
33 ठिकाणी पालकमंत्रीच करणार झेंडावंदन
तर अपवादात्मक चार ठिकाणी इतर मंत्र्यांना झेंडावंदन करण्याच्या सूचना
गडचिरोली - राज्यमंत्री आशिष जैस्वाल
मुंबई शहर - मंगलप्रभात लोढा
बीड - दत्तात्रय भरणे
अमरावती - इंद्रनील नाईक
वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे तैनात आहेत. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने वाहतूक संथ गतीने होत आहे. नागरिकांनी महामार्गावर वाहने न थांबविण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे. वाहतुकीस अडधळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश
सैफ अली खान प्रकरणातील संशयित आरोपीचे फोटो मुंबई शहरात जागोजागी लावण्यात आली आहेत. सीसीटीव्हीतील फोटो स्थानक आणि रस्ता परिसरात लावत सदर इसम दिसल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करा असे आशय यावर लिहिले आहे. 48 तासापेक्षा अधिक वेळ उलटला तरी अद्याप आरोपी पोलिसांना सापडलेला नाही पोलिसांची विविध पथके या आरोपीचा शोध घेत आहेत.
पुणे पोलिसांनी सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करत नेपाळच्या 2 आरोपींसह तामिळनाडूमधील 1 अशा 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यात एका व्यक्तीची तब्बल 68 लाख 11 हजार 692 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांचा तपास सुरू होता.
दरम्यान, याच प्रकरणी ३ संशयित पुण्यातील एका हॉटेल मध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून 7 मोबाईल, नेपाळ देशाचे नागरिकत्व चे कार्ड, विविध बँकांचे पासबुक, चेकबुक, यासह बनावट पासपोर्ट देखील जप्त करण्यात आले.
कोल्हापुरात चोरट्यांनी दुचाकी चोरून त्याचे पार्ट विकून उरलेला सांगाडा पुरावा नष्ट करण्यासाठी टाकला विहिरीत ढकलून दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून विहिरीतून काढून ४ दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी कोल्हापूर एलसीबीने दोघांना अटक केली आहे.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरील टनेलच्या कामाची पाहणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यातर्फे करण्यात आली.
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथून सुरू होणारा हा टनेल शिळफाटा येथे बाहेर निघणार असून हा टनेल तब्बल 21किलोमीटरचा असणार आहे.
महापे शिळफाटा येथे सुरु असलेल्या कामाची पाहणी करताना बुलेट ट्रेन प्रकल्प नियोजित वेळेत पिरन होईल असा विश्वास रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
या टनल मधून दोन बुलेट ट्रेन 250 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहेत.
बहुप्रतीक्षित कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर झालाय. कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांनी हायवेला गाड्या लावल्यानं वाहतूक कोंडी झालीय. सायन - पनवेल हायवे वाहतूक कोंडीमुळे जाम झाला असून, सीबीडीपासून सानपाडापर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. ५ ते ७ किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झालाय. ज्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पालघरमधील जव्हार-डहाणू मार्गावर चारोटीजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. भरधाव तिन्ही वाहने समोरासमोर धडकली. कार, रिक्षा आणि दुचाकीची धडक झाली. या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे, वाहनांची धडक इतकी जोरात होती की कार थेट रस्त्यानजीकच्या शेतात उलटली.
आरोपीच्या वकिलाने पुढील तारीख मागीतल्याने न्यायालयाने दिली वाढीव तारीख
खंडणी प्रकरणात कराड व चाटे यांनी केला होता जामीनासाठी अर्ज
कराड यांच्या वकिलांनी तारीख घेतली वाढवून
पुष्पा स्टाईलने आईसर वाहनातून दारूची जनरेटरमध्ये अवैधपणे छुपी वाहतूक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या प्रमाणात दारूचा अवैध साठा हस्तगत केला आहे...
केंद्रशासित प्रदेश दिव दमण येथे विक्रीचा परवाना असलेल्या दारूचा साठा महाराष्ट्रातून गुजरातकडे आयशर ट्रकमध्ये अवैधपणे वाहतूक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने साक्री तालुक्यातील सुरत बायपास रोडवर सापळा रचून पकडला आहे....
अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा काही खाजगी लोक घरी घेऊन जात असल्याचा आरोप...
