
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम... माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला. मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. आता दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदी कडे प्रस्थान करतील.
धर्मांतर करण्यासाठी गावात कोणी आलं तर त्याला ठोकून काढा - गोपीचंद पडळकर
गावागावात जसे बैलगाडी शर्यतीला बक्षीस असते,तश्या पध्दतीने गावागावात
धर्मांतरणासाठी येणाऱ्या ठोकून काढणाऱ्यांनासाठी बक्षीस जाहिर केले पाहिजे,
ठोकून काढल्यास पाच लाख रुपये,आणि त्याचा सैराट करणाऱ्यास 11 लाख बक्षीस जाहीर करा.
येऊ आता पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला तुला सुट्टी नाही ऋतुजाचा जीव गेला आमच्या अरे
अजित पवार यांचा भाजप आमदार महेश लांडगे यांना अप्रत्यक्ष टोला
पिंपरी चिंचवड शहरात भ्रष्टाचार मुक्त कारभार आणायचं आहे
कोण काय होता, कोण कसा काय झाला, कोण हात बाधून रहातय आणि घोडा त्याच्या चारही आजुबाजूला कशा प्रकारे फिरतय
ठाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र देत श्रीमती सुनीती देवी सिंघानिया शाळेत मोठ्या प्रमाणात मुले व शिक्षक आजारी असल्याची माहिती दिली आहे.
घरातील बादली आणि चाकूने हल्ला करत केला खून
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील घटना
पत्नीविषयी अपशब्द बोलल्यामुळे पतीला राग अनावर
रागाच्या भरात केला एकाचा खून
या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे
अनिल अशोक जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे
शरद पवार गटाला पिंपरी-चिंचवड शहरात बसणार मोठा धक्का
शरद पवार गटातील अजित गव्हाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
अजित गव्हाणे हे जवळपास 30 माजी नगरसेवकांसोबत करणार पक्षप्रवेश
अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार पक्ष प्रवेशसोहळा
आता बातमी अकोलेकरांची चिंता वाढवणारी. अकोला शहराला 5 दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता 7 दिवसांआड केला जाणार आहे. कारण, अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होतोय. 13.60 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. अर्थातच या प्रकल्पात सद्यःस्थितीत 11 टक्के दलघमी एवढा साठा आहे. याचाच विचार करीत अकोला महापालिकेने आजपासून हा निर्णय लागू केला आहे.
लातूरच्या देवणी तालुक्यातील वलांडी येथे अवैध धंदे आणि दारू विक्री जोमात सुरू आहे. तालुक्यातील अनेकांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त झाल्याने, महिलांनी हातामध्ये दारूबंदीचे फलक घेतले. उदगीर - निलंगा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. दारूविक्री बंद करून न्याय देण्याची मागणी देखील महिलांनी केली.
तळोदातील बोरद आरोग्य केंद्रातील प्रसूती विभागात आग
मध्यरात्री लागलेल्या आगीत प्रसूतिगृह जळून खाक
लाखो रुपयांची उपकरणे आणि साहित्य जळाले
आगीच्या वेळी प्रसूतिगृहात कोणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळला
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पुण्यातील कुंडमळा पूल दुर्घटनास्थळी पाहणी
बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी याच्याकडून घेणार माहिती
आमदार सुनील शेळके यांच्यासह स्थानिक देखील उपस्थित
काँग्रेस महाराष्ट्रात नात्यागोत्याचा पक्ष राहिलाय, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली. जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून चव्हाण यांनी ही टीका केलीय. काँग्रेस नेतृत्वहीन झाल्यानं सांगलीत घडामोडी घडत आहेत. टीका करून पक्ष चालत नाही, असंही चव्हाण म्हणाले.
अवकाळी पावसाच्या संकटातून वाचलेला कांदा आता बाजारपेठेत दाखल होत आहे.. बीडच्या कडा बाजार समितीमध्ये शेकडो क्विंटल कांद्याची आवक झाली असून सध्या या ठिकाणी कांद्याला 1500 ते 2100 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे.. आष्टी,पाटोदा, शिरूर सह शेजारच्या तालुक्यामधून कडा बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची मोठी आवक होताना दिसत आहे.
