३० लाख जणांना डिजिटल प्रमाणपत्र दिले - सामंत
समाजामध्ये जनजागृती करणार- विखे
हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र दिले नाहीत - जरांगे
लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केले पाहिजे - विखे
शिंदे समितीने ५८ लाख नोंदी शोधल्या - जरांगे
५८ लाख कुणबींचे प्रमाणपत्र मला पाहिजे - मनोज जरांगे
अर्ज करतील त्यांना डिजिटल प्रमाणपत्र मिळतील - राधाकृष्ण विखे
याद्या बनल्यानंतर बाकीच्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल - उदय सामंत
पुणे -
विद्यानंद बापट विश्रामबाग पोलिस ठाण्यातून बाहेर पडतील
बापट यांचा जबाब नोंदवून घेतला गेला आहे
बापट यांना पोलिस संरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे
मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू आहे.
त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या सोलापूर जिल्हा बंदची हाक सोलापूर शहर वगळता ग्रामीण भागात बंद पाळणार
जिल्हा बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, सकल मराठा समाजाचे आवाहन
सोलापूर -
- सोलापूरच्या मोहोळ मध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा विद्यार्थी आक्रमक
- मागील 3 तासांपासून विद्यार्थ्यांनी मोहोळ तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलेय
- मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू
- त्याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे आल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही अशी विद्यार्थ्यांची भूमिका
- सुरुवातीला मोहोळ मधील शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला
- त्यानंतर या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालबाहेर ठिय्या दिला आहे.
नाशिक -
आदिवासी विद्यार्थी आंदोलन ठिकाणी अभिजीत दिपके दाखल
अभिजीत दिपके यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत केली विचारपूस
अंजनारी पुलाजवळ कंटेनरचे ब्रेक फेल
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर डोंगराला धडकून महामार्गावर उलटला
भीषण अपघातात चालक गंभीर जखमी
हातखंबा टॅप महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
जखमी चालकाला रत्नागिरी शासकीय रुग्णालयात केलं दाखल
अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम
क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत
पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
युट्यूबर संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी
पुणे न्यायालयाचा निर्णय
कोथरूड पोलिस ठाण्यात संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पंडित यांना झाली होती अटक
पुणे -
विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीची गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बापट यांना पोलिस संरक्षण
यापुढे विद्यानंद बापट यांच्यासोबत पोलिस संरक्षण असणार
सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली माहिती
बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर सरकारकडून तातडीची कारवाई
ठाणे गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे.
ठाणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गहाळ झालेल्या तब्बल १८० मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला
१९ लाख ५९ हजार २०० रुपये किमतीचे हे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
CEIR पोर्टलच्या माध्यमातून या मोबाईलचा शोध घेण्यात आला. अनेक मोबाईल ठाणे शहराबाहेर, तर काही महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये असल्याचे समोर आले होते.
मात्र, गुन्हे शाखेच्या स्वतंत्र पथकांनी अथक प्रयत्न करत हे मोबाईल पुन्हा मिळवले आहेत.
या कारवाईत भिवंडी घटकाने ८०, कल्याण घटकाने ६०, उल्हासनगर घटकाने १५, तर वागळे इस्टेट घटकाने २५ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
अमरावती -
अमरावती येथे भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीची हत्या प्रकरण
काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची संतप्त प्रतिक्रिया
अमरावतीमध्ये काय चाललंय?
एखादी मुलगी निर्भीडपणे चालू पण शकत नाही, शाळेमध्ये जाऊ शकत नाही.
अमरावतीमध्ये शर्वरीसोबत जे घडलं ते कुणाही सोबत घडू शकत असं पोलिसांना किंवा मुख्यमंत्र्यांना वाटत नाही का?
यशोमती ठाकूर यांचा राज्य सरकारला सवाल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केलं. यादरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेकही घातला. या आंदोलनादरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असणाऱ्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात खालच्या पातळीवर टीका केली.
धाराशिव मध्ये मराठा कार्यकर्त्यांच्या टार्गेटवर राजकीय नेते
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या घराबाहेर तरुण जमा झालेतय. आमदार राणाजगजीतसिंह यांची भेट झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही; शिंगोली येथील त्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. आमदार, खासदार यांच्या घराबाहेर बोंब मारो आंदोलन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूने शिरकाव केलाय. जानेवारीत एक, जुलैमध्ये पाच आणि ऑगस्ट महिन्यात अचानकपणे 31 रुग्ण आढळलेत, त्यामुळं शहरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, त्यामुळं शहरवासीयांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. असं महापालिका प्रशासनानं आवाहन केलंय. गेल्या सहा वर्षात 2022 मध्ये 58 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती.