हा सगळा प्रकार बेकायदेशीर...
समाधीवर जमा होणारा पैसा सरकार जमा व्हावा अशी जगताप यांची मागणी...
साई मंदिर परिसरात साईबाबांच्या समकालीन भक्तांच्या समाधी...
इतर समाधीवर जमा होणारा पैसा साई संस्थानकडे होतो जमा...
तर अब्दुलबाबा समाधीवर जमा होणारा पैसा त्यांचे वंशज परस्पर घरी नेत असल्याचा आरोप...
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
न्यायमूर्ती सुरेखा पाटील यांचा निर्णय
लासलगाव- विंचूर रस्त्यावर मोटरसायकल कारची समोर समोर धडक...
एक ठार दोन गंभीर जखमी...
जखमींवर लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू...
लासलगाव विंचूर रस्त्याचे मंजूर चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करावी अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा
साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात पार्टनर असलेल्या व्यक्तीला आता acb ची नोटीस
दिनकर सावंत यांना 22 तारिखेला रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख
मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर आता व्यावसायिक पार्टनर असलेल्या व्यक्तीची होणार चौकशी
सारंगी महाजनांनी पुन्हा एकदा साधला धनंजय मुंडेंवर निशाणा
अजित दादांवर माझा विश्वास ते धनंजयचा राजीनामा घेतील - सारंगी महाजन
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट
मस्साजोग गावात जात घेतली देशमुख कुटुंब यांची भेट
वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर तीनवर दोन ट्रेन समोरासमोर
काही दिवसांपूर्वीच मिरा रोड येथे अशी घटना घडली होती
त्यानंतर आता वांद्रे स्थानकावर दोन ट्रेन समोर आले आहेत.
दुपारी 1 वाजून 19 मिनिटांची घटना
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.वर्धा ते गोवा असा हा महामार्ग असून या महामार्गामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत.शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताचा हा महामार्ग नसल्याने या महामार्गाला शेतकरी विरोध करीत आहेत.नांदेड मधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी विरोध करीत आहेत.शक्तीपीठ महामार्गाला पूर्वीही विरोध होता आणि आता ही माझा विरोध आहे.मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का हे पाहावे लागणार असल्याचे मत भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. दरम्यान नांदेडचा बीड होऊ द्याचा नसेल तर मुंडे बंधू आणि भगिनींना नांदेडचे पालकमंत्री पद देऊ नये अशी भूमिका मराठा समन्वयकाने घेतली आहे.यावर खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय.
अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत 3 वर्षीय चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती,3 वर्षीय चिमुकली घराबाहेर खेळत असताना चॉकलेटचे आम्हीच देऊन अत्याचार करण्यात आला यात प्रकाश पुंडकर याला अटक करण्यात आली मात्र येवदा येथील गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध करत येवदा गाव कडकडीत बंद होते
बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात होणार सुनावणी
सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होण्याची शक्यता
वाल्मीक कराडला न्यायालयातून घेऊन जात असताना झाली होती घोषणाबाजी
सुनावणीवेळी न्यायालय परिसरात मोठ्या संख्येने लोक जमा होत असल्याने पोलीस प्रशासनाकडून खबरदारी
सीआयडी आणि एसआयटी अधिकारी बीड जिल्हा न्यायालयात दाखल
एसआयटीच्या किरण पाटील आणि अन्य अधिकारी कोर्टात दाखल
वाल्मिक कराड यांचे वकील आजारी असल्याने कोर्टात तारीख वाढवुन मिळवण्यासाठी करणार अर्ज
तर विष्णू चाटे यांचे वकील आज जामीन साठी प्रकरण दाखल करणार नसल्याची चाटे यांच्या वकिलाची माहिती
वाल्मीक कराड व विष्णू चाटे याच्या खंडणी प्रकरणात जामीन अर्जावर आज होणार होती केज न्यायालयात सुनावणी
हिंगोली जिल्ह्यात खरिपाच्या हंगामात ओल्या दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर रब्बीच्या हंगामात देखील मोठ संकट कोसळलं आहे, शेतात तोडणीला आलेल्या हरभरा पिकात जंगलातील वानरांचे कळप शिरत असून हे वानर हरभरा फस्त करत आहेत दरम्यान या मुळे शेतकऱ्यांचे उत्पादन निम्म्यावर येणार असल्याने वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत
- निफाड तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाला रामराम
- सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना
- आज करणार शिंदे गटात प्रवेश
- निफाड तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे २५ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा आज शिवसेना शिंदे गटात दुपारी पक्ष प्रवेश
अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या 30 पेक्षा अधिक टीम वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत अशातच आता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच टीम सैफ अली खान यांच्या इमारतीच्या शेजारील बंगला परिसरात दाखल झाले असून आरोपीने याच बंगल्याच्या इमारतीच्या भिंतीवरून सैफ अली खान यांच्या इमारतीत प्रवेश केला का या संदर्भात तपास करत आहेत
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिवेशन
मंत्री धनंजय मुंडे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाहीत
मंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाची माहिती
सैफ अली खान हल्लाप्रकरणी करीना कपूरचा जबाब समोर आला आहे. चोराने एकाही दागिन्याला हात लावला नसल्याचे करीना कपूरने सांगितले आहे.