ठाकरे गटातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कोल्हापुरातील गांधीनगर मधील व्यापाऱ्याचे पैसे चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या टोळीकडून चोरीचे 1 कोटी 78 लाख रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 1 कोटी 79 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट देणार.
सायंकाळी ४ वाजता अजित पवार कुंडमळा ठिकाणी भेट देणार.
रविवारी कुंडमळा येथे दुर्घटना झाली होती, त्यात ४ लोकांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक लोक जखमी आहेत.
अजित पवार जखमींची हॉस्पीटलमध्ये जाऊन भेट घेणार असल्याची शक्यता.
पुण्यात पावसाला सुरुवात.
सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुणे शहरात पुन्हा एन्ट्री.
पुण्यातील पेठ भागात पावसाच्या दमदार सरी.
सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथून निघालेली निवृत्तीनाथ महाराज पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात पोहचलीय.. गेल्या काही दिवसापासून अनेक भागात मान्सूनने हजेरी लावली असून निसर्गाने देखील हिरवा शालू नेसलाय.. काही ठिकाणी काळीभोर शिवार तर काही ठिकाणी हिरवा शालू पांघरलेली जमीन असे चित्र आहे.. याच मनमोहक वातावरणातून विठू नामाचा जयघोष करत निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे विहंगम दृश्य बघायला मिळतंय..
पावसाळ्यात सखल भागात असलेल्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी केडीएमसीने सक्शन पंप लावले आहेत. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डोंबिवली स्टेशन सह वर्दळीची सात ते आठ ठिकाणे केडीएमसीसीने निश्चित केली आहेत . या ठिकाणी पाणी साचल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्याचप्रमाणे नागरिकांना मार्गक्रमण करताना तारेवरचे कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर केडीएमसीने सात ते आठ ठिकाणी सक्षम पंप लावलेत. या ठिकाणी पाणी साचल्यास पंपच्या सहाय्याने त्या ठिकाणचे पाणी काढण्यास मदत होणार आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातील बोगद्याला गळती लागली आहे. दोन्ही बाजुच्या बोगद्यांच्या सिलिंगमधून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. यामुळे कशेडी बोगदा प्रवासासाठी सरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संगमेश्वरमध्ये आलेल्या पूरामुळे श्रद्धा हाँटेल पाण्याखाली गेलं.
असावी नदीला पूर आला आणि पुराचं पाणी हाँटेलमध्ये शिरलं.
जवळपास तीन ते चार फुट पाणी हाँटेलच्या तळमजल्यावर होतं.
आता पाणी पूर्णपणे ओसरलं असून हाँटेलमध्ये चिखलाचं साचला आहे.
हॉटेलचं नुकसान झालं आहे.
नागपूर जिल्ह्यातील भिलगाव रोडवर असलेल्या अंकिता प्लस कंपनीत ब्लास्ट झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्य तर 4 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाी आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरात ठाकरे गटातून अंबाबाई चरणी 59 किलोचा लाडू अर्पण करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या युवासेनेकडून 59 किलोचा लाडू तयार केला आहे. या राज्यात पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सरकार यावं, अशी प्रार्थना अंबाबाई चरणी शिवसैनिकांनी केली. आणि या लाडूचा प्रसाद कार्यकर्त्यांसह भक्तांना वाटण्यात आला.
- वाल्मीक कराड संतोष देशमुख खून प्रकरणातला एक नंबरचा आरोपी आणि मास्टरमाइंड.
- एकीकडे धनंजय मुंडे म्हणतात आरोपींना फाशी झाली पाहिजे मात्र दुसरीकडे बीड शहरातील बॅनरवर आरोपी वाल्मीक कराडचे फोटो.
- राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगेंच्या वाढदिवसानिमित्त शहरात बॅनरबाजी.