शिष्टमंडळ अगोदर मराठा अभ्यासकांसोबत करणार सरपंचांच्या निवासस्थानी चर्चा
नंतर उपोषण स्थळी जाऊन जरांगे पाटलांसोबत चर्चा करणार आहेत.
पालकमंत्री भरत गोगावले यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या आढावा बैठकीतून थेट नितीन गडकरी यांना फोन
मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच सुरू करण्यात आलेला खारपाडा टोल वसूलीला स्थगिती देण्याची केली मागणी
मागणीनंतर गडकरी यांनी टोल वसूली थांबवण्यासाठी दिला हिरवा सिग्नल
महाड येथील शासकीय विश्राम गृहातून सुरू असलेल्या महामार्ग संदर्भातील आढावा बैठकीतून केला फोन
मुळात संपलेली सलाईन वापरलेल्या नवी मुंबईतील गोपीराम खडसे याच्या मृत्यू नंतर मनसेने आंदोलन केलाय.. निष्पपांचा बळी घेणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयाला टाळा लावा. मनसेने महापालिका रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करत.. रुग्णालयाच्या अधिक्षकांना टाळ भेट दिलं.
काल राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी राजू शेट्टी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ स्वाभिमानीचा आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होणार आहे. काल याच चौकात राजेश क्षीरसागर समर्थक आणि राजू शेट्टी यांच्या प्रतिमेला जोडे मारून केलं होतं आंदोलन. स्वाभिमानी आणि शक्ती पीठ महामार्ग विरोधी कृती समिती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेत.
नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू असून आधारे तळोदा तालुक्यातील चिनोदा गावात छापा टाकण्यात आला.गुजरात राज्यातून चोरट्या मार्गाने आणलेला 2 लाख 94 हजार 248 रुपयांचा प्रतिबंधित विमल गुटखा आणि तंबाखू पथकाने जप्त केला.गुटख्याची वाहतूक करणारी 5 लाख रुपयांची चारचाकी जप्त करून तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकूण 7 लाख 94 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई एलसीबी पथकाने केली.
पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली. आज शेतकऱ्यांच्या व्यथा प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आंदोलन केलंय. अकोल्यातील बोरगाव खुर्द–डापकी जहागीर मार्गालगत शेतशिवारात तब्बल चार तास आक्रमक आंदोलन चालेले.
सोयाबीन, मूग, उडीद यासह विविध खरीप पिके पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत आहे. यंदा शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, प्रत्येक नुकसानग्रस्त शेताचे प्रत्यक्ष पंचनामे करावेत, प्रति हेक्टर एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, पीक विम्याचा लाभ द्यावा आणि कर्जमाफी जाहीर करावी, या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. दरम्यान, शेतकरी आपल्या व्यथा सांगण्यासाठी बांधावर बसले असताना अचानकपणे जिल्हाधिकारी २०० मीटरवर येऊनही शेतकऱ्यांना भेटल्या नसल्याची खंत व्यक्त केली.
हिंदू धर्माच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करत विद्यानंद बापट यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदू सेवा संघाने कोथरूड पोलिसांकडे केली आहे. संघाचे अध्यक्ष रोहित रमेश मारणे यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. पुण्यातील रहिवासी बापट यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंचावरून आणि माध्यमांमधून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे समाजात अस्वस्थता आणि तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.मी बहुमत मानत नाही” अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा दावा संघाने केला आहे.
मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय. राज्यभरातील मराठा बांधव जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये येत आहेत. त्यामुळे अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याने राज्यभरामध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक जिल्ह्यात बंद पाळण्यात येत आहे तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“उत्सवाला गालबोट लागता कामा नये,” अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे निर्माण झालेल्या वादावर शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
अमरावती शहरातील रवी नगर चौकात 12.45 च्या सुमारास एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण अमरावती शहर हादरले आहे. एकतर्फी प्रेमाच्या विकृत मानसिकतेतून आणि ब्रेकअपच्या संतापातून एका तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थी शर्वरी गणेश हाडके हिच्यावर चाकूने सपासप वार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव संतोष चव्हाण असून तो पुण्यातील कोथरूड परिसरातील राऊतवाडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
राऊतवाडी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष असल्याचेही सांगितले जात आहे. गणेशप्रेमी असलेल्या संतोष चव्हाणने बापट यांच्यावर हल्ला नेमका का केला? यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ण्यात विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध
गणेश मंडळांच्या आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला निषेध व्यक्त
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सकल मराठा बांधव आक्रमक झाले आहेत, सिल्लोड-कन्नड रोडवरील धानोरा फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तब्बल एक तास रस्ता अडवून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू आहे उपोषण
कालच देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची देखील या आदिवासी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली होती भेट
आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांनी राजीनाम्याची केली आहे मागणी
आदिवासी विकास विभागात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात आदिवासी विद्यार्थ्यांचे सुरू आहे उपोषण..
