
रत्नागिरी - लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात वायू गळती
स्फोटातून मोठ्या प्रमाणात वायू गळती.....
नागरिकांसह कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांची जळजळ
एक कर्मचारी गंभीर असल्याची माहिती.
जखमी कर्मचाऱ्याला उपरासाठी रुग्णालयात दाखल
कंपनी मधील सर्व कर्मचाऱ्यांना खबरदारी म्हणून काढलं बाहेर.
कारण अस्पष्ट.
पुणे- बेंगळुरू महामार्गावर कार पेटली आहे.
कराड शहरानजीक पाचवड फाटा येथील घटना
पुण्याहून सांगलीला निघालेल्या चारचाकीने गाडीने अचानक पेट घेतला
सांगलीतील गाडी पेटली
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या ऐदलापूर गावातल्या नवनीत चांडक या शेतकऱ्याचा हा धाडसी प्रयोग केलाय. चांडक यांनी एका एकरात तब्बल 700 सफरचंदाची झाडे लावली आहे.. हिमाचल प्रदेश अथवा जम्मू काश्मीर सारख्या थंड हवामानातं घेतल्या जाणारे सफरचंद पिक आता अकोल्यासारख्या उष्ण शहरात घेतल्या जातये..
- बेळगावमधील कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कृत्याचा नाशिकमध्ये निषेध
- नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या बसला काळे फासत आंदोलन
- कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्र, मनसे नाशिक लिहीत व्यक्त केला निषेध
- कन्नड वेदिका रक्षक संघटनेने महाराष्ट्रातील महाराष्ट्रीयन बस चालकांच्या तोंडाला फासले होते काळे
- याच कृत्याचा निषेध करण्यासाठी नाशिक मनसेने कन्नड बसवर लिहिले जय महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीसजींनी राज्यपाल मोज्याच्या अभिभाषनाच्या वेळेस सांगितलं या महाराष्ट्राचा चौफर आम्हाला विकास करायचा आहे. महाविकास आघाडीचे आमदार यांना देखील निधी दिल्या जाईल.महायुतीच्या आमदारांमध्ये विकास करायचा आहे महाराष्ट्रात कुठेही त्या ठिकाणी होणार नाही किंवा मतदार संघाचा विकास थांबू नये काय आमची भूमिका नाहीये, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
अमित शाह यांचा पुण्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांना टोला
कोणती शिवसेना असली आणि कोणती शिवसेना नकली याचाही निर्णय दिलाय
कोणती एन सी पी असली कोणती नकली त्याचाही निर्णय महाराष्ट्राने दिला
मुंबई विमानतळ परिसरातील पंचतारांकीत हॉटेलला भीषण आग लागली आहे
अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल
अग्निशमनदलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
शिळफाटा रोडवर महापे येथे झाला अपघात.
ट्रक आणि टेम्पोची धडक झाल्याने अपघात.
धडक देणारा ट्रक चालक झाला फरार मात्र टेम्पो चालक स्टीअरिंग मध्ये पडला अडकून.
टेम्पोच्या जखमी ड्रायव्हरला अग्निशमन जवानांनी काढले बाहेर.
मनपा रुग्णालय वाशी याठिकाणी जखमी टेम्पो चालक उपचारासाठी दाखल.
फरार ट्रक चालकाचा पोलीस घेतायत शोध.
नाशिकमध्ये सध्या तनावपूर्ण परिस्थिति
काठे गल्ली परिसरात दोन गटात तेढ
28 फेब्रुवारी रोजी हैद्राबाद न्यायालयात नवनीत राणा यांना उपस्थित राहण्याचे आदेश
15 मिनिटं नहीं 15 सेकंद कॉफी है असं वक्तव्य नवनित राणा यांनी असुद्दिन ओवेसी यांच्या बद्दल केलं होतं
असदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणा यांच्या बद्दल घेतली आहे न्यायालयात धाव
नवनीत राणा यांना ओवेसी यांनी न्यायालया मार्फत दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी नवनीत राणा हैदराबाद कोर्टात 28 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहणार
असदुद्दीन ओवेसी यांच्या बद्दल नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याने नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
भाजप आमदार सुरेश धस हे आज परळीच्या दौऱ्यावरती असून राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे आणि ठेवीदारांना पैसे मिळावे त्यासाठी परळी मध्ये आंदोलन चालू आहे ते आंदोलना स्थळी भेट देण्यासाठी गेलेल्या सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते त्याचबरोबर घोषणाबाजी देखील करण्यात आली होती मात्र तेथील काळे झेंडे दाखवणाऱ्या आंदोलकांना परळी पोलिसांनी आता ताब्यात घेतली आहे....!
- केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडणार समारंभ
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील असणार उपस्थित
- हडपसर येथील विठ्ठल तुपे पाटील सभागृहात होत आहे कार्यक्रम
उल्हास नदीतलं वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन बदलापूरजवळच्या चामटोली गावातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी इरमाळी आणि वनशक्ती संस्थेनं नदी स्वच्छता मोहीम हाती घेतलीय. पहिल्या टप्प्याअंतर्गत उल्हास नदीला जोडणाऱ्या ओढ्यातून 5 हजार किलो कचरा साफ करण्यात आला. आमदार किसन कथोरे यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.
बदलापूर आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या झपाट्यानं वाढतीय. अनेकजण निर्माल्य, प्लास्टिक कचरा तसच काचेच्या बाटल्या आपल्या लगतच्या ओढ्यात टाकतात. हे पाणी उल्हास नदीला जाऊन मिळतं. त्यामुळे उल्हास नदी आणि परिसरातील ओढे प्रदूषित झाले आहेत. यासाठी चामटोली गावातून नदी स्वच्छता मोहिमेला सुरवात करण्या आली. या मोहिमेत वनशक्तीचे 50 ते 60 स्वयंसेवक, स्थानिक रहिवासी आणि आसपासच्या वाड्यांमधील आदिवासी बांधव सहभागी झाले होते. पहिल्याच दिवशी निर्माल्य, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या. थर्माकोल असा जवळपास 5 हजार किलोंचा कचरा जमा करण्यात आला. स्वच्छतेमुळे इथल्या पाण्याचा प्रवाह पूर्ववत झालाय.
वाशीम येथील सुशीलाबाई देशमुख अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील गंभीर प्रकारावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी संताप केला आहे. या शाळेत अन्न आणि पाण्याची सोय नाही. शिवाय मुख्याध्यापक मुलांकडून पाय दाबून घेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या प्रकाराची आदिवासी विकास मंत्र्यांनी गंभीर दखल घेत मुख्याध्यापकाची वेतनवाढ थांबवण्याचे आदेश दिले असून, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तत्काळ करण्यात आल्याचे उईके यांनी सांगितले.
कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी चालकाला कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी काल रात्री मारहाण केली होती. कन्नड बोलता येत नाही म्हणून एसटी चालकाला मारहाण करत त्यांच्या तोंडाला काळही फासण्यात आलं होतं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या एसटीवर काळा रंग फासण्यात आला होता. कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी मारहाण केलेले एसटीचे चालक भास्कर जाधव आणि वाहक प्रशांत थोरात कोल्हापुरात पोहोचले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने या दोन्ही चालक आणि वाहकांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला नेमकं काल रात्री काय घडलं याचं वर्णन चालक आणि वाहकाने केलेला आहे.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे ई-मेल द्वारे हद्द वाढीचा प्रस्ताव सादर
राज्य सरकार कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या बाबत काय निर्णय घेणार?
राज्य सरकारच्या निर्णयाकडे कोल्हापूरकरांचे लक्ष
कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीकडून कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीची झाली होती मागणी
पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील चॅनेल क्रमांक 235 वर ट्रेलरच्या चालकाला झोपेची डूलकी लागल्याने चालत्या ट्रकला मागून धडक दिली. या धडकेत ट्रेलरचा चक्काचूर झाला असून, यात ट्रेलरचा चालक जखमी झाला आहे. या अपघातात ट्रेलरच मोठा नुकसान झालाय.. मागील काही दिवसापासून समृद्धी महामार्गावर अपघाताची सत्र सुरूच आहे
- पुणे - नाशिक महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याने न्यायालयाची कारवाई
- पुणे - नाशिक महामार्गावरील निघोटवाडी येथील शेतकऱ्यांनी वाढीव मोबादल्या साठी न्यायालयात मागितली होती दाद
- न्यायालयाने 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचा आदेश दिला होता. मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही
- त्यामुळे अखेर काल न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संचालकांचे टेबल आणि खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले
- न्यायालयीन कर्मचार्यांनी या आदेशाची अंमलबजावणी करत, प्रत्यक्षात खुर्ची - टेबल जप्त केले
महामार्गावरून बायपास रोडवरून ट्रक खाली उतरत असताना अपघात झाला. दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्टेटसला गळ्यामध्ये भगवा पंचा टाकून एक गाणं ठेवला आहे..