शक्तिपीठ महामार्गातून ज्या पद्धतीने कोल्हापूर वगळलं त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यालाही वगळावं.सरकारला ही शेवटची विनंती, अन्यथा आंदोलन करावा लागेल असा खासदार विशाल पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. ते सांगलीच्या मार्केट कमिटी कार्यक्रमात बोलत होते.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराच्या घरी गांजाची साठवणूक.....
पोलिस कर्मचाऱ्याच्या घरून पथकाने जप्त केला 900 ग्रॅम गांजा....
पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात धडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल....
पोलिस अधीक्षकांनी केली निलंबनाची कार्यवाही
भामा नदीच्या काठावर चाकण औद्योगिक वसाहतीच्या अनेक कंपन्या आहेत... या कंपन्यांच रसायन युक्त आणि सांडपाणी इंद्रायणी आणि भामा नदीत सोडलं जातं... त्यामुळे या नद्यांना हिमनद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय... या रसायनयुक्त पाण्यामुळे वाकी, काळुस, भोसे, शेलगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय... या रसायन युक्त पाण्यामुळे भामा नदीतील जलचर प्राणी नष्ट होत आहे... हे पाप चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्या मालक करत असल्याचा आरोप शेतकरी करतायेत... हे पाप करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याच वेळोवेळी दिसून आलय... सरकारला शेतकऱ्यांपेक्षा अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्या महत्वाच्या का वाटतात? अनेक वेळा मंत्र्यांनी नदी प्रदूषणाकडे लक्ष वेधलं तरी त्या कंपन्यांना का वाचवलं जातंय? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नक्की केव्हा जाग येणार? असे प्रश्न यानिमित्तानं पुन्हा उभे ठाकलेत.
लातूरचा निलंगा तालुक्यातल्या शिदोळवाडी येथे ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना सरपंच आणि गावातील दोन तरुणांमध्ये वाद झाला.. किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणी झाले सरपंच यांना गावातीलच दोन तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे ... दरम्यान मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय.. मात्र तक्रार देऊनही पोलिस दखल घेत नसल्याचा सरपंचांचा यांचा आरोप आहे.
बीड जिल्ह्यात अगोदरच तापलेले वातावरण असताना, पुन्हा एकदा खळबळ जनकघटना बीडच्या अंबाजोगाई शहरात घडली. लातूरच्या रेणापूर तालुक्यात असणाऱ्या, गोविंद नगर येथील गणेश चव्हाण या युवका सोबत, फिर्यादीच्या मुलीचे मागील तीन वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरोपी हा माझ्याशी नेहमी बोल म्हणून मुलीला धमकी द्यायचा, तसेच घरच्यांना जीवे मारून टाकेन, असं म्हणत असल्याने मुलीने आरोपी युवकाला नकार दिला. त्यामुळे युवकाने अंबाजोगाई शहरातील घरी येऊन गोळीबार केला. अवघ्या काही तासात पोलिसांनी सदरील युवकाच्या रेणापूर येथून पिस्टलसह मुसक्या आवळल्या असून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- पुण्याचा जगभरातील शहरांशी ‘कनेक्ट’ होणार
- केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने लोहगाव आंतराराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे.
