Maharashtra Live News Update: 26 त्र्यंबकेश्वरातील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये घोषणा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रात पावसाची विश्रांती, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

त्र्यंबकेश्वरातील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये घोषणा

- त्र्यंबकेश्वरातील प्रवेश कर कायमस्वरूपी रद्द

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये घोषणा

- शिवसेनेच्या बूथ मेळाव्यात शिंदे यांची घोषणा

- आता भाविक निर्विघ्न करू शकणार त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश

- वसुलीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वाढली होती गुन्हेगारी

- पत्रकारांना करण्यात आली होती मारहाण

26 ऑक्टोबरपासून विठुरायाचे 24 तास दर्शन सुरू राहणार

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने इतिहास 26 ऑक्टोबर पासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे येत्या दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक यात्रेचा महासोळा संपन्न होणार आहे या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

Bhandara : भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

भंडारा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मिस्कीन टॅंक येथील नगरपालिका प्रशासनाचा तलाव सायंकाळी फुटला. तलावाच्या पाण्याचा प्रवाह भंडारा शहराचा मुख्य मार्ग असलेला जे एम पटेल मार्गावरून वाहत असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे तलावाचं पाणी खालच्या भागांमध्ये असलेल्या बैरागी वाडा, बजाज कॉम्प्लेक्स, गांधी विद्यालय, तहसील कार्यालय परिसरात पूर्णपणे जलमयस्थिती निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये बूथ प्रमुखांचा मेळावा

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये बूथ प्रमुखांचा मेळावा

- मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना देणार कानमंत्र

- नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणुकीत कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, याची देखील माहिती देणार

कोकणातुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांचा रांगा

माणगाव बाजार पेठ ते मुगवली फाटा पाच ते सहा किलो मिटर लांब वाहनांचा रांगा

रविवारच्या सुट्टीनंतर घरी परतणारे पर्यटक आणि मुंबईकर वाहतुक कोंडीत अडकले

माणगाव बाजार पेठेतील अरुंद रस्ता, मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणातील रखडलेले बायपासचे काम यामुळे मुंबईकर, पर्यटक आणि स्थानिकांना सहन करावा लागत आहे वाहतुक कोंडीचा त्रास

डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

- अहिल्यानगरमध्ये हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते

- GST रिफॉर्म मध्ये शेतकऱ्यांशी संबंधित अनेक बाबी 5 टक्क्यांवर आणल्या

- शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार

- विवेक कोल्हे यांनी केवळ CNG प्लांट उभारला नाही तर त्याच्या विक्रीसाठी विविध कंपन्यांशी करारा केला

- सहकारी साखर कारखान्यांनी बहुद्देशीय विचार ठेवावा

- सहकाराची सुरुवात महाराष्ट्रात झाली

- आपल्याला महाराष्ट्रातील सहकारासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी आपली

- संजीवनी गृहने हरित क्रांतीसाठी अनेक मोठे पाऊले टाकली

- नरेंद्र मोदींनी सहकार मंत्रालय स्थापन करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती देण्याचे काम केले

Hingoli: हिंगोलीत शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील टाकळगव्हाण येथे शेतकऱ्याची आत्महत्या

पावडे नावाच्या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

अतिवृष्टी होऊन शेतातील पीक हातात काहीच राहिले नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Bhandara: गडकरींच्या शेतकरी मेळाव्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची निदर्शने

भंडाऱ्याच्या देव्हाडा येथील मानस ऍग्रो इंडस्ट्रीज आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीनं मोहाडी तालुक्यातील करडी इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला. नितीन गडकरी हे कार्यक्रमस्थळी पोहोचत असताना कारखान्याच्या संचालकाच्या भाषणातर्फे मेळाव्याला उपस्थित ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत निदर्शन. शेतकऱ्यांच्या प्रचंड घोषणाबाजी सुरू असल्यानं उपस्थितांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. यामुळं काहीकाळ शेतकरी मेळाव्यात गोंधळाची स्थिती उडाली. देव्हाडा येथील मानस साखर कारखाना इथं या शेतकऱ्यांनी ऊस विक्री केली. मात्र, सहा महिने लोटल्यानंतरही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम नं मिळाल्यानं रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित पोलिसांनी आणि मानस ऍग्रो कारखान्याच्या संचालकांनी शेतकऱ्यांची समजूत काढून त्यांना गप्प बसविलं.

