Maharashtra Live Update: टीम इंडियाचं मुंबईत आगमन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 10 March 2025: आज सोमवार दिनांक १० मार्च २०२५ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकीय घडामोडी, दत्ता गाडे, धनंजय मुंडे, सुरेश धस, सतीश भोसले, संतोष देशमुख हत्या प्रकरण, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर.
Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 10 March 2025
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

टीम इंडियाचं मुंबईत आगमन

टीम इंडियाचं मुंबईत आगमन झालं.

kolhapur-ratnagiri : कोल्हापूर-रत्नागिरी राज्य मार्गावर वडाचं झाड कोसळलं

कोल्हापूर-रत्नागिरी राज्य मार्गावर केर्ली जवळ वडाचं झाड कोसळलं.

रस्त्याच्या मध्यभागी मोठं वडाचे झाड कोसळल्याने राज्य मार्गावरील चारचाकी वाहतूक बंद..

तर एका बाजूने दुचाकी वाहतूक सुरू.. ट्राफिक जाम

Nashik News : अर्थसंकल्पावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी

- राज्याच्या अर्थसंकल्पावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी

- अर्थ संकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

- निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीच आश्वासन राज्य सरकारने पाळले नाही

- कांद्याचे भाव घसरलेले असतानाही कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्यास सरकार तयार नाही.

Kalyan : दुकानदारांना फसवणाऱ्यांना कोळसेवाडी पोलिसांनी केली अटक

सुपर मार्केट गाठत किराणा खरेदी करायचा आणि दुकानदाराने बिलाची विचारणा केली असता एका फोन पे वरुन पैसे पाठवितो असे सांगायचे.त्यानंतर ऑनलाइन पेमेंट केल्याचे बसून तेथून पळ काढणाऱ्या दोन जणांना कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात .

पंकज गोपाळ पाटील आणि अनिल अरुण कांबळे अशी दोघांची नावे आहे. या दोघांकडून पोलिसांनी मुद्दमाल हस्तगत केला आहे. या दोघांनी हे आधी देखील अनेक दुकानदारांना अशा प्रकारे गंडवल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस पुढील तपास करत आहेत

Raigad : पेणमध्ये सापडला सुटकेसमध्ये कोंबलला महिलेचा मृतदेह

महिलांवरील अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असताना रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये सुटकेसमध्ये कोंबलेला महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दुरशेत गाव हद्दीत बाळगंगा नदी किनारी हि सुटकेस पडली होती. परिसरात दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांनी तपास केला असता हि धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून साधारण 30 ते 40 वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह असून पाच ते सहा दिवसांपूर्वी तीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Pune : गौरव आहुजाला एक दिवसाची पोलिस कोठडी

पुणे मेट्रो मार्गिका रोखणाऱ्या आंदोलकांना २ दिवसांची पोलिस कोठडी

मेट्रो मार्गिका रोखणाऱ्या आंदोलकांना २ दिवसांची पोलिस कोठडी

८ आंदोलकांना आज पुणे न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

पुणे महापालिका मेट्रो स्टेशनवर काल करण्यात आले होते आंदोलन

काल पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता

सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मेट्रो कायदा तसेच बेकायदा आंदोलन यासह इतर कलमानुसार काल आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला

या आंदोलनकर्त्यांना काल पोलिसांनी केली उशिरा अटक

कल्याण पूर्वेतील १०० फुट रोड परिसरात प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध

कल्याण पूर्वेतील १०० फुट रोड परिसरात महानगरपालिकेच्या प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. हा कचरा प्रकल्प मानवी वस्त्यांपासून दूर हलवावा अशी मागणी करत शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरत स्वाक्षरी मोहीम आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Pune : गौरव आहुजा प्रकरणी न्यायालयात सुनावणीला सुरुवात

गौरव आहुजा याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आहे

पुण्यात शनिवारी सिग्नल वर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गौरव आहुजा याला केली होती पोलिसांनी अटक