संरक्षक भिंतीसकट दरड रस्त्यावर
संगमेश्वरमधील कसबा शास्त्रीपुलाजवळील घटना
दरड कोसळलेली एक लाईन वाहतुकीसाठी बंद
त्यामुळे या ठिकाणी होतेय वाहतूक कोंडी
संरक्षक भिंतींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
इंडिगोची फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच...इमर्जन्सी लँडिंग,
नागपूर विमानतळावर सुखरूप फ्लाईट उतरली आहे..
यात 157 प्रवाशी असून उतरवण्याच काम सुरू आहे..
यात पोलीस विभागकडून तपासणी केली जाईल..
यात कंपनीच्या विमानात बॉंम्ब असल्याचं कळतात ATC सोबत संपर्क साधून इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली..
यात यापूर्वी दिल्या गेलेल्या धमक्यांमध्ये काहीच मिळून आलं नाही. त्यामुळे यावेळेस नेमकं काय मिळतं याकडे आता लक्ष लागलं आहे..
पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक विमानतळाकडे रवाना झालाय.
शिवसेना उबाठा युवासेनेचे उपजिल्हाध्यक्ष ओंकार तुपे यांनी पाठवले पत्र
वाघोली पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या संदर्भात गृहमंत्री फडणवीस यांना पत्र
त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे.. ही पालखी आता अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे.. पुढील दोन दिवस ही पालखी नगर जिल्ह्यात असणार आहे.. संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथे मुक्काम केल्यानंतर आज ही पालखी पुढील प्रवासासाठी रवाना झाली आहे.. विठू नामाचा गजर करत हजारो वारकरी या पालखीत सहभागी झाले आहेत.. महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, पुरुष वारकऱ्यांच्या हातात टाळ - मृदुंग आणि मुखी विठुरायाचे नामस्मरण असे भक्तिमय वातावरण बघायला मिळतंय.
12 जुन ते 31 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीसाठी वरंध घाट मार्ग राहणार बंद, तर हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना वरंध घाटातील हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक राहणार बंद
पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात.. त्यातच सध्या वरंध घाट रस्त्याचं रुंदीकरणाचे कामं प्रशासनाकडून हाती घेण्यातं आलय, त्यामुळं अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झालाय..
त्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले आदेश.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कडून भूमिपूजन.
एक भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं तर त्याच रस्त्याच्या कामाच दुसरं भूमिपूजन अजितदादांचे आमदार शंकर मांडेकर यांनी केलंय.
पुण्याच्या भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते काल सायंकाळी भूमिपूजन झालं.
सुप्रिया सुळे यांनी बनेश्वर रस्त्याचे भूमिपूजन केल्यानंतर,काल पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा दुसऱ्यांदा रस्त्याचे भूमिपूजन.
7 जूनला खासदार सुप्रिया सुळे यांनी या रस्त्याचे केलं होतं भूमिपूजन.
ह्या रस्त्याचे काम व्हावं यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार पाठपुरावा केला जात होता, मात्र प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नव्हती.
त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी 9 एप्रिल ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.
जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय
जिल्ह्यातील गावे आणि वाड्या जोडणारे लहान पूल काढण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे
यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा ने केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी यांनी दिले आहेत
या संदर्भातली बैठक दोन दिवसात होण्याची शक्यता आहे मावळ येथील इंदुरी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी फुल रविवारी कोसळला
त्यामुळे जिल्ह्यातील धोकादायक लोखंडी पादचारी फुल गावी वस्त्यांना जोडणाऱ्या छोट्या मुलांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे
अहमदाबाद विमान अपघातात -उरण येथील न्हावा गावची २३ वर्षीय एअर इंडिया हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटीलचा विमान अपघातात मृत्यू झाला. आज तिचे पार्थिव न्हावा गावात आणण्यात आले आहे. तसेच थोड्याच वेळात अंतिम संस्कार देखील करण्यात येत आहे
अंत्यसंस्काराचे वेळी आमदार प्रशांत ठाकूर ,महेश बालदी उपस्थित आहेत
अमरावती जिल्ह्यात वर्षभरापासून 12 कोटीची देयके थकली..
