मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळाल्यानंतर गोगावले आपल्या समर्थकांसोबत रायगडावर गेले होते. यावेळी त्यांनी जगदिश्वराची पुजा केली, कार्यकर्त्यांनी बोललेला नवस फेडला. यावेळी महाराष्ट्राचे पुढचे मख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत असं साकडं जगदीश्वराला घातल्याचे विकास गोगावले म्हणाले.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली परिसरात आज पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
वाघोलीतील वाढती वाहतूक लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिसांची प्रभावी उपाययोजना अपेक्षित असताना प्रत्यक्षात वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव जाणवत असल्याने कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. चौकांमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नियोजन करण्याची गरज आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटातील हिवाळा ब्रीजजवळ कंटेनर पलटी झाला होता. कंटेनर पलटी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावर पलटी झाला होता
कंटेनर महामार्गवर आडवा पडल्याने नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती
महामार्ग पोलिस केंद्र घोटीचे कर्मचारी व रूट पेट्रोलिंग टीमचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत खाजगी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे.
पुणे -
पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे बिनसले?
पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांचे थेट सुनेत्रा पवार यांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगरसेवकांच्या महापालिकेतील वर्तवणुकीबाबत केली नाराजी व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांना पाठवले खरमरीत पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक अमोल बालवडकर यांची वागणूक असंसदीय आणि हेकेखोर असल्याची पत्रातून केली तक्रार
बालवडकर यांची भूमिका सभेच्या कामकाजात बाधा आणणारी आणि अहंकारी असल्याची देखील केली तक्रार
सांगली जिल्ह्यात नशेविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. मिरज ग्रामीण हद्दीतुन जाणार गांजा पोलिसांनी सापळा रचून पकडला आहे. आणि या अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. कोल्हापूर परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा,सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कामगीरी केली आहे..
मुंबई- गोवा महामार्गावर इन्सुली येथे खड्ड्यांमुळे भीषण अपघात
कार पलटी होऊन महिलेचा मृत्यू
तीघे गंभीर; घटना सीसीटीव्हीत कैद
पुणे -
बार्टी सारथी महाज्योती संस्थांना लागू करण्यात आलेले जीआरची होळी
सर्वकष समान धोरणाच्या GR ची समाजकल्याण आयुक्तालय पुणे स्टेशन येथे आंदोलन
विद्यार्थीनी केली जाहीर होळी..
नांदेड -
गडचिरोतील आदिवासी आश्रम शाळेत तीन विद्यार्थ्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आश्रम शाळांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीला आश्रम शाळांमधील विदारक चित्र दिसून आले.
अनुसूचित जमाती कल्याण समिती आज नांदेड जिल्ह्यातील आदिवासी तालुके असलेल्या किनवट आणि माहूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहे.
किनवट तालुक्यातील सारखणी येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत समिती पाहणीसाठी गेली होती.
समिती येणार असल्याने वरवरून शाळेची सफासफाई करण्यात आली होती.
धुळे -
वाहन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला सोनगीर जवळ लागली आग
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
जवळपास एक तासापासून वाहतूक कोंडी, जवळपास पाच किमी पर्यंत वाहतूक कोंडी
मध्यप्रदेश येथून धुळ्याकडे जाणाऱ्या नवे वाहन घेऊन जाणाऱ्या कंटेनरला आग लागल्याने वाहतूक कोंडी
आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल
वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांनी आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडला भेट दिली. यावेळी त्यांनी जगदीश्वर मंदिरात पूजा करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत दर्शन घेतले. पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गोगावले यांनी रायगड दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या दौऱ्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंगोली शहरातील अष्टविनायक नगर परिसरात चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटांत कारची काच फोडून तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली. गोल्ड लोनमधून मिळालेले पैसे कारमध्ये ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी कारची काच फोडून रोकड पळवली. या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अरुण टाले यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील टेंभुरधरा येथे भिमराव भुजमराव यांच्या घरात गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच स्फोटाच्या तीव्रतेमुळे घराचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.
लातूर जिल्ह्यातील औसा केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना बसवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत सोशल ऑडिट करताना अभिजीत दिपके यांनी शाळेला भेट दिली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपण खासगी शाळेत शिकत असल्याचे दिपके यांच्यासमोर सांगितल्याचा दावा करण्यात आला. मात्र, हे विद्यार्थी शेजारील उर्दू शाळेतील असल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या वक्तव्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या आणि उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकाराची चर्चा सुरू आहे.
