Maharashtra News Live Updates: पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात गोळीबार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 17 september 2024 : आज मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, गणेश विसर्जन, मनोरंजन, क्रीडा, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Pune Crime: पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात गोळीबार

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील पिनिकस मॉल जवळ गोळीबार झाला आहे. पिनिक्स मॉल च्या गेट नंबर 7 जवळील डीपी रोडवर अज्ञात व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने येऊन गोळीबार केला आहे. सुदैवाने ह्या गोळीबारात कुणीही जखमी झालेला नाही मात्र गणपती विसर्जनाच्या दिवशी गोळीबार झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात दहशतीचं वातावरण आहे. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्या आरोपीचं शोध घेत आहेत.

Pune Politics: वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे याचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सिल्व्हर ओक येथे वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्यासह माजी नगरसेवक महादेव पठारे, महेंद्र पठारे आणि भैय्यासाहेब जाधव यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.

शिवसेना शिंदे गटाच्या वर्सोवा कार्यालयावर दगडफेक?

कार्यालयाच्या काचेच नुकसान झाले आहे. अल्ताफ खान विभाग प्रमुख यांचे अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला डेपोजवळ विभाग कार्यालय आहे. अल्ताफ खान यांच्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोणी दगडफेक केली किंवा कार ने दगड उडून काचेवर लागली याचा वर्सोवा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

जेष्ठ विचारवंत यशवंत मनोहर यांना वंचित बहुजन आघाडीकडून धमकी

घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांच्याकडून घरासमोर घोषणा दिल्यात. पोलिसांनी विनापरवाना आंदोलन केल्यानं त्या कार्यकर्त्याना ताब्यात घेतलं. इंडिया आघाडीला समर्थन दिल पाहिजे अशी भूमिका घेतली. राहुल गांधी हे आरक्षण विरोधी आहे, त्यांना समर्थन दिले असं म्हणत वंचित बहुजन आघाडीने विरोध केल्याचं यशवंत मनोहर यांनी सांगितलं.

मीरा भाईंदरमध्ये गणपती विसर्जनापूर्वी अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

धुळे जिल्ह्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

भिल्लू सावळे,बंटी बजाज यांना पोलिसांनी घेतले ताब्यात,दोन किलो गांजा केला जप्त

धुळे जिल्ह्यातून गांजाचे मोठे तस्कर असल्याची माहिती समोर

काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 11000 रुपये तर तुरीला 15000 रुपये भाव द्या, धाराशिवमधील शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्यांच्या उत्पादित सोयाबीनला 11000 रुपये, तुरीला 15000 रुपये गहू ज्वारीला 6 हजार रुपये भाव द्या, या मागणीसाठी उमरगा येथे सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी उपोषणाला सुरुवात केलीय. उमरगा येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू असून उमरगा व लोहारा या दोन्ही तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी देखील उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्ते सातलिंग स्वामी यांनी घेतलीय.

रायगड रोप वे गुरुवारी प्रवासी, शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी राहणार बंद

सकाळ पासून दुपारी दोन वाजेपर्यंत रायगड रोप वे बंद राहणार आहे. सुरक्षेचा सराव म्हणून NDRF मॉक ड्रिल करणार आहे. प्रवासी, पर्यटक, शिवप्रेमींची गैरसोय होऊ, नये यासाठी रायगड रोप वे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी धाराशिव जिल्हा पहिला: आरोग्यमंत्री सावंत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी धाराशिव जिल्हा राज्यात अव्वल असून या योजनेसाठी पहिला नंबर धाराशिव जिल्ह्याने पटकावला आहे. जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ३ लाख २४ हजार एवढे उद्दिष्ट असले तरी जिल्ह्यामध्ये ४ लाख अर्ज या योजनेसाठी दाखल झाले आहेत.

तसेच धाराशिव जिल्हा हा हेल्थ हब झाला आहे, तर आज मुख्यमंत्र्यांनी सोनारी येथील भैरवनाथ तिर्थक्षेञासठी वृत्त आराखडा 186 कोटीला मान्यता दिली असून ज्या पद्धतीने तुळजापूर देवस्थानाचे डेवलपमेंट आहे, तसेच सोनारीचदेखील होईल असंदेखील पालकमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय.