2018 मध्ये केंद्राने जलजीवन मिशन उपक्रम घेतला हाती..2019 मध्ये प्रत्यक्षात सुरूवात..
जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन साठी जिल्ह्यात 262 कोटीचा आराखडा..
या कामामध्ये 50 टक्के केंद्र आणि 50 टक्के राज्याचा वाटा.
राज्याचा निधी नियमित मात्र केंद्राचा निधी अडकला..
- नाशिक भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते विजय साने हे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासाठी मुंबईकडे रवाना...
- रात्री उशिरा दोन वाजता उद्या मुंबई प्रदेश कार्यालयात पोहोचण्याचा शहराध्यक्ष यांना पक्ष श्रेष्ठींचा निरोप...
- भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांची माहिती...
उधार दारू न देणाऱ्या दारू दुकानादाराला मारहाण करत दारू दुकानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीची येरवडा पोलिसांनी काढली धिंड
येरवड्यामधील एका वाईन शॉपमध्ये दुकानदाराला दुकानात दारू उधार दिली नाही म्हणून रोहित पुष्कराज पिल्ले याने मारहाण करत दुकानाची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत ज्या परिसरात घटना घडली.त्याच परिसरात येरवडा पोलीस ॲक्शन मूडमध्ये येऊन आरोपीची धिंड काढली आहे.
- शिवसेना ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांच्या पत्नी ठाकरे गटातील माजी नगरसेवक किरण गामने, पुंजाराम गामने आणि सीमा निगळ यांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
- तिने माजी नगरसेवकांचा आज मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेत होणार प्रवेश
- एकीकडे सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबन घोलप यांच्यासह ठाकरे गटातील अन्य काही माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत असतानाच शिंदे यांच्या शिवसेनेने देखील लावला ठाकरे गटाला सुरुंग
राजापूर-ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात रानडुकरे पिकांचे नासाडी करत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी नाशिकच्या येवल्यातील राजापूरला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर या ठिकाणी मका व सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे,मात्र वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनींमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घालत पेरणी केलेल्या क्षेत्राची नासधूस करत पिकांचे कोंब नष्ट करत असल्याने पिकाची नासाडी करणाऱ्या रानडुक्करांचा बंदोबस्त करावा या मागणी साठी शेतकऱ्यांनी येवला-नांदगाव रोडवर राजापूर गावात रस्ता रोको आंदोलन केले.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला जुंपन्यासाठी संस्थानच्या वतीने कर्नाटक मधील अप्पाची वाडी येथील बाबुराव अर्जुन खोत यांचे कडून खरेदी केलेल्या माणिक व राजा, आणि सातारा शहापूरी येथील राजु भानुदास गिरी यांच्या कडून खरेदी केलेल्या राजा आणि सोन्या या बैलजोडीला जुंपन्यात येणार आहे. ह्या बैल जोड्या देहू मध्ये दाखल झाला आहे. संस्थांच्या वतीने त्यांची विधिवत पूजा करून देहू गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे. दरम्यान चौघडा गाडीसाठी पुणे जिल्ह्यातील सिध्दटेक जवळील बेलवंडी येथील संतोष खंडू कायगुडे यांच्याकडून खरेदी केलेल्या हिरा आणि राजा बैलजोडीला पालखीपुढे चौघडा गाडीला जुंपन्यात येणार आहे. यावेळी देहू देवस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त उमेश महाराज मोरे, यासह सर्व विश्वस्त, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा अठरा तारखेला दुपारी होणार असून या पालखीच्या रथाला जुंपन्यासाठी प्रथमच संस्थानच्या वतीने कोणत्याही शेतकऱ्यांची बैलजोड्या न लावता संस्थानने तीन बैल जोडया खरेदी केल्या आहेत. यामध्ये दोन बैलजोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी पालखीपुढे चालणाऱ्या चौघडा गाडी साठी खरेदी करण्यात आली आहे...
