Maharashtra Live News Update : निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रावर शक्ती चक्रवादळाचं सावट, कोकण मराठवाड्यात पावसाची शक्यता, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

२० जणांवर गुन्हा दाखल

आमदार बापू पठारे यांना सार्वजनिक कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळानंतर, त्यांच्या समर्थकावर झालेल्या मारहाणप्रकरणी बंडू खांदवे याच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले...

याप्रकरणी शकील अजमोद्दीन शोख (वय ४६, रा. तुकारामनगर, खराडी) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडू शहाजी खांदवे (रा. लोहगाव), शेखर मोझे, विलास खांदवे, कालिदास खांदवे, गणेश खांदवे, मेघराज खांदवे, प्रतीक खांदवे, रामेश्वर पोळ, सागर करजे, ओंकार ऊर्फ ओम्या खांदवे, हरिदास खांदवे, तुकाराम खांदवे, मंगेश खांदवे, रामदास खांदवे आणि अन्य पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

यवतमाळ प्रथमच होणार एसटी प्रवर्गातील महिला नगराध्यक्ष

यवतमाळ नगर परिषदेची धुरा प्रथम एसटी प्रवर्गातील महिलांच्या हाती जाणार आहे. या पदावर प्रभावी महिला उमेदवार देण्यासाठी राजकीय पक्षांचा कल लागणार आहे. शहरात भाजपची कायम एक हाती सत्ता राहिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरण बदलले आहे. काँग्रेसकडून नगरपरिषदेतील फार पूर्वीचे वैभव परत मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे भाजपला विधानसभेचा वाचपा काढायचा आहे.

छिंदवाडा परिसरातील ३६ रुग्ण नागपुरात दाखल

- छिंदवाडा परिसरातील ३६ रुग्ण नागपुरात दाखल, आतापर्यंत १० मृत्यू; डेथ ऑडिटनंतर कारण स्पष्ट होणार, NIV चे रिपार्ट ठरणार महत्वाचे

- ० ते १६ वर्षे वयोगटातील १२ रुग्ण सध्या उपचार सुरू, मध्यप्रदेश १०, महाराष्ट्र १, तेलंगणा १.

- वैद्यकीय शिक्षण विभागाचे ३ सदस्यीय पथक तपासणीस सुरुवात,

- ६ रुग्ण व्हेंटिलेटरवर, त्यापैकी मेडिकलमध्ये ४, इतर रुग्णालयात २.

- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक मंगळवारी नागपुरात, पुढे छिंदवाड्यालाही भेटीची शक्यता.

- महापालिकेच्या अहवालानुसार संशयित मेंदूज्वराचे १२ रुग्ण उपचाराधीन — मेडिकल ६, एम्स २, लता मंगेशकर १, तीन खासगी रुग्णालयात प्रत्येकी १.

- तपास पथकात डॉ. आरती किन्हिकर, डॉ. छाया वळवी आणि डॉ. भालचंद्र चिकलकर, मुंबई, पुणे येथील तज्ञांचा यांचा समावेश.

- पथकाने रुग्ण व नातेवाइकांची भेट घेऊन केसपेपर तपासले, उपचाराची दिशा ठरवली

विमानतळ उद्घाटना दिवशी नवी मुंबईत जड आणि अवजड वाहणांना पुर्ण बंदी.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ८ ॲाक्टौंबर रोजी होणार असल्याने त्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १० वाजे पर्यंत शहरातून जाण्यास जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पार्किंग सुद्धा करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मध्ये ट्रक , कंटेनर , टॅंकर आदींचा समावेश आहे. उध्दघाटनंतर मोदी यांची सभा होणार असल्याने जवळपास ५० हजार लोकं उपस्थित राहणार आहेत. त्याच बरोबर राज्याचे संपुर्ण मंत्रिमंडळ, अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.

बनावट कागदपत्र सादर करून पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी निलेश घायवळ वर गुन्हा दाखल

पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

बनावट कागदपत्र आणि प्रतिज्ञा पत्र सादर करत मिळवला पासपोर्ट

आपल्यावर कुठला ही गुन्हा दाखल नसल्याचं सांगत केली शासकीय यंत्रणांची फसवणूक

बनावट ओळखपत्र आणि कागदपत्र पोलिस आणि पासपोर्ट कार्यालयाला सादर करत मिळवला पासपोर्ट

फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार करून पासपोर्ट ॲक्ट १९६७ आणि आधार ॲक्ट २०१६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

महायुतीत प्रथम निवडून आलेल्या आमदारांना विकास निधी दिला जाणार असल्याची सुत्रांची माहीती

विकास कामांसाठी दिल्या जाणार्या नीधीबाबत अजित पवार यांची भूमिका ऊदासिन असल्याची आमदारांची शिंदेंकडे तक्रार

याबाबत तीन्ही प्रमुख नेत्यांनी योग्य तो मार्ग काढावा अशीही आमदारांची भूमिका.

AMARAVATI - सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नाचा काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून निषेध.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नाचा काँग्रेस नेत्या माजी मंत्री  यशोमती ठाकूर यांच्याकडून निषेध.

भूषण गवई हे बुद्धिस्ट मागासवर्गीय  समाजामधून येतात आणि संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे म्हणून ते या ठिकाणी बसले आहे  हे सत्ताधाऱ्यांना सहन होत नाही ही वास्तविकता आहे - यशोमती ठाकूर यांची टीका 

2014 पासुन भाजपची सत्ता आली तेव्हापासून आदिवासी,अल्पसंख्यांक, मागासवर्गीयावर अन्याय होत आहे

वणी पोलीस ठाण्यात समोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची गर्दी

तद्नंतर पोलिसांनी शिवसेनेच्या आठ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.उशिरा पर्यंत जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना न सोडल्याने हजारो शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली

,दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या सह काही पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवला होता.मंत्री उईके हे वणीत आढावा बैठकीसाठी गेले होते.मात्र आढावा बैठक न घेताच मंत्री उईके यवतमाळकडे निघाल 

वणी पोलीस स्टेशन समोर अजूनही शिवसैनिकांची गर्दी कायम, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर कडून कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठानकडून आल्याची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com