पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलनात फूट पडलीय. मंजारी येथील काही विद्यार्थी उपोषण सोडायला तयार आहेत. तर काही विद्यार्थी मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून उपोषण सुरू ठेवणार आहेत.
शेगाव बसस्थानकात बसची प्रतीक्षा करणाऱ्या तीन महिला आणि तीन वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर अचानक छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोमल बावस्कर, रेखा बावस्कर, विमलाबाई पवार आणि तीन वर्षीय रुद्र बावस्कर जखमी झाले असून त्यांना सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. छताचे प्लास्टर कोसळताच बसस्थानकात एकच खळबळ उडाली. बसस्थानकाची इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून धोकादायक भागाची तातडीने पाहणी व दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी गठित साळुंखे समितीसह अन्य अहवालांतील शिफारशींचा अभ्यास करून तीन महिन्यांत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाने दिले आहेत. आराखड्याची अंमलबजावणीही पुढील तीन महिन्यांत करून कृती अहवाल शासनाला
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कंटेनर चालकाचे खेडशिवापूर टोल नाक्या जवळ ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. घटनेचे नेमके कारण आणि अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.
सिंधुदुर्गातील ओरोस येथे जिल्हा रुग्णालयाच्या उपहारगृहातच अन्नसुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी उपहारगृहात मागविलेल्या मिसळ पावमध्ये मृत झुरळ आढळून आल्याने खळबळ उडाली.
यंदा गोकुळ दूध संघाची दहीहंडी महायुतीच फोडणार आहे. यंदा 25 शून्य अशा मतांनी गोकुळवर महायुतीची पुन्हा सत्ता येईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांना व्यक्त केलाय. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडं उमेदवार नसल्याने ते सध्या सर्वांच्याच भेटीगाठी घेत आहेत. आता सतेज पाटील समविचारी पक्ष म्हणून गोकुळच्या राजकारणात फिरत आहेत, तर यापूर्वी त्यांची समविचारी आघाडी कुठे गेली होती? असा सवालही खासदार धनंजय महाडिक यांनी केलाय.
- बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधी रुपयांचे गोल्ड लोन घेतल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
- ICICI बँकेच्या विविध शाखांमधील १५२ गोल्ड लोन खात्यांमध्ये अनियमितता आढळून आली असून, फसवणुकीची रक्कम २३ कोटी ३१ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.
- या प्रकरणातील मास्टरमाइंड सचिन राऊत याला अटक करण्यात आली असून, आतापर्यंत सात आरोपींना अटक झाली आहे.
- दागिन्यांचे मूल्यांकन करणाऱ्या अप्रेझरवर १५५ बनावट दागिने अस्सल असल्याचे प्रमाणित केल्याचा आरोप आहे.
- आर्थिक गुन्हे शाखेकडून बँक अधिकारी, कर्मचारी, अप्रेझर आणि ऑडिटर यांचीही चौकशी सुरू आहे.
कांद्याच्या वाढलेल्या दरापासून शहरी भागातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधील ४५३ मेट्रिक टन कांदा बुधवारी दुपारी ३ वाजता लासलगाव येथून दिल्लीसाठी रवाना केला मात्र, दिल्लीला कांदा पोहोचण्यापूर्वीच लासलगावच्या कांदा बाजारात दर घसरल्याचे चित्र समोर आले आज गुरुवारी कांद्याच्या सरासरी दरात बुधवारच्या तुलनेत १०० रुपयांची, तर सोमवारच्या तुलनेत ४५० रुपयांची मोठी घसरण झाली दरातील या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे, लासलगाव बाजार समितीत ४४६ वाहनांतून कांद्याची आवक झाली कांद्याला कमाल ४ हजार ४०१ रुपये, किमान १ हजार रुपये आणि सरासरी ३ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याचे बाजार समितीचे व्यापारी संचालक व कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी ही माहिती दिली
वाशिम ते मालेगाव महामार्गावरील धार काटा फाट्यावर कार समोर दुचाकी आडवी आल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे... या अपघातात दुचाकी वरील युवती जागीच ठार झाली असून युवक गंभीर जखमी झाला आहे...
