

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात सर्व आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी बुधवारी सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येत होते... हे आंदोलन पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता स्थगित करण्यात आले... विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले तसेच घुले कुटुंबातील महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या तर गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीजवळ ठिय्या सुरू केला होता.. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी दाखल होत कारवाईचे आश्वासन दिले... यामध्ये सोशल मीडियातून होणारी बदनामी थांबवण्याबरोबरच उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी देखील कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले... तर आश्वासनाप्रमाणे कारवाई न झाल्यास यापुढे आम्ही आंदोलन करणार असल्याचे रमेश घुले यांनी सांगितले.
सायन - पनवेल मार्गांवर वाहतूक कोंडी
मुंबई कडून पनवेल आणि पनवेलकडून मुंबईच्या दोन्ही मार्गीकेवर वाहतूक कोंडी
मुंबईतून चाकरमानी बाहेर पडल्याने मुंबई ते पुणे मार्गीकेवर वाहनांची संख्या जास्त
दोन्ही मार्गीकेवर पानी साचल्याने वाहतूक कोंडीत भर
वाहनधारकांचे आणि प्रवाशांचे घरी परतताना हाल
वाहतुकीस होत आहे आडथळा
० दिघी - दिवेआगर दरम्यान शिस्ते गावात स्थानिक ओढ्याचे पाणी आले रस्त्यावर
० सकाळ पासून सुरु आहे जोरदार पाऊस
० रस्त्यावरुन पाणी वाहत आसल्याने वाहन चालक आणि पादचाऱ्यांना ये जा करताना होत आहे अडचण
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यात असलेल्या फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.नांदेडहून किनवटकडे ताफा जातांना अंजनखेड गावा जवळ उबाठा कार्यकर्त्यांनी ताफा अडवन्याचा प्रयत्न केला.काळे झेंडे आणि गद्दार असे फलक दाखवून कार्यकर्त्यांनी आष्टीकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली .. दरम्यान काळे झेंडे दाखवनाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष प्रमूख उध्दव ठाकरे यांनी फोन केला. फोन करुन उध्दव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.उबाठाचे जिल्हा प्रमूख ज्योतिबा खराटे यांना फोन करून उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला. तुम्ही चांगला काम करताय , तुमच्या सारखे निष्ठावान शिवसैनिक आहेत तो प्रयत्न शिवसेनेला धोका नाही अस उध्दव ठाकरे म्हणाले.काही अडचण असेल तर मला सांगा , पुढच्या टप्यात मी किनवटला येईल असं उध्दव ठाकरे म्हणाले.
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे तर अनेक भागात अजूनही पावसाची शेतकरी वाट पहात असल्याचे पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यात काही भागात पावसाची हजेरी लागली असून काही भागात जून महिना उलटून गेला तरी पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने पावसाची वाट पाहत होता मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच परळी तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे या मुसळधार पावसामुळे परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात
० कुत्र्याला वाचविण्याच्या नादात एसटी थेट रस्त्याचा कडेला घसरली
० सुदैवाने जीवित हानी टळली
० बोर्ली पंचतनवरून कार्ले खुजारे गावाकडे जाणाऱ्या बसला अपघात
० एसटी मधील सात ही प्रवासी सुखरूप
दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी अंगलट
० भर पावसात महिंद्रा थार आणि मारुती स्विफ्ट कार थेट समुद्र किनाऱ्यावर
० मारुती स्विफ्ट कार वाळूत रुतली
० श्रीवर्धन मधील दिवेआगर हनुमान पाखाडी समुद्रकिनाऱ्यावरील घटना
० पर्यटकांचा अतिउत्साहीपणा
० स्थानिकांनी सूचना देऊन सुद्धा हुल्लडबाजी
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील मुसळधार पावसाने रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालवाणी फाटा परिसरातील मंडणगड-बाणकोट मार्गावर रस्त्याचा काही भाग खचून मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने दुरुस्ती आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने हजेरी लावली आहे, अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गर्मीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे, आजच्या झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, अद्यापही धुळे जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालेला नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे दिसून येत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध धंदे वाढले आहे, कायदा व सुव्यस्था बिघडली आहे, चोरी व दरोडेचे प्रमाण वाढले, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या, गरिबाना लुटण्याचे प्रकार वाढले असून याप्रकरणी कायदा व सुव्यवस्था राखण्यास जिल्हा पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे.. त्यामुळे याला जबाबदार म्हणूज बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा पृथ्वीराज गायकवाड , तसेच शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, आणि धर्मवीर युथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोष्ण सुरू केलेय. .
