विधानपरिषदेच्या निकालांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा विरोधकांची सरशी पाहयाला मिळालीय... मविआनं या निवडणुकीत 3 जागांवर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली...मात्र या पराभवानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडलीय...निकालांनंतर आता भाजपनं पुणे पदवीधर मतदारसंघ आणि संभाजीनगरमधल्या पराभवाचं खापर शिंदेसेनेवर फोडलंय. पुणे पदवीधर मतदारसंघात शिंदेसेनेनं स्मिता जाधवांचं काम न केल्याचा जाहीर आरोप भाजपनं केलाय. तर भाजपच्या मी पणाला जनतेनं उत्तर दिल्याचा टोला शिंदेसेनेनं लगावलाय...
केवळ पुणेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरच्या पदवीधर मतदारसंघातही भाजपनं शिंदेसेनेवर दगाबाजीचा आरोप केलाय.. शिंदेसेनेच्या अब्दुल सत्तारांनी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटलांना पाठिंबा दिल्यानं दादांच्या राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाणांचा पराभव झाल्याचा आरोप भाजपनं केलाय... मात्र अब्दुल सत्तार यांनी दादांच्या राष्ट्रवादीविरोधात काम केलं असेल तर गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी कोणाचा प्रचार केला हे तपासा? असा सवाल शिंदेसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी उपस्थित केलाय...मात्र प्रशांत बंब यांनी हा आरोप फेटाळून लावलाय.
पुण्याचा पराभव भाजपला चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे अमरावतीतल्या भाजप बंडखोरांवर कारवाई केल्याचा दाखला देत भाजपनं धंगेकरांवर कारवाई करण्याचं आव्हान एकनाथ शिंदेंना दिलंय. त्यामुळे शिंदे धंगेकरांवर कारवाई करणार का हा प्रश्न आहे. तर दुसरीकडे दोन मतदारसंघांबाबत पराभवाचं खापर फोडणाऱ्या भाजपनं मात्र बालेकिल्ल्यातल्या नागपूरच्या पराभवावर मात्र मौन बाळगलंय. मात्र भाजप आणि शिंदेसेनेतला हा विकोपाला गेलेला वाद आता कसा संपणार? यात कुणाचा बळी जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलयं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.