- यानुसार जागेचे सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण झाले असून,
- त्यासाठी आवश्यक भूसंपादन करण्यात येणार आहे.
- त्याअंतर्गत धावपट्टीची लांबी वाढणार असल्याने मोठ्या आकाराच्या विमानांचे लॅण्डिंग शक्य होणार आहे.
- त्यामुळे थायलंड आणि दुबईसह जगातील अन्य शहरांतही आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढणार आहेत.
संतोष देशमुख खून प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा या गावच्या महिला सरपंचाला, गावातीलच तिघांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. ममदापूर पाटोदा गावात विकास कामे सुरू असताना, हे तिघेजण त्यात अडथळा आणत होते.. यादरम्यानच 16 ऑगस्ट 2024 रोजी वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांनी विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली.. याप्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून आता अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..दरम्यान अधिक तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत..
मराठवाड्यात मागील वर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस बरसला अनेक भागात महापूर देखील आला मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्या नंतर ही हिंगोली जिल्ह्यात अचानक विहिरी बोअरवेल सह पाण्याचे स्त्रोत आटल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, ऐन रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे सुरू असताना शेतातील पाण्याचा सोर्स आश्चर्यकारकरीत्या बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत दरम्यान पाणीपातळी अचानक का खालावली याच उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आता याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाला हाक दिली आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात करडईच्या क्षेत्रात दुप्पट वाढ झाली असून शेतकरी पुन्हा जुन्या पिकाकडं वळल्याचं दिसून येतंय . जिल्ह्यात सरासरी ३९१ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी अपेक्षीत होती. मात्र प्रत्यक्षात ७५८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालीये. अर्थात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत जवळपास दुपटीनं करडईचं क्षेत्र वाढलय.
वाशिम जिल्ह्यात २० वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात करडईची पेरणी होत होती. मात्र, या पिकाला अपेक्षीत भाव न मिळणे, तसेच बाजारपेठेचा अभाव या प्रमुख कारणांमुळं शेतकऱ्यांनी या पिकाकडं पाठ फिरवली होती.मात्र मागील तीन चार वर्षांत मात्र जिल्ह्यात करडईच्या क्षेत्रात पुन्हा वाढ होऊ लागली असून यंदाही जिल्ह्यात ७५८ हेक्टर क्षेत्रावर करडईची पेरणी झालीये.
कोल्हापुरातल्या मार्केट यार्ड येथे साडेतीन किलो गांजा विक्रीसाठी आलेल्या कराडच्या तरुणास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णात पोवार असं या तरुणाचं नाव असून शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक करून त्याच्याकडून 63 हजार रुपये किमतीचा साडेतीन किलो गांजा जप्त केला आहे. गोपनीय बातमीदार दिलेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड इथं सापळा असून ही कारवाई करण्यात आलीय.
ढगाळ वातावरणामुळे सातपुड्यातील आंबा बागांना फटका.....
थंड हवामान आणि ढगाळ वातावरणाचा फटका आंब्याचा मोहरांना....
आंब्यांच्या मोहरांवर थ्रिप्स नामक रोगाची लागट....
आंबा कलमांना थ्रिप्सची लागण टाळण्यासाठी कीटकनाशके फवारणी सुरू....
आंब्यावरील बहार टिकवून ठेवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी उत्पादनात घट होण्याची शक्यता.....
अवकाळी पावसानंतर पुन्हा आंबा उत्पादक शेतकरी संकटात....
कोल्हापूरतल्या कोठीतीर्थ तलाव येथे जबरी चोरी करणाऱ्या राजारामपुरी पोलिसांनी अटक केलीय. त्याच्याकडून सोन्याच्या चेंनसह 1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी करण भिसे याला अटक केली असून राजारामपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी घेतले साई समाधीचे दर्शन...
नव संकल्प शिबिर सुरू होण्यापूर्वी अजितदादांनी साई दर्शनाला हजेरी...
कुठलेही चांगले काम करण्याअगोदर देव दर्शन घेणे आपली परंपरा...
साई दर्शनानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया...
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबिर...
भाजपानंतर राष्ट्रवादी शिर्डीतून फुंकणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग..
