Maharashtra Live News Update: उत्तर महाराष्ट्रात आजपासून थंडीच्या लाटेचा इशारा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज बुधवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२५, आजच्या ताज्या बातम्या, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यात थंडीची लाट, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Beed: बीड नगर परिषदेसमोर एमआयएम भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारांच्या अर्जाचे छाननी सुरू असताना एमआयएमचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र अर्ज वैध ठरल्यानंतर एम आय एम आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून बीड नगर परिषदेसमोर मोठा गदारोळ पाहायला मिळाला दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली मात्र दोन्ही गट आमने-सामने आले होते आणि एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Sangli: कृष्णामाईच्या कुशीतील,आयर्विन पुलाचा वाढदिवस उत्साहात साजरा..

सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.97 वा वाढदिवस केक कापून साजरा झाला आहे.सांगलीतील सामाजिक संघटनांकडून आयर्विन पुलाचा वाढदिवस एखाद्या मुलाप्रमाणे साजरा करण्याची परंपरा आहे.यानिमित्ताने आयर्विन पुलावर फुगे, रांगोळी काढून व दिवे लावून सजवण्यात आला होता.यानंतर केक कापून आयर्विन पूलाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.18 नोव्हेंबर 1929 मध्ये सांगली शहराच्या जडण-घडण आणि समृद्धीचा मार्ग बनलेल्या पुलाची उभारणी ब्रिटिश काळामध्ये तत्कालीन संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्याकडुन करण्यात आली होती.वास्तू कलेचा अद्भुत अविष्कार व 13 सुंदर कमानींवर कृष्णा नदीत उभरलेला सांगलीचे वैभव म्हणून आयर्वीन पुलाची ओळख आहे.

Dhule: धुळ्यात थंडीचा जोर वाढला

सहा पूर्णांक एक अंश डिग्री सेल्सिअस इतक्या नीच अंकी तापमानाची आज धुळ्यात नोंद

वाढत्या थंडीचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर

सकाळी थंडीमध्ये कुडकुडत चिमुकले पोहोचत आहेत शाळेत

विद्यार्थ्यांवर आणि या विद्यार्थ्यांना शाळेत सकाळी पोहोचवणाऱ्या पालकांवर थंडीचा मोठ्या प्रमाणात परिणाम

Andheri: कूपर रुग्णालयातील शौचालयात पडून रुग्णाचा मृत्यू

अंधेरीतील कूपर रुग्णालयात ५२ वर्षीय रुग्णाचा बाथरूममध्ये पडून मृत्यू.

डोक्याला गंभीर दुखापत आणि प्रचंड रक्तस्राव

डॉक्टरांना सांगून देखील वेळेवर उपचार न मिळाल्याचा नातेवाईकांचा आरोप.

अतिदक्षता विभागातून सामान्य वॉर्डमध्ये हलवल्यानंतर घटना घडली.

ऑक्सिजन व वैद्यकीय देखरेखीत दुर्लक्ष झाल्याचा आरोप.

रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू केली

या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाची चुप्पी,

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रतिसाद अद्याप नाही.

Amravati: अमरावतीत 10 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायत निवडणूकीसाठी अर्ज दाखल

अमरावती जिल्ह्यात 10 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायत निवडणूक

रात्री उशिरापर्यंत चालली उमेदवारी अर्जाची छाननी

नगराध्यक्ष पदाचे 19 आणी नगरसेवक पदाचे 295 उमेदवारी अर्ज छाननीत ठरले अवैध.

आता नगराध्यक्ष पदासाठी 108 उमेदवार आणी नगरसेवक पदासाठी 1516 उमेदवार कायम

21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत

Parbhani: परभणीत गारठा, तापमान ७ अंशावर

परभणीचे तापमान ७ अंशावर

जिल्ह्यात थंडीची लाट कायम

परभणी करांना भरली हुडहुडी

फुटाळा तलाव स्वच्छतेचा ॲक्शन प्लॅन सादर करा,महापालिकेचा आदेश

- फुटाळा तलाव स्वच्छतेचा ॲक्शन प्लॅन सादर करा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा महानगरपालिकेला आदेश

- न्यायाधिकरणाने फुटाळा तलावाच्या संवर्धनासाठी स्वतःच याचिका दाखल केली आहे

- न्यायाधिकरणाने फुटाळा तलावाचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगर पालिका यांची संयुक्त समिती स्थापन करून अहवाल मागितला होता

- फुटाळा तलाव विविध कारणांमुळे अस्वच्छ होत असून तो स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापक उपायोजना करण्याची गरज आहे असे या समितीने अहवालाद्वारे न्यायाधिकरणाला सांगितले

- त्यामुळे न्यायाधिकरणाने फुटाळा तलाव स्वच्छतेचा ॲक्शन प्लॅन सादर करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले आहेत

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर ठपका

मुंढव्यातील जमीन व्यवहार प्रकरणी मुठे समितीच्या अहवालात अनेक मुद्दे उपस्थित

मुंढव्यातील जागा शासकीय असताना सुद्धा शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीने जाणीवपूर्वक दस्त नोंदणी केल्याचा ठपका

मुद्रांक शुल्कमाफी घेऊन सरकारचा महसूल बुडविल्याचा ठपकाही चौकशी समितीने अहवालात ठेवला आहे

मुद्रांक शुल्कात माफी मिळविताना जिल्हा उद्योग केंद्राचे पात्रता प्रमाणपत्र जोडले नसल्याचे आले दिसून

दस्त नोंदणीवेळी दिलेली मुद्रांक शुल्कमाफी ग्राह्य ठरत नाही, असा निष्कर्ष चौकशी समितीने मांडला आहे

Yavatmal: थंडीचा जोर वाढल्याने यवतमाळ जिल्हा गारठला

सातत्याने तापमानात घट होत असून विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली आहे.सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा जोर कायम असून पारा 9.6 अंशावर स्थिरावला. दिवसाचे तापमान 29 अंशावर असून रात्रीच्या तापमानात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे दुपारी चार नंतर उडी उडी भरू लागली आहे आणखी तापमान कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वरती दिला आहे.