पावसाचा तडाखा सुरू असतानाच नवी मुंबईतील नेरूळमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एल.पी. ब्रिजखाली बिकानेरसमोर वायरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली असून, त्यातून विद्युतप्रवाह पसरल्याने दोन कॉलेज विद्यार्थिनी करंटच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघीही पाण्यात पडल्या असून त्यांना तातडीने रिक्षातून डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नेरूळ पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील सिस्टर निवेदिता स्कूल आणि टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालय एकत्र सुटल्याने पालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले दुसरीकडे पावसामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झाली होती त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ ची परिस्थिती निर्माण झाली होती सुदैवाने कोणतीही घटना घडली नाही.
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर–कटाई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील डिव्हायडर तीन ठिकाणी तोडून पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेतले आहे. जेसीबीच्या साहाय्यानेही पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले असून, अनेक वाहने रस्त्यातच बंद पडल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
जून महिना संपून जुलैची सुरुवात झाली असली तरी गडचिरोली जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मान्सूनने हजेरी लावली असली तरी जोरदार पावसाऐवजी हलक्या सरींवरच समाधान मानावे लागत आहे.
मुंबई - गोवा महामार्गावरील लांजा येथील वेरळ घाटात कोसळली दरड
मुसळधार पावसामुळे वेरळ घाटात रात्री पुन्हा दरड कोसळली
गेल्या आठवड्यात पावसामुळे वेरळ घाटात कोसळली होती दरड
सलगच्या पावसामुळे रात्री पुन्हा कोसळली दरड
सुदैवाने कोणतीही हानी नाही
देशभरात सर्वत्र आज कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच भंडाऱ्यात मात्र भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भंडारा पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष बघायला मिळाला. दोन दिवसांपूर्वी भंडारा नगरपालिकेनं बीटीबी भाजी मार्केटमधील पाच व्यापाऱ्यांनी व्यावसायिक कर भरला नसल्याचा ठपका ठेवत पाच व्यापाऱ्यांची दुकानं सील केली आहे.
नेवाली नाका परिसरात रस्त्यावर साचले पाणी
वाहतूक पोलिसांवर वाहतूक बंद करण्याची आली वेळ
रात्रपाळीचे कर्तव्य बजावत असताना पुणे शहरातील शिरोळे रोडवरील एका कॅफेमध्ये प्रवेश करून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप कदम यांना निलंबित करण्यात आले आहे.
सहा जूनला संदीप कदम हे रात्रपाळीवर कार्यरत होते.रात्री सुमारे पावणेदोनच्या सुमारास शिरोळे रोडवरील 'फ्लाइंग जिप्सी' कॅफेमध्ये ते गेले.त्या वेळी कॅफे बंद करण्याची तयारी सुरू होती.कदम यांनी हातातील काठीने कॅफेच्या काउंटरवरील कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्य पदार्थ खाली पाडले.तसेच तेथे बसलेल्या ग्राहकांना तत्काळ उठून बाहेर जाण्यास सांगितले आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरली.
फोडाफोडीच्या राजकारणाला काही मर्यादा आहेत की नाही?
महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरु आहे
बोईसर तारापूर एमआयडीसीतील एन 74 /1 प्लॉट नंबर वरील चेमेट इंडस्ट्रीज या कारखान्यात रिॲक्टरमध्ये ब्लास्ट
भीषण ब्लास्ट मुळे परिसर हादरला
ब्लास्टमुळे दीड ते दोन किलोमीटर पर्यंत हादरा बसल्याची माहिती
वेल्हे पोलिसांची कारवाई; गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत आरोपी जेरबंद
वेल्हे : वेल्हे पोलिसांनी बोराळे फाटा येथे कारवाई करत सोन्या उर्फ अतुल विलास कोळपे (वय २६) याला एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केली.
आरोपीकडून सुमारे २५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रीपासून मुसळधार
कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे पाऊस असाच सुरू राहिला
तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.कल्याण शीळ मार्गावर पाणी साचले आहे.
त्यामुळे वाहन चालकांना वाहन मनस्ताप सहन करावा लागत आहे वाहतूक मंदावली आहे.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात जिल्ह्यातील 32 हजार 409 ठेवीदारांचे तब्बल 338 कोटी 19 लाख 53 हजार 908 रुपये अद्याप अडकले आहेत.
या ठेवी तातडीने परत मिळाव्यात, या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.
भगवती किनारपट्टीभागात लाटांच तांडव
किनारपट्टी भागातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा
पुढील चार दिवस रत्नागिरीला आँरेंज अलर्ट
मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता
भारतीय रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे परिसरातील शिस्त आणि नियमांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्यासाठी 'जन विश्वास अधिनियमांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे.
