Maharashtra Live Update : सोलापुरात अज्ञात व्यक्तीकडून एसटी बसवर दगडफेक

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 16th December 2024 : आज सोमवार, दिनांक १६ डिसेंबर २०२४. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन, संसदेचे हिवाळी अधिवेशन, महाराष्ट्र बंदची हाक, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 12 December 2024
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

 Solapur News :  सोलापुरात अज्ञात व्यक्तीकडून एसटी बसवर दगडफेक

- सोलापुरात अज्ञात इसमांकडून एसटी बसवर दगडफेक

- सोलापुरातील डी मार्ट आणि सम्राट चौक परिसरात करण्यात आलीय दगडफेक

- सोलापूरहुन तुळापूरला जाणाऱ्या दोन गाड्या आणि सोलापूरहुन साताऱ्याला जाणाऱ्या एक गाडीवर झाली आहे दगडफेक

- दगडफेकीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी झाले दाखल,पुढील तपास पोलीस करत असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

- यामध्ये कोणत्याही प्रवाश्याला त्रास झालेला नसून, सर्व परिस्थिती पूर्ववत झाली असून वाहतूक सुरळीत

Jalna News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या जालन्यातील रामनगर शहर बंदच आवाहन

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या जालना जिल्ह्यातील रामनगर साखर कारखाना शहर बंदच आवाहन आलं आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता जालना जिल्ह्यात देखील पडसाद उमटत आहेत. उद्या जालन्यातील रामनगर बाजारपेठ बंदच आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे. यासंदर्भात जालन्यातील मौजपुरी पोलिसांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन देखील देण्यात आल आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नागपूरला रवाना

महाराष्ट्र विधानसभेला धडक देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नागपूरला रवाना

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नावर करणार जनजागृती

शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते नागपूरला रवाना

40 जणांचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ नागपूरला रवाना

Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंसकार करण्यासाठी हजारोंची गर्दी

परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंसकार सुरु आहेत. मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे.

Ravindra Waikar : बिहारमध्ये दोन एम्स, पण महाराष्ट्रात एकच का? रवींद्र वायकरांचा केंद्र सरकारवर निशाणा 

बिहारसारख्या राज्यात दोन एम्स आहेत, पण महाराष्ट्रात मात्र फक्त एकच का? रवींद्र वायकरांचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबईत एम्स रुग्णालय आवश्यक-शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांची लोकसभेत मागणी

मुंबई उपनगरात एम्स सारख्या रुग्णालयाची आवश्यकता

मुंबईत टाटा सारखी चांगली इस्पितळे पण त्यावर भार जास्त

बिहारसारख्या राज्यात दोन एम्स पण महाराष्ट्रात फक्त एकच आणि नागपूरात आहे.

त्यामुळे आता मुंबई उपनगरात एम्स सारख्या इस्पितळाची आवश्यकता

Mumbai News : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ स्पोर्ट्स कारला अचानक आग 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ स्पोर्ट्स कारला अचानक आग लागली.

आगीवर तात्काळ ताबा मिळवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

कारला आग लागल्याने डी एन रोडवर वाहतूक कोंडी

Winter Session :  संसदेत बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा मुद्दा

शिवसेना खासदार नरेश म्हस्केंकडून लोकसभेत बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित

प्रियांका गांधींनंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक

शून्यप्रहर (झिरो हवर) मध्ये बांगलादेशप्रश्नी उपस्थित केला प्रश्न

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांक यांना सुरक्षा देण्याची मागणी

Pune News : विजयस्तंभ शौर्यदिनाला पोलीस अलर्टमोडवर

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारील विजयस्तंभावरील शौर्यदिन साजरा होत असताना 15 दिवस आधीपासूनच शासकिय सर्व विभागांसह पोलीस दल अलर्टमोडवर आलं आहे.

कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभावरील शौर्यदिनाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून 15 लाखांपेक्षा जास्त आंबेडकर अनुयायी दाखल होत असतात. त्यामुळे शौर्यदिन मानवंदना कार्यक्रम उत्साहात पार पडला जावा, यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि सुरक्षा आणि संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी पोलीस दलासह शासनाच्या सर्व विभाग सज्ज झाले आहेत. आज कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसरात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने महत्त्वाची बैठक पार पडली.

Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संसदेत चर्चा

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संसदेत चर्चा झाली.

बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला प्रश्न

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी केली मागणी

बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही - सोनावणे

जे या प्रकरणातील मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी

खासदार बजरंग सोनावणे यांची लोकसभेत मागणी

Strike Against EVM  : ईव्हीएम बंदीसाठी मुलुंडकरांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या मार्गदर्शनात आणि मुलुंडकरांच्या वतीने सोमवारी ईव्हीएम बंदीसाठी मुलुंड पूर्व रेल्वे स्टेशन येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. सदर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात सर्व-सामान्य जनतेला सामील करून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबविण्यात आली. भाजपाच्या हुकुमशाही प्रवृत्ती, मनमानी कारभार तसेच ईव्हीएमचा घोळ करून अप्रामाणिकपणे निवडणुका लढविण्याच्या कारभाराला जाब विचारण्यासाठी हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आलेले.

शिवसेना नाराज आमदार प्रकाश सुर्वे मुंबईसाठी रवाना

मंत्रिपद न मिळाल्याने आमदार प्रकाश सुर्वे यांनी नाराजी व्यक्त केली होती. आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस मात्र पहिल्या दिवशी सुर्वेंची गैरहजरी आहे.

पुणे सातारा महामार्गावर आंबेडकरी अनुयायांकडून निषेध आंदोलन

पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाका येथे परभणीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांकडून निषेध आंदोलन करण्यात आले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ करत, जोरदार घोषणाबाजी करत टोल नाक्यावरच्या वाहनांची टोल वसुली काहीकाळ बंद ठेवली. पोलिसांकडून झालेल्या बेदम मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. आंबेडकर अनुयायांची मागणी आहे. आंदोलनामध्ये भोर, राजगड आणि हवेली तालुक्यातील भीमसैनिक सहभागी झालेत.

कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला

कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला असून मृतांची संख्या झालीय. फजलू शेख असं आठव्या मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातात ते जखमी झाले होते, त्यांच्यावर उपचार सुरू होता. सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात होते, याचदरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. अपघातात आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला तर ४१ जखमी झालेत.

Maharashtra Live Update : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

डॉ.पद्मसिंह पाटील यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याची त्यांचे चिरंजीव आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची माहिती

गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणास्तव डॉ.पद्मसिंह पाटील मुंबईतच

डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून पाटील पुढील दोन ते तीन दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

टिटवाळ्यात मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. टिटवाळ्यावरून अप दिशेने जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. लोकल उशिराने असल्याने प्रवाशांचा खोळंबा..

आम्हाला अडीच वर्षाची जबाबदारी दिलेली आहे. पण अडीच वर्षानंतर जे नाराज आहेत, त्यांना जबाबदारी मिळेल. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी बाळगायला हवी.
प्रताप सरनाईक

Maharashtra Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर

आज संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असणार

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

सायंकाळी पक्ष कार्यालयात येणार साधणार महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद

Maharashtra Live Update : खाते वाटपासाठी आजच सायंकाळी बैठकीची शक्यता

खाते वाटपासाठी आजच सायंकाळी बैठकीची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी होणार बैठक

सुत्रांची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोघेही उपस्थित राहण्याची शक्यता

खाते वाटप संदर्भात आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Maharashtra Live Update :  बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावर अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत गंभीर आरोप  

पोलीस तक्रार दाखल करुन घेत नाहीत. पोलिस आरोपींना सहकार्य करत असतील. सहा आरोपी यात आहेत. राजकीय पक्षाशी संबध अजित दादा गटाचा एक तालुका अध्यक्ष देखील यात आहे. बाप तो बाप रहेगा अस पोस्टर पोलिस स्टेशन समोर लावलं गेलं. तीन गुन्हेगार फरार आहेत. सगळ्यांचे सीडीआर तपासावे. कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी यांचे संबध आहेत. तीन आरोपी राजकीय पक्षाशी संबध आहेत. बीड जिल्ह्यातील मंत्री महोदयांनी आरोपींना फोन केले. पोलिसांना फोन केले असे लोकांनी आरोप केलेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.

Maharashtra Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकरांच्या नावाची चर्चा

भाजपच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पडद्यामागे काम करणाऱ्या महत्त्वाचा चेहरा म्हणून प्रवीण दरेकर यांच्याकडे पाहिलं जात... देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचं सुद्धा असल्यानं पसंती जाऊ शकेलं...

विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे...

मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्धवला असताना प्रवीण दरेकर यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.

यंदा जातीय समीकरण साधताना प्रवीण दरेकर यांच्याही नावाची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मंत्रीपद न मिळाल्यामुळे विजय शिवतारे नाराज. ?

विधानभवनात सही करून पुरंदरला निघून जाणार असल्याचे समजलेय.