जळगावच्या चाळीसगावात रोड रोलरचा मोठा अपघात

जळगावच्या चाळीसगाव रोड रोलरचा मोठा अपघात

शहरातील रेल्वे पूल चढताना झाला अपघात

पुलाचे सुरक्षा कठडे तोडून रोड रोलर पुलावरून चक्क खाली कोसळले त्यानंतर त्याने प्रशासकीय इमारतीच्या संरक्षण भिंतीला धडक दिली.

रोड रोलर रेल्वे पुलावरून कोसळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या अपघातात सालक जखमी झाला असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर

Amravati: अमरावतीमध्ये रावण उत्सव.. १८ वर्षाची परंपरा

दर वर्षी अमरावती च्या राणी दुर्गावती चौकात रावण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या वर्षी देखील अमरावतीत आदिवासी बांधवांनी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जयंती निमित्य राजा रावनाची पूजा करून उत्सव साजरा केलाय.. गेल्या १८ वर्षापासून अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावणाची पूजा केली जाते.. यावेळी देखील जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधवाणी एकत्र येत रावण उत्सव साजरा केला.. तर राणी दुर्गावती यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली.यावेळी रावणाला पूजा अर्चना करून जोरदार नारे देण्यात आले.

Mumbai: ठाकरे बंधूंची पुन्हा भेट, राज ठाकरे मातोश्रीवर दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ही पाचवी भेट आहे. भेटी वाढत असल्यामुळे दोघांमध्ये युती होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही भेट नेमकी कशासाठी? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची ठरत आहे.

Ahilyanagar: शेतकरी मेळावा सुरू होण्यापूर्वी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे झाल्या भावुक

अहिल्यानगर -

वरिष्ठांच्या आदेशानुसार विधानसभेला थांबल्या...

स्वतःसह मुलाच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह...

आज अमित शाहांच्या दौऱ्यामुळे मिळाली नवी ऊर्जा...

शेतकरी मेळावा सुरू होण्यापूर्वी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे झाल्या भावूक...

अश्रूंचा बांध फुटला

कोल्हे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला उत्सुर्त प्रतिसाद

Mumbai: मी संशय व्यक्त केला, चौकशीची मागणी करणं चूक नाही - रामदास कदम 

रामदास कदम -

मी संशय व्यक्त केला, चौकशीची मागणी करणं चूक नाही

या प्रकरणी अनिल परब का बोलत आहेत

डॉक्टर का लोकांसमो आले नाहीत

अनिल परबांमुळे ८ हजार मराठी माणूस मुंबईबाहेर

घर खाली करण्यासाठी अनिल परबांनी मराठी माणसांना दम दिला

दापोली मागत असताना मुला गुहाघरसाठी तिकीट का दिलं?

उद्धव ठाकरे जगातील एकमेव नेते, ते आपल्याच नेत्यांना संपवतात

Pune:  पुण्यातील नामांकित कॅफेच्या पदार्थामध्ये आढळून आली आळी

पुणे -

पुण्यातील नामांकित कॅफेच्या पदार्थामध्ये आढळून आली आळी?

पुण्यातील या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ग्राहकाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

पुण्यातील कल्याणीनगर भागातील नामांकित कॅफे च्या चिज चिली टोस्ट मध्ये ग्राहकाला आढळली आळी

कॅफे च्या व्यवस्थापकाला याबाबत तक्रार केली असता त्याने लक्ष दिलं नसल्याची सुद्धा ग्राहकाची तक्रार

Amit Shah:  अमित शाह काही वेळातच कोपरगावमध्ये दाखल होणार

अमित शाह यांचा अहिल्यानगर जिल्हा दौरा

अमित शाह काही वेळातच कोपरगावमध्ये दाखल होणार

कोल्हे साखर कारखान्याच्या CNG प्रकल्पाचे शाह यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Pune: वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत सोनं,रोख रक्कमेसह ११ शेळ्यांची चोरी

वृद्ध दाम्पत्याला मारहाण करत सोनं,रोख रक्कमेसह ११ शेळ्यांची चोरी

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील घटना

Pune: राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा - शरद पवार

शरद पवार -

राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊ जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजे

संपूर्ण राज्यात ही स्थिती नाही

राज्यातील काही जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे

या जिल्ह्यात अधिकारी, कर्मचार रेकॉर्ड काढावे

सर्व रेकॉर्ड करून मदत सुरू करावी

माळेगाव कारखाना आणि शिक्षण संस्थेच्या बाबत अजित पवारांनी भेट घेतली होती

ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्या नांदेडच्या लोहा तालुक्यातील लोंढे सांगवी येथे तरुणाने सुरु केले आमरण उपोषण

Summary

नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेले 8 हजार 500 रुपये हेक्टरी अनुदान तुटपंज आहे. या विरोधात नांदेडच्या लोहा तालुक्यातील लोंढे सावंगी येथील अविनाश लोंढे या तरुणाने आमरण उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहील असा निर्धार या तरुणाने केला आहे.

ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये बॅनवॉर..

Summary

सर्वांना ढ म्हणून पक्षच ढगात गेलाय पण त्या पक्षाच्या रावणाचा अहंकार काही मोडत नाही.. असा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून लावण्यात आला आहे कॅडबरी जंक्शन येथे भला मोठा बॅनर..

ढ विद्यार्थ्यांनी शाळा सोडली तर नुकसान विद्यार्थ्यांचे होते विद्यापीठाचे नाही असा एक दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पक्षाकडून लावण्यात आला होता पक्ष कार्यालयाच्या बाहेर बॅनर.. त्याच बॅनरला प्रतिउत्तर म्हणून युवक काँग्रेसने कॅडबरी जंक्शन येथे लावलाय मला मोठा बॅनर..

अमरावती च्या संघाच्या विजयादशमी उत्सवात मुख्य अतिथी कोण ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज अमरावतीत पार पडणार आहे.. या कार्यक्रमाला सरन्यायधीश भुषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई ह्या मुख्य अतिथी म्हणून येणार होत्या,त्यांचं पत्रिकेत नाव देखील आहे,पण कमलताई गवई संघाच्या कार्यक्रमाच्या आमंत्रना वरून चांगलाच वाद निर्माण झाला होता, अखेर कमलताई गवई यांनी पत्रक काढून संघाच्या कार्यक्रमात जाणार नसल्याचं सांगितले त्यामुळे आजच्या या सोहळ्याला मुख्य अतिथी कोण राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगराचा श्री विजयादशमी उत्सव आज रविवार 05 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी किरण नगर येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे..हिंदू समाजातील पुरुषार्थ तथा शक्ती व पराक्रमाचा जागर विजयादशमी उत्सवात होत असतो.. यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पुर्ण होत आहेत.. या उत्सवाला प्रमुख वक्ते म्हणून प्रज्ञा प्रवाहाचे जे नंदकुमार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.. मात्र या कार्यक्रमला मुख्य अतिथी कोण हे अजून कळलेले नाही.. उत्सवापूर्वी 5 वाजता पथसंचलन नरसम्मा महाविद्यालय येथून सुरू होऊन फरशी स्टॉप, कवर नगर, सबनीस प्लॉट मोतीनगर चौक किरण नगर - साई मंदिर मार्गे जाणार आहे.. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे...

Sabgli Latest News

आटपाडीची कन्याशाशिकला नांगरे यांचा कोल्हापूर येथील ठेकेदार शिवाजी पवार यांच्याशी 25 वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. आटपाडीतील रवींद्र चव्हाण यांच्या त्या मोठ्या बहीण आहेत. शिवाजी पवार हे शासकीय कामे घेतात. तसेच त्यांचे इतरही उद्योग आणि व्यवसाय आहेत. या व्यवसायासाठी त्यांनी अनेक चार आणि सहा चाकी गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र त्यांचे हेलिकॉप्टर खरेदीचे स्वप्न होते. ते यंदाच्या दसऱ्याला त्यांनी पूर्ण केले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन हेलिकॉप्टर विकत घेतले. पवार जावयांच्या आटपाडीशी चांगला जिव्हाळा असून तेथेही त्याने अनेक मित्रमंडळी जोडलेले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर हेलिकॉप्टर खरेदी केल्यावर नवीन हेलिकॉप्टर घेऊन थेट सांगलीच्या आटपाडीमध्ये सासरवाडी मध्ये पूजनासाठी आणले. यावेळी हेलिकॉप्टर चे पूजन करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि याच हेलिकॉप्टर मधून कन्या माहेरी हेलिकॉप्टर मधून गेली.

शिरोडा-वेळागर किनाऱ्यावर तीन ऑक्टोबर रोजी घडलेल्या दुर्घटनेत 9 पर्यटक समुद्रात बुडाले होते. यामध्ये आतापर्यंत पाच मृतदेह सापडले असून, दोघांना वाचवण्यात यश आले होते. मात्र अजूनही दोघांचा शोध सुरूच आहे. उर्वरित चार जणांपैकी काल दोन मृतदेह मिळाल्यानंतर आता अजूनही इरफान मोहम्मद इसाक बेळगाव आणि जाकीर निसार मणियार कुडाळ हे दोघेही अद्याप बेपत्ता आहेत. आज सकाळपासून तिसरा दिवशी पोलिस व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने आणी ड्रोन कॅमेराद्वारे शोध पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात 5 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.