आता रेल्वेचे अधिकृत कर्मचारी थेट घटनास्थळावरच दंड आकारू शकतील. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
सिंधुदुर्ग -
नगरसेविकेच्या पतीकडून कचरा कामगाराला मारहाणीची धमकी
मालवणात कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन
नगरसेविकेने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वादावर पडदा
यवतमाळ जिल्ह्यात अडीच हजार बीएलओ वाटणार गणना
मतदार यादी अध्यायावत करण्यासाठी निवडणूक विभागाने विशेष पुनरीक्षन कार्यक्रम (SIR) ही विशेष मोहीम 30 जून ते 29 जुलै एक महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात राबविली जात आहे.
या दरम्यान 2 हजार 578 बीएलओच्या माध्यमातून 22 लाख मतदारांचे गणना पत्रक भरून घेतले जात आहे.
जे मतदार गणना पत्रक भरणार नाही, अशा मतदारांची नावे यादीतून मतदार वगळल्या जाणार आहे.
यामुळे 18 वर्षे झालेल्या प्रत्येकाला एसआयआर मोहिमेत गणना पत्रक भरणे सक्तीचे आहे.
रायगड :
- रायगडच्या आंबा नदीने धोका पातळी ओलांडली
- आंबा नदीची इशार पातळी 8 मिटर इतकी आहे पण पावसाचा जोर वाढल्याने आंबा नदी 8.20 मिटर वरून वाहत आहे
- नदी काठची गाव आणि रहिवाशांना शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे
नालासोपारा -
वसई-विरार शहरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे.
नालासोपारा पूर्वेतील वाकणपाडा आणि धानिव बाग मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
गुडघाभर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे.
गुडघाभर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहने काढावी लागत आहेत. तर अनेक वाहने ही रस्त्यामध्ये बंद पडली आहेत.
वारंवार होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येमुळे स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई -
नवी मुंबईत रात्रभर मुसळधार पडलेल्या पावसामुळे एमआयडीसी भागात पाणी
तुर्भे एमआयडीसी मधील रस्त्यावर पानी
एक ते दीड फुट पानी साचल्याने वाहनधारकांना त्रास
पाण्याचा निचरा न झाल्याने रस्ते जलमय
मनमाडमध्ये पाऊस लांबल्याने बळीराजा हतबल, पेरणीची काम खोळंबली
राज्यात एकीकडे अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस होतोय.
मात्र नाशिक जिल्ह्यात अद्याप पर्यंत दमदार पाऊस झालेला नाही.आकाशात ढग भरुन येताय
पाऊस पडेल अस वातावरण असतांना मात्र वरुण राजा हुलकावणी देत आहे
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दमदार पावसा अभावी बळीराजाची पेरण्यांची काम खोळंबळी आहे
जून महिन्यात ब-यापैकी शेतीची काम आटपून गेलेली असतांना यंदा मात्र जून महिना तसा कोरडाच गेल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
ठाणे -
ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान आज राज ठाकरे ठाण्यात
मनसे पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद, राजकीय चर्चांना उधाण
राज्याच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन लोटसच्या चर्चांनी जोर धरला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधणार
अमरावती -
अमरावती भाजपा नवनियुक्त शहराध्यक्ष नितीन गुडधे यांच्या शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीला स्थगिती...
नितीन गुडधे तातडीने मुंबईसाठी रवाना; मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती...
माजी खासदार नवनीत राणा यांचे विश्वासू असलेले डॉ नितीन धांडे यांच्या जागी नितीन गुडधे यांची केली होती प्रदेशाध्यक्षांनी शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती.
तर नितीन गुडधे हे खासदार अनिल बोंडे आमदार राजेश वानखडे यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा
मात्र 24 तासातच नितीन गुडधे यांच्या अमरावती शहराध्यक्ष पदाला स्थगित देण्यात आली...
त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे; दरम्यान अमरावती भाजप मधीक अंतर्गत गटबाजी मधून स्थगिती दिली असल्याची चर्चा सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
कणकवली, देवगड, कुडाळ, दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर असून किनारपट्टी भागासह सह्याद्री पट्ट्यातही पावसाचा जोर दिसून येत आहे.
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 90 मि.मी पाऊस झाला असून कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 131 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
आज सुद्धा सकाळपासूनच अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत असून हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर -
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन.
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 11 वाजता होणार आंदोलन.
32 हजार 409 ठेवीदारांचे 338 कोटी 19 लाख अडकलेले पैसे परत मिळावेत या मागणीसाठी आंदोलन
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त, बॅरिकेड्स उभारले.
नागपूर
- नागपूर महानगर पालिका वेस्ट कापडातून बनविणार बेस्ट वस्तू
- नागपुरात महानगरपालिका टेक्स्टाईल रिकव्हरी प्रकल्प सुरू करणार
- नागपूर महानगर पालिका आयुक्त डॉ विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून साकार होणार प्रकल्प
- शहरातून दररोज सुमारे 500 टन कपड्यांचा कचरा निघतो यातील ७० टक्के कापड हे पुन्हा वापरण्यायोग्य केले जाणार तर उर्वरित 30 टक्के कपड्यांपासून नवनवीन उत्पादने तयार केली जातील
- त्यामुळे जुन्या फाटलेल्या आणि न वापरता येणारे कपडे कचऱ्यात किंवा नाल्यात वाहून न जाता त्याचा पुनर्वापर केला जाणार
- यानिमित्ताने रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार, शिवाय कचरा कमी होईल असा उपक्रम लवकरच राबवला जाणार आहे...