रवींद्र धंगेकर शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असून काही दिवसापूर्वी रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
मुंबईतील डोंगरी परिसरातून 59 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. डोंगरी पोलिसांनी धडक कारवाई केली. रबीउल इस्लाम शेख आणि नीरज कुमार सिंग नावाच्या दोघांना अटक करण्यात आली. पी डिमेलो रोडवरील वाडीबंदर जंक्शन येथून गुटखा आणि तंबाखूने भरलेला ट्रक जप्त
- आज 12 वर्गाचा गणिताचा पेपर आहे, त्यामुळे गणिताचा विषय पाहता विशेष काळजी घेतली जात आहेय.
- नागपूर विभागीय बोर्डाचे अध्यक्ष चिंतामन वंजारी यांच्याकडून परिक्षा केंद्रावर पाहणी
- नागपूर विभागातील बोर्डाचे वर भरारी अलर्ट मोडवर आहे...
- कॅापी किंवा पेपर व्हॅाटॲपवर व्हायरल झाल्यास निलंबन आणि फौजदारी कारवाई होणार असाही इशारा देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे ४ वाजता कोरेगाव पार्कच्या हॉटेल वेस्टीन येथे दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. गृह विभागाच्या विभागीय बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, अमित शहांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे.
पोलीस अधिकारी महाजन आणि पाटील हे सहआरोपीच झाले पाहिजेत सुरेश धस यांची भूमिका
पोलिसांनी ॲट्रॉसिटी चा गुन्हा नोंद करून घेतला नाही
सुरेश धस वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार
तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन बीड जिल्ह्यात का?
हाँगकाँगमधील हाय सिक्युरिटी थ्रेडचा कागद मागवून बनावट नोटा छापणारा आणि चलनात आणणारा अशा दोघांना करवीर पोलिसांनी अटक केली. सिद्धेश घाटगे आणि विकास पानारी अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्याकडून बनावट नोटा, बनावट नोटा छापलेले प्रिंटर्स पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेला घाटगे हे घरी बनावट नोटा छापत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गोपनीयपणे सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी घाटगे याने बाहेरील देशातून साधनसामग्री मागवून बनावट नोटा छापत होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडील ए फोर साइझचे चार पेपर, पन्नास रुपयांच्या सहा बनावट नोटा, २०० रुपयांच्या चार बनावट नोटा, ५०० रुपयांच्या चार बनावट नोटा, कोऱ्या कागदावर हाय सिक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी त्यावर आरबीआय आणि भारत असे छापलेले कागद जप्त करण्यात आले. घाटगे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर बनावट नोटा चलनात आणणारा विकास पानारी यालाही पोलिसांनी अटक केली. काही तरुण कळंब्यात बनावट नोटा छापण्याचे काम करतात आणि त्याची माहिती थेट केंद्रीय तपास यंत्रणेपर्यंत पोहोचते आणि स्थानिक पोलिसांना त्याचा काहीच सुगावा लागत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
16 वर्षांपूर्वी चोरी झालेल्या दागिन्यांसह 27 मोबाईल कोपरखैरणे पोलीसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केलेत. सीईआयआर या केंद्र सरकारच्या ट्रेकिंग सिस्टिम यंत्रणेद्वारे हे सर्व हरवलेले अथवा चोरी झालेले मोबाईल पोलिसांनी शोधलेत. यावेळी 16 वर्षांपूर्वी चोरी झालेले दागिने देखील कोपरखैरणे पोलिसांनी शोधून काढले असून एकूण 7 लाख रुपये किंमतीचे 27 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आलेत. यावेळी आपले दागिने तसेच चोरी झालेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता.