Palghar News : पालघरमध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेलेली बोट खडकावर आदळून बुडाली

मासेमारीसाठी समुद्रात गेलेली बोट खडकावर आदळून बुडाली . झाई मांगेला समाज मच्छीमार सहकारी सोसायटीच्या पावनलक्ष्मी या बोटीला जलसमाधी देण्यात आली. बाबुराव हरिश्चंद्र मांगीला यांच्या मालकीची मासेमारी बोट समुद्रात बुडाली . सुदैवाने खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात दुसऱ्या बोटीवरील खलाशांना यश मिळालंय . दुर्घटनाग्रस्त बोटीवरील पाच मच्छिमार खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय . समुद्रात काहीच अंतरावर मासेमारी करत असलेल्या बोटीने तातडीने दुर्घटनास्थळी धाव घेतल्याने दुर्घटनाग्रस्त बोटीतील खलासांचे जीव वाचले . मात्र बोटीत पाणी शिरून बोटीसह बोटीतील साहित्य समुद्रात बुडालं .

Navi Mumbai : प्रकल्पग्रास्थांचा मागील 20 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निघणार निकाली

आगामी विधानसभा निवडणुकी आधी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्थान्ना राज्य सरकार मोठा दिलासा देणार आहे. प्रकल्पग्रस्थांची गरजेपोटी घरे नियमित होणार आहे. लवकरच राज्यसरकार गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासंदर्भात सुधारित अध्यादेश काढणार आहे. प्रकल्पग्रास्थांचा मागील 20 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे.

Pune News : आळेफाटा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला

पुण्याच्या आळेफाटा मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय. यावेळी कुत्रा जीव वाचविण्यासाठी बंगल्याच्या दरवाजा जवळ मोठमोठ्याने भुंकत होता. त्याच्या बचावासाठी मालकाने धाव घेतली तत्पूर्वी बिबट्याने घाबरून धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.

Navi Delhi : २६ आणि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच अधिवेशन 

२६ आणि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच अधिवेशन होणार आहे. २ दिवसांच्या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार आहे.

Beed News : बीडमधील महादुर्ग किल्ल्याची दुरावस्था;  कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून उभारलेली भिंत कोसळली

बीडच्या धारूर येथील ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या किल्ल्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, त्यातून उभारलेली भिंत आता पडली असून, याची पाहणी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. किल्ल्याला साधा सुरक्षारक्षक देखील नसल्याने या ठिकाणी गैरप्रकार चालतात. याबरोबरच किल्ल्याची सुरक्षितता देखील धोक्यात आली असून यामुळे इतिहास प्रेमींमधून संताप व्यक्त केला जातोय. या किल्ल्याची दुरुस्ती करावी तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी आता धारूरकरांमधून केली जात आहे.

Manoj Jarange Patil : अंबडचे तहसीलदार यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, उपोषण मागे घेण्याची विनंती 

अं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्रीपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली. आज अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली..

Amit Shah : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळाचं पुस्तक प्रकाशित

अमित शाह यांनी पत्रकार परिषदेतमोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकालच पुस्तक प्रकाशित केलंय. आज पूर्ण देशात मोदींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जातोय. १५ विविध देशांनी नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. सलग १० वर्ष भारताचा विकास, सुरक्षा आणि गरिबांसाठी सरकार चलवल्यानंतर तिसऱ्यांदा सरकार बनवण्याची संधी मोदींना देशाने दिली. देशाची सुरक्षा, रक्षा प्रणालीला मजबूत केलं. डिजिटल इंडियाच्या कल्पनेला जगातील अनेक देश स्वीकारू पहात आहेत. देशातील ६० कोटी गरिबांना घर, शौचालय, पाणी, गॅस, राशन देण्याचं काम १० वर्षात आमच्या सरकारने केलं. पहिल्या १०० दिवसात १५ लाख कोटी रुपयांच्या नव्या योजनांना मंजुरी सरकारने दिली. महाराष्ट्रातील वाढवण बंदराला मंजुरी हे पहिल्या १०० दिवसात दिलेली सगळ्यात मोठी मंजुरी, अनेक नव्या मेट्रो प्रकल्पांना आम्ही मंजुरी दिली, अशी माहिती अमित शहांनी दिलीय.

