Maharashtra News Live Update: CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : पेट्रोल-डिझेलची बचत करा, राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update :
Maharashtra Live News Update :Saam Marathi

Nashik : CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी

CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी

नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिकच्या शुभम खैरनार याला CBI ने घेतले आहे ताब्यात

पेपर फुटीच्या संपूर्ण प्रक्रियेत टेलिग्राम अँपचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड

टेलिग्रामवर मोठ्या फाइल्स सहज पाठवता येत असल्याने वापर

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

आज पुण्यात सदिच्छा भेट घेतली

भेटीचा उल्लेख करताना उबदार भेट असा अंधारे यांच्याकडून उल्लेख

Pune : दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!

पुण्यातील दिवेघाटात दुचाकीला फटका सायलेन्सर लावून काही तरुणांनी दहशत माजवली होती.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दिवेघाटात बुलेटच्या सायलेन्सरचा आवाज काढणारे आणि कोयते नाचवणाऱ्या विरोधात आता पोलिसांनी कारवाई केली आहे.

Buldhana : बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला

बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला

१४ वर्षीय मुलीचे भविष्य सुरक्षित

‘डायल ११२’ ठरली देवदूत

चाईल्ड हेल्पलाईन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

Amravati : अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त

अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त

आयुक्त वर्षा लड्डा यांचे अतिक्रमणधारकांना कडक निर्देश

Yavtaml : यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली

यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता नवे पोलीस अधीक्षक म्हणुन नित्यानंद झा यांची वर्णी लागली आहे.

दोन वर्षांच्या कार्यकाळात मावळते पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत समाजोपयोगी उपक्रम राबवत हजारो बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला.

त्यांच्या कार्याची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. आता त्यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com