नाराजी व्यक्त करण्यासाठी अधिवेशनात थांबणार नाही..

महायुती मधील तिन्ही पक्षातील तुटक समन्वयांवर विजय शिवतारे नाराज

काही वेळात आपल्या मतदारसंघात जाणार असल्याची Saam Tv ला माहिती.

Maharashtra Bandh News : संजय कुटे यांना मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक 

जळगाव जामोद मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून येऊनही भाजप नेते संजय कुटे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने जळगाव जामोद मतदारसंघात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी समाज माध्यमात देवेंद्र फडणवीस यांचा निषेध नोंदवायला सुरुवात केली असून आज शेकडो वाहनातून हजारो कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्यासाठी नागपूरकडे कूच करणार आहेत. थोड्याच वेळात कार्यकर्ते जळगाव जामोद मतदारसंघातील सोनाळा या गावात जमून तेथे देवेंद्र फडणवीस यांचा सामूहिक निषेध करून नागपूरकडे कूच करणार आहेत.

chhagan bhujbal News : छगन भुजबळ यांना मंत्रिपदातून डावलले,  नागरिकाचा रास्तारोको, नागपूर - पुणे महामार्ग रोखला 

ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून सिंदखेडराजा येथे ओबीसी समाजाच्यावतीने शहरातून मोर्चा काढत नागपूर पुणे या महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले... राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा निषेध करत सिंदखेडराजा येथे मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला

Maharashtra Bandh News : घाटी हॉस्पिटलमधून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह परभणीकडे पाठवला, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमधून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह पोस्टमार्टम करून परभणीकडे पाठवत आहेत. मोठी गर्दी जमली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह परभणीकडे ॲम्बुलन्सद्वारे घेऊन जात आहेत. छत्रपती संभाजी नगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी परभणी येथे घेऊन जात आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेल्या आहे. बंदोबस्तासह परभणीकडे ॲम्बुलन्स निघाली आहे. सोबत कुटुंबीय आहेत.

Maharashtra Live Update : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदारांचा प्रवेश गट नेत्याशिवाय

- पक्षाची पहिली बैठकही गट नेत्याशिवाय होण्याची शक्यता, काही प्रमुख नेत्यांमध्ये रस्सीखेच असल्यानं अजूनही निर्णय नाही...

- विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 16 जागी विजय मिळाला...

- निवडणुकीचा निकाल लागून सुमारे 3 आठवडे झाले

- शरद पवारांची राष्ट्रवादी,ठाकरेंची शिवसेना यांचेकडून गट नेते निश्चित करण्यात आले

- काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला मंगळवारी नागपुरात आल्यावर बैठक घेणार आहेत।।

- या बैठकीत गट नेता निवडला जाण्याची शक्यता

- मात्र विधिमंडळात काँग्रेसची आजची एन्ट्री गट नेत्याशिवायच

अनेक जणांना शपथ घेता आली नाही. नारजी साहजिक आहे. पण महामंडळावर अनेकांची बोळवण होइल.
अमोल मिटकरी

स्थानिक स्वराज्य संस्था पुढे ढकल्याचा प्रस्ताव संमत

स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणूका पुढे ढकलण्या संदर्भात प्रस्ताव संमत झाला. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. दोन्ही सभागृहात चर्चा झाल्यावर हे विधेयक पास होईल.

Maharashtra Live Update : मविआचे नेते आज परभणीला जाणार

मविआचे नेते आज परभणीला जाणार असल्याची माहिती मिळाली. परभणीत झालेल्या हिंसाचारानंतर आज मविआचे नेते दुपारी परभणीला भेट देणार आहेत. परभणीत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

हिवाळी अधिवेशनाला सुरूवात, मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची ओळख करून देण्यास सुरुवात

नवनिर्वाचित मंत्री याची ओळख करून देण्यात येत आहे. मंत्र्यांचा परिचय करताना दादा भुसे , भरत गोगावले संजय सावकारे गैरहजर आहेत. 

Maharashtra Bandh News : पंढरपूर बंदला संमिश्र प्रतिसाद

परभणी घटनेवरून पंढरपुरात सर्व आरपीआय संघटनांच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बंदला पंढरपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने बंद तर काही व्यवहार सुरळीत चालू होते. जनजीवन कुठेही विस्कळीत झाले नाही. त्यामुळे या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला दिसून आला. सर्व संघटनांनी एकत्र येऊन तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून नेते छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याची प्रयत्न सुरू झाला आहे.  अजित पवारांचे निकटवर्ती प्रमोद हिंदुरावांनी भुजबळांची भेट घेतली.  भुजबळांना केंद्रात महत्वाची जबाबदारी देण्याबाबत चर्चा सुरू आहे.