Beed News : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन ; बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानात ध्वजारोहण करण्यात आले आहे. यावेळी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत यांच्यासह जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची उपस्थिती होती. यावेळी पोलीस कर्मचारी व एनसीसी कॅडेटस ने पथसंचलन केले. दरम्यान यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या.

Parbhani : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, परभणीत पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त राजगोपालचारी उद्यानात राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण, बंदरे तथा पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी त्याच ठिकाणी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमाला जिल्हातील खासदार व आमदार नागरिक उपस्थित होते. यावेळी स्वातंत्रसैनिकाचा सत्कार करण्यात आला.

Amravati News : महिनाभरात टायफाईटने फणफणले 1030 रुग्ण, अमरावतीत साथीच्या रोगाचे थैमान

अमरावती जिल्ह्यात मागील तीन महिन्यापासून साथ रोगाचे प्रमाण वाढले.. ऑगस्ट महिन्यात टायफाईडचे 1030 रुग्ण आढळल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे.. सध्या जिल्ह्यात सर्वत्र लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना ताप येण्याचे प्रमाण दिसत आहे.. प्रत्येक घरामध्ये किमान एक तरी व्यक्ती हा आजारी दिसतो.. त्यामुळे ताप आणि कोणतेही लक्षणे दिसतात त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले..

 Delhi CM : आज दुपारी १२ वाजता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार

आज दुपारी १२ वाजता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. आम आदमी पक्ष आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करणार आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे.

Nanded News : नांदेडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा 

- 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. नांदेडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते माता गुजरीजी विसावा उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी हुतात्म्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.पोलीस दलाकडून हवेत तीन फेऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. या मुक्ती संग्राम दिन सोहळ्याला स्वातंत्र्य सैनिक,खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ अजित गोपछडे,यांच्यासह आमदार,सर्वच विभागातील अधीकारी,कर्मचारी,नागरिक उपस्थित होते.

Bhandara News : राजापूर जि.प.शाळेची इमारत धोकादायक, अपघात होण्याची शक्यता

भंडारा जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता उंचावण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जातात. तथापि, ज्या शाळेत आणि वर्गखोल्यांमध्ये ते अध्यापन करतात, त्या जीवघेण्या इसल्या आहेत. असाच प्रकार तुमसर तालुक्यातील गोबरवाही नजीकच्या राजापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत आहे. शाळेची इमारत पूर्णपणे जीर्ण, जर्जर व धोकादायक झाली असून, ती केव्हा कोसळून पडेल याचा नेम नाही. परंतु, याकडे जिल्हा परिषद प्रशासनचे दुर्लक्ष होत आहे

Jalna News :  मनोज जरांगे पाटील यांचं मध्यरात्रीपासून आमरण उपोषण सुरू

सगेसोयरे अधिसूचनेची अंबलबजावनी करावी, हैदराबाद गॅझेटसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू कराव तसेच मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घ्यावे यासह इतर मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे काल मध्यरात्री बारा वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसले आहेत.मागील पाच उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना सरकारने वेळोवेळी आश्वासने दिली मात्र त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा आमरण उपोषण करत आहे.

Manmad News : मनमाड शहर परिसरात धुक्याची चादर, कांदा पिकावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता 

मनमाड शहर परिसरात पावसाने उघडीप दिल्याने आज पहाटे पासून शहर व परिसरावर धुक्याची चादर पसरली होती. सकाळी उशिरा पर्यंत धुके सर्वत्र परलेले होते. धुक्यामुळे लागवड केलेल्या कांद्यावर दव बिंदू पडल्याने कांद्यावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. धुक्यामुळे सकाळी हवेत मात्र चांगलाच गारवा निर्माण झाला होता.