- नाशिकच्या द्वारका परिसरातील काठे गल्ली सिग्नल जवळील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात
- पालिका प्रशासनाकडून आंदोलनपूर्वीच अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात
- पोलीस बंदोबस्तात महापालिकेची कारवाई
- संपूर्ण परिसर पोलीस बंदोबस्ताने सील
- सकल हिंदू समाजाने आज अनधिकृत धार्मिक स्थळ न हटवल्यास दिलाय आंदोलनाचा इशारा
- सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर
- 25 वर्षांपूर्वीच्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू
- 11 वाजता सकल हिंदू समाजाकडून काढण्यात येणार आहे मोर्चा
- अनधिकृत धार्मिक स्थळ न हटवल्यास त्यासमोर मंदिर उभारण्याचा देण्यात आलाय इशारा
- NDA तील आर्मी ऑफिसर दीपक डब्बास यांच्या घराशेजारी आढळले ह्या रक्तलोचन दुर्मिळ जातीच्या घुबडाचे पिल्लू
- याची माहिती डब्बास यांनी प्राणीमित्रांना कळविल्यानंतर, पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनच्या प्राणीमित्रांनी त्याठिकाणी जात जखमी घुबडाच्या पिल्लाला पकडून, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून दोन दिवसांनी पुन्हा त्याच्या झाडावरील घरट्यात दिल सोडून.
- घुबडाचं पिल्लू इतर घुबडांजवळ सुखरूप घरट्यात विसावले.
- शुक्रवारी शासकीय वैद्याकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका ३२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू
- त्यामुळे नागपुरातील विविध रुग्णालयात ‘जीबीएस’ने दगावलेल्या रुग्णांची संख्या तीनवर पोहचलीय
- दगावलेला ३२ वषीय रुग्ण मध्यप्रदेशचा आहे, प्रकृती खालावल्यावर त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
- आजपर्यंत ‘जीबीएस’चे तब्बल २१ रुग्ण आढळले
- त्यापैकी मेडिकलमध्ये एक साडेसात वर्षांचा मुलगा आणि एक वयस्क या दोन रुग्णावर अतिदक्षता विभागात कार्यरत आहे.
- शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नागपूर पोलिसाची नवी हेल्पलाइन, 8976897689 हा असणार वॉट्सअप्प हेल्पलाईन नंबर*
- नागपूर पोलिसांनी वाहतूक मित्र नावाचा एक समर्पित व्हाट्सअप हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
- या व्हाट्सअप हेल्पलाइनवर नागरिकांनी ट्रॅफिक संदर्भात समस्या टाकल्यास ती समस्या सोडविण्यासाठी पोलीस सक्रिय असणार.
- शहरातील नागरिकाला चुकीच्या पद्धतीने पार केलेली कार दिसल्यास किंवा चौकातील सिग्नल बंद असल्यास, नो पार्किंग झोन मध्ये पार्किंग आणि इतर समस्या दिसल्यास तो फोटो व्हाट्सअप हेल्पलाइनवर शेअर करता येणार आहे.
- फोटो शेअर केल्यावर पोलीस कमांड अँड कंट्रोल सेंटर येथून तक्रारीची पडताळणी करतील, पडताळणी होताच एक पोलीस निरीक्षक आणि सात कर्मचारी हे लागलीच संबंधित ठिकाणी जाऊन अडचणी सोडवतील.
कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याची देखील माहिती
एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येते का ? अशीही केली विचारणा
एसटी महामंडळाच्या गाडीलाही काळे फासल्याची माहिती
एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याने त्याला रुग्णालयामध्ये केलं दाखल
कर्नाटकातल्या चित्रदुर्ग इथं घडली घटना
पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना
- 2016 ते 2019 या कालावधीमध्ये सहकार मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करत गोपनीयतेचा भंग केल्याची दाखल आहे तक्रार
- सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते रविराज कदम यांनी लोकायुक्तांकडे केली होती तक्रार
- या तक्रारीची लोकायुक्तांकडून दखल घेत तक्रारदार रविराज कदम यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले.
- 2016 साली सोलापूर जिल्ह्यात प्रास्तावित राष्ट्रीय महामार्गांच्या लगत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने विकत घेतल्याचा आरोप
- खरेदी खतामध्ये या जमीनीतून राष्ट्रीय महामार्ग जाणार असून त्यातून आलेली रक्कम ही लिहून घेणार यांनी घ्यावयाची आहे असे लिहून घेतल्याचा आरोप
- या वाक्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या रकमेपासून शेतकरी वंचित राहिल्या असल्याचा दावा
- दरम्यान 9 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे मंत्रालयात लोकायुक्तांसमोर याबाबत सुनावणी ठेवण्यात आलीय.