शासनाने महानगरपालिका प्रभाग रचनेचे आदेश दिल्यानंतर नांदेड महानगरपालिकेने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 2011 च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग रचना होणार आहे. नांदेड महानगरपालिकेसाठी 2017 प्रमाणेच 20 प्रभाग राहणार आहेत.19 प्रभागात 4 तर सिडको प्रभागात 5 असे एकूण 81 सदस्य संख्या राहणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्याने सर्वच पक्षातील इच्छुक कामाला लागले आहेत.
बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील राक्षसभुवन तांबा येथे शेतीच्या जुन्या वादातुन दोन गटात वाद झाला. यादरम्यान महिला शेतकरी सीमा खोले यांना ट्रक्टरने धडक दिली आणि यानंतर दिपक खोले या आरोपीने बेल्टने मारहाण केली. या प्रकरणी दिपक खोले, नानासाहेब तांबे आणि रामेश्वर औसरमल यांच्या विरूद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी सीमा खोले यांच्यावर बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
महावितरणच्या वलगाव उपकेंद्रात घुसून दोघांनी तेथील टेबल खुर्चीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली तसेच सहाय्यक अभियंत्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे. आमच्या भागात वीज व्यवस्थित राहत नाही तुम्ही ऑफिसमध्ये बसून काय करता नियमित वीज पुरवठा का होत नाही असा सवाल दोघांनी उपस्थित करत थेट कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सध्या दोघे आरोपी फरार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक रवाना केली आहे.
बदलापुरातल्या कात्रप परिसरात देवराज ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. रात्री तीनच्या सुमारास दोन ते तीन चोरटे गाडीतून आले. त्यांनी दुकानाचे शटर तोडलं आणि दुकानात प्रवेश केला. मात्र त्याचवेळी दुकानाचा सायरन वाजला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी लगेचच तिथून पळ काढला. दरम्यान दुकानाचे मालक त्या ठिकाणी पोहोचले मात्र त्यापूर्वीच चोरटे पसार झाले होते. चोरट्यांचा हा कारनामा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण तालुक्यात दाणादाण उडाली असून वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. धोकादायक ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे.
- दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातून जिंकलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरुद्ध काँग्रेसचे प्रफुल गुडधे, मोहन मते यांच्या विरोधात गिरीश पांडव चंद्रपूरच्या चिमूर मधून जिंकलेले बंटी भांगडीया यांच्याविरुद्ध सतीश वारजूरकर
- बल्लारपूर मधून विजय झालेल्या सुधीर मनगंटीवार यांच्याविरुद्ध संतोष सिंग रावत, राजुरा येथून जिंकलेले भोंगळे यांच्याविरुद्ध सुभाष धोटे यांनी उच्च न्यायालयात निवडणुक याचिका दाखल केली आहे.
- "निवडणूक आयोगाने ईव्हीएम द्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही"
- त्यामुळे या विजयी उमेदवारांची निवड अवैध ठरवून रद्द करण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.
- या निवडणूक याचिका फेटाळून लावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पाच आमदारांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
- याप्रकरणी सोमवारी हायकोर्टात अंतिम सुनावणी पार पडली आणि या अर्जांवर हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे.
सोलापूरकरांना संत गजानन महाराजांच्या दिंडीचे वेध लागले आहेत. आषाढी सोहळ्यासाठी रविवार दिनांक 29 रोजी शहरात पालखी दाखल होईल. सोलापुरात येणाऱ्या मानाच्या दिंडीमध्ये संत गजानन महाराज पालखी सोहळा महत्त्वाचा मानला जातो. वर्षानुवर्षे सोलापूरकरांना पालखी सोहळ्याची कायम प्रतीक्षा असते. संत गजानन महाराजांच्या अध्यात्मिक कार्य प्रत्येक कुटुंब पर्यंत पोहोचलेले आहे. मात्र प्रत्यक्षात शेगाव हे संत गजानन महाराजांची स्थान सोलापूर पासून शेकडो कि.मी अंतरावर आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यात संत गजानन महाराजांच्या मूर्तीच्या दर्शनाची संधी भक्तमंडळी सोडत नाही.