Parabhani News : सोयाबीन खरेदीसाठी परभणीला 11 केंद्रांचा प्रस्ताव, हमीभाव मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू

खरीप हंगाम 2024-25मधील शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभाव दराने खरेदी करण्यासाठी परभणी जिल्ह्यात 11 केंद्र नाफेडकडून उघडण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्यावतीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.यंदा सोयाबीनचे उत्पादन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतले आहे. मात्र, बाजारपेठेत गतवर्षीपासून खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा प्रतिक्विंटल एक हजार रुपये कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसगत होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्यावतीने परभणी जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांना हमीभाव मिळावा, यासाठी 11 खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव 'नाफेड'कडे पाठविण्यात आले आहे. यामध्ये परभणी, मानवत, पूर्णा, जिंतूर, पाथरी, बोरी, सेलू, सोनपेठ, पेडगाव, पालम आणि देवनांद्रा या 11 केंद्रांचा समावेश आहे.

Marathwada News : आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा हा निजामाच्या राजवटीत होता. भारतीय स्वातंत्र्याच्या एक वर्ष, एक महिना, एक दिवसा नंतर मराठवाडा व अच्छा राजवटीतून मुक्त झाला, स्वतंत्र झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये अनेक जणांनी आपले बलिदान दिले. आज संपूर्ण मराठवाड्यात मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात येत. थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगर शहरातील सिध्दार्थ उद्यानात मुख्य ध्वजारोहण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करतील. या निमित्ताने मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री चर्चा करीत असतात. आज मुख्यमंत्री काय घोषणा करतात किंवा आपली काय भूमिका म्हणतात हे पाहणं महत्वाचं असेल.

Badlapur News : बदलापुरात पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या चोरांना बेड्या, मोबाईल आणि चोरीची दुचाकीही हस्तगत

बदलापुरात नागरिकांनी पकडून दिलेले मोबाईल चोर पोलीस ठाण्यातून पळून गेल्याची घटना घडली होती. ही घटना गांभीर्याने घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी अवघ्या काही तासात या चोरट्यांना शोधून काढत बेड्या ठोकल्या आहेत.

Pandharpur News : धनगर आरक्षण मागणीसाठी आंदोलक आक्रमक, पंढरपूर पुणे पालखी मार्गावर आंदोलन

धनगर आरक्षण मागणीसाठी आंदोलक आक्रमक झालेत. पंढरपूर पुणे पालखी मार्गावर निमगाव येथे टायर पेटवून आंदोलन करण्यात येत आहे. आरक्षण मागणीसाठी आंदोलकांची सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे.

Gondia News : देवरी चिंचगड मार्गांवरील पुल पडल्याने वाहतूक बंद

देवरी चिंचगड मार्गांवरील पुल पडल्याने वाहतूक बंद झालीय. 50 च्या वर गावांना फटका बसतोय. 50 किलोमीटर लांब प्रवास करून यावा लागतो. गोंदिया जिल्यातील काही तालुक्यात रात्री पासून दमदार पाऊस सुरु असून नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे, तर देवरी तालुक्यातुन चिंचगड कडे जाणाऱ्या सालईटोला गावा जवळील पुल कोडल्याने देवरी चिंचगड रस्ता बंद झाला आहे तर देवरी वरून चिंचगड ला जायचे असल्यास 50 ते 60 किलोमीटर अंतर ओलांडून जावा लागत आहे.

Nagpur News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव 12 ऑक्टोबरला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव 12 ऑक्टोंबरला साजरा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा 100 वर्षे पूर्ण होत असताना या उत्सवाला विशेष महत्त्व असणार आहे. यावेळी या उत्सवात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर के राधाकृष्ण उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित असणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक, लोकसभेत भाजपची पीछेहाट यासह राष्ट्रीय स्वयं संघाच्या भविष्यातील योजनांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे . नागपुरातील रेशीम बाग मैदानावर सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी हा कार्यक्रम असणार असून त्यापूर्वी स्वयंसेवकांचे पथसंचलन होणार आहे.

Pune News : दगडूशेठ मंदिरात अजित पवारांच्या हस्ते होणार बाप्पाची पूजा आणि आरती

उपमुख्यमंत्री अजित पवार दगडूशेठ मंदिरात पोहचले आहेत. अजित पवारांच्या हस्ते बाप्पाची पूजा आणि आरती होणार आहे. पालकमंत्री मानाच्या गणपतींची आरती आणि पूजा सुद्धा करणार आहेत. अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार, रूपाली चाकणकर सुद्धा उपस्थीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com