Loan Waiver: एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

Good News For Farmers: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
Loan Waiver: एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
Good News For FarmersSaam Tv
Published On: 
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर.

  • चौथ्या यादीत १,१५,६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश.

  • एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांसाठी यादी प्रसिद्ध.

  • पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन.

गणेश कवडे, मुंबई

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक बँकेमध्ये कर्जखाती असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे शेतकरी तपासू शकतात.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सध्या सुरू आहे. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. आतापर्यंत १५.८५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर १३ हजार २७५ कोटी रुपये जमा झाले आहेत. पहिल्या ३ याद्यांमध्ये २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरणानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे, असे देखील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

सहकार मंत्र्यांनी पुढे सांगितले की, महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केलेली आहे. महाआयटीने केलेल्या संगणकीय प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १५.८५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७ आणि तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेस आहे. आतापर्यंत ३ यादी जाहीर करण्यात आल्या असून त्यात एकूण २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांचा समावेस आहे. आता चौथी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Loan Waiver: एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
Maharashtra Farmer: शेतकरी दुष्काळाने त्रस्त, कृषिमंत्र्यांसमोर अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी आज प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.

Loan Waiver: एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
Farmer Scheme : शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी सरकारकडून गुड न्यूज! ३० लाख रुपयांपर्यंत मिळणार सबसिडी; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

जी चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची आहे. यामध्ये १ एप्रिल २०२६ रोजी नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करुन जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. या यादीतील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकेसंदर्भात काही शेतकऱ्यांच्या ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम २ लाखापेक्षा जास्त असली तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही सर्व कर्ज निरंक करण्यात येणार आहेत.

Loan Waiver: एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
Farmer Loan Waiver Scheme : दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com