पुण्यातील कौन्सिल हॉल चौकातून साधू वासवानी चौकाकडे जाणारा रस्ता २२ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. बंडगार्डन वाहतूक विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. साधू वासवानी चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. कौन्सिल हॉल चौकातून येणाऱ्या वाहनांनी डावीकडे वळून ब्लू नाईल चौक, त्यानंतर आयबी चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच किराट चौक ते मॅरेज ब्युरो मार्गावरही वाहतूक बदल लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
नवी मुंबईत रिक्षाचालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत आजपासून परिवहन विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. आरटीओकडून विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, नवी मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर रिक्षाचालकांची तपासणी केली जात आहे. यावेळी रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही, याची पडताळणी केली जात आहे. मराठी भाषेचा वापर आणि प्रवाशांशी संवाद साधताना अडचणी येऊ नयेत, यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे. कारवाईमुळे रिक्षाचालकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
मुलींच्या अडीअडचणीसह त्यांना दिलासा देण्यासाठी राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रो की गुंज कार्यक्रम
पुण्यातील एस एस पी एम एस कॉलेजच्या मैदानावर होणार शनिवारी सायंकाळी कार्यक्रम
कार्यक्रमाला वीस ते पंचवीस हजार तरुणी येणार असल्याचा काँग्रेसचा दावा..
एस एस पी एम एस मैदानावर कार्यक्रमासाठी तयारी
दौंड शहरातील आर.बी.1 नगरमोरी परिसरात 70 वर्षीय महिलेची निघृण हत्या करण्यात आली आहे.सुमन किसन शिंदे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. विशेष म्हणजे आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहापासून महिलेचं शीर वेगळं करून दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकलं.
इंदोर कडून धुळ्याकडे गाजर घेऊन येणाऱ्या आईसर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला ठोकून ट्रक झाला पलटी
आयशर ट्रक पलटी होताच ट्रकला लागली भीषण आग
सुदैवाने जीवित हानी टळली मात्र आईसर ट्रक जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान
वैभव नाईक हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेकडून आमदारकी लढवणार होते. सर्व बोलणी झाली होती असा गौप्यस्फोट आमदार निलेश राणे यांनी केला होता..
या आरोपाला वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदे यांनी मला अनेकवेळा बोलावलं होतं पण ठाकरेंशी गद्दारी करून मला आमदार व्हायचं नव्हतं म्हणून मी शिंदेसोबत गेलो नाही.
बारामती तालुक्यातील अग्रगण्य सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असतानाच, रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.
अंबरनाथमध्ये भर पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सुरळीत पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाबाहेर आंदोलन आणि उपोषण सुरू केले आहे.
उल्हासनगर शहरातील विविध नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी ‘महापौर आपल्या दारी’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.उल्हासनगर शहरातील चारही प्रभागांमध्ये वेगवेगळ्या दिवशी ‘महापौर आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून महामोर्चाला सुरूवात, महिलांसह हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी
मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात,मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन समाज बांधवांचा सहभाग
विद्यार्थ्यांचे प्रश्न राहुल गांधी मांडत आहे
राहुल गांधी पुण्यात येतात याची दाखल मुख्यमंत्री यांनी घेतलीय
ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे याची मुख्यमंत्र्यांनी धास्ती घेतलीय
राहुल गांधी यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत तसेच त्यांनी झारखंडमध्ये देखील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्ज नंतर झारखंडचा दौरा करावा
कोल्हापूर महानगरपालिकेच्या जवाहरनगर येथील शाळेत शिक्षकांची जात फळ्यावर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचे पडसाद काल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे, नगरसेवकांनी शिक्षकांची जात लिहिलेला फलक थेट सभागृहात आणत घोषणाबाजी केली.
परभणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मागील पाच महिन्यांपासून वेतन थकीत आहे. थकीत वेतन मिळावे आणि महानगरपालिकेला जीएसटी अनुदान मिळावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील दहा दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या दररोज विविध पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका कार्यालयासमोर चुलीवर ठेचा-भाकरी थापत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
ऑगस्ट महिना संपण्यास अवघे दहा दिवस उरले असताना या महिन्याचे चार ही आठवडे मराठवाडा आणि विदर्भासाठी निराशाजनक ठरले आहेत. या दोन्ही विभागातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा देहूरोड विभाग युनिट-४ ने दरोड्याचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत पाच अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून तब्बल ११ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपींनी पिकअप चालकाला अडवून पिस्तुलासारखी वस्तू दाखवत धमकावले आणि मारहाण करून १ लाख ८ हजार रुपये लुटले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत इंडिका कार, मोटरसायकल, चारचाकी पिकअप आणि मोबाईलसह रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड युनिट ४ पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे दरोडेखोरांचे धाबे दणाणले आहेत
सोशल मिडिया इन्फ्ल्यूएनसर म्हणून घेणाऱ्या एका तथा कथित आध्यात्मिक गुरु ने तरुणीकडे अर्धनग्न फोटो मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात या २३ वर्षीय सोशल मिडिया इन्फ्ल्यूएनसर वर गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. "तुझ्या अंगातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी काही अर्धनगन फोटो," अशी मागणी या भोंदू ने केली असल्याने त्याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अन्वये कारवाई करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली.
अंबरनाथमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या ड्रग्ज माफियांची घरं निष्कासित करा, अशी मागणी पोलिसांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे केलीये. याबाबतचं पत्र पोलिसांनी पालिकेला दिलं असून सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी ही माहिती दिलीये.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या जवाहरनगर येथील शाळेत शिक्षकांची जात फळ्यावर लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचे पडसाद काल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे, नगरसेवकांनी शिक्षकांची जात लिहिलेला फलक थेट सभागृहात आणत घोषणाबाजी केली.
उत्तराखंड येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर भाजपतर्फे गंगाजल टाकून शुद्धीकरण करण्यात आल्याच्या निषेधार्थ धुळ्यात काँग्रेस आक्रमक झाली आहे, धुळ्यात महात्मा गांधी पुतळ्या समोर सत्याग्रह पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे,
शहरातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून, या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज करनकाळ यांनी भाजपवर घणाघाती टीका करत, "भाजपने केलेल्या या कृत्यामुळे आज स्वतःविरुद्धच आंदोलन ओढवून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे," असा टोला लगावला.या सत्याग्रह आंदोलनामुळे धुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील वृत्तवाहिन्या, दैनिके आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत पत्रकारांना १० लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना डोंगरकपारी, वाड्या-वस्त्या तसेच दुर्गम भागात जाऊन बातम्यांचे वार्तांकन करावे लागते. राजकीय, सामाजिक तसेच विविध घटनांचे वृत्तांकन करताना पत्रकार सतत फिल्डवर कार्यरत असतात. मात्र अनेक पत्रकारांना त्यांच्या संस्थांकडून आरोग्य किंवा विम्याचे कोणतेही सुरक्षा कवच उपलब्ध नसते. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या पत्रकार बांधवांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा विचार करून राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिपत्याखाली मावळ तालुका मराठी पत्रकार संघाने एक पाऊल पुढे टाकत ही विमा संरक्षण योजना राबविली आहे. या उपक्रमाचा तालुक्यातील शेकडो पत्रकारांना लाभ मिळणार असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल ठरत आहे
कोकण किनारपट्टीवर स्थलांतरित होणाऱ्या दुर्मिळ समुद्री गरुडाला दापोलीतील मुर्डी येथे जीवदान मिळाले आहे. पक्षीप्रेमी विनय जोशी यांच्या सतर्कतेमुळे जखमी अवस्थेतील गरुडाची माहिती वनविभागाला देण्यात आली.वनरक्षक आणि प्राणीमित्रांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून गरुडाला ताब्यात घेतले. दापोलीतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी या दुर्मिळ पक्षाला पालघर येथील डहाणू रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.नर-मादी समुद्री गरुडाच्या झटापटीत झालेल्या जखमांमुळे हा पक्षी जखमी झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवर एका कारमधून जीवघेणा स्टंट केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारमधून अर्धे शरीर बाहेर काढत तरुण सेल्फी घेत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एका वाहनचालकाने हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या जीवघेण्या स्टंटमुळे संबंधित तरुणांसह इतर वाहनचालकांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. नियमांची भीती न बाळगता अशाप्रकारे स्टंट करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी कार मारुती सुझुकी कंपनीची असून तिचा क्रमांक MH 03 ES 5523 असा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या जीवघेण्या स्टंटप्रकरणी महामार्ग पोलिसांकडून कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारी सुविधा घेऊन २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या महाराष्ट्र व गोवा राज्याचा प्रतिनिधी असल्याचे भासवून बनावट लेटर हेड तयार करून त्याद्वारे गंडा घालण्यात आला आहे.
बनावट पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सादर लोणावळ्यातील करून शासकीय विश्रामगृहाचा वापर,तसेच पुणे ग्रामीण पोलिसांचे 'एस्कॉटिंग' घेतल्याचा आरोप आहे.
* आदिवासी पाड्यांपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
* अतिवृष्टी, नदीला पूर अथवा रस्ते नसल्याने दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवताना येतात अडचणी
* या अडचणींवर मात करण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून औषधे आणि वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचा प्रयोग
* ड्रोन संचालनासाठी आयआयटी मुंबईकडून प्रशिक्षणाला सुरुवात
अभिजीत दिपके हे आज हे लातूर येथील औसा तालुक्यातल्या उजनी येथील जिल्हा परिषद शाळेची स्कूल ठीक करो या अभियानांतर्गत पाहणी करत आहेत, शाळेतील विद्यार्थ्यांची त्यावेळी संवाद साधत आहेत. शाळेत असलेल्या अपुऱ्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता याविषयी ते सोशल ऑडिट करत आहेत..