- पाण्याचे स्राोत नसताना जलवाहिन्या टाकल्यास कामे त्रयस्थ संस्थेद्वारे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश
- अंगणवाडी आणि पाणीपुरवठा योजनेच्या कामांना जीओ टॅगिंग आवश्यक असल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले
- जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाच्या हाती येताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आढावा बैठक
- मागील काही वर्षात झालेल्या पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी बांधकाम, पाणंद रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांची उपलब्धता आणि इतर विकासकामांबाबत अनेकांच्या तक्रारी
छत्रपती संभाजीनगर -
अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील पावणेतीन लाखांचे दागिने चोरी करणारा आरोपी अटकेत
गंगापूर पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत मुद्देमाल जप्त केला आहे
आकाश साळवे असे चोरी करणारे आरोपीचे नाव
चोरी गेलेले दोन लाख 80 हजारांचे दागिने पोलिसांकडून जप्त
चोरी करणारा आरोपी या अगोदर करत होता रुग्णवाहिनीवर चालकाचे काम
दागिने बघून त्याने लालचेपोटी चोरी केल्याची पोलिसांची माहिती
धाराशिव मध्ये गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 50 हजाराची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षक रंगेहात अटक
धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरज शांतीलाल देवकर यांना 50 हजार लाच घेताना रंगेहात केली अटक
या प्रकरणी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाणे येथे करण्यात आला गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीला तीन वर्ष कारावास तसेच अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोकवण्यात आली दारव्हा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी शिक्षा ठोठावली जयसिंग चव्हाण असे शिक्षा ठोकवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत.
- नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरक्राफ्ट क्रॅशची मॉक ड्रिल करण्यात आली
- विमानतळावरील अग्निशमन सेवेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या मॉकड्रिल मध्ये सहभाग घेतला
- सोबतच मनपाची अग्निशमन सेवा, विमानतळाशी संबंधीत रुग्णालये आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या मॉक ड्रिल मध्ये सहभाग घेतला
- कुठल्याही अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ठराविक कालांतराने अशा प्रकारच्या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येतं.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे याना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अमलबजावणी न केल्याचा आरोप करत वकिलामार्फत पाठवले नोटीस...
- संविधानाचे अभ्यासक व निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी अधिवक्ता डॉ. सुरेश माने यांच्यामार्फत मुख्यमंत्री कायदेशीर नोटीस बजावली आहे.
- २०१६ च्या सुधारित नियमावलीनुसार, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने वर्षातून किमान दोन बैठकातुन आढावा घ्यावा लागतो,
- मागील 5 वर्षात बैठका झाल्या नाही.... २०१९ ते डिसेंबर २०२४ कालावधीत एकही बैठका झाली नसल्याचं म्हणत नोटीस पाठवण्यात आली आहे...
- मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कुंभमेळा आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वरला रिलीजियस कॉरिडोर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
- नाशिक शहराजवळ महाकुंभ उभारून तिथं मोठं संमेलन केंद्र निर्माण करण्याचे आदेश
- साधूग्राम साठी टीपी स्कीम आणण्याचा देखील महत्त्वपूर्ण निर्णय
- प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना
- साधूग्रामकरता अतिरिक्त जमीन भूसंपादित करण्याचे आदेश
- इगतपुरी त्रंबकेश्वर रस्ता चौपदरी करण्याच्या सूचना
- रामकाल पथ बरोबरच त्र्यंबकेश्वरला रिलीजियस कॉरिडॉरचा निर्णय
- कुंभमेळ्यासाठी ८ ते १० हेलिपॅड तयार करणार, नाशिक शहरातील रस्त्यांसोबतच नाशिकला येणारे सर्व रस्ते प्रशस्त करण्याच्या सूचना
- 7767 कोटींचा महापालिकेचा सर्वात मोठा कुंभमेळा आराखडा शासनाला सादर
- पुणे शहर पोलीस दलातील २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
- प्रामुख्याने वाहतूक, गुन्हे, विशेष शाखा येथील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