आमदार म्हणून काम केलं आहे. आता मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव वेगळा असेल. खातेवाटपानंतर कामाबद्दल अधिक बोलता येईल. पक्षाने कामाच ॲाडीट करत असेल तर चांगलं आहे.

इंद्रनील नाईक, मंत्री

छगन भुजबळ व गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद नाकारलं हा ओबीसींचा अपमान आहे.
लक्ष्मण हाके
नवीन रक्ताला वाव द्यायलाच पाहिजे, दुसऱ्याचा आनंदात सहभागी होणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आपल्याला काम करायचे आहे,चांगले सुरवात झाली आहे. नव्या मंत्र्यांना मनापासून शुभेच्छा.
दीपक केसरकर

Maharashtra Live Update : ईव्हीएमच्या विरोधात विरोधक आक्रमक

हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी ईव्हीएमविरोधात आंदोलन पुकारलेय. विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन पुकारलेय.

Maharashtra Bandh News : आंबेडकर अनुयायींचे मुंबईमध्ये आंदोलन

चेंबूरमध्ये आंबेडकर अनुयायींचे आंदोलन सुरू आहे. पोलिसांकडून आंदोलन कऱणाऱ्यांची धरपकड करण्यात येत आहे.

जनतेच्या समस्या दूर करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. अडीच वर्षाच्या कामाचे ऑडिट केले जाणार,जे चांगले काम करतात त्यांना शाबासकी मिळाली पाहिजे. भुजबळ नाराज नाहीत,ते आमचे सगळ्यांचे नेते आहेत,वरिष्ठ त्याबाबत योग्य निर्णय घेतील. भुजबळ बाबत वरीष्ठनाचा निर्णय आहे. कुठलेही खात्याची अपेक्षा व्यक्त केली नाही,कुठलाही खाते मिळाली तर त्याला न्याय देणार
दत्ता भरणे, कॅबिनेट मंत्री

Maharashtra Bandh News : परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ लातूरमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद

Latur Bandh News :  परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली तसेच पोलिसांच्या कस्टडीतील कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ लातूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे.. शहरातील आंबेडकरी व संविधानवादी पक्ष-संघटनाच्या वतीने हे बंदच आव्हान करण्यात आलं आहे.. शाळा ,महाविद्यालय व्यापारी संकुल बंद करत व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिला ..तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौज फाटा देखील तैनात केला आहे

Maharashtra Live Update : निलेश राणेंची ठाकरेंवर टीका

राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं ते बघा ? अशा पद्धतीचे पत्र आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलं आहे. आता तरी कपटीपणाने कोणासोबत वागू नका. तुम्हालाही मी शुभेच्छा देतो कारण पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचं नसतं तुमच्या मुलांनाही अक्कल द्या. जर त्यांना अक्कल आली नसेल तर कठीण आहे. असा खोचक टोला ही निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Nanded Bandh : नांदेडमध्ये महाराष्ट्र बंदला प्रतिसाद

Maharashtra Bandh : परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या नंतर आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे.नांदेडमध्ये देखील या बंदला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळतोय.नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुक्यात देखील या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहे.बंद च्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.

सगळ्या चॅनल वर मी आमदारांच रुसवे फुगवे पाहत आहे. एवढं मोठं यश मिळालं ते आनंद साजरा करून तुम्ही कामाला लागायला पाहिजे होत.
सुप्रिया सुळे
जेव्हा महाराष्ट्र जळत होता तेव्हा हे सरकार आपला उत्सवात होते. कायदा व सुव्यवस्थावर चर्चा झाली पाहिजे. सरपंचाचा खून होतो, एकाचा कस्टडीमध्ये मृत्यू होतो. विरोधकांनी या सगळ्यांवर जाब विचाराला पाहिजे.
नितीन राऊत, काँग्रेस आमदार

आज मंत्री म्हणून पहिला दिवस आहे, आनंद आहे-मंत्री मेघना बोर्डीकर

महिलांवर विश्वास ठेवून काम करण्याची संधी आमच्या नेत्रुत्वाने दिली.

परभणीतील घटना चुकीची.

पोलिस परिस्थिती हाताळत आहेत.

ज्याचा मृत्यू झाला आहे तो हार्ट अटॅक ने त्याचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आहे

आजचा बंद आहे उद्या पासून सर्व पुर्वपदावर येईल.