आहुजा याचा मित्र भाग्येश ओसवाल याला सुद्धा केलं जाणार हजर

काल न्यायालयाने सुनावली होती दोघांना एका दिवसाची कोठडी

अमरावतीत डाव्या आघाडी व सामाजिक संघटनेचा विद्युत कार्यालयावर मोर्चा

महावितरण वितरण कंपनीने प्रीपेड मीटरची सक्ती सुरू केली आहे, नवे कनेक्शन घ्यायचे असेल किंवा खराब झालेले मीटर बदलावयाचे असेल तर प्रीपेड मीटर शिवाय पर्याय सांगितला जात आहे, यावरून आता अमरावती जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे, डाव्या आघाडी व सामाजिक संघटनेच्या वतीने अमरावतीच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यावेळी स्मार्ट/ प्रीपेड मीटर अमान्य असल्याचे हजारो अर्ज दाखल यावेळी महावितरणला देण्यात आले. विविध फलक हातात घेत यावेळी स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रॉनिक मीटर ला जोरदार विरोध करण्यात आला, स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रॉनिक मीटर आम्हाला नकोच अशी भूमिका यावेळी घेण्यात आली, यावेळी अमरावती मुख्य महावितरण कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर यावेळी जोरदार निदर्शने करत मागण्यांचे निवेदन महावितरण कार्यालयाला देण्यात आले

हिंगोलीत प्रवासी सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांचा वावर, बंदोबस्त कधी होणार प्रवासी संघटनांनी केला सवाल

नाशिक - राज्याच्या अर्थ संकल्पावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी

- राज्याच्या अर्थ संकल्पावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी

- अर्थ संकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

- निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीच आश्वासन राज्य सरकारने पाळले नाही

- कांद्याचे भाव घसरलेले असतानाही कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्यास सरकार तयार नाही

- शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तसच शेतमालाच्या हमीभावाबाबत अर्थसंकल्पात काहीच नाही

- साखर कारखान्यांना कट्ट्यावरील रुपये देतात मात्र शेतीच्या बंद पडलेल्या पाणी योजनांना सरकारकडून मदत नाही

- केंद्र आणि राज्यातील सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

- दरम्यान या शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी

शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रवींद्र धंगेकर मुंबईच्या दिशेने रवाना

शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी रवींद्र धंगेकर मुंबईच्या दिशेने रवाना

धंगेकर यांच्यासोबत अनेक शिवसैनिक सुद्धा आज मुंबईत

पुण्यातील मुख्य पदाधिकारी देखील मुंबईत दाखल होणार

संध्याकाळी ७ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकर करणार शिवसेनेत प्रवेश

सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या साडू गब्बा विरुद्ध सुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल

आष्टी तालुक्यामध्ये सध्या सतीश उर्फ खोक्या भोसले याचे कारनामे चांगलेच गाजत आहेत.आता त्याचा साडू प्रशांत अरफान चव्हाण (गब्ब्या) हा सुधा चांगला चर्चेत आला असून त्यानेही एका शेतकऱ्यास एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

Beed : बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पालकमंत्री अजित पवारांच्या प्रतिमेला गाजर दाखवून आंदोलन

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर सामाजिक कार्यकर्त्यांकडून लक्षवेधी आंदोलन केले जात आहे. उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडकरांना विकासाचे गाजर दाखवले असा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेसमोर गाजर दाखवून लक्षवेधी आंदोलन केले आहे.

बीड जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत 205 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद आहे. यापैकी 108 कुटुंबीयांना मदत देण्यात आली. मात्र मागील वर्षातील 63 आणि चालू वर्षातील 82 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळालेली नाही.

Raigad: कोलाड भिरा फाट्याजवळ भंगारच्या गोडाऊनला भीषण आग

० आगीच्या धुराचे लोट बाजुच्या परिसरात

० रोहा MIDC अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

० आग विझवण्याचं प्रयत्न सुरू मात्र नियंत्रण अद्यापही नाही

Beed Politics: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी 12 मार्च रोजी केज न्यायालयातच होणार

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटला केज न्यायालया ऐवजी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात चालवला जावा..

असा विनंती अर्ज एसआयटीने न्यायालयात केला होता..

या अर्जावर आज सुनावणी झाली त्यात पुढील सुनावणी 18 मार्च रोजी होणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने देशमुख हत्या प्रकरणातील खटला बीडच्या न्यायालयात चालवण्याची विनंती करण्यात आलेली आहे.

मात्र 12 मार्च रोजी पहिली सुनावणी ही केज न्यायालयातच होणार आहे.

Ladki Bahin Yojana: जालना जिल्ह्यात 40 लाडक्या बहिणींनी नाकारला लाडकी बहीण योजनेचा लाभ

जालना जिल्ह्यात 40 लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला आहे.

जिल्ह्यात 5 लाखांपेक्षा जास्त महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेताय.

योजनेसाठी पात्र नसताना योजनेकरीता चुकून अर्ज केलेल्या जवळपास 40 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणून जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले होते.

यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 40 महिलांचा लाभ बंद केला आहे.

अशी माहिती जालना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी दिलीय.

दरम्यान, पात्र नसताना ही ज्या महिलांकडून योजनेसाठी चुकून अर्ज केला गेला असेल त्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करून मिळणारा लाभ थांबवावा असं अवाहन कोमल कोरे यांनी केलंय.

विविध मागण्यांसाठी सिंहगर्जना युवक अपंग संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सर्वसामान्य नागरिक, जेष्ठ नागरीक, परितक्त्या विधवा, शेतकरी समस्या व दिव्यांग यांच्या विविध समस्या तसेच अर्थसहाय्य अनुदानाच्या रक्कमेत वाढ करण्याच्या मागणीसाठी सिंहगर्जना युवक अपंग विकास सामाजीक संघटनेच्यावतीने आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या सोबत विकास निधीमधून दिव्यांगाकरीता राखीव असलेल्या ५ टक्के निधी दिव्यांगावर खर्च करावा.

राज्यातील बोगस अपंग शाळा, वस्तीगृह शाळा यांची चौकशी करुन बंद करा, ज्या दिव्यांगांच्या परिवारात ३ एकर कोरडवाहू, व एक एकर ओलीताची शेती आहे.

अशा दिव्यांगांना योजनांचा लाभ द्यावा, दिव्यांगांना वित्त व विकास महामंडळाने दिलेली कर्जे त्वरीत माफ करावीत.

यासह विविध मागण्यांना घेऊन हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

Jalna GBS: जालन्यात GBS चा पहिला रुग्ण आढळला

जालन्यात GBS या आजाराचा पहिला रुग्ण आढळला असून जालना शहरातील 23 वर्षीय तरुणाला या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराची लागण झाली आहे.

या रुग्णावर सध्या जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे .

दरम्यान मुंबई पुणे या शहरानंतर आता मराठवाड्यात GBS चे रुग्ण आढळत आहे.

यापूर्वी छत्रपती संभाजी नगर लातूर नांदेड सह आता जालन्यात देखील रुग्ण आढळला आहे, दरम्यान जीबीएस आजाराच्या लक्षणाबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृतीची आवश्यकता असून याबाबत तपासणी देखील मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे.

Buldhana: बुलढाणा जिल्ह्यात अफूची शेती होत असल्याची दुसरी घटना उघड

देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील उंबरखेड शेत शिवारात खरबूज आणि तिळाच्या पिकांमध्ये मधोमध करण्यात आली होती अफूची लागवड...

देऊळगाव राजा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्तिक कारवाई...

17 लाख 24 हजाराचा पोलिसांनी केला जप्त, शेतकरी उद्धव कायंदे याला पोलिसांनी गुन्हा दाखल करून केली अटक...

22 फेब्रुवारी रोजी अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतून 13 कोटी पेक्षा अधिक किमतीची अफूची झाडे पोलिसांनी केली होती जप्त..

रामदास कदम यांनी पालखी नाचवण्याचा लुटला आनंद...

सध्या कोकणात शिमगोत्सव सुरू आहे. राजकीय नेते देखील आपल्या व्यक्त कार्यक्रमांमधून शिमगोत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत..

माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांची पत्नी ज्योती कदम यांनी पालखी नाचविण्याचा आनंद लुटला..

रामदास कदम यांच्या मंडणगड तालुक्यातील सोवेली इथल्या घरी तोंडली गावच्या ग्रामदैवतेची पालखी आली असता, कदम कुटुंबियांनी ग्रामदैवतेचं मनोभावे दर्शन घेतलं..

यावेळी रामदास कदम आणि त्यांच्या पत्नीने पालखी नाचविण्याचा आनंद लुटला

१०० दिवसांत पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये १ हजार ३१८ प्रस्तावांना मंजुरी

राज्यातील जनतेची शासकीय स्तरावरील विविध कामे कमी खर्चात आणि तातडीने व्हावीत. राज्य शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होवून सहजता निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला होता.

यात सातकलमी कार्यक्रम ठरवून दिला होता.यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात पुरंदरच्या प्रशासनाकडून १३१८ विविध प्रस्तावांना मंजुरी देऊन पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.

अभियानांतर्गत नागरीकांना वारस नोंद, लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ, पाणंद रस्ते खुले करणे, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शन सुरु करणे, विविध दाखले वाटप, नव मतदार नोंदणी, शेतक-यांना फार्मर आयडी तयार करणे, रेशन कार्ड आदी सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

पुरंदरमधील नागरिकांना दिलेल्या सेवा आणि लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे..