- शहरातील पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
- शहरातील कोयता गॅंग, गोळीबार या घटनांच्या पार्श्वभिमिवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडुन पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या
- गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन केली होती पोलीस आयुक्तांवर टीका
- दहावीच्या परीक्षेचे हॅाल तिकीट सोमवारपासून मिळणार ऑनलाइन
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट २० जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणर
- शाळेने हे हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावे यासाठी कुठलेही शुल्क लागणार नाही
- राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना
- राज्य मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार
- www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट
- पुणे शहरात आज सकाळपासून अनेक ठिकाणी धुक्यांची चादर
- धुक्यांच्या चादरीत हरवले पुणे शहरातील अनेक भाग
- आज सकाळपासून पुणे शहरातील अनेक परिसरामध्ये पडले दाट धुके
- तर पुण्यात आज सकाळपासून हवेत गारवा
- आज आणि उद्या पुण्यात थंडी वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेचा अंदाज
- उत्पन्न वाढवण्यासाठी एसटीच्या चालक वाहक योजनेस कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद
- उद्दिष्टापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करून उत्पन्न मिळवून देणाऱ्या चालक वाहकास दहा टक्के प्रोत्साहन भत्ता
- 31 जानेवारी पर्यंत एसटी महामंडळाकडून ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे
- आत्तापर्यंत पुणे विभागात 200 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला असल्याची विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांची माहिती
- पुण्यात आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाने काढणाऱ्यांमध्ये वाढ
- गेल्या तीन वर्षांत १३ हजारांहून अधिक पुणेकरांनी काढले इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन
- परदेशात वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेला आंतराष्ट्रीय वाहन चालक परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत होत आहे दिवसेंदिवस वाढ
- पुणे 'आरटीओ' कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार २०२२ – २३ या वर्षभरात ४२९४ नागरिकांनी, तर २०२३-२४ साली ५२१० नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेतला आहे.
- तर, गेल्या वर्षभरात (नोव्हेंबर २०२४ पर्यंत) ३६९३ जणांनी परवाना काढला आहे.
- पुणे जिल्ह्यात ड्रोनने चित्रीकरणासाठी आता नवीन नियम लागू
- ड्रोनद्वारे चित्रीकरणासाठी घ्यावी सात दिवस आधीच घ्यावी लागणार पोलिसांचे परवानगी
- पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय
- जिल्ह्यात कोणत्याही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांना ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना आता सात दिवस आधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार
- दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता
- ड्रोनमार्फत चित्रीकरण करून गैरव्यवहार आणि गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला निर्णय
- नियम मोडणाऱ्यावर जिल्हा प्रशासन करणार दंडात्मक कारवाई
- पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारीपासून नव्या बस होणार दाखल
- एकूण ४०० नव्या बस फेब्रुवारी मध्ये धावणार
- ठेकेदाराच्या ४०० बसेसची निविदा प्रक्रिया पीएमपीएल कडून पूर्ण
- नव्या बस दाखल होताच पीएमपीएल चे नवे मार्ग देखील करण्यात येणार सुरू
- प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पीएमपीएल खरेदी करणार अजून २०० नव्या बसेस
नारायणगाव येथील अपघातातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश
स्थानिक गुन्हे शाखेने चाकण परिसरातून घेतला ताब्यात
रोहित कुमार जगमालसिंग चौधरी असे या आयशर चालकाचे नाव
हरियाणा येथे पळून जात असताना पोलिसांनी घेतला ताब्यात
पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील अपघातात नऊ जणांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी
वाशिम जिल्ह्यात वाशिम आणि रिसोड बाजार समितीत हळदीची खरेदी केली जाते. या दोन्ही बाजार समितीत हळदीच्या दरात थोडीफार तफावत नव्हे तर तब्बल अडीच हजार रुपयांची तफावत होत असल्याची बाब खरेदीतून समोर आली आहे..