विठुरायाच्या पंढरी मध्ये मानाची पालखी असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचे हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथून प्रस्थान झाले आहे आज सकाळी ही पालखी निघाली असून हजारोच्या संख्येने महिला पुरुष वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले आहेत दरम्यान आज हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडणार आहे, श्रींचे अश्व या पालखीला प्रदक्षिणा घालत पुढे पालखी प्रस्थान होणार आहे हिंगोली पालिकेच्या वतीने या रिंगण सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली असून नागरिकांनी डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या रिंगण सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन हिंगोली पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड यांच्या मालमत्ता चल उचल संपत्ती जप्त करण्यासंदर्भात बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सरकारी वकिलांकडनं अर्ज करण्यात आला आहे या अर्जावरती आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद होणार आहे यामध्ये सरकारी पक्षाचे वकील सहाय्यक बाळासाहेब कोल्हे युक्तिवाद करणार आहे तर आरोपी पक्षाकडून विकास खाडे हे न्यायालयामध्ये युक्तिवाद करणार असून वाल्मीक कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्याचबरोबर आज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने सातवी सुनावणी होणार आहे या सुनावणीसाठी उज्वल निकम हे गैरहजर असणार असल्याची माहिती समोर आली आहे तर त्यांच्या जागी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे काम पाहणार आहेत. वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्ती संदर्भाच्या अर्जावरती आज बीडच्या न्यायालयात कामकाज चालणार आहे.
मातीचा ढिगारा खचल्यामुळे मातीखाली दोन कामगार अडकले
मातीखाली अडकलेल्या दोन कामगारांपैकी एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला एका कामगाराला अग्निशमन दलाचा जवानांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे
दुसऱ्या जखमी कामगाराला विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी केले घोषित
मयत कामगाराचे नाव सोनेलाल प्रसाद वय 27 वर्ष आहे
संध्याकाळी चार कामगार काम करत असताना अचानक त्यांच्यावर माती खचली
लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू झाला असून, काही शेतकऱ्यांनी अखेर पेरणीला सुरुवात केली आहे. मागच्या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने ,ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. यंदा देखील जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन आणि तूर पिकाचा पेरा केला जाणार आहे... तर बाजारात 26 किलो वजनाच्या सोयाबीन देण्याचा दर 3 हजार ते 3 हजार 500 रुपये आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या सोयाबीन मलाला बाजारात 4 हजार 400 रुपयाचा प्रतिक्विंटल भाव मिळतो आहे... त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल भाव आणि बाजारात बियाण्यांचा भाव गगनाला भिल्याने, शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत आले आहेत.
जळगाव महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव असलेल्या पंढरपूर यात्रेसाठी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सुमारे दोन हजार भाविकांना विशेष रेल्वेने -रवाना करण्यात आले. ही यात्रा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित झाली आहे.
१८ जून पंढरपूर मुक्कामानंतर ही रेल्वे १९ जून रोजी परत येणार आहे. मतदारसंघातील कोणताही भाविक विठ्ठल दर्शनापासून वंचित राहू नये, यासाठीच हा उपक्रम राबवला आहे. कार्यकर्त्यांचे योगदान अंमूल्य असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
खेड घाटात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागमोडी वळणाचा डोंगरातुन बायपास तयार करण्यात आलाय मात्र या घाटात डोंगर कड्याचे काम अर्धवट अवस्थेत असून दरडींचे संरक्षणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे पाऊसात डोंगरकड्यांवरून दरड थेट महामार्गावर कोसळण्याचा धोका निर्माण झालाय डोंगरकड्यांचे संरक्षणासाठी आवश्यक असलेले स्टील जाळी, काँक्रीट संरचना आणि सुरक्षात्मक उपाय केलेले नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. पावसाच्या सुरुवातीच्या सरींमध्येच दगड-माती महामार्गावर कोसळू लागल्याने अपघाताचा धोका वाढलाय या मार्गावरून सध्या अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून हा बायपास वापरण्यात येतो आहे.
मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे... बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घातल्याने भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे... शेवगा, 100ते 80 रुपये प्रति किलो... मेथी 30ते 40 रुपये पेंडी, शिमला 80ते 70 रुपये प्रति किलो.. तर दोडका 70 रुपये प्रति किलोचा दराने भाव खात आहे., त्यामुळे सामान्य नागरिकांना वाढलेल्या भाजीपालांच्या दरामुळे चांगलाच फटका बसला आहे..
पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
पुण्याला पाणी देणाऱ्या धरणातील पाणी पातळी वाढली
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चार धरणे मिळून ९ टक्क्याने पाणी पातळीत वाढ
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा
खडकवासला: ५६.२२ टक्के
पानशेत: १६.८१ टक्के
वरसगाव: २५.३४ टक्के
टेमघर: ३.४३ टक्के
चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा: २१.५३ टक्के
मागील वर्षी (आजच्या तारखेला) चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा: १२.०१ टक्के
० रायगड जिल्ह्यातुन वाहणाऱ्या आंबा आणि कुंडलीका नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
० रोहा परिसरात खाडीला मिळणाऱ्या आंबा आणि कुंडलीका या दोन्ही नद्या इशारा पातळी इतक्या पातळीवरून वाहत आहेत
० रायगड जिल्ह्यातुन वाहणाऱ्या सवित्री, पाताळ, उल्हास आणि गाढी या मोठ्या नद्या इशारा पातळी खालून वाहत आहेत
० जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट असून पाऊस कमी अधीक प्रमाणात बरसत आहे
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा मध्यम प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात १८ टक्क्यांवर गेलेले पाणी आता २८ टक्क्यांपर्यंत आले आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसासोबतच पावसाळ्यातही पाऊस होत असल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत आहे... यामुळे शेतकऱ्यांतून देखील समाधान व्यक्त होत आहे.
लातूर शहर, एमआयडीसी, कळंब व अंबाजोगाई या मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील अनेक खेड्यांना धनेगाव येथील मांजरा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो.. तर लातूर ,बीड, धाराशिव या तीन जिल्ह्यांची जलदायिनी म्हणून मांजरा धरणाची ओळख आहे... दरम्यान पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धरण क्षेत्रातल्या पाणीसाठ्यात वाढ होत, असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे..
जालन्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपीटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून 26 तलाठी 5 ग्रामसेवक आणि 5 कृषीसहायकांनी तब्बल 40 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे . दरम्यान या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सध्याचे आणि बदली करून गेलेल्या अशा सहा तहसीलदारांना नोटिसा बजावल्या असून खुलासे मागितले आहेत.तर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहायक आणि क्लर्क यांना देखील नोटिसा बजावून खुलासे मागितले आहे.त्यामुळ अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्यानंतर सहा तहसीलदारांसह तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या खंडाळा येथे गुरुवारी तिघांवर चाकूहल्ला झाला होता. यानंतर एका टोळक्याने दुकानांचे शटर आणि घराचा दरवाजा तोडून साहित्याची नासधूस करत दुचाकी पेटवून दिली. या गंभीर घटनेनंतर भाजप आमदार संजय केणेकर यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्यानंतर याप्रकरणी रात्री वैजापूर पोलिसांत ३७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात अजूनहीआमदार संजय केणेकर यांनी सोमवारी दुकान आणि घरांची पाहणी केली. चाकूहल्ल्यातील संशयित आरोपी गौरव अनर्थे गोरक्षक आहे. त्याने गोरक्षणाचे स्टेटस ठेवल्यामुळे त्याला ५० जणांनी मारहाण केली. बचावावेळी ही घटना झाल्याचे केणेकर यांनी सांगितले. घटनेला मूळ कारणीभूत असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या हल्ल्यामुळे नवनाथ पत्नी आणि मुलांना घेऊन घराच्या मागील दरवाजाने निघून गेले. टोळक्याने दरवाजा तोडून घर आणि दुकानातील फर्निचर पेटवून देत जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच जमावाने विजय त्रिभुवन यांच्या पाण्याच्या मशीन आणि टाक्या फोडल्या. गौरव अनर्थे यांची दुकान फोडून दुचाकी पेटवून दिली. जमावाने तिघांचे दुकान आणि दुचाकी पेटवून सात लाखांचे नुकसान केले.
हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतल्या या बंधाऱ्यातून पाणी ओसंडून वाहू लागल्याने या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार असुन पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतीच्या दृष्टिकोनातून मोठा दिलासा मिळालाय यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याचबरोबर परिसरातील निसर्गसौंदर्य खुलल्याने आणि धबधबे, हिरवाई फुलल्याने पर्यटकही या भागाकडे आकर्षित होत आहेत. सध्या घाटघर परिसरात पर्यटकांची गर्दी होत असून, स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
मावळ येथील पुल दुर्घटनेनंतर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीवरील जुन्या ब्रिटिश कालीन पुलाचा मुद्दा समोर आला आहे.
येथील जूना दगडी पुल हा धोकादायक असून या ठिकाणची जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. येथे नवीन पुल उभारणीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढच्या वर्षभरात येथे नवीन समांतर उभा राहिल . सोलापूर जिल्ह्यातील सर्व ब्रिटिश कालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात तथा लगतच्या बफर क्षेत्रात वाघांची संख्या वाढली आहे. परिणामी त्यांच्यात अधिवास तथा मादीकरिता संघर्षही शिगेला पोहचला आहे. अशाच एका संघर्षात एका नवतरुण वाघाचा मृत्यू झाला. वाघिणीवर वर्चस्व गाजवण्यासाठी तिच्या मुलाला ठार करण्यात आले. याच कारणावरून मागील महिन्यात ताडोबाचा किंग छोटा मटका व ब्रम्हा नावाच्या वाघाची झुंज झाली आणि त्यात ब्रम्हाचा मृत्यू झाला होता. तर आता ताज्या घटनेत चिमूर बिटातील नर वाघ त्रिशुल व पारू वाघिणीचा बछडा यांच्यात झुंज झाली. त्यात बछड्याचा मृत्यू झाला. चिमूर वनपरिक्षेत्राअतंर्गत येत असलेल्या शेडेगाव परिसरात पारू नावाची वाघीण आपल्या नऊ महिन्याच्या बछड्यासोबत वास्तव्यास आहे. इथे येऊन त्रिशुलने पारूच्या मुलावर हल्ला चढवला. ताकदवर त्रिशूलपुढे नऊ महिन्यांच्या नवयुवक वाघाचा निभाव लागू शकला नाही. आणि तो यात मारला गेला. बछड्याचे तोंड पूर्णपणे फुटल्या अवस्थेत तथा पाय व मानेला जखमा दिसून आल्या.
मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ठ कामाचा आणखी एक नमुना समोर आलाय कळंबणी पाठोपाठ पीर लोटे येथे देखील पुलावर रस्त्याला तडा गेल्या आहेत.लोटे औद्योगिक वसाहत ते परशुराम घाट भागात पीर लोटे येथे असणा-या उड्डाण पुलावर रस्त्याला ही मोठी तडा गेलीय परशुराम घाटाच्या सुरुवातीला, गोव्याकडे जाणाऱ्या बाजूच्या पुलाता तडा गेल्या महामार्गाच्या कामाबद्दल पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उभं राहतय.
सातार्यात ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे.मसाप, शाहूपुरी शाखा,मावळा फौंडेशन यांच्या मागणीनुसार साताऱ्यात संमेलन होणार आहे.मराठ्यांची चौथी राजधानी साताऱ्यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. राजधानी साताऱ्यात होणाऱ्या या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
साताऱ्यात मसाप, शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशन या संस्थांनी मागणी केल्यानुसार साताऱ्यात हे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव सुचवले त्याला साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, साहित्यिक डॉ. उमेश करंबेळकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही संस्थांच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची एकमताने ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.