वारस नोंद १२२, लक्ष्मी मुक्ती योजना २५, पाणंद रस्ते व नकाशावरील रस्ते ७०, संजय गांधी अनुदान योजना ३४, विविध प्रकारचे दाखले वाटप २९१, प्रलंबित फेरफार निर्गती व निकाल ५८, अग्रीस्टॅक अंतर्गत शेतक-यांना ओळखपत्र ६८७ नव मतदार नोंदणी ४०, शिधापत्रिका १४. एकूण १३१८.

Jalna: अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा आश्वासन दिलं होतं, त्या आश्वासन पूर्तीचा आज दिवस आहे..

कारण आज पासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून, यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलीय.

Maharashtra Politics: अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयावर कंत्राटदारांचे धरणे आंदोलन

राज्य सरकारने कंत्राटदारांचे हजारो कोटी रुपये थकवल्याने कंत्राटदार आक्रमक..

अमरावती जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपये सरकार कडे थकीत...

आम्ही आमच्या जवळ चे पैसे शासकीय कामावर खर्च केले असून आता आमचे बिल निघत नसल्याने आम्ही काम कसे करायचे कंत्राटदारांचा सवाल...

सरकारनें तात्काळ पैसे द्यावे;कंत्राटदारांची मागणी..

Pune News: पुण्यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला घरात घुसून गुंडांकडून मारहाण

- पुण्यातील चंदन नगर परिसरातील फॉरेस्ट पार्क मधील धक्कादायक प्रकार.

- घरासमोरील चेंबरचे झाकण तोडल्याच्या संशयावरून आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून मारहाण..

- गोरखनाथ एकनाथ शिर्के असे मारहाण झालेल्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांचे नाव.

- फॉरेस्ट पार्क परिसरातील झाकण तुटल्याच्या संशयावरून राजू शंकर देवकर आणि गोविंद कॅनल या दोघांसह येरवडा परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या टोळक्या कडून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकांच्या कुटुंबांना बेदम मारहाण.

- देवकर यांनी येरवडा परिसरातील काही गुंडांना बोलवून पोलीस निवृत उपनिरीक्षकांना किरकोळ कारणावरून मारहाण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

- ⁠या प्रकरणी दहा ते बारा जनावर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Dombivali: डोंबिवली जवळील खंबाळपाडा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दगडफेक

डोंबिवली पूर्वेकडिल खंबाळपाडा परिसरातील चौधरीवाडी मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वीर सावरकर शाखेतर्फे लहान मुलांना प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे.

काल रात्रीच्या सुमारास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना अचानक शेजारील झाडी व इमारतीतून दगडफेक करण्यात आली.

सुदैवाने या दगडफेकीत कोणीही जखमी झालं नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण होतं .याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे पोलिसांनी या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

या घटनेनंतर आरएसएस कार्यकर्त्यांसह भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. दगडफेक करणाऱ्या आरोपींचा शोध घ्यावा त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात बुलढाणा व मोताळा बंद

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वालमिक कराड सह सर्व आरोपीना कडक शासन झाले पाहिजे..

हत्या जरतानाचे फोटो वायरल झाले त्यामुळे राज्यातील लोकांचे मन सुन्न झाल्याने ठिकठिकाणी आंदोलने केल्या जात आहेत..

त्याचं पार्षभूमीवर बुलढाणा व मोताळा शहर बंद ठेवण्यात आले ...

धर्मवीर युथ फाउंडेशन् च्या वतीने बुलढाणा शहरात् पृथ्वीराज गायकवाड यांच्या नेतृत्वात रॅली काढून मारेकर्यांना फाशी देण्याच्या घोषणा देत व्यापार प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले..

सकाळपासून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवली आहेत.. या बंदला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आहे..

वालमिक कराड सह सर्व आरोपीना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली..

Maharashtra Live Update: पुण्यात ठाकरे गटाचे शिंदे घाटा विरोधात आंदोलन

रामदास कदम व नीलम गोरे यांनी जे बेताल वक्तव्य उद्धव ठाकरे आणि मातोश्री बद्दल केला आहे त्याचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

त्यांनी आज रास्ता पेठ पावर हाऊस समोर आंदोलन केलं.

एक म्हैस या आंदोलनात आणलेली होती या म्हशीला पूर्णतः सजवण्यात आलं होतं.