वाशिमच्या बाजार समितीत कांडी हळदीला १३३०० ते ९७०० रुपयांचे दर मिळाले आणि गट्टू हळदीला १२५०० ते ८८०० प्रति क्विंटलचे दर मिळाले. आणि रिसोडच्या बाजार समितीत मात्र हळद कांडी ला १३४०० ते १२३०० रुपयांचे दर मिळाले असून, गट्टू हळदीला १२४०० ते १२२०० रुपयांचे दर मिळाले. एकीकडे रिसोड बाजार समितीत बारा हजार रुपये पर्यंत मिळत असताना वाशीमच्या बाजार समितीत मात्र हेच दर ९७०० आणि ८८०० च्या दरम्यान घसरल्याचे पाहायला मिळाले. एकाच जिल्ह्यातील या दोन्ही बाजार समितीत बाजारभावात अडीच हजार रुपयांची तफावत आढळून आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच यात मोठ नुकसान होत आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून 14 संचालकांनी विभागीय सहनिबंधक अमरावती यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला असून यामध्ये सर्व पक्ष संचालकांचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या 14 संचालकांची यवतमाळ येथील विश्रामगृहावर बैठक पार पडली यामध्ये विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांचा राजीनामा मागण्याचे ठरविण्यात आले.
मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना २ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी, १४ जानेवारीच्या सुनावणीत, केज न्यायालयाने वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र न्यायालयीन कोठडी मिळताच कराडच्या वकिलानी केज न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.. या जामीन अर्जावर आज केज न्यायालयात सुनावणी होणार आहे.दरम्यान याप्रकरणी एसआयटीने न्यायालयाकडे आपले म्हणणे नोंदवले असून कराडला जामीन देऊ नये, जर जामीन मिळाला तर तो पुरावा नष्ट करू शकतो, असे न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळं आता यावर न्यायालय काय निर्णय देणार ? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाशिकच्या मालेगाव शहरातील द्याने भागातील काही कारखान्यातून रसायन मिश्रित सांडपाणी नदीपात्रात सोडण्याचे प्रकार सुरुच असून,रसायन मिश्रीत पाणी प्रक्रियेविनाच वाहत्या पाण्यात सोडण्यात येत असल्याने नदीपात्रातील मासे मृत होत असल्याच समोर आले आहे.महापालिका प्रशासनाने या कारखान्यां विरोधात कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरीकांनी केलीय.
लाडु पुरवण्यासाठी राज्य पातळीवरील चार नामांकित कंपन्यांनी निविदा भरल्याची माहिती
मंदीर संस्थान विश्वस्तांच्या बैठकीतील निर्णयानुसार भाविकांना लाडु प्रसाद उपलब्ध करुन देण्यासाठी दाखल निविदा प्रक्रियेची छाननी केली सुरू
मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील,तहसीलदार माया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी प्रसाद उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील
मंदीर संस्थानच्या नियंत्रणात भाविकांना लाडु प्रसाद पुरविण्याची निविदा प्रक्रीया सुरू
चैञ याञे पुर्वी भाविकांना लाडु प्रसाद उपलब्ध होण्याची शक्यता.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून लाखनी तालुक्यात पसरलेल्या नेरला उपसा सिंचनाचे काम आता 40 वर्षानंतर पूर्णत्वास आले असून या परिसरातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही शेती करता येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात कालवे तयार करण्यात आले मात्र त्याला पाणी नव्हते. ज्यांच्या शेतात बोरवेल किंवा खाजगी पाण्याची सुविधा असेल असेच शेतकरी उन्हाळ्यात धान पीक घेत होते. परंतु आता गोसेखुर्द धरणाच्या नेरला उपसा सिंचनाच्या पालंदूर व घोडेझरी परिसरातील कालव्याला 40 वर्षानंतर का होईना पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
अंबरनाथ पालिकेचे अधिकारी विकासाचा अंबरनाथ पॅटर्न राबवून शहराचा विकास केल्याचं सांगत आहेत. मात्र त्यांनी आमच्या सोबत फिरून नेमका काय विकास केला? ते दाखवावं, असं खुलं आव्हान मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिलं आहे. तसंच नागरिकांच्या प्रलंबित मागण्या आणि प्रश्न २६ जानेवारीपर्यंत न सोडवल्यास २६ जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शैलेश शिर्के यांनी अंबरनाथ शहरातील १० ज्वलंत प्रश्न उपस्थित करत ते सोडवण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनपासून दीडशे मीटरपर्यंत नो फेरीवाला झोन करून फेरीवाला धोरण आणणे, कचरा नीट उचलला जात नसल्याने ठेकेदारावर कारवाई करणे, अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करणे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची पुनर्बांधणी करणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बी केबिन डीपी रोड तयार करणे, वालधुनी नदीतील अतिक्रमणे काढून नदी संवर्धन करणे, निसर्ग संकुलातील आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन त्याचा विकास करणे, चिखलोली धरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, मार्जिन स्पेस न सोडणाऱ्या विकासकांवर कारवाई करणे असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या सगळ्या प्रश्नांबाबत पालिकेने २६ जानेवारीपर्यंत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा २६ जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसण्याच इशारा शैलेश शिर्के यांनी दिला आहे. तर याबाबत अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांना विचारलं असता, शैलेश शिर्के यांच्यासोबत चर्चेला पालिका प्रशासन तयार असून चर्चेतून हे सगळे प्रश्न सोडवण्याची पालिकेची तयारी आहे, मात्र शिर्के यांनी उपोषण करू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
उल्हासनगरच्या आशेळे गावात चोरट्यांनी घरांना बाहेरून कड्या लावून काही घरात चोरी केल्याची घटना घडलीये. हा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला असून याबाबत पोलिसांत मात्र तक्रार करण्यात आलेली नाही.