लोकानी कायदा सुव्यवस्था राखला पाहिजे.

असा उद्रेक लोकांनी करू नये सर्वांनी शांतता राखावी

सेनाभवना बाहेर नितेश राणे यांच्या अभिनंदनाचे लागले बॅनर...

नितेश राणे यांनी मंत्री पदाची काल शपथ घेतल्यानंतर हिंदू धर्म रक्षक अशा उपाधी मध्ये भाजप पदाधिकारी विनय दुबे यांच्याकडून थेट सेना भवना बाहेर लागले बॅनर...

'हिंदू धर्म रक्षक नितेश राणे... तो पुन्हा आला.. मी नितेश नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की...' अशा आशयाचे बॅनर लावून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न...

Parbhani: परभणी घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड जिल्हा बंदची हाक

परभणी घटनेचे पडसाद नांदेड जिल्ह्यात उमटत आहेत.आज विविध सामाजिक आणि राजकीय पक्ष संघटनांनी नांदेड बंद ची हाक दिलीय.नांदेडच्या अर्धापूर ते निर्मल महामार्गावर विविध सामाजिक संघटनेने टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करत परभणी घटनेचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Bhandup: धक्कादायक! भांडुप मध्ये 14 वर्षीय मुलाने अभ्यास करण्यास सांगितले म्हणून केली आत्महत्या

प्राथमिक मिळालेल्या माहिती नुसार आई ने अभ्यास करण्यास सांगितल्यावर मुलाने घरत बेडरूम मध्ये लावला गळफास

भांडुप मध्ये एका उच्भ्रू सोसायटी मधील घटना

मुलाला जवळील रुग्णालयात दाखल केली असतं डॉक्टरांनी केले मृत घोषित

भांडुप पोलीस स्टेशन मध्ये अपघाती मृत्यू ची नोंद

Weather Update In Marathi : हाडं गोठवणारी थंडी, नाशिकचा पारा 3.8 अंशावर

weather update in marathi : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम राहिला आहे. ओझर HAL येथे 3.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 5.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. उब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्या आधार घेत आहेत. थंडीचा कडाका कायम असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली.

Parliament Winter Session samvidhan debate : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा

Constituent Assembly Debates : आजपासून २ दिवस राज्यसभेत संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त विशेष चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत चर्चेला सुरुवात करणार

विरोधी पक्षाकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जू खर्गे चर्चेला सुरुवात करण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या चर्चेत भाग घेणार

शनिवारी लोकसभेत सांविधनावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती

राज्यसभेत काँग्रेससह INDIA आघाडीचे इतर पक्ष देखील चर्चेत सहभागी होणार

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फौजिया खान चर्चेत सहभागी होणार

Eknath Shinde News : श्रध्दा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात शिवसेनेची मंत्रिपदं

मंत्रिपदं न मिळाल्याने नाराज होऊन पक्षाच्या कार्यपध्दतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

काही नाराज आमदारांनी पक्षावर टीका केली आहे. त्यामुळे शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रध्दा आणि सबुरी ठेवा कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल . योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल अशी भूमिका शिंदे यांनी घेतली आहे.

केसरकर यांनी ज्या प्रकारे संयमी भूमिका घेतली आहे त्याचं शिंदे यांनी कौतुक केलं आहे. तर , नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गोटोतून सुरू असून मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मात्र शिंदे नाराज झाल्याचं कळतंय. त्या आमदारांना या नाराजीचा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

EVM शब्दामुळे महायुती आणि उद्धव ठाकरे सेनेत जुंपली...

EVM म्हणजे Every Vote For Maharashtra असा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता

तर EVM म्हणजे Every Vote Is Manipulated असा उल्लेख उध्दव ठाकरे सेना तर्फे करण्यात आला आहे...

उध्दव ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी तीतवकरून सरकार ला डिवचले

Maharashtra vidhan sabha winter session : हिवाळी अधिवेशन आजपासून सुरुवात

फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा कालच विस्तार झाला असून सर्व मंत्री आज सहभागी होतील. मंत्री आज पदभार स्वीकारतील त्याचबरोबर कोणत्या मंत्राला कोणत्या विभगाची जबाबदारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Maharashtra vidhan sabha winter session 2024 Live Update : विधान भवनात राष्ट्रवादीचे २ पक्ष कार्यालय

यंदा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार कार्यालय अशी दोन स्वतंत्र कार्यालये आहेत. मागच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीसाठी एकच पक्ष कार्यालय होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com