शी तालुका आणि शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.बार्शी-तुळजापूर रस्त्यावरील अशोका गार्डनजवळील रेल्वे ब्रिजखाली साचलेल्या पाण्यात एक बस अडकली होती.ज्यामध्ये 27 प्रवासी अडकून पडले होते.मात्र, बार्शी शहर पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबवत,बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे.

बार्शी शहर आणि तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून,वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.अशोका गार्डनजवळील रेल्वे ब्रिजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने, त्याखालून जाणाऱ्या एका बसने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने बस मध्यभागीच अडकली आणि त्यात पाणी शिरू लागले. यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Solapur rain News : अक्कलकोट तालुक्यात सर्वदूर पावसाची संततधार

अक्कलकोट तालुक्यात सर्वदूर पावसाची संततधार चालू असून दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे.भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे हिळ्ळी बंधारा हाऊस फुल्ल झाला आहे.बोरगाव, घोळसगाव, बादोळे बु गावातील ओढ्याची पाणी पातळी वाढल्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.हिळळी परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे शेत बंधारा, बांध, शेततळे भरले आहेत.दरम्यान अक्कलकोटच्या दक्षिण पूर्ण भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. दुधनी, बोरोटी, तोळणूर, नागणसुर, जेऊर, अक्कलकोट स्टेशन, गौडगाव, नाविंदगी, करजगी, तडवळ हिळ्ळी भागात पाऊसाने चांगलेच झोडपून काढले आहे. बंधारे पाण्याखाली गेले आहेत.गेल्या दहा ते बारा दिवसापासून 107 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com