लातूर जिल्ह्यात मागच्या 5 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या काही भागात रात्री मेघगर्जनासह पावसाने हजेरी लावली. यावेळी अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. निलंगा तालुक्यातील उस्तुरी, टाकळी, बडूर या मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. र पावसामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.तर प्रशासनाने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्यानिमित्ताने तुळजा भवानी देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक तुळजापूरला पायी निघाले

सोलापूर,सातारा, कोल्हापूर,सांगलीसह कर्नाटक,आंध्र आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यातील हजारो भाविक पायी चालत तुळजापूरच्या दिशेने निघाले

उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पायी चालत जाता आहेत.

लांबून चालत आलेल्या हजारो भाविक रात्री सोलापुरात मुक्काम केल्यानंतर पहाटेपासून पुन्हा चालायला सुरुवात करतात

भाविकांच्या सुरक्षेसाठी मध्यरात्री पासूनच सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका ते तुळजापूर शहरपर्यंत बंद करण्यात आलीय

त्यामुळे सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गांवर केवळ देवी भक्तांची मंदियाळी पाहायला मिळत आहे.

7 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा इशारा

शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीला प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आला आहे. 7 ऑक्टोबर पर्यंत या वादळाचा प्रभाव राहणार असल्यामुळे मच्छिमार व किनारपट्टीवरील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सध्या दोन नंबरचा बावटा सिंधुदुर्ग किनारपट्टीला देण्यात आला आला आहे. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांनी माघारी फिरण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

कोण बोलत आहे का यावर. याचे पूर्ण गुजरातीकरण झाले आहे. यात नोकरी मध्ये मराठी माणसाला स्थान नाही. मनसे आणि शिवसेना आंदोलन करणार. राज ठाकरे आणि आमची चर्चा झाली.
संजय राऊत

अमरावतीत हाफ मॅरेथॉन स्पर्धा, राज्यभरातील हजारो स्पर्धकांनी घेतला सहभागी

अमरावती मॅरॉथॉन असोशिएशन व्दारे आज आयोजित आठव्या अमरावती मॅरॉथन स्पर्धेमध्ये अमरावतीसह, राज्यातील व राज्याबाहेरील तीन हजाराहून अधिक धावकांनी सहभाग नोंदविला, ही मॅरॉथॉन २१ किलोमीटर,१० किलोमीटर व पाच किलोमीटर च्या अंतरासाठी आयोजित करण्यात आली होती, तर फिटनेस रन सर्वाकरिता तसेच पाच किलोमीटर मुलांकरीता या प्रकारात पार पडली . यावेळी हजारो स्पर्धक अमरावतीच्या रस्त्यावर या स्पर्धेमध्ये धावताना दिसून आले..

हेलिकॉप्टर विकत घेऊन जावई बापू थेट सासरवाडीत

सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे जावई शिवाजी पवार यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन हेलिकॉप्टरची खरेदी केली.. त्याच्या पूजनासाठी ते थेट सासरवाडीत हेलिकॉप्टर घेऊन आले.. आटपाडीच्या जावयाच्या या आगळ्यावेगळ्या कर्तुत्वाचे परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती..

छत्रपती संभाजीनगर : भरदिवसा व्यावसायिकाच्या मोपेडची डिकी तोडून 2.85 लाख लंपास

दसऱ्याच्या मुहूर्तावर आईसाठी दागिने घेण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकाची 2 लाख 85 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी भरदिवसा पळवली. छत्रपती संभाजी नगर शहरातल्या क्रांती चौक-उस्मानपुरा रस्त्यावरील एका शोरूमबाहेर घडलेल्या या धाडसी चोरीमुळे शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कपिल खंडागळे यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सणासुदीच्या काळात झालेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस या पिकासह केळीला देखील मोठा फटका बसला. नांदेडच्या अर्धापूरची केळी देश,विदेशात प्रसिद्ध आहे.अर्धापूर, मुदखेड आणि नांदेड या तालुक्यात केळीचे सर्वाधिक पीक घेतले जाते.परंतु नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या केळीवर परिणाम झाला. परिणामी केळीचे भाव पडले. दोन महिन्यापूर्वी केळीला प्रतिक्विंटल 2 हजार ते 2 हजार 200 भाव मिळाला होता. परंतु आता केळीला केवळ 300 ते 400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचा केळी लागवडीचा खर्च देखील यातून निघणे अवघड झाले आहे.सततच्या पावसामुळे केळीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला.नांदेड येथून देशातील इतर राज्यांमध्ये होणारी केळीची निर्यात थांबली. ऐन सणासुदीच्या काळात केळीला कवडीमोल भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण

गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण

अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

चालकाचा वैद्यकीय अहवालातून माहिती समोर

अपघातावेळी गौतमी पाटीलच्या चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे आता स्पष्ट

पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात गौतमी पाटीलच्या कार चालकाने एका रिक्षाला दिली होती धडक

अपघातात रिक्षा चालक जखमी तर पोलिसांनी चालकाला केली अटक

जळगावात कुसुंबा येथे एका घरावर ८ ते १० अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत अचानक गोळीबार व दगडफेक केल्याची घटना घडली आहे

कुरियरचे काम करणारे चंद्रशेखर त्र्यंबक पाटील यांच्या घरावर हल्ला झाला आहे, हल्ला झाला त्यावेळी पाटील कुटुंब घरात जेवण करत होते

*यादरम्यान हल्लेखोरांनी घराबाहेर उभी असलेली दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर घराच्या दिशेने गोळीबार करत ३ राउंड फायर केले

*पोलिसांना घराबाहेर बंदुकीच्या गोळीच्या २ रिकामी पुंगळी आणि घरामध्ये १ पुंगळी मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे

पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत.

*हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही., या घटनेने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे

शिंदेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता मेळावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता मेळावा

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरणार शिंदे सेनेची रणनीती

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पाठोपाठ शिंदे शिवसेनेने दंड थोपटले असून आज हॉटेल डेमोक्रसीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. नाशिक महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी असून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शंभर प्लसचा नारा दिलाय. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची अस्वस्थता वाढली असून त्यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केलीय. सध्या ३१ प्रभागांमधील १२२ जागांसाठी पॅनल निर्मितीला वेग आलाय. यापूर्वी शिंदेसेनेने अन्य पक्षांतील काही नेते गळाला लावलेत. त्यामुळे आता भाजपला उत्तर देण्यासाठी हा बूथ प्रमुख आणि कार्यकर्ता मेळावा महत्वाचा मानला जातोय. एकनाथ शिंदे आज पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

जालन्यात चिमुकल्याने खाऊचे पैसे दिले पूरग्रस्तांसाठी, खाऊसाठी जमा केलेले पाच हजार रुपये केले अंबड तहसीलदारांकडे सुपूर्द

जालन्यात एका चिमुकल्याने खाऊचे पैसे पूरग्रस्तांसाठी दिले आहे. खाऊसाठी जमा केलेले जवळपास पाच हजार रुपये या चिमुकल्याने अंबड तहसीलदारांकडे सुपूर्द केले आहेत. शिवराज मुळे असे या चिमुकल्याचं नाव आहे. जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचा खरीप पिकाचे अतोनात नुकसान झालं आहे तर जालन्यातील गोदाकाठच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने तेथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून या चिमुकल्याने वर्षभर खाऊ साठी जमा केलेले जवळपास पाच हजार रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबड तहसीलदारांकडे सुपूर्द केले आहे..

PUNE : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

प्रभाग रचना अंतिम झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या नजरा आता आरक्षणाच्या सोडतीकडे

प्रशासनाकडे ५ हजार ९२२ हरकती सूचना नोंदविल्या गेल्या. त्यावर राज्य शासनाकडून प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत दोन दिवस सुनावणी झाली

त्यानंतर प्रभाग रचनेतील बदलांसह त्याचा अहवाल राज्य शासनास सादर झाला आणि त्यास निवडणूक आयोगाकडून मान्यता दिल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली

५९२२ हरकती आणि सूचनांपैकी ४५२४ हरकती सूचना झाल्या अमान्य 

१३२९ हरकती झाल्या मान्य तर ६९ हरकती अंशतः मान्य

प्रभाग क्रमांक १,१४,१५, १७, २०, २४, २६ आणि ३८ यांचे नावे बदलली

पुणे शहरातील आठ प्रभागांची नावे बदलली

प्रभाग क्रमांक -- बदललेले नाव --जुने नाव

१ -- कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित -- कळस-धानोरी

१४ -- कोरेगाव पार्क-घोरपडी- मुंढवा-- कोरेगाव पार्क-मुंढवा

१५ -- मांजरी बुद्रूक-केशवनगर-साडेसतरा नळी --मांजरी बुद्रूक- साडेसतरा नळी

१७ -- रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी --रामटेकडी- माळवाडी

