Maharashtra News Live Update: शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे

Marathi Breaking Live Headlines Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मनोज जरांगेचं उपोषण, राज्यात पावसाची उघडीप,राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे

अहिल्या नगर येथील शनिशिंगणापूर च्या देवस्थान कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी बंद करण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. शनि देवस्थान ट्रस्ट येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सहावा वेतन आयोग 54 दिवसांच्या सुट्ट्या आरोग्य विमा यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र देवस्थानचे प्रशासक आणि विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांची कर्मचाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठकी पार पडली यात देवस्थान उत्पन्न आणि खर्चाच्या मर्यादा यावर चर्चा करण्यात आली मागण्यांबद्दल प्रशासक सकारात्मक असून नियमानुसार कर्मचाऱ्यांना लाभ दिला जाईल असं सांगत असतानाच आरोग्य विमा काढण्याचा आश्वासन दिलं

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, भोगावती नदीवरील पुलावर वाहनांच्या रांगा

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्याने एकेरी वाहतुक

पेण जवळील भोगावती नदीवरील पुलावर वाहनांच्या रांगा

रस्ता दुरुस्तीच्या कामाचे ठिकाणी एकेरी वाहतुक सुरु असल्यामुळे वाहनांचा वेग मंदावला

मुंबईकडून कोकणाच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी

रायगडच्या माणगावमध्ये 9 तासांपासून बित्तीगूल

माणगाव तालुक्यातील कांदळगाव - कडापे मार्गावरील भागात वायर तुटून पडल्याने दुरुस्ती करिता वीज पुरवठा बंद. वीज वितरण विभागाकडून वीज दुरुस्ती आणि वीज वाहिनी देखभाल कामात दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांकडून आरोप

मराठा आंदोलकांकडून आज पुन्हा धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. मनोज जरंगे यांच्या उपोषणाचा आजचा 11 वा दिवस असून सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नसल्याने समाज बांधव आक्रमक झालेत.

मनोज जरांगेंच्या आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांना एकनाथ शिंदेंचा आदेश

मंत्र्यांनी मराठा आरक्षणावर बोलणं टाळावं, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मराठा आरक्षणाबाबत सरकारची योग्य भूमिका समाजात मांडा, समाजात गैरसमज पसरेल अशी वक्तव्य करू नये असे आदेश देण्यात आलेत.

Sambhajinnagr: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगापूरमध्ये रास्ता रोको

छत्रपती संभाजीनगर -

- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगापूरमध्ये रास्ता रोको

- मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे आंदोलन

- किंन्हळ-देर्हळ फाटा येथे तब्बल दोन तास महामार्ग रोखला.

- रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनाच्या लागल्या रांगा.

Nalasopara: नालासोपाऱ्यात जिल्हा परिषद शाळेत स्फोट, २ विद्यार्थ्यांसह ३ जण गंभीर जखमी

नालासोपारा -

नालासोपारा परिसरातील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी दुपारच्या सुमारास कुकरचा स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली.

या दुर्घटनेत दोन शाळकरी विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले असून, विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणारी महिला देखील भाजली आहे.

Nagpur: नागपुरमध्ये रेल्वे परीक्षा देण्यासाठी आलेल्या डमी उमेदवाराला अटक

- नागपुरात पार पडलेल्या रेल्वे ग्रुप ‘डी’ भरतीत ‘मुन्नाभाई’ फर्जीवाडा उघड झालाय.

- दुसऱ्याच्या नावावर शारीरिक परीक्षा देण्यासाठी आलेल्या डमी उमेदवाराला अटक करण्यात आलीय...

- नागपुरात रेल्वे ग्रुप ‘डी’ भरतीच्या शारीरिक पात्रता परीक्षेदरम्यान मोठा फर्जीवाडा उघडकीस आला आहे.

- दुसऱ्या उमेदवाराच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या डमी उमेदवाराचा संशयास्पद प्रकार उघड झाला आहे.

- रेल्वे स्टेडियम मैदानावर रेल्वे ग्रुप ‘डी’ भरतीची शारीरिक पात्रता परीक्षा सुरू होती.