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना त्यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे एका तरुणाने चक्क मोबाईल टॉवरवर चढून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.पूर्णा ते नांदेड रोडवरील चुडावा येथे नागनाथ गुंडाळे या तरुणाने मोबाईल टॉवरवर चढत ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या.
तरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. सरकारने या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी धामणगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. या आंदोलनात शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.
सरकारने तातडीने उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा १२ तारखेनंतर लाखो मराठा बांधव मुंबईत एकवटतील, असा इशारा सरपंच मनोज गाढवे यांनी दिला. सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
- मनोज जरांगे पाटील यांचे मास्क लावत शेकडो विद्यार्थिनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
- मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी विद्यार्थिनी दाखल
- मनोज जरांगे पाटील यांचे मागील सहा दिवसापासून उपोषण सुरू आहे
- सरकारने जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी विद्यार्थिनी मास्क लावत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरलाय.
दरम्यान आंदोलनापूर्वीच पुणे ग्रामीण पोलीस आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आंदोलन स्थळापासून दोन्ही बाजूला 500 मीटर अंतरावरती बेरिगेटिंग करून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे . त्यामुळे पुणे सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत
महागाईच्या वाढत्या झळांविरोधात थाळीनाद’ आंदोलन
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर महिलाचे आंदोलन
वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि सर्वसामान्य नागरिकांवर पडणाऱ्या आर्थिक बोजाविरोधात महिला व युवती संघटनेच्या वतीने ‘थाळीनाद’ आंदोलन
या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारचे लक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे वेधून, महागाईवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी .
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज संपूर्ण मराठवाड्यात बंद पाळण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यातही मराठा समाजाच्या वतीने कडकडीत जिल्हा बंद पाळला जात आहे. बंददरम्यान मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील डिकसळ येथे आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून शासनाचा निषेध नोंदवला. तर दुसरीकडे कळंब-लातूर महामार्गावरील देवळाली येथे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. "मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नका, आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही," असा सज्जड इशारा या वेळी मराठा कार्यकर्त्यांनी दिला.
सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 4 वाजून 36 मिनिटांनी 3.6 तीव्रतेचा भूकंप झालाय... 10 किलोमीटर खोली असलेल्या या भूकंपाचे केंद्र राखीव वनक्षेत्रात होते... अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही सौम्य धक्के जाणवले... सुदैवाने कोणतीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही... दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहेत...
नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग मराठा समाजाने रोखला.
नांदेडच्या पिंपळगाव महादेव पाटी जवळ मराठा बांधव उतरले रस्त्यावर.
जवळपास तासभरापासून नांदेड नागपूर महामार्ग मराठा समाजाने धरला रोखून.
नांदेड नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प
अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस!
ऑगस्ट महिन्यात विदर्भावर पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. विदर्भात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ५८ टक्के कमी पाऊस झाला असून, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांतही सरासरीपेक्षा २२ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि वाशिमसह पश्चिम विदर्भातील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. पावसाची कमतरता, सिंचनाचा अभाव आणि सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
खिशात पैसे नाही पण आयफोन घ्यायचा आहे अशा परिस्थितीत अल्पवयीन मुलाने आजोबाच्या घरी चोरी करून सहा लाख 72 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना यवतमाळच्या कनकवाडी परिसरात घडली. याप्रकरणी डीबी पथकाने नातवासह एका तरुणाला ताब्यात घेऊन चोरीतील मुद्देमाल जप्त केले. चोरट्याने घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून 52 ग्रॅमचे सहा लाख 72 हजाराचे दागिने लंपास केले.
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. यंत्रणा सुस्त असल्याने रुग्णांना नाईलाजाने खासगी लॅबमध्ये हजारो रुपये मोजावे लागत आहेत.
