विधानपरिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग; अहिल्यानगरमधून शरद पवार गटाचा तगडा उमेदवार रिंगणात उतरणार

ahilyangar politics : अहिल्यानगरमध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगरमधून शरद पवार गटाचा तगडा उमेदवार रिंगणात उतरणार आहे.
ahilyangar news
ahilyangar politics :Saam tv
Published On
Summary

विधानपरिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग

खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके भरणार उमेदवारी अर्ज

काँग्रेसमधून दोघांच्या नावांची चर्चा

सुशील थोरात, साम टीव्ही

विधानपरिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी दीप चव्हाण आणि करण ससाने यांचे नाव सुचवले. अजित पवार गटाकडून सचिन जगताप तर भाजपकडून प्राजक्त तनपूरे यांना अद्याप निरोप नाही.

अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात आता राणी निलेश लंके यांची एन्ट्री होणार आहे. परंतु खासदार निलेश लंके आता या निवडणुकीत रंग भरणार की काही वेगळी जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ahilyangar news
Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? ७० नगरसेवक अचानक संपर्काबाहेर, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ

तर दुसरीकडे काँग्रेसकडून दीप चव्हाण आणि करण ससाने या दोघांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राणी लंके, दीप चव्हाण,करण ससाने या महाविकास आघाडीतील उमेदवार निवडणूक लढवणार की शेवटच्या क्षणी काही वेगळीच जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. लंके यांच्या भूमिकेने खरोखरच आघाडीत बिघाडी झाली आहे, याबाबतही आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

ahilyangar news
MLC Election : भाजप की राष्ट्रवादी, अहिल्यानगर विधान परिषदेची खुर्ची कोणाची? 'या' नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांचाही उमेदवारी अर्ज दाखल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तर भाजपकडून प्राजक्त तनपुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार की आणखी काही धक्का भाजप देऊ शकते. कारण अद्यापही प्राजक्त तनपुरे यांना कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचे खुद्द त्यांनी चोंडी येथे बोलताना सांगितले आहे. त्यामुळे अर्ज काढण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार कोण राहणार याबाबत प्रश्नचिन्ह राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com