२० --शंकर महाराज मठ-बिबवेवाडी--बिबवेवाडी-महेश सोसायटी

२४ -- कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल - केईएम रुग्णालय -- कमला नेहरू रुग्णालय- रास्ता पेठ

२६ -- घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी -- गुरुवार पेठ-घोरपडे पेठ

३८-- बालाजी नगर-आंबेगाव-कात्रज -- आंबेगाव-कात्रज

PALGHAR : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे शक्ती चक्रीवादळचा तडाखा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे शक्ती चक्रीवादळचा तडाखा पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागात बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे . सध्याचा या वादळाचा परिणाम पालघर जिल्ह्यात जरी जाणवत नसला तरी मच्छीबार बांधवांनी सतर्क राहण्याच आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे .पाच , सहा आणि सात ऑक्टोबर असे तीन दिवस या वादळाचे परिणाम पश्चिम किनारपट्टी भागाला जाणवू  शकतात असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पालघर जिल्हा प्रशासन , कोस्ट गार्ड आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सध्या अलर्ट मोडवर असल्याच दिसून येत आहे.  

NAGAR-केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांचा अहिल्यानगर जिल्हा दौरा...

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांचा अहिल्यानगर जिल्हा दौरा...

आज सकाळी 11 वाजता शिर्डीत साई दर्शनाने होणार दौऱ्याची सुरुवात...

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह राज्यातील अनेक मंत्री शाह यांच्या सोबत...

शाह यांच्या उपस्थितीत लोणी आणि कोपरगाव याठिकाणी विविध कार्यक्रमांचे तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन...

शाह यांच्या स्वागतासाठी शिर्डी, लोणीसह कोपरगाव झाले भगवेमय...

आजच्या दौऱ्यात अमित शाह राज्यासाठी काही मोठी घोषणा करणार का?.. याकडे लक्ष...

BULDHANA-धनगर आरक्षणासाठी संग्रामपूर तहसीलवर मोर्चा ..

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर  तहसील कार्यालयावर धनगर समाजाला आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसाठी  तालुक्यातील तमाम धनगर समाजाच्या वतीने  माेर्चा काढण्यात आला.या वेळी मोर्चात  तालुक्यातील शेकडो धनगर समाजबांधव सहभागी झाले होते. धनगर समाजाला हक्काचं आरक्षण द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला...या मोर्चात मोठ्या संख्येने समाजातील नवयुवक, महिला, अबाल वृद्ध असे अनेक समाज बांधव सहभागी झाले होते...

PUNE : लक्ष्मण हाके यांची पुन्हा आंदोलनाची हाक

लक्ष्मण हाके यांची पुन्हा आंदोलनाची हाक 

मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलवलं नसल्याने लक्ष्मण हाके उद्या जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार

हजारो तरुणाने ओबीसी लढा साठी उद्या जेजुरी गडावर येण्याचं केलं हाके यांनी आवाहन

लक्ष्मण हाके उदया जेजुरी गडावर ओबीसी आंदोलनाची तळी उचलणार

आपल्यावर अन्याय अत्याचार   करणाऱ्या ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन आंदोलनाची तळी उचलू या लक्ष्मण हाके यांचे तरुणांना आवाहन

PUNE : पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळींचे होणार "आर्थिक ऑडिट"

पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळींचे होणार "आर्थिक ऑडिट"

पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार

पुण्यातील टिपू पठाण, गजा मारणे घायवळ तसेच इतर गँग च्या मालमत्तेची चौकशी होणार

शहरातील कुख्यात गुंड टोळ्यांच्या मालमत्तेची मोजमाप करून त्याच्या आर्थिक गदा आणण्याचा पुणे पोलिसांनी आराखडा तयार

 गुंड डोळ्यावर मर्यादित कारवाई करण्याऐवजी आता आर्थिक दृष्ट्या कुमकवत करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे

पुणे पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून डोळ्याची मालमत्ता उत्पन्नाचे स्त्रोत आणि काळा पैसा याच बारकाईने तपास करण्यात येणार आहे

सरकार मान्यता प्राप्त व्यालीवरची नेमणूक करून त्याच्या स्थावर मालमत्ता चे मूल्यांकन करण्यात येणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com