
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगरपरिषद निवडणूकी करीता भाजपाकडुन नगराध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन चालुक्य यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद येरमे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे दाखल केला आहे.महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपने मुहुर्त साधत शक्तीप्रदर्शन करीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यासमवेत नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला.तर नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी नगरसेवक पदासाठी आत्तापर्यंत आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान ऊस दरासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रूपये मिळावी या मागणीसाठी ऊस वाहतूक रोखली आहे.
माळशिरस तालूका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
माळशिरस तालुक्यातून अनेक साखर कारखान्यांना ऊस जातो.
शेकडो ऊसाची वाहने अडकल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी (कार्तिकी यात्रा) सोहळाच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरीता वापरण्यास मनाई करण्यातबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरीता वापरण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे तथापि, ते पाणी भांडी घासणे वा तत्सम अन्य कारणासाठी वापरता येईल. तसेच आळंदीतील ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे. इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणतीही कपडे धुवू नयेत, अगर कोणत्याही प्रकारे नदीचे पाणी दूषित होईल असे कृत्य करु नये. सदर दूषित पाणी पिल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील पाणी पुरवठ्याचा तब्बल २४ कोटी रुपयांचा निधी वळवण्यात येणार
या निधीतून जुन्या हद्दीतील पाणी पुरवठ्याची कामे केली जाणार आहेत.
पाणीपुरवठा विभागासह इतर विभागांच्या विविध प्रकल्पांसाठी निधी अपुरा पडत असल्याने एकूण ५२ कोटींच्या विविध तरतुद वळवली जाणार आहे.
वित्तीय समितीची मान्यता घेण्यात आली आहे.समाविष्ट गावात महापालिका कर जास्त घेते पण विकास कामे करत नाही. रस्ते,पाणी, विद्युत व्यवस्था, कचरा व्यवस्थापन केले जात नाही.
विकास निधीवरून पुन्हा वाद पेटला
२०१७ आणि २०२१ मध्ये ३२ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, समावेशानंतरही विकासकामे न झाल्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांनी महापालिकेतून बाहेर पडून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी केली होती. शासनाने ती मागणी मान्य केली आणि दोन्ही गावे वेगळी केली.त्यानंतर उर्वरित गावांमधूनही नाराजीचा सूर कायम आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने बजावला समन्स
24 तासात चौकशीसाठी हजर राहण्याचे उन्मेष पाटलांना आदेश
देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या 5 कोटी 33 लाखांच्या फसवणुकी प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेचे चौकशीसाठी हजर राहण्याच्या आदेश
नगरपालिका निवडणुकांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या अडचणीत वाढ झाल्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
कंपनीत माझा कुठलाही भाग बसताना, माझ्यावर राजकीय देशातून गुन्हा दाखल
पार्थ पवार गिरीश महाजन यांच्यावर भूखंडा संदर्भात आरोप असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
- नव्या निर्णयानुसार 29 महानगरपालिकांसाठी प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर ऐवजी 20 नोव्हेंबरला केली जाणार प्रसिद्ध
- या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर असणार
- 27 नोव्हेंबर पर्यंत दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी पाच डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येतील
- 8 डिसेंबर रोजी या याद्या मतदार केंद्राच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येतील 12 डिसेंबर रोजी केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार.
वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत निवडणूकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सदस्य पदासाठी 19 नामांकन अर्ज दाखल केले असून, यात अध्यक्ष पदासाठी केवळ 2 नामांकन दाखल करण्यात आले आहेत. यात सदस्य पदासाठी सर्वाधिक अर्ज हे वाशीम नगर परिषदेकरीता आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रिसोड नगर परिषदेमध्ये 6 नामांकन दाखल करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये खोडा घालण्याचे काम तटकरे कुटुंबीय करत आहेत असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे त्यांनी जो प्रयोग केलाय त्यापेक्षा चांगला प्रयोग आम्ही करू शकतो असा सूचक इशाराही आमदार दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला दिला आहे. रायगड जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांना बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युती करण्याची भूमिका घेतली आहे त्यावर ते बोलत होते. राष्ट्रवादीला सोबत घेऊन जाण्याची भूमिका नेहमीच भाजपची राहिली आहे. आम्ही जर कुणाबरोबर गेलो तर बाकीच्यांनी त्यावर विचार करू नये. आम्ही सुद्धा असे प्रयोग करू शकतो परंतु आम्ही युतीचा सन्मान ठेवून जाण्याचा प्रयत्न करत आहोत असं महेंद्र दळवी म्हणाले.
पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू
मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांपैकी ५ पुरुष २ महिला आणि १ लहान मुलीचा समावेश
अपघातात १५ जणं जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू
फॉरेन्सिक पथकाकडून अपघातस्थळाची पाहणी आणि पंचनामा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.