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास गंडा
मागासवर्गीय आयोगाचा प्रतिनिधी असल्याचे भासवत फसवणूक
सरकारी सुविधा घेऊन २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पहाटे ५ वाजता गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या सर्वांना घेतलं ताब्यात
कोंढवा परिसरात गणेश पाटोळे या सराईत अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीला घेतलं ताब्यात
घटनास्थळावरून ३ ते ४ किलो गांजा जप्त
याप्रकरणी गांजा खरेदीसाठी आलेल्या ४३ लोकांना देखील ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू
आज अमित ठाकरे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर; विद्यार्थ्यांशी संवाद, सदस्य नोंदणी आणि कॉलेज युनिटचे उद्घाटन करणार
अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या स्वागतासाठी कल्याण-डोंबिवलीत मनसेचे झेंडे आणि बॅनर लावून जोरदार शक्तिप्रदर्शन
मात्र कल्याण मध्ये मनसे शहराध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या बॅनरवर अमित ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे फोटो; तर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर याचा फोटो गायब
जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब असल्याने मनसेतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत; कार्यकर्त्यांमध्ये तर्क-वितर्क
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील 152 गावांना अद्याप स्मशानभूमी नाही.
मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना 3 ते 10 किमी पायी करावा लागतो प्रवास.
जंगल, नदी नाले पार करत मृतदेह नेण्याची ग्रामस्थांवर वेळ
* नाशिक जिल्ह्यात दुर्गम भागात ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्याची चाचणी सुरू
* आदिवासी पाड्यांपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
* अतिवृष्टी, नदीला पूर अथवा रस्ते नसल्याने दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवताना येतात अडचणी
पुणे-पिंपरीत सीएनजीच्या मागणीत तिप्पट वाढ
वाहनसंख्या ६.२० लाखांवर
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजीची मागणी झपाट्याने वाढली
पालखीच्या मागे स्वच्छता दिंडी; खामगाव–शेगाव मार्गाची साफसफाई
हातात झाडू घेत भाविकांसोबत स्वच्छतेची वारी; ॲड. शर्वरी तुपकरांचा अनोखा उपक्रम
- हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद
- मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या
- पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा निर्णय
- दाट धुक्यामुळे गडावर चढाई धोकादायक
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्यांना हायकोर्टाचा सवाल
‘कायदेशीर दाद मागण्याचा अधिकार काय?’
पुरंदर विमानतळासाठी प्रस्तावित जागेला केंद्राची यापूर्वीच मान्यता मिळाली असून, भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे
पुणे-पिंपरीत सीएनजीच्या मागणीत तिप्पट वाढ
वाहनसंख्या ६.२० लाखांवर
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजीची मागणी झपाट्याने वाढली
अमरावती जिल्ह्यात १५ दिवसापासून पावसाची दडी
सोयाबीन,तूर आणि कापूस उत्पादनात घट होणार
- नागपुरातील निवृत्त प्राध्यापकाला ‘लॉरेन्स’ नावाने १० लाखांच्या खंडणीचा ई-मेल आला... पोलिसांच्या प्राथमिक तपासात ई-मेल फेक असल्याचं स्पष्ट केलं..
- कॅनडात राहणाऱ्या प्राध्यापकांच्या मुलीला आणि तिच्या नागपुरातील वडिलांना ‘१० लाख रुपये द्या, अन्यथा दोघांना ठार मारू’, अशी धमकी दिली होती..
- धमकीच्या ई-मेलसोबत मुलगी एका समारंभात भोजन करत असल्याचं छायाचित्रही पाठवण्यात आल्यानं कुटुंब भीतीत होते..
यवतमाळ शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या वाढला आहे.
त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
पालिकेने तातडीने मोकाट जनावरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
- नागपूर महानगर पालिकेने हर घर तिरंगा मोहिमेसाठी खरेदी केलेल्या तिरंग्याचा खर्च अवाढव्य झाल्याची जोरदार चर्चा....
- 30 रुपयांना मिळणार तिरंगा मनपाने 87 रुपयात खरेदी केला
- शहरात 1 लाख 75 हजार तिरंगा खरेदीसाठी मनपा ने 1 कोटी 41 लाख 55 हजार रुपये खर्च केले
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी संपर्क न साधता तसेच पूर्वपरवानगी न घेता खोदकाम केल्याने यवतमाळ शहरात पाण्याची पाईपलाईन फुटून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे यांच्या फिर्यादीवरून एअरटेल कंपनीचे अधिकारी अजय शिंदे आणि आदित्य झा यांच्याविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.