Pune: रीलस्टार संतोष पंडितची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पुणे -

रीलस्टार संतोष पंडितची न्यायालयीन कोठडीत रवानगी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण

सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपातून संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संतोष पंडित यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते

तपासासाठी न्यायालयाने यापूर्वी ८ सप्टेंबरपर्यंत पंडित यांना पोलीस कोठडी सुनावली होती

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज पंडित यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले

Nashik: नाशिकमध्ये पार पडली सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक

नाशिकमध्ये आज सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

यामध्ये राज्यातील मराठा समन्वयकांनी या बैठकीमध्ये उपस्थिती दर्शविली

मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात पुढील रणनीती ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले होते

Dharashiv: सरकार मनोज जरांगेंसोबत चर्चा करणार नसेल तर हे चुकीच आहे - अंबादास दानवे

धाराशिव -

सरकार मनोज जरांगेंसोबत चर्चा करणार नसेल तर हे चुकीच आहे

संवादाचा मार्ग ठेवला पाहिजे, मागण्या इकडे तिकडे होऊ शकतात

चर्चा बंद करणे हे यो नाही

शिवसेना नेते अंबादास दानवे यांचे वक्तव्य

Dharashiv: सरकारला जागं करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ठाकरेसेनेचे आंदोलन

धाराशिव -

सरकारने कुंभकर्णाच्या झोपेच सोंग घेतले, सरकारला जागं करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आंदोलन

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थितीत आंदोलन

दुष्काळ जाहीर करा, मराठवाड्यातील प्रकल्प पूर्ण करा, अतिवृष्टीची मदत द्या, या मागणीसाठी आंदोलन

धाराशिव जिल्ह्यात ही आज तीन आमदाराच्या उपस्थितीमध्ये उबाठा गटाचे आंदोलन

Beed: बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात, पिकासाठी कष्ट केले पण पावसाने घात केला

बीड -

बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात

५ एकरवरील सोयाबीनचे पीक मजूर लावून शेतकऱ्यांनी उपटलं

पिकासाठी कष्ट केले पण पावसाने घात केला

५ एकर सोयाबीन वाया गेला

नुकसान काढायलाही शेतकऱ्याच्याच खिशाला फटका

Washim: वाशिमच्या बोरगाव येथे गॅस सिलिंडरचा स्फोट, ४ घरं जळून खाक

वाशिम -

वाशिमच्या बोरगाव येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

आगीमध्ये चार घर जळून खाक

दुचाकीसह संसार उपयोगी साहित्य जळाले

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

Pune: पुण्याच्या विकासात अपयशी ठरलेल्या 'पीएमआरडीए'ला टाळे ठोकण्याची वेळ

पुणे -

पुण्याच्या विकासात अपयशी ठरलेल्या 'पीएमआरडीए'ला टाळे ठोकण्याची वेळ

महानगर नियोजन समितीचा गंभीर आरोप

चाकण-हिंजवडीतील वाहतूककोंडी, रखडलेला विकास आराखडा अन् पायाभूत सुविधांच्या अभावावरून टीका

भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांची नौपाडा पोलीस ठाण्यात लावणी कलाकार गौतमी पाटील च्या विरोधात तक्रार केली दाखल

राजकीय म्हणून मी तक्रार करण्यासाठी आलेली नसून एक महिला म्हणून तक्रार करत आहे..

कोणताही राजकीय पक्ष असो आम्हाला त्या बाबत काहीही देणे घेणे नाही...

अश्लील हावभाव अश्लील नृत्यांगण आणि डायलॉग बाजी गौतमी पाटील यांनी केल्यामुळे गौतमी पाटील आणि आयोजकांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली आहे....

गौतमी पाटील यांचा एक व्हिडिओ आणि तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे...

अशा नृतांगणामुळे सामाजिक जीवनात विकृती वाढत चालली आहे... त्यामुळे कठोर कारवाई करण्याची देखील मागणी भाजप कडून करण्यात आलेली आहे.

कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर आक्रोश

पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व मका पिके धोक्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीक विम्याची भरपाई, कर्जाबाबत दिलासा तसेच जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.

खरपुडीत भटक्या कुत्र्यांची दहशत; शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खेड तालुक्यातील खरपुडी येथे भीमानदीच्या पुलालगत दोन्ही बाजूंना भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

पुण्यात डंपरची दुचाकीला जोरदार धडक,  अपघातात शाळकरी मुली गंभीर जखमी

पुण्यातील कात्रज कोंढवा रोड वर भीषण अपघात

वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेत जात असताना घडला अपघात

या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

भारती विद्यापीठ पोलिसांनी डंपर चालकाला घेतलं ताब्यात

कात्रज कोंढवा रस्त्याने जात असताना यू टर्न घेताना भरधाव येणाऱ्या डंपर ने दुचाकीला दिली धडक

दुचाकीवर वडील आणि दोन मुली शाळेच्या दिशेने जात असताना घडला अपघात

उद्धव ठाकरेंचा डीजेला विरोध; ‘चर्चेतून प्रश्न सोडवू, सणाचं पावित्र्य राखलं पाहिजे’

उद्धव ठाकरे यांनी सण-उत्सवांमध्ये डीजेच्या वापराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. डीजेमुळे निर्माण होणारा प्रश्न चर्चा करून सोडवता येऊ शकतो, मात्र सणांचं पावित्र्य आणि धार्मिक वातावरण राखलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं.