नीलम गोरे आणि रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.

नीलम गोरे यांना ही म्हैस भेट देणार असल्याचे आंदोलकांनी सांगितलं.

Maharashtra Live Update: खोक्या भाईचा शोधासाठी शिरूर पोलीस ठाण्याचे दोन विशेष पथक रवाना

सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. दाखल झाल्यापासून मागील चार दिवसांपासून खोक्या भाई फरार आहे.

त्याच्या अटकेसाठी शिरूर पोलीस ठाण्याचे दोन पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.

मात्र अद्याप पोलीस यंत्रणेला खोक्या भाईचा शोध लागलेला नाही.

बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला.

या प्रकरणात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा नोंदविला आहे.

तर बावी परिसरात ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्या भाई वर दुसरा गुन्हा दाखल आहे.

यासह त्याच्यावर इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Badlapur: बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आग

बदलापूरमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आग लागल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये ही आग लागली.

या आगीत रेकॉर्डमधील कागदपत्रं जळून खाक झाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.

या आगीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे रेकॉर्ड जळाल्याची भीती आहे.

Buldhana: डोणगावमध्ये भाजीपाला मार्केटला मध्यरात्री भीषण आग

मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील भाजीपाला मार्केट मध्ये मध्यरात्री मोठी आग लागल्याने भाजीपाला दुकान सह स्टेशनरी ची दुकाने जळून खाक झाली ..

यामधे दुकान मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग कशाने लागली अद्याप समजू शकले नाही . .

आग लागल्यावर परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला , मात्र आगीने रौद्ररूप धारण केलेलं होते ..

शेवटी नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ..

शिरूर मध्ये मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रा सह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

बीडच्या शिरूर येथील बावी गावात मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि पोस्को अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरणाची शिकार करताना आडवे आले म्हणून ढाकणे पिता पुत्राला मारहाण झाली होती..

या प्रकरणात त्यांनी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या विरोधात तक्रार देत त्याला अटक करण्याची मागणी केली होती..

आता ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघां विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

आमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीती पिता पुत्राने यापूर्वी व्यक्त केली होती..

त्यानंतर आता हा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हानपुडे पाटील हे करत आहेत..

Nandurbar: हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात

शहरातील नेहरू चौकातून मोर्चाला सुरुवात...

मोर्चात मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी....

अक्कलकुवा येथील जामिया संस्थेची मदरशाची चौकशीची मागणी...

जामिया मदरशात बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक....

शहरातील मुख्य रस्त्यावरून हिंदू जन आक्रोश मोर्चा नेहरू चौकात होणार समाप्त....

मोर्चाचा पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात....

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ब्राझीलशी 'नाॅन डिस्क्लोझर' करार

दिपक केसरकर

Nandurbar: नंदुरबार शहरातील 101 दांपत्यांचा हस्ते महाकुंभ जलकलाशाची महाआरती.

प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाचा नंदुरबार शहरात भव्य महाआरती सोहळा पार पडला.

नंदुरबार शहरातील 101 दांपत्यांच्या हस्ते जल कलशाची महाआरती करण्यात आली ढोल ताशांचा गजरात हा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे स्नान करण्याचा ज्या भाविकांना योग आला नाही अशा एकूण एक लाख हून अधिक भाविकांना पवित्र गंगाजलचे वितरण देखील करण्यात आला.

या कार्यक्रमात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित.. साधू महंत यासोबतच अनेक राजकीय नेते उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत....

Pune: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पुण्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा कारभार गेल्यापासून आपले पुणे शहर हिंसेची राजधानी दहशतीचे माहेरघर झाले आहे.

पोर्शे कार अपघात,कोयता गँग, दिवसाढवळ्या गोळीबार, चेन चोरी, बलात्कार, विनयभंग, अपघात, खून अशा गुन्ह्यांनी पुणे शहर सतत चर्चेत आहे. लहान लहान मुलांकडे पिस्तूल, कोयता असे हत्यार आढळून येत आहेत.

छोट्या मोठ्या कारणांवरून शहरात खून होत आहेत,अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे.

या परिस्थितीवर पोलीस प्रशासनाचे तथा गृहमंत्र्यांचे काहीही नियंत्रण राहिले नाही.

याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार..

रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली होणार आंदोलन

Lasalgaon : कांद्याचे 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करावे या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन

लासलगाव बाजार समितीत प्रहरचे गणेश निंबाळकर,गोरख संत सह कार्यकर्त्यानी केले आंदोलन

लासलगाव बाजार समितीच्या आवारात घोषणा देत लिलाव पडले बंद

कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त

कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची केली मागणी

लिलाव बंद पाडत आंदोलकांनी बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले सुरू

Dombivali: डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरातील चौधरी वाडी मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक

काल रात्रीच्या सुमारास सुमारास लहान मुले प्रशिक्षण घेत असताना अचानक शेजारील जंगल आणि इमारतीतून झाली दगडफेक,..... सुदैवाने कोणतीही जखमी नाही.

ही शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची वीर सावरकर शाखा असून या ठिकाणी शाखा अध्यक्ष संजू चौधरी व शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यापासून सुरू होती शाखा

दगडफेकीनंतर संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सध्या कार्यकर्त्यांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे

गहु काढणीला सुरूवात, बाजारपेठेत गव्हाच्या किंमतीत मोठी घसरण

नैसर्गिक संकटावर मात करीत अखेर जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहु पिकांच्या काढणीला सुरूवात झाली. रब्बीतील सर्व पिकांना जीवदान मिळाले.

मात्र, शेतकऱ्यांच्या संकटाची मालिक येथेच संपत नाही. तर आता बाजारपेठेतील दराची अस्थिरता शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे.

कारण काढणीपर्यंत गव्हाला जिल्ह्यात उच्चांकी दर होता मात्र, रब्बी हंगामातील गहू बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होताच 3 हजार 500 रुपये क्विंटलवर गेलेला गहू थेट 3 हजार ते 2 हजार 500 वर येऊन ठेपला आहे.

त्यामुळे आता सोयाबीन, कापूस, तूर याप्रमाणेच गव्हाचीही साठवणूक की विक्री हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

Hingoli: हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार

सलग तीन वेळा काँग्रेस कडून हिंगोली विधानसभेत विजयी झालेले काँग्रेस नेते भाऊराव पाटील गोरेगावकर हजारो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेने प्रवेश करणार

2024 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने गोरेगावकर यांनी बंडखोरी करत लक्षेवधी मते घेतली होती मात्र पराभव झाल्याने आता आगामी निवडणुकांची तयारी म्हणून पक्षप्रवेश होणार

Nanded: हदगाव तालुक्यातील बळीराजाच्या चिंतेत भर, शेतात वन्य प्राण्यांचा धुडगूस; पिकांचे मोठे नुकसान

नांदेडच्या हदगाव तालुक्यात हरिण, रानडुक्करे, काळवीट या वन्य प्राण्यांनी कांदा, मका व फळबागा या पिकांची नुकसान करून धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

वनविभागाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतामध्ये खडा पहारा द्यावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस रानडुकरे शेतामध्ये शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत.

त्याचबरोबर शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांचे हल्लेसुद्धा होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

भारताच्या विजयाचा जल्लोष दुबईतही वाजला श्रीमंत ढोल ताशा पथकाचा ढोल

भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत संपूर्ण देशाला अभिमानास्पद क्षण दिलले आहे या ऐतिहासिक विजयाचा आनंद सर्व देशभरात साजरा केला जात असताना

श्रीमंत ढोल ताशा पथकाने दुबईतील स्टेडियमबाहेर दमदार वादन करत क्रिकेटप्रेमींच्या उत्साहात अधिक रंग भरले.

भारताच्या विजयाने भारावलेल्या दुबईत असलेल्या हजारो चाहत्यांनी श्रीमंत ढोल ताशा पथकाच्या जोशपूर्ण वादनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात संपूर्ण परिसर दुबई भारतमय झाला होता . उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी आनंदाने नृत्य केले, झेंडे फडकवत भारताचा विजय मोठ्या जल्लोषात साजरा केला.

या सोहळ्याने उपस्थित प्रत्येकाचा हृदयस्पर्श केला. अनेक माध्यम प्रतिनिधींनी आणि सोशल मीडियावरील चाहत्यांनी या अनोख्या सेलिब्रेशनचे फोटो व व्हिडिओ शेअर केले, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.

श्रीमंत ढोल ताशा पथक हे केवळ एक वादन पथक नसून, भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरवशाली प्रचार करत आहे.

Bhandara: भंडाऱ्यात १७ हजार लाडक्या बहिणी झाल्यात अपात्र, विविध कारणांनी प्रस्ताव केले रद्द

विधानसभा निवडणुकीपूर्वी पात्र ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील भंडारा जिल्ह्यातील १७ हजार १८३ लाडक्या बहिणींना विविध कारणांनी अपात्र ठरविण्यात आलं आहे.