शिर्डीतील रीक्षाचालकांच्या मनमानीला आता चाप बसणार आहे.. परवाना धारक रीक्षाचालकांना आता शिर्डीत रीक्षा चालवताना युनिफॉर्म आणि बॅच बिल्ला असणं, ठरवून दिलेल्या स्टॉपवर थांबणं बंधनकारक करण्यात आलं आहे.. शिर्डी वाहतूक शाखेच्या वतीने रीक्षाचालकांना सुचना करण्यात आल्या असून कोणत्याही साई भक्तांची गैरसोय आणि लूट होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन रीक्षाचालकांना करण्यात आलं आहे...
भंडाऱ्याच्या तुमसर येथील दीनानाथ मंगल कार्यालय येथे भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश व भाजप कार्यकर्ता बैठकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान माजी राज्यमंत्री तथा आमदार परिणय फुके यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादीच्या(अजित पवार) माजी जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर यांच्या नेतृत्वात असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. समोर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होणार असून काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत भाजपची गोची झाली तसा प्रकार होऊ नये यासाठी ऍक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर एकीकडे प्रफुल पटेल यांच्या राष्ट्रवादीला तुमसर परिसरात मोठा झटका मानला जात आहे.
वीज वितरण कंपनीने थकीत बिलाच्या विरोधात वीज बिल वसुलीची मोहीम यवतमाळ जिल्ह्यात तीव्र केली असून या मोहिमेतील तीन हजार ग्राहकांची कंपनीने वीज कापली. या ग्राहकांकडे 120 कोटी थकले आहेत थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज कंपनीने नोटीस बजावली मात्र यानंतरही थकीत वीज बिल न भरल्याने कंपनीने ही कारवाई केली.
सोलापुरात शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत तब्बल 15 कोटी रुपये लुटल्याप्रकरणी एकास अटक
निवृत्ती मारुती पैलवान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव
पैलवान हा शेअर बाजार शिकवण्याचे क्लासेस चालवत होता
यावेळी संपर्कात आलेल्या लोकांना त्याने मोठ्या परतव्याचे आमिष दाखवत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले
या प्रकरणातील फिर्यादी आशिष पाटील याने निवृत्ती पैलवान याने 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती
सोलापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केला असता आतापर्यंत आरोपी निवृत्ती पैलवान याने 124 गुंतवणूकदारांकडून तब्बल 15 कोटी रुपये घेतल्याचे समोर आले
आरोपी निवृत्ती मारुती पैलवान याला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावन्यात आलीय
राहुरी तालुक्यातील एका उद्योजकाने वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने अनाथ मुलांसह वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणा-या मुलांना हेलिकॉप्टरची सफर घडवली आहे.. हेलिकॉप्टरमध्ये बसून उडण्याची हौस पूर्ण झाल्याने या चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात नकली सोने, काळी हळद, पांढरे बिबे , मांडूळ साप सचं बोलो सच तोलो कलदर,कोईन नागमनी भोपळे,व इतर वस्तू कमी पैशात मिळत असल्याची दलाला कडून बतावणी करून बाहेर जिल्ह्यातील लोकांची फसवणूक करून मारहाण करत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार सुरु आहेत ...जामोद चौकी चे हद्दीत दोघांना सोन्याच्या गींन्या कमी पैशात मिळत असल्याची ची बतावणी करून एकाची दोन लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली त्या तक्रारी वरून दोघांना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय...व विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील सूर्यफूल पिकाचा पेरा मोठया प्रमाणात घटला असून मोजक्याच शेतकऱ्यांनी सूर्यफूलाची लागवड केलीये. खाण्यासाठी सूर्यफूलाचं तेल उत्कृष्ट मानलं जातं त्यामुळं मागणीही जास्त असते. मात्र दिवसेंदिवस उत्पादन घटत चालल्यानं इतर तेलाच्या तुलनेत सूर्यफूल तेलाचे दर जास्त असतात. जिल्ह्यात पूर्वी मोठ्याप्रमाणात शेतकरी सूर्यफूलाचं उत्पादन घेत होते मात्र शेतकरी हरभरा आणि चिया पिकाकडं वळल्यानं सूर्यफूलाचं क्षेत्र घटलंय.
गरीबाचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या मातीचे माठ आणि रांजण यांची किंमत यावर्षी जवळपास 25 टक्क्यांनी वाढली आहे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतोय, उन्हाळ्याची चाहूल लागल्याने मातीची भांडी बाजारात दाखल झाली आहेत, दरवर्षीच बुलढाण्यात मातीच्या रांजण, माठ, घागरी याची मोठी मागणी पाहायला मिळत असते, मात्र यावर्षी कच्च्याम मालाच्या किमती वाढल्याने या भांड्यांमध्ये देखील 25 टक्क्याने भाव वाढ झाली आहे, यामुळे मातीच्या भांड्यांची मागणी थोडी कमी झाल्याच चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे...
नाशिक शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई विरोधात कारवाई करत नसल्यानं सकल हिंदू समाजाकडून अनधिकृत धार्मिक स्थळासमोर मंदिर बांधण्याचा इशारा देण्यात आलं आहे . त्यामुळे शहरात तणावाचा वाटेवरून निर्माण झाला आहे खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलं आहे.जवळपास 3 हजार पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण नाशिक शहरात करण्यात आलं आहे.
सरकार व प्रशासनात समन्वयन नसल्याचे निष्पन्न
हमीभाव केंद्रांना सोयाबीन खरेदी केंद्राला मुदत वाढ करण्याचे आदेश प्राप्तच नाही..
जिल्ह्यातील सर्व सोयाबीन हमीभाव केंद्र बंदच...
शेतकऱ्यांची सोयाबीन केंद्राबाहेरचं ....शेतकरी आर्थिक अडचणीत..
जिल्ह्यातील सर्व गमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी..
उपविभागीय कार्यालया समोर शेतकऱ्यांनी केले निदर्शने व केली घोषणाबाजी..
पणन महासंघाला सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याचे द्यावे आदेश...
शेतकऱ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप....
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलिसांच्या हद्दीत शेतकऱ्याने केली अफू ची शेती.
अफू च्या शेतीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.
अंदाजे ३ कोटी रुपयांची अफूची झाडे जप्त.
स्थानिक गुन्हे शाखेने शेतकरी संतोष सानप याला घेतलं ताब्यात.
जिल्ह्यात पहिल्यांदाच अफूची ( अमली पदार्थ ) आढळल्याने खळबळ.
अद्यापही कारवाई सुरूच.
लाखोभावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवाच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज झाली आहे. मुंबई, पुण्यासह, गोवा, कर्नाटक राज्यातून लाखो भावीक देवीचे दर्शन घेण्यासाठी आंगणेवाडीत दाखल झाले आहेत. तसेच राजकीय नेतेमंडळी देवी भराडी मातेच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. जवळपास 10 ते 12 लाख भावीक यात्रोत्सवासाठी येणार असल्यामुळे पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला आहे. आई भराडी देवीचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले असून मंदिर व आंगणेवाडी परीसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आंगणेवाडी परिसरातील विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्यात आली असून याची खास दृश्य सामटीव्हीच्या प्रेक्षकांसाठी...
नंदूरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या धडगाव तालुक्यातील शहादा धडगाव घाटात घाटात चक्क वाघाची पूजा केली जाते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य झालं असेल पण हे खरं आहे ..वाघाने गावशिवारातील पशु पक्षी, माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव पाड्यात समृद्धी नांदावी यासाठी पूर्वी आदिवासीं बांधवांचे पूर्वज हे जंगलात असलेल्या वाघाचे पूजन करायचे मात्र कालांतराने वाघ हा प्राणी सातपुड्याच्या जंगलातून नामशेष झाला असला तरी आज ही त्यांची पूजा केली जात असून हे देशातील एकमेव मंदिर आहे...
धारदार शस्त्राने डोक्यासह शरीराच्या इतर भागात वार केल्याने तरुण गंभीर जखमी
हल्ला केल्यानंतर मारेकरी हे घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
गंभीर जखमी तरुणाला तात्काळ जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
मात्र तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती, प्रतिक निंबाळकर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव
पूर्व वैमन्यातून हा हल्ला झाल्याची पोलिसांकडून प्राथमिक माहिती
चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये कुणाच्या गुन्ह्यात चार वर्षापासून प्रत्येक निंबाळकर हा कारागृहात होता.