असा आरोप रूग्णांकडून केला जात आहे.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील अनेक रूग्ण येतात. अपघात, मेंदूविकार, छातीच्या आजारांसाठी सिटीस्कॅन अत्यावश्यक असतो. मात्र तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत हे मशीन गेल्या दोन महिन्यांपासून धूळ खात बंद आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
सुमारे अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहतूक विस्कळित झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांच्या वतीने घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस
जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने राज्यभरात मराठा समाज आक्रमक
धाराशिव लातुर जालना सह अनेक जिल्ह्यात जरांगे यांच्या समर्थनार्थ बंद
- विजपुरवठा सुरळीत होत नसल्याने सोलापुरातील शेतकरी आक्रमक
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे सब स्टेशन शेतकऱ्यांनी बंद पाडले
- उळे सब स्टेशन बंद पाडल्याने 11 गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकार जाणीवपूर्वक उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज संपूर्ण लातूर जिल्हा बंदची हाक दिली आहे
जिल्ह्यातील औसा , अहमदपूर, मुरूड यासह इतर मुख्य शहरात देखील बंदच आव्हान करण्यात आले आहे
सकाळपासून बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतोय, तर काही वेळात बंदच आव्हान करण्यासाठी मराठा आंदोलकांची रॅली देखील निघणार आहे.
दिव्यांग' सवलती लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले; ६८९ कर्मचाऱ्यांची पडताळणी
पुढील आठवड्यात येणार अंतिम अहवाल : आधीच ९२ कर्मचारी निघाले आहेत बोगस दिव्यांग
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिमायतनगर तालुका कडकडीत बंद.
हदगाव आणि हिमायतनगर बंदला सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद.
आज जिल्ह्यातील अनेक महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार रास्ता रोको आंदोलन
जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे उपोषणाचा सहावा दिवस आहे
सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून शिष्टमंडळ जरांगे पाटलांची का भेट घेत नाही आणि मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्यामुळे आज संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक सर्वपक्षीय बांधवांकडून देण्यात आली आहे
बीड जिल्हा बंदला प्रतिसाद मिळत असून संपूर्ण आस्थापने बंद आहेत
पुण्यातील चिखली परिसरातून 24 वर्षीय आरशद सिद्दीकी याचे अपहरण करून त्याला थेट उत्तर प्रदेशात पळवून नेण्याचा धक्कादायक कट समृद्धी महामार्गावर पोलिसांनी उधळून लावला.. पोलिसांनी समृद्धी महामार्गावर 3 किलोमीटर थरारक पाठलाग करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत..
राज्यात एकत्र सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा व्यासपिठावरून जाहिर झाला. रायगडचे नवनिर्वाचित पालक मंत्री भरत गोगावले यांच्या नागरी सत्कार समारंभात आ. थोरवे यांनी राष्ट्रवादी आणि सुनिल तटकरे यांच्यावर तोफ डागली.
तटकरे आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या राजकारणाचा उल्लेख करीत भरतशेठ यांना सावध होण्याचा सल्ला थोरवे यांनी दिला.
परवा पासून आम्हाला काही सांगू नका, महेंद्र दळवी यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सुरु करू मग थांबणार नाही असा निर्वाणीचा इशाराच आ. थोरवे यांनी व्यासपिठावरून दिला.
नांदेड जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला आता गटबाजीचं स्वरूप आलं आहे. मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत ४ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा बंदची हाक दिली.
त्यानंतर आता दुसऱ्या गटाने मात्र आज 3 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज बंद पुकारला.त्यामुळे समाज बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
भाईंदरच्या उत्तन परिसरातील स्थानिक टेम्पो चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेत केला जाहीर प्रवेश.
मनसेचे मीरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शेकडो टेम्पो चालकांनी मनसेच्या वाहतूक सेनेत प्रवेश करून संघटनेच्या कार्याला पाठिंबा दर्शविला आहे.
टेम्पो चालकांच्या विविध समस्या आणि त्यांच्या हक्कांसाठी मनसे वाहतूक सेना सातत्याने लढा देणार असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४ लाख सदनिकाधारकांना पीएनजी जोडणी करून घेणे आवश्यक
सोसायट्यांमध्ये पीएनजीचे जाळे उपलब्ध असूनही एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना ३० सप्टेंबरपूर्वी पीएनजी जोडणीसाठी अर्ज करून ती कार्यान्वित करून घ्यावी लागणार
पीएनजी जोडणी न घेतल्यास १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलिंडरचा पुरवठा थांबण्याची शक्यता
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड कडकडीत बंद.
सर्व पक्षांकडून आज बीड जिल्हा बंदची हाक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.