तालुकास्तरीय समितींच्या तपासणीत लाडक्या बहिणींचे प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत. तर, भंडारा जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ७८८ महिलांचे प्रस्ताव या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

जिल्ह्यातील १४ महिलांनी स्वतः लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे. अपात्र ठरलेल्या महिलांकडून अगोदर दिलेले रक्कम परत घेणार नाही.

मात्र, पुढील लाभासाठी त्या आता वंचित झाल्या आहेत.

अमरावती शहरातील पोलीस स्टेशन मधील भंगार दुचाकींचा लागणारा आता कायम विल्हेवाट

कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांचा निर्णय..

500 भंगार दुचाकी पोलीस मुख्यालयात आणल्या.. उर्वरित भंगार दुचाकी आणण्याचे काम सुरू.

दुचाकी मालकांसोबत पोलिसांचा संपर्क सुरू,महिना भराची दिली मुदत..

महिनाभरात मूळ मालकांनी दुचाकी न नेल्यास दुचाकीचा करणार लिलाव..

Maharashtra Live Update: पुण्यात काँग्रेसला खिंडार, रवींद्र धंगेकरांनी साथ सोडली, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

पुण्यात काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे. पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

आज पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

रवींद्र धंगेकर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

काँग्रेस सोडताना दु:ख व्यक्त होत असल्याची भावना यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

पक्ष सोडताना दुःख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत.

शिंदे आणि सामंत यांना भेटलो. कार्यकर्त्यांसोबत सगळ्याची चर्चा केली.

आज प्रवेश करणार आहे. सायंकाळी ७ वाजता एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे.

आज कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार आहे.

कार्यकर्ते मतदारांचा आदर करूनच प्रवेश करणार आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.

अमरावती बाजार समितीत दररोज 1 हजार कॅरेट सत्राची विक्री, 600 ते 1000 रुपये बाजारभाव

आपल्या आंबट गोड चवीसाठी विदर्भातील संत्र्याची ओळख आहे..

अमरावतीमध्ये सर्वात जास्त उत्पादन संत्राचे घेतल जाते..

मृग बहारात निघालेला संत्रा आता बाजारात येऊ लागला असून अमरावती बाजार समितीमध्ये दररोज एक हजार कॅरेट संत्र्याची आवक आहे..

बाजार समितीमध्ये संत्र्याला सहाशे रुपये पासून तर 1 हजार रुपये प्रति कॅरेट पर्यंत भाव मिळतोय..

यावर्षी संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने उत्पादनात घट झाली असली तरी साधारणतः संत्राला बाजार भाव व्यवस्थित रित्या मिळतोय..

सुरुवातीपासूनच संत्र्याचे भाव स्थिर राहिले आहेत..

हळूहळू अमरावती बाजार समितीमध्ये संत्र्याची आवक वाढणार असल्याची माहिती फळ विक्रेता व्यवसायिकांनी दिली..

Maharashtra Live Update: बीड सतीश उर्फ खोक्या भोसलेचा आणखी एक व्हिडिओ समोर

शिरूरच्या सतीश उर्फ खोक्या भोसले चे केलेल्या कारनाम्यांचे नवनवीन व्हिडिओ समोर कधी मुलांना धमकी दिल्याचे तर कधी पैसे उधळताना तर कधी मारहाणीचे या व्हिडिओमुळे सतीश भोसले सध्याला चर्चे मध्ये आहे.

अशातच या सतीश भोसले चा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

त्यामध्ये तो चालत असताना दोन्ही बाजूला रिवाल्वर हातामध्ये असलेले दोन व्यक्ती चालतात आणि सतीश भोसलेमध्ये चालतो.

या व्हिडिओमध्ये रिवाल्वर कशामुळे वापरल्या आणि तो व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल करून आपली दहशत पसरवण्याचं काम सतीश भेटले त्यामध्ये गाणं बनवण्यात आले आहे की पुरा आसमान मुठठी मे करना है येतो सुरुवात है असे गाणे टाकून तो रिल्स आपल्या इंस्टाग्राम टाकतो आणि दहशत पसरवत अशी चर्चा या परिसरामध्ये आहे.