आशेळे गावात पाण्याच्या टाकीच्या मागे भगवान म्हात्रे चाळ आणि अक्षय केणे यांचं घर आहे. सकाळी अक्षय केणे उठले असता त्यांच्या घराला बाहेरून कडी लावलेली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं, त्यामुळे त्यांनी शेजारच्या मित्राला बोलावून दरवाजा उघडला. त्यानंतर आजूबाजूला चौकशी केली असता शेजारील दोन भाडेकरू आणि मागे असलेल्या भगवान म्हात्रे चाळीत राहणाऱ्यांच्याही दरवाजाला बाहेरून कडी लावण्यात आल्याचं समजलं. तर एका घरातून चोरट्यांनी किरकोळ चोरी केल्याची माहिती समोर आली. त्यामुळं केणे यांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यात दाराला कडी लावताना चोरटे कैद झाले. चोर केणे यांच्या घराला कडी लावताना आणि कपड्याने दरवाजा बाजूच्या खिळ्याला बांधताना दिसून आला आहे. याप्रकरणी कोणताही गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेला नाही. मात्र पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यात गेल्या वीस दिवसापासून केस गळतीचे दहशतीन अनेकांना चिंताग्रस्त करून सोडले आहे... स्थानिक आरोग्य यंत्रणेपासून राष्ट्रीय पातळीवरच्या आरोग्य संस्था केस गळतीचे कारण शोधण्यासाठी बाधित गावात येऊन गेल्या आहेत .. मात्र अजूनही केस गळतीचे नेमके कारण शोधण्यात या आरोग्य संस्थांना यश आलेले नाही... त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे... राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांना देखील केस गळतीचे नेमके कारण सापडत नसेल तर आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था डब्ल्यूएचओला या प्रकरणात पाचारण करण्याची मागणी यावेळी उबाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केली. आज पर्यंत केस गळतीचे रुग्णांची संख्या 200 वर पोहोचली असून जिल्ह्याची चिंता वाढली आहे .. भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेकडे धावं घेऊन या आजाराचा शोध लावावा अशी मागणी उबाठा कडून करण्यात आली आहे
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शेत जमिनीच्या जुन्या वादावरून 40 वर्षीय इसमाचा डोक्यामध्ये कुराडीने वार करून निर्गुण खून केल्याची घटना माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये घडली.
जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये भास्तन येथील शत्रुघ्न मिरगे व त्याच्या चुलत भावामध्ये शेत जमिनीचा वाद होता या वादावरून माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शत्रुघुन मिरगे यांच्या डोक्यामध्ये कुराडीने वार करून खून करण्यात आला आहे. तर त्याची साली तिला सुद्धा कुराडीने वार करून गंभीर जखमी केले आहे.
घटनेची माहिती मिळताच जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.व त्या जखमी महिलेला पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये तातडीने बसून उपचारासाठी रवाना करण्यात आले. या घटनेतील आरोपी फरार झाला असून त्याचा शोध जलंब पोलीस करीत आहेत...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.