Pune: पुण्यात १४ नगरपरिषद आणि ३ नगर पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरले

पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणूक

१४ नगरपरिषद आणि ३ नगर पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आले होते

त्यातील नगराध्यक्ष पदासाठी भरलेले अर्जापैकी २६ अर्ज बाद

नगरसेवक पदासाठी भरलेल्या एकूण २६१८ पैकी ४०४ अर्ज बाद

Pune: पुणे महापालिकेतील दोन अभियंत्यांचे निलंबन

पुण्यातील वारजे येथे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केल्याचे नागरिकांनी समोर आणून त्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले होते

या प्रकरणी ठेकेदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे तर पथ विभागाच्या दोन अभियंत्यांनी त्यांच्या कामात निष्काळजीपणा केल्याने त्यांचे निलंबन

महापालिकेच्या ठेकेदाराने मातीवर डांबरीकरण केले, पण व्यवस्थित दबाई न केल्याने डांबराचे थर निघून जात होते

हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा व्हिडिओ एका तरुणाने तयार करून तो समाज माध्यमावर व्हायरल केला होता. त्यामुळे महापालिकेच्या कामावर झोड उठली होती

MNS: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात समाज माध्यमावर फोटो टाकल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेचे लक्ष झालेले अभिनेते रमेश परदेशी यांनी आज भाजपमध्ये केला प्रवेश

अभिनेते रमेश परदेशी यांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटात पिट्या भाई म्हणून साकारली होती भूमिका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत मुंबईत जाऊन केला पक्ष प्रवेश*

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांपूर्वी पुण्यात संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते

त्यांनी रमेश परदेशी यांच्याकडे पाहून तू इथे काय करत आहेस? कुठेतरी एका ठिकाणी रहा. असे त्यांना बजावले होते व त्यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले होते अशी चर्चा होती

या बैठकीवरून त्याबाबत पुण्यात चांगलेच पडसाद उमटले होते

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात अडीच हजारांवर उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद

यवतमाळ पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून माधुरी मडावी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राहणार असे सांगण्यात येत होते, मडावी यांनी उमेदवारी कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र छाननीच्या दिवशी त्यांचे यवतमाळ नगर परिषद मतदार यादीत नाव नसल्याने नामांकन अर्ज रद्द करण्यात आला.मडावी ह्या यवतमाळ पालिकेच्या तात्कालीन मुख्याधिकारी राहिल्या असून त्यांनी मुख्याधिकारी पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.दरम्यान जिल्ह्यातील दहा पालिका आणि एक नगरपंचायत मध्ये एबीपी फॉर्म नाही, शपथ पत्र अर्धवट,स्वाक्षरीचाही पत्ता नाही अशा विविध कारणे तब्बल अडीच हजार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आली आहे.

Guhagar: गुहागर नगरपंचायतीत बाप बेटा आमने-सामने

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत वडील आणि मुलामध्ये लढत होणार आहे. गुहागर नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून वडील राजेंद्र अर्जुन भागडे हे नगरसेवक पदाची निवडणूक लढवीत असून त्यांच्यात विरोधात त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सौरभ राजेंद्र भागडे हे निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण गुहागरवासीयांचे लक्ष लागलं आहे. वडील विरुद्ध मुलगा ही लढत गुहागरमध्ये आकर्षण ठरणार आहे.

जळगाव जिल्ह्यात पहाटेचा पारा सात अंशांवर जळगाव महाबळेश्वरपेक्षाही थंड सकाळी धुक्याची दाट चादर

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने रात्री व पहाटे जिल्हावासियांना हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. आज पहाटे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत कमी तापमान ७ ते ८ अंशांपर्यत खाली आल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. गेले अनेक दिवस थंडीचा कडाका कायम असून, जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अडीच हजारांवर उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद

यवतमाळ पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून माधुरी मडावी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राहणार असे सांगण्यात येत होते, मडावी यांनी उमेदवारी कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र छाननीच्या दिवशी त्यांचे यवतमाळ नगर परिषद मतदार यादीत नाव नसल्याने नामांकन अर्ज रद्द करण्यात आला.मडावी ह्या यवतमाळ पालिकेच्या तात्कालीन मुख्याधिकारी राहिल्या असून त्यांनी मुख्याधिकारी पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.दरम्यान जिल्ह्यातील दहा पालिका आणि एक नगरपंचायत मध्ये एबीपी फॉर्म नाही, शपथ पत्र अर्धवट,स्वाक्षरीचाही पत्ता नाही अशा विविध कारणे तब्बल अडीच हजार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात आजपासून थंडीच्या लाटेचा इशारा

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पारा दहा अंशावर आला. उत्तरेकडून गोठविणारी थंडी महाराष्ट्रावर धडकत असल्याने अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली.

राज्यात सर्वाधिक किमान तापमान जळगाव मध्ये

जळगाव मध्ये ७.१ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)

अहिल्यानगर: ८.४

नाशिक: ९.२

यवतमाळ: ९.६

जळगाव: ७.१

मालेगाव: ९.६

गोंदिया: ९.६

पुणे: ९.४

नागपूर: १०.४

अमरावती: ११.४

महाबळेश्वर: १०

सातारा: १०.६

सांगली: १२.३

सोलापूर: १३.९

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com