आजच त्याची न्यायालयाच्या माध्यमातून अटी शर्ती घालून जामीन मंजूर करण्यात आला होता.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील राधास्वामी चौक येथे असलेल्या जेठा इंटरप्राईजेस या दुकानात आज पहाटे चार वाजता भीषण आग लागली. हे दुकान ट्रॉफी आणि झेंडे तसेच निवडणूक साहित्यानी भरले होते, दुकानाच्या वरील दोन मजले सुद्धा या सामानाने भरल्याने वरील दोन मजल्यावर सुद्धा आग पसरली, उल्हासनगर महानगरपालिकेचे दहा अग्निशमन दलाने दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग विझवण्यात आली, ही आग कशामुळे लागली याचे कारण अजून समोर आले नसून, घटनास्थळी मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते, या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठे नुकसान मात्र जेठा इंटरप्राईजेस या दुकानदाराचे झाले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस देशमुख कुटुंब आणि मस्साजोग ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. यासह परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळीत भेट होईल.
पुण्यातील कोथरूड परिसरात गजा मारणे टोळीतील आरोपींकडून मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याची चंद्रकांत पाटलांनी घरी जात घेतली भेट
देवेंद्र जोग यांच्या घरी जात चंद्रकांत पाटील भेटले त्याच्या कुटुंबाला
शिवजयंती दिनी कोथरूडमधील मृत्यूंजय मंदिराजवळ भाजपा कार्यकर्ता देवेंद्र जोग यांस किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घडली होती घटना
या घटनेनंतर सर्वजन पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची चंद्रकांत पाटील यांची जोग कुटुंबाला ग्वाही
सह व्यवस्थापकीय संचालकांचे सक्तीचे आदेश
पीएमपीएल चे सर्व कामकाज आणि लिखापढीची कार्यालयीन कामे मराठी भाषेतच करण्याचे आदेश
पीएमपीएल चा पत्रव्यवहार, कार्यालयातील कामकाज, सर्वसामान्यांपर्यंत जाणारे सर्व नमुने, पत्रके, परवाने हे सगळ आता मराठीत असणार
प्रशस्ताचा कारभार सुरळीत करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक नार्वेकर यांचा निर्णय
समाविष्ट झालेल्या गावांना पाण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी सिंहगड रस्ता परिसरातील समाविष्ट गावांना शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी
उशीरा का होईना शासनाला जाग
योजनेनुसार राज्य शासन व महापालिका प्रत्येकी ५० टक्के खर्च करणार
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या या गावांना मिळणार शुद्ध पाणी
धायरी, नांदोशी, किरकटवाडी, खडकवासला, सणसनगर, नांदेड, नर्हे, कोळेवाडी, जांभूळवाडी, भिलारवाडी, मांगडेवाडी
७० वर्षांनंतरही लाभ न मिळाल्याने हायकोर्टात करण्यात आल्या होत्या याचिका
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन विभागाकडून करण्यात येत आहे चौकशी
आत्तापर्यंत सुमारे चार हजार आदेशांपैकी २८०० आदेशांची चौकशी पूर्ण झाली आहे
चौकशी मध्ये दोनदा लाभ मिळाला आहे का याची देखील चाचपणी करण्यात येत आहे
पानशेत, वरसगाव, पवना आणि नाझरे या धरण प्रकल्पन मधल्या बधिताना मोबदला देण्यात आला होता त्या मोबदल्याची चौकशी पुनर्वसन विभागाकडून होत आहे
या सगळ्या चौकशी अहवाल राज्य सरकार कडे पाठवण्यात देखील येणार आहे
खराडीत पॅलेस कार रेन्टल" नावाने दोघांनी कार्यालय सुरू केले. त्याची सोशल मीडियावर जाहिरात बाजी केली. महिन्याच्या पॅकेजवर कार भाड्याने घेतल्या.नंतर चक्क त्या कार डेमो कार म्हणून विकल्या. एक नव्हे दोन नव्हे तब्बल १६ कार त्यांनी अशाप्रकारे विकल्या.अखेर त्यांचा भांडाफोड झाला. खराडी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकून एक कोटी ६४ लाख रुपयांच्या १६ कार हस्तगत केल्या.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढल्याने तापमानाचा पारा ३६ अंशांच्या वर आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून उन्हाचा चटका कायम राहण्यासह, राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.