Maharashtra Live News Update: औषधे आजपासून होणार स्वस्त

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२५, आजपासून नवरात्रोउत्सव, देशात जीएसटी रिफॉर्म सुरू, ५ आणि १८ असे दोनच स्लॅब राहणार, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराला आकर्षक फुलांची आरास

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज शादीय नवरात्र उत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराची आकर्षक अशा फुलांनी सजावट करण्यात आली आहे. देशी विदेशी फुलांचा वापर करून केलेल्या सजावटीमुळे आई तुळजाभवानीचा मंदिर परिसर फुलून गेला आहे. दुपारी बारा वाजता मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे.

गुणरत्न सदावर्ते यांची आई साम टीव्हीवर, मुलाला म्हणाली जरा शांत रहा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना आता त्यांच्या आईने शांत राहण्याचा सल्ला दिला आहे, सध्या गुनरत्न सदावर्ते हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत काल जालन्यामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हाताने मारत सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर हिंगोली मध्ये देखील अँडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या सगळ्या घटनांवर अँडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या आईने माध्यमांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे, साम टीव्हीशी बोलताना सदावर्ते यांच्या मातोश्री यांनी आपला मुलगा गुणरत्न सदावर्ते कायद्याने बोलतो तो वकील आहे

Crime News : मध्यरात्री गॅस कटर च्या सहाय्याने ATM मशीन फोडून 10 लाखांची रोकडं लंपास.

चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील भर वस्तीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये घुसून चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील दहा लाख रुपयांची रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना चिखली शहरात घडली आहे. चोरट्यांनी सुमारे दीड तास या एटीएम मध्ये धुमाकूळ घालत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून ही रोकड लांबवली यामुळे मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे अतिशय दाट वस्तीच्या असलेल्या राऊतवाडी परिसरात अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकही भयभीत झाले आहेत. पोलीस आता विविध माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

raigad :  नेरळ माथेरानच्या रस्त्याची दुरावस्था

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. पावसाळ्या दरम्यान रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला गटार काढुन न दिल्याने डोंगरात पडणाऱ्या पावसाचे पाणी रस्तावरून वाहिल्याने माथेरानच्या घाट रस्त्या चरा प्रमाणे लांब खड्डे पडले आहेत. यामुळे नेरळ ते माथेरान या आठ किलोमिटरच्या रस्त्यावर अपघात जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्यटक आणि स्थानिकांच्या वाहनांचे या खड्डयांमुळे नुकसान होत असून अपघात देखील होत आहेत. पावसाळा संपत आला असून आता पर्यटनाचा हंगाम सुरू होणार आहे. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने हा नेरळ माथेरान रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा नेरळ माथेरान टॅक्सी मालक चालक संघटनेनी दिला आहे.

Rain News : संभाजीनगरला झोडपले

छत्रपती संभाजीनगर : मध्यरात्रीपासून पुन्हा शहरासह वैजापूर, पैठण, कन्नड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव परिसरात जोरदार पाऊस

कन्नड तालुक्यातील सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

सावरगाव मध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर शेती पिकांचे मोठे नुकसान

नदीला मोठा पूर आल्याने घाटनांद्रा सिल्लोड संपर्क तुटला

मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू

Tuljapur : तुळजाभवानी देवी मंचकी निद्रा संपुन सिंहासनावर विराजमान

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची नऊ दिवसाची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर पुन्हा विराजमान झाली आहे.देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पुजा होवुन सुरूवात होणार आहे.दरम्यान देवीची मुर्ती ही चल मुर्ती आहे.मध्यराञी १ वाजुन १५ मिनिटांनी चरणतीर्थ झाले तर राञी सव्वा दोन वाजता तुळजाभवानीची मुर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.काळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान तुळजाभवानी मातेची धुपारती व घटस्थापना होणार आहे.तर नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदीराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नवराञ उत्सवाचा पाहीलाच दिवस असल्याने तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळत आहे.

DHARAshiv : परंडा तालुक्यातील चांदणी नदीने रौद्ररूप,सिरसाव गावातील शाळा सरकारी दवाखाना व घराघरात घुसले पाणी

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा मोठा कहर पाहायला मिळत आहे.राञी झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदणी नदीने रौद्ररूप धारण केले आहे.परंडा तालुक्यातील सिरसाव गावात चावडी शाळा व घराघरात पाणी साचले आहे, यामुळे गावकऱ्यांच्या नुकसान झाले असून, घराघरात पाणी सुचल्या जीवनावश्यक वस्तूचे होते नुकसान झाले असून मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांचे हे अतोनात नुकसान झाले असून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी ही करण्यात येत आहे. सिरसाव गावातील नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडे जवळपास 200 -300 लोक अडकल्याची माहिती आहे. 

PANDHARPUR : पंढरपूरच्या उपरीत मुसळधार पाऊस

पंढरपूर तालुक्यातील उपरी व परिसरात  रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. ऊस पिकासह अनेक शेती पिकात गुडघाभर पाणी साचले आहे. 

सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. कासार ओढ्यावरील सुपली आणि पळशी गावा दरम्यानचा पुल पाण्याखाली गेला आहे

YAVATMAL : आसेगाव देवी येथे आज पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ

यवतमाळ च्या बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव येथे आदिशक्तीचे प्राचीन देवस्थान असून आज नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घटस्थापना होणार आहे.भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आई जगदंबेच्या चरणी नवही दिवस आसेगाव देवी येथे भक्तांची गर्दी उसळणार आहे.आसेगाव देवी येथील आदिशक्तीच्या देवालयाबाबत मोठी अख्यायिका आहे.संस्थानच्या वतीने या सदर्भात माहिती देण्यात आली इ.स.१६७० मधे आसेगाव देवी मधे मराजी नावाचे देवीचे भक्त होऊन गेले.दिवसभर मराजी गावातील गुरे ढोरे चारायचे त्यानतंर गोठानाची ते साफसफाई करायचे पुरातन काळात जणू त्यांनी गावकऱ्यांना स्वच्छेतेचा मंत्र दिला होता.गावामध्ये गोधनाची संख्या वाढावी व त्यातून गावकरी समृद्ध व्हावे या साठी मराजी झटायचे.त्यांची अहोरात्र गो मातेची सेवा पाहून आई जगदंबेने त्यांना साक्षात दर्शन दिले.

RAIGAD : माथेरानमध्ये घोड्यांच्या डोळ्यांना अज्ञात रोगाची लागण

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये घोड्यांना डोळ्याच्या अज्ञात आजाराची लागण झाली आहे.  गेल्या विस दिवसांपासून उद्भवलेल्या या आजारामध्ये घोड्यांना दृष्टी दोष निर्माण होत आहे.  प्रथम डोळ्यांना सुज, डोळ्यांच्या रंगात बदल आणि दृष्टी कमी होत जाण्याची लक्षण दिसत आहेत.  हा आजर नक्की काय आहे हे अद्याप समजले नसुन या आजाराची 11 घोड्यांना लागण झाली आहे.  घोडा हा माथेरानकरांसाठी केवळ एक प्राणी नसून तो त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य, उत्पन्नाचे साधन आहे.  

DHARASHIV : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात राञी मुसळधार पाऊस

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात  राञी मुसळधार पाऊस

संजीतपुर गावातील तेरणा नदीला पुर,परीसरातील शेतात  घुसले पाणी

काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांच मोठं नुकसान

नदीला पुर आल्याने बंधाऱ्याहुन वाहणाऱ्या पाण्यातुन गावकर्‍यांचा जिवघेना प्रवास

sangli : .. अग्रण धुळगावचा हरित विश्वविक्रम, आईच्या नावाने 1 मिनिटात 1000 वृक्षांची लागवड...

 सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या अग्रण धुळगाव येथे हरित विश्वविक्रम करण्यात आला आहे.एक झाड आईसाठी या उपक्रमांतर्गत अवघ्या एका मिनिटात 1 हजार वृक्षांचा लागवड करण्यात आली आहे.

त्याचबरोबर यावेळी माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत एकूण पाच हजार झाडांचे वृक्षारोपण देखील करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये अग्रण धुळगाव मधील शालेय विद्यार्थी,महिलांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

NANDED : नांदेडच्या माहूरच्या गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात

नांदेडच्या माहूरच्या गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात

माहूरगडावर राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल.

नऊ दिवस माहूर गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची असणार रेलचेल.

 देवीचा अभिषेक, वस्त्र अलंकारांचे प्रधान, घटस्थापना,

घट स्थापनेनंतर महाआरती कुमारी का पूजन सोहळा पडणार पार.

मंदिर संस्थान कडून भाविकासाठी उपाय योजना.

माहूर गडाच्या पायथ्या पासून महामंडळाच्या एसटी बसेसची सुविधा.

NASHIK : नवरात्रोत्सव निमित्ताने देवीचे फलक रेखाटन

शारदीय नवरात्रोत्सवाला आज पासून सुरुवात होत असून त्या निमित्ता नाशिकच्या चांदवड येथिल कला शिक्षक देव हिरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या वणी गडावरील सप्तश्रृंगी देवीची प्रतिकृती च फलक रेखाटन करत भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

PUNE | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! 

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यात जिल्ह्यातील ४ ही धरणं १०० टक्के भरलेली

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार ही धरणात १०० टक्के पाणीसाठा

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर मध्ये १०० टक्के पाणीसाठा

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे चार ही धरणे मध्ये मुबलक पाणीसाठा

पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात २९.१२ टी एम सी पाणीसाठा

PUNE | औषधे आजपासून होणार स्वस्त, किंमत जुनी असली तरी जीएसटी कपातीचा लाभ रुग्णांच्या खिशात

औषधांवरील वस्तू व सेवाकरात (जीएसटी) कपात केल्यानंतर औषध नियंत्रकांनी कंपन्या आणि वितरकांना सुधारित किमतीत ग्राहकांना औषधे पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने औषधविक्रेत्यांनी सोमवारपासूनच स्वस्त दरात औषधे देण्याचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे जुनी किंमत असलेली औषधेही नव्या किमतीत मिळणार आहेत. बहुतांश औषधांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर आणला आहे. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटीही आता ५ टक्क्यांवर आणला आहे.

राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा कायम

राज्यात विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते जोरदार सरी कोसळतच आहेत. राज्याच्या कमाल तापमानातील वाढ टिकून आहे. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी आणि विजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com