Maharashtra Politics: गोपीचंद पडळकर यांची जयंत पाटलांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सहकाराचे वाटोळे केलंय, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

जतचा सहकारी साखर कारखाना जयंत पाटलांनी ढापला आहे,

आता त्यांचा डोळा आटपाडीच्या माणगंगा साखर कारखान्यावर आणि कवठेमहांकाळच्या महांकाली कारखान्यावर आहे,

केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जयंत पाटील जिल्ह्यातील सहकारी आणि सभासदांचे कारखाने हडप करत आहेत, असा आरोप देखील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

भंडाऱ्यात २२ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, कारधा पोलिसांनी केली कारवाई

महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू विक्री आणि वाहतुकीसाठी बंदी असतानाही राष्ट्रीय महामार्गावरून सुगंधित तंबाखूची वाहतूक करण्यात येत असताना भंडाऱ्याच्या कारधा पोलिसांनी २२ लाखांचा सुगंधित तंबाखू पकडला.

पान पराग कंपनीचा हा सुगंधित तंबाखूसाठा रायपूर येथून भंडाराकडं एका आयशर ट्रक (CG 08 AR 6050) मधून येत असल्याची माहिती कारधा पोलिसांना मिळाली.

यावरून कारधा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून हा आयशर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आढळून आला.

याप्रकरणी कारधा पोलिसांनी चालक बलराम रीचोलिया (४०) रा. इंदोर आणि क्लिनर दिनेश गुजरिया (३०) रा इंदोर या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

या कारवाईत कारधा पोलिसांनी २२ लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि आयशर ट्रक असा ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या वर्षाची कारधा पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

छत्रपती मालोजीराजे यांच्याकडून श्रीतुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची कोल्हापूरच्या छत्रपती राजघराण्यातील युवराज छत्रपती मालोजीराजे शाहू यांनी सहकुटूंब अभिषेक महापूजा केली.

रूढी परंपरेप्रमाणे तुळजाभवानी देवीच्या गर्भग्रहामध्ये जाऊन छत्रपती मालोजीराजे शाहू यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीची अभिषेक महापूजा केली,

तत्पूर्वी त्यांनी तुळजाभवानी देवीची ओटी भरली.

अभिषेक महापूजेच्या वेळी मालोजीराजे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी मंदीर संस्थानच्या वतीने श्रीतुळजाभवानी देवींची प्रतिमा,कवड्याची माळ व महावस्त्र देऊन रूढी परंपरेप्रमाणे छत्रपती घराण्यातील सदस्यांच सन्मान करण्यात आला.

Ratnagiri: रत्नागिरीमध्ये नवीन एसटी बस दाखल

रत्नागिरी एसटी आगारातून नवीन एसटी बसचे लोकार्पण कार्यक्रम राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून लांजा, राजापूर, देवरूख, रत्नागिरी या डेपोंना प्रत्येकी दहा बसेस मंजूर झाल्या आहेत.

त्यापैकी लांजा दोन, राजापूर पाच, रत्नागिरी दहा अशा 17 बसेस प्राप्त झाल्या असून याचा लोकार्पण सोहळा रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी मंत्री उदय सामंत यांनी स्वतः या बस मधून प्रवास केला व प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Jalna: जालन्यात खवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या आरोपींना दोन दिवसाची वनकोठडी

जालन्यात खवले मांजरीची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना वनविभागाने अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी अद्याप तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.

दोन दिवसांपूर्वी वनविभागाच्याच अधिकाऱ्यांनी व्यापारी होत सापळारचून जालन्यातील मंठा चौफुली परिसरात कारवाई केली होती.

या कारवाईमध्ये तीन वाहनांसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.

दरम्यान या खवल्या मांजरीचा वापर कश्यासाठी करायचा होता याची माहिती अद्याप समोर आली नाही.

Raigad: भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रायगडमध्ये क्रिकेट प्रेमींचा जल्लोष

भारतीय संघाने न्यूझीलंड विरूध्द क्रिकेट सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

या विजयाचा जोरदार जल्लोष रायगडमध्ये साजरा करण्यात आला.

महाड शहरातील छ. शिवाजी महाराज चौकामध्ये तिरंगा भगवे झेंडे फडकवत त्याच बरोबर फटाकांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करीत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला.

Ambernath: अंबरनाथमध्ये सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

अंबरनाथमधील सराईत गुन्हेगार फहाद उमर इंजिनिअर याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याची वर्षभरासाठी येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आलीये.

त्याच्यावर २० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याची गुन्हेगारी कृत्य कमी होत नसल्यानं एक वर्षासाठी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com