त्याचबरोबर MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबतही आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे डीजेचा मुद्दा आणि MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने संवादातून तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ठाकरे गटाचा राडा

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकानी गोंधळ घालत घोषणाबाजी सुरू केली आहे. ठाकरे शिवसेनेच्या वतीने तुमचे ना हो पायेगा या टॅगलाईन खाली धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंबादास दानवे,आमदार कैलास पाटील,आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सुरू होते. मराठवाड्यातील रखडलेल्या विकास प्रकल्प,दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला जाताना पोलिसांनी शिवसैनिकांना अडवल्यानंतर आमदार दानवे व आमदार कैलास पाटील यांच्याबरोबर सगळेच कार्यकर्ते आत घुसले कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोरठिय्या आंदोलन सुरू करत जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली आहे,गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असुन या ठिकाणी शिवसैनिकांनी ठिय्या सुरू केला आहे.

सांगली- स्पर्धा परीक्षा अकॅडमी'मध्ये तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या गोटखिंडी येथे एका निवासी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी मधील तीन अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी अकॅडमीच्या संस्थापकासह त्याच्या पत्नी विरोधात पोक्सो अंतर्गत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात सुरक्षेचा बोजवारा! फायर सेफ्टी यंत्रणाच बंद

अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या घटनांनंतर राज्यातील रुग्णालयांच्या फायर सेफ्टीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाची अग्निप्रतिबंधक यंत्रणाच मुख्य मोटार पंप बंद असल्याने कार्यरत नसल्याची बाब उघड झाली आहे.

कोल्हापूर- सैनिक टाकळीच्या एमआयडीसीला विरोध; तहसील कार्यालयात घुसून मोर्चेकऱ्यांची घोषणाबाजी

शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथल्या प्रस्तावित एमआयडीसीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. याच विरोधात आज शिरोळ शहरातून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चेकऱ्यांना तहसील कार्यालयात प्रवेश न दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. यावेळी पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर संतप्त मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयाचा लोखंडी ग्रीलचा दरवाजा आणि काचेचा दरवाजा तोडून थेट कार्यालयात प्रवेश केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी भिडे गुरुजी यांनी केलं.

भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; उमरगेकर, सूर्यवंशींसह नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस व अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रभारी आ. अ‍ॅड. माधवी नाईक आणि अध्यक्ष विश्वजित गायकवाड यांनी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. उपाध्यक्षपदी अशोक उमरगेकर (पुणे), प्रा.पंडित सूर्यवंशी (लातूर), दिनेश पगारे (नाशिक) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी प्रा.रमा शेजवळ (परभणी), सुधीर जांभूळकर (नागपूर), परिमल कांबळे (अकोला), राहुल कांबळे (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी सिद्धार्थ वानखेडे (अमरावती), बबनराव नरवाडे (छ.संभाजीनगर), प्रणाली सावर्डेकर (रत्नागिरी) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण कांबळे (पुणे) यांची कोषाध्यक्षपदी तर सुरेश गायकवाड (नवी मुंबई) यांची कार्यालय मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निष्क्रिय आणि मराठ्यांचं वाटोळ करणारे विखे पाटील आहे- मनोज जरांगे

मराठ्यांचं वाटोळं केलं आता अंग काढताय?

विखेंन किती फसवलं हे मराठ्यांना माहितीये

मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यासाठा विखे-पाटील आलेत

अचानक कोसळलेल्या PS साठी मंत्री ठरले देवदूत; तातडीने CPR देत वाचवले प्राण

तेलंगणाचे मंत्री वकिटी श्रीहरी यांनी विधानसभा परिसरात अचानक कोसळलेल्या वरिष्ठ IAS अधिकारी नवीन मित्तल यांचे वैयक्तिक सचिव (PS) राजू यांना तत्काळ CPR दिला. आज सकाळी ही घटना घडली. त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने राजू यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना बारामती मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी दाखले, जातपडताळणी तसेच मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला मराठा क्रांती मोर्चा, बारामती व सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे.सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्यांचा तातडीने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या मान्य कराव्यात,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