यवतमाळ -
मुदतबाह्य कीटकनाशके रासायनिक खताचा साठा केला जप्त
यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख येथे अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशके रासायनिक खताचा साठा केला जप्त
कृषी विभागाने कारवाई करत 17 लाख 82 हजाराचा साठा केला जप्त
यश शिवनवार हा विना परवाना प्रतिबंधित साठा करून करत होता शेतकऱ्यांना विक्री
पेरण्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना विकली जात होती मुदतबाह्य कीटकनाशक आणि खते
नाशिक -
- भोंदू अशोक खरात प्रकरणातील पहिल्या खटल्याची सुनावणी सुरू
- पहिल्या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पडली पार
- एसआयटीकडून आतापर्यंत १०५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले
- साक्षीदारांचे जबाब आणि कागदपत्रांच्या आधारे पुढील सुनावणी होणार
- भोंदू अशोक खरात विरोधात सध्या एकूण १९ गुन्हे दाखल
- त्यापैकी महिला लैंगिक शोषणाचे ८ गुन्हे, तर अन्य आर्थिक फसवणुकीचे
- आर्थिक फसवणुकीच्या उर्वरित प्रकरणांचा तपास अंतिम टप्प्यात
- खटल्याच्या गांभीर्यामुळे न्यायालयाकडून सुनावणीला गती
- या प्रकरणात शासनाकडून ॲड उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी म्हणून झाली आहे नियुक्ती
बुलडाणा -
जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस; नदी-नाल्यांना पूर, बाजारपेठेत शिरले पाणी
मेहकरच्या वाघदेव नदीसह मोताळ्यातील नळगंगा दुथडी भरून वाहते; काही भागात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम
- रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले
- नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले
- जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा अलर्ट
- जिल्ह्याला हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा
नाशिक -
- नाशिकमधील नगरसेवक शिवीगाळ प्रकरण
- महापौर हिमगौरी आडके यांचा मोठा निर्णय
- यापुढे लोकप्रतिनिधींनी सभागृहात गैरवर्तन केल्यास थेट ६ महिन्यांचं निलंबन
- सभागृहात कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाने शिवीगाळ अथवा गैरवर्तन केल्यास थेट ६ महिन्यांसाठी महासभेच्या कामकाजातून निलंबित करण्याचा इशारा
- २ दिवसांपूर्वी सिडको प्रभाग बैठकीत भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यात झाली होती शिवीगाळ
- महिला नगरसेवकांसमोरच दोन्ही नगरसेवकांमध्ये वाद झाल्यानंतर झाली होती शिवीगाळ
- महासभेत याचा सर्वपक्षीय निषेध करण्यात आल्यानंतर महापौरांची आक्रमक भूमिका
- सभागृहात लोकप्रतिनिधींनी सभ्य भाषा वापरणं अपेक्षित, महिला लोकप्रतिनिधींसमोर अश्लील भाषा खपवून घेतली जाणार नाही, महापौरांचा इशारा
नाशिक -
- घटसर्प आणि धनुर्वात प्रतिबंधक लसीच्या एका बॅचवर बंदी
- अन्न आणि औषध प्रशासनाकडून तात्काळ लसीच्या एका बॅचचा वापर थांबवण्याच्या सूचना
- लस घेतल्यानंतर नाशिकमधील मुलीचा मृत्यू झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचा मोठा निर्णय
- प्राथमिक अहवालात तीव्र अॅलर्जिक प्रतिक्रियेचा संशय
- डिफ्थेरिया-टिटॅनस लसीची संबंधित बॅच आणि संबंधित सिरिंज वापरण्यास बंदी
- जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांना तातडीच्या सूचना
- लसीच्या बॅचची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्रीय प्रयोगशाळेत नमुने पाठवले
भाईंदर -
मीरा भाईंदर शहरात दुपारपासूनच पावसाचा जोर वाढल्यामुळे मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास अचानक मोठे झाड उन्मळून कोसळल्याची घटना घडली आहे.
या दुर्घटनेत पार्किंगला उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावर अचानक भले मोठे झाड कोसळल्यामुळे त्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
परिसरातील नागरिकांनी मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन जवानांना माहिती दिली जवानांनी घटनास्थळी पोहोचून झाडाला बाजूला केले आहे.
मात्र मीरा-भाईंदर शहरातील धोकादायक वृक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.