उमरखेड शहर मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद

यवतमाळच्या उमरखेड शहरात मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवण्यात आली. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या त्यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने बंद ठेवत एकजूट दाखवली असून मराठा बांधवांनी शहरातून रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

नांदेड जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर, महिनाभरापासून पावसाची दडी

पावसाने पाठ फिरवल्याने नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. महिनाभरापासून पाऊस न झाल्याने सोयाबीनसह इतर पिके करपली असून, मोहन कल्याणकर या शेतकऱ्याने एकरभर सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला. पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Maharashtra News : डाळिंब उत्पादकांच्या अडचणींची चर्चा आंतरराष्ट्रीय परिषदेत होत असतानाच सांगोला तालुक्यातील शेतकऱ्याने आपल्या समस्या थेट कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासमोर मांडल्या.

शनी शिंगणापूर मंदिर देवस्थानांतील कर्मचाऱ्यांचा उद्यापासून सुरु होणार काम बंद आंदोलन....

काळेवाडी फाट्यावर खदानीत अनोळखी व्यक्ती पडली

काळेवाडी फाटा परिसरातील साईबाबा चहाच्या दुकानाच्या पाठीमागील खदानीमध्ये एक अनोळखी व्यक्ती पडल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान साडेनऊच्या सुमारास घडली.

लातूर अंबाजोगाई महामार्ग आडवत जोरदार घोषणाबाजी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी लातूरच्या पळशी येथे मराठा समाज आक्रमक झाला आहे, मागच्या तीन तासापासून लातूर अंबाजोगाई महामार्ग अडवत मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सरकारने तात्काळ मराठा समाजाच्या मागण्या मान्य करावे, जरांगे यांचे उपोषण माग घेण्यासाठी सरकारने सकारात्मक पावलं उचलावीत अशी मागणी करत हे आंदोलन आक्रमक झाले आहेत. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.

मामा बाळासाहेब थोरात यांच्या समोरच आमदार सत्यजीत तांबेंकडून विखे पाटलांच कौतुक

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे.. मात्र आमदार सत्यजीत तांबे यांनी, मामा बाळासाहेब थोरात यांच्या समोरच विखे पाटलांचं तोंडभरून केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत..

संगमनेर नगरपालिकेच्या वतीने विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला.. शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, संगमनेर पालिकेला भरघोस निधी दिल्याबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.. मात्र दुसऱ्यांनी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला भाषणादरम्यान त्यांनी नाव न घेता आमदार अमोल खताळ यांना लगावलाय.. मामा बाळासाहेब थोरात यांच्या समोरच सत्यजीत तांबे यांनी विखे पाटलांचे आभार मानत कौतुक केल्याने, त्यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे..

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा ११ वा दिवस! मध्यरात्री फोनवरून काय चर्चा झाली? आज सरकारचं शिष्टमंडळ भेटणार!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज ११ वा दिवस आहे. सलग ११ व्या दिवशीही जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काल मध्यरात्रीच्या सुमारास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर काही मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनद्वारे थेट संवाद साधला. या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी काल बंद केलेले आपले वैद्यकीय उपचार आणि सलाईन पुन्हा सुरू केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रविकिरण इंगवलेंच्या ऑडिओ क्लिपवरून वातावरण तापलं

कोल्हापुरात राजकीय संघर्षाला आता धक्कादायक वळण मिळालंय... शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर आणि ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता एका कथित ऑडिओ क्लिपची जोड मिळाली आहे... या ऑडिओमध्ये शरद कोरणे यांच्या मृत्यूबाबत गंभीर दावा करण्यात आलाय... रविकिरण इंगवले यांचाच आवाज असल्याचा दावा करत या प्रकरणाची चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केली आहे... तर दुसरीकडे रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह राज्य सरकारची जाहीर माफी मागितली आहे... त्यामुळे या प्रकरणामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय..

Maharashtra News Live Update: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी काही वृक्षतोड करण्याचा झाला होता निर्णय

- याच निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे याचिका दाखल

- वृक्षतोडीला स्थगिती देण्यासाठी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात बाजू मांडली जाणार

- याचिकाकर्त्यांच्या तातडीच्या सुनावणीच्या मागणीला न्यायालयाने यापूर्वी दिली होती मान्यता

- साधुग्राम उभारणीच्या तयारीसाठी महापालिकेकडून तपोवन परिसरात वृक्षतोड केली जाण्याची शक्यता व्यक्त

- वृक्षतोडीस स्थगिती मिळवण्यासाठी याचिकाकर्ते आज न्यायालयात मांडणार बाजू

- वकील आणि मनसेचे नेते नितीन पंडित यांनी केली आहे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra News Live Update: बुलढाणा जिल्ह्यात 35 दिवसांपासून पावसाने मारली दडी

बुलढाणा जिल्ह्यात मागील 35 ते चाळीस दिवस झाले असून पावसाने दडी मारली आहे .. परिणामी पीक वळायला लागली आहेत .. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून शेतकरी संकटात सापडला आहे .. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त सरासरीच्या 25 टक्केच पाऊस झाला.. अनेक लहान मोठी धरणे अद्याप कोरडी आहेत .. मात्र पीक वाळत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आर्थिक नुकसान होणार असुन रब्बी पिकांचे भविष्य सुद्धा कठीण असल्याचे परिस्थिती आहे .. त्यामुळे वाळलेल्या पिकांचे पंचनामे करावेत आणि जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे ..

कुडाळ येथील साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

कुडाळ तालुक्यातील साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

आज सकाळी ही घटना निदर्शनास आली. या घटनेची माहीती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले

पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू चा प्रादुर्भाव वाढल्याने प्लेटलेट्सची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलीय.

मात्र शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून गणेश उत्सव काळात तरुण वर्गाने उत्स्फूर्तपणे समोर येऊन रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांनी केलंय.

Ulhasnagar : महापौरांच्या जनता दरबारात जोरदार गोंधळ!

महापौरांच्या जनता दरबारात जोरदार गोंधळ!

पाणी प्रश्नावर भाजप आक्रमक

महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत “महापौर हाय हाय”

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर मध्यरात्री मराठा आंदोलकांनी केला रस्ता रोको

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर मध्यरात्री मराठा आंदोलकांनी केला रस्ता रोको,टायर जाळून केला निषेध व्यक्त

मध्यरात्री 1 वाजता शहागड परिसरातल्या पैठण फाटा या ठिकाणी घोषणाबाजी करून महामार्ग रोखून धरला

Solapur : सोलापुरात ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे अर्ध नग्न आंदोलन

सोलापुरात ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे अर्ध नग्न आंदोलन

आंदोलनावेळी अश्रू अनावर झालेल्या महिला शेतकऱ्यांचे तहसीलदारांनी पुसले डोळे

धाराशी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती, सोयाबीन पीक मातीमोल

धाराशी जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती, सोयाबीन पीक मातीमोल

पेरणीसह पिकांसाठी केलेला खर्च ही गेला वाया,शेतकरी हतबल

तातडीने मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती ही गंभीर

मंत्री मुरलीधर मोहोळ घेणार भाजपच्या नगरसेवकांची ‘शाळा’

मंत्री मुरलीधर मोहोळ घेणार भाजपच्या नगरसेवकांची ‘शाळा’

महापालिकेतील गटबाजीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी

पावसाची दडी; उभी पिके करपली, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न!

लातूर जिल्ह्यावर दुष्काळाच गडद सावट निर्माण झाल आहे, पावसाअभावी खरीप पिक पुरते वाळून गेले आहेत

तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील भीषण होत चाललाय, तीन महिन्यापासून पाऊस नसल्याने जिल्ह्यातील प्रमुख नदी- नाले अक्षरशः कोरडे ठाक पडले आहेत.

दरम्यान लातूर ग्रामीण मधल्या शेतकऱ्यांची अतिशय बिकट अवस्था निर्माण झाली आहे

Pune : "बापट जाऊ द्या ना", अखेर विद्यानंद बापट यांच्यावर रॅप साँग प्रदर्शित

"बापट जाऊ द्या ना", अखेर विद्यानंद बापट यांच्यावर रॅप साँग प्रदर्शित

सागर पाटील नावाच्या तरुणाने तयार केले बापट यांच्यावर रॅप

सागर पाटील हे दुबई येथील त्रिविक्रम ढोल ताशा पथकाचे संस्थापक

Pune : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ

मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्पदंशाच्या घटनेत

मागील तीन महिन्यांत १३१ सर्पदंशांच्या घटना तालुक्यात घडल्या असून, वेळेत योग्य उपचार मिळाल्याने सर्पदंशाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

मोदींच्या हस्ते आज संध्याकाळी ५.४५ वाजता ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६चे उद्घाटन

मुंबईतील या कार्यक्रमादरम्यान मोदी नागरिकांशी संवाद साधणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com