हा अपघात इतका भीषण होता की,दुचाकी कार समोर आडवी आल्याने कारने दुचाकीला अक्षरशा फुटबॉल सारखे उडवत पन्नास फूट दूर फेकल्या गेले...
अपघातात दुचाकीचा अक्षरशा चक्काचूर झाला असून, मार्गावर दुचाकीचे पार्ट रस्त्यावर पडले होते. त्यामुळे दुचाकी वरील मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर युवक हा गंभीर जखमी झाला असून, पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.
३० ते ४० प्रवासी जखमी, कामथे रुग्णालयात उपचार सुरू...
आंबडस येथील चिरणी फाट्याजवळ दोन बसेसचा भीषण अपघात झाला असून,दोन्ही वाहने समोरासमोर आदळली
तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती
या धडकेत सुमारे ३० ते ४० प्रवासी जखमी झाले असून, सर्व जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..
घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत..
कल्याणमध्ये दारूच्या नशेत भरधाव टँकरने दोन रिक्षा आणि ७ ते ८ दुचाकींना उडवत ५ जणांना किरकोळ जखमी केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मद्यधुंद टँकर चालकाला चोप देत महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले.
सोनी कुमार गुल्लू असे या मद्यधुंद पाण्याच्या टँकर चालकाचे नाव आहे. हा टँकर साईबाबा वॉटर सप्लायर कंपनीचा असल्याची माहिती आहे. भरधाव वेगाने वाहनांना धडक देणारा टँकर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे
आतापर्यंत जे काही घडले आहे, त्यातून आम्हालाही प्रेरणा मिळाली आहे.
जेन-झीला कोणत्याही सूचना देण्याची गरज नाही; ते जे करत आहेत ते उत्तम पद्धतीने करत आहेत.
सरकारच्या अन्यायकारक धोरणांमुळे २१ मुला-मुलींनी आत्महत्या केली.
मात्र, त्या वेळी सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही
दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असताना आंदोलक मुला-मुलींवर लाठीमार करण्यात आला, लाठ्यांमध्ये खिळे टोचून मारहाण केली.
त्यावेळीही सरकारने संवेदनशीलता दाखवली नाही, तेव्हा सरकारला जाग आली नाही
या सर्व विषयांवर महाराष्ट्र सरकारशी चर्चा करणार
जनतेची ताकद सरकारला कळल्यानंतर केंद्रातील राजीनामा घेण्यात आला,
त्यानंतर आता जनतेसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र उभे राहिल्यामुळेच जनतेकडून एवढे प्रेम मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी समृद्धी वर लूट केलेल्या मिश्रा कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली, काय घडले ते समजून घेतले आणि यापुढं समृद्धी वर पेट्रोलिंग वाढवण्यात येईल प्रशासन पूर्ण दक्षता घेईल असे आश्वासनही दिले
नाशिकच्या मालेगाव ते कुसूंबा मार्गावरील लेंडाणे येथे शकाळच्या सुमारस एका भरधाव ईनोव्हा कारने शाळेत जाणा-या १२ वर्षीय आरोही चव्हाण या विद्यार्थीनीला उडवल्याने तीचा मृत्यू झाला.या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन केले,या मार्गावर वारंवार अपघात होत असतात मात्र टोल नाक्यावर कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत असा आरोप गावक-यांनी करत चार तासा पेक्षा जास्त वेळ रास्ता रोको आंदोलन केले,टोल कंपनीचे अधिकारी जो पर्यंत येथे येत नाही तो पर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार गावक-यांनी केल्याने घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात आंदोलन करणारा
अभिजीत दीपकेची हिंगोलीत घोषणा
पुढील पंधरा दिवस शाळा पाहणी केल्यानंतर सविस्तर अहवाल तयार करणार
राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना देखील या आंदोलनात सहभागी करणार
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन
- भर पावसात नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
- नागपुरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयात 'हिंदी अल्पसंख्यांक' कोट्यातून विद्यर्थांनी प्रवेश घेतले होते
- एक वर्षानंतर चौकशी दरम्यान हे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत
- याचा परिणाम एकूण ३२२ विद्यार्थ्यांवर झाला असून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे तसेच भविष्यातील शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत
जालना -
धुळे- सोलापूर महामार्गावर काही वेळ मराठा आंदोलकाचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा बांधवांचा रास्ता रोको
धुळे सोलापूर महामार्गावर वडीगोद्री फाट्यासमोर रास्ता रोको, रास्ता रोको मुळे काही वेळ वाहतूक कोंडी
पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर वाहतूक सुरळीत
पंढरपूर -
माढ्यात मराठा आंदोलन आक्रमक
सहकार मंत्र्यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी
धावत्या गाडी मागे पळत गाडी खाली घुसण्याचा प्रयत्न झाला
बापू गायकवाड असं मराठा आंदोलकाचे नाव
जालना -
मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत उपोषण
दुसरीकडे प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर
हैदराबाद गॅझेटिअरच्या नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रासाठी जालन्यातील हसनाबाद महसूल मंडळात विशेष कॅम्प
मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहांचे केलं स्वागत
सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांना राखी बांधली
रायगड -
- गोगावले यांच्या महाडमधील साम्राज्याला सुरुंग लावण्याची तटकरेची तयारी
- ठाकरे गटाच्या सोमनाथ ओझर्डे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे वेळी केली महाडमध्ये मेळाव्याची घोषणा
- नवरात्रीनंतर महाडमध्ये होणार भव्य मेळावा
- महाडमधील मेळाव्याची तटकरेंकडून घोषणा
अभिजीत दिपके यांची हिंगोलीतील केसापूर गावातील जिल्हा परिषद शाळेत भेट
शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाकीवर जाऊन केली पाहणी
रायगडमध्ये सुनिल तटकरे यांनी एका दगडात पुन्हा एकदा दोन पक्षी मारले आहे. ठाकरे गटाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांना आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना शह देण्याची रणनीती सुनील तटकरे यांनी आखली आहे.
साम टीव्हीच्या बातमी वर शिक्का मोर्तब... सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश... विधानसभा 2026 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता पण त्यानंतर जे काय झाले ते आपण पाहिले त्यामुळे मी हा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे. शेखर गोरे यांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची बीपी, वजन त्याच बरोबर प्रार्थमिक तपासण्या करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पहिला दिवस आहे. शासकीय डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृती संदर्भात सर्वच प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या आहेत. बीपी,शुगर,वजन या संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत टँकरला आग
मुंबई लेनवर टँकरला अपघात झाल्यानंतर लागली आग
खोपोली नगरपालिकेचा अग्नीशमन दल घटना स्थळी दाखल
टँकर रस्त्यात पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प
विद्यार्थ्यांच्या मागणी मान्य करण्यात आल्या आहेत. संध्याकाळी पुण्यात जाऊन चर्चा करणार. तसेच सीएमसोबत चर्चा झाली आहे.
सीजेपी चे अध्यक्ष अभिजीत दिपके पुन्हा एकदा मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात स्कूल ठीक करो अभियान राबवत आहेत. सलग तिसऱ्यांदा जिल्ह्यातील सरकारी शाळा पाहण्यासाठी अभिजीत दिपके दाखल झाले आहेत. आज त्यांनी हिंगोली सेनगाव व औंढा तालुक्यातील लोहगाव आडोळ खिल्लार करंजाळा जांभरून या शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.
वाढती महागाई, पेट्रोलमधील इथेनॉलची सक्ती आणि सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या गगनाला भिडलेल्या दरांविरोधात धुळ्यात काँग्रेसने अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध केला आहे, 'अच्छे दिन'ची खिल्ली उडवत धुळे शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील संतोषी माता चौक परिसरात रस्त्यावरील नागरिकांना आणि वाहनधारकांना चक्क साखर वाटून हे उपरोधिक आंदोलन करण्यात आले आहे, यावेळी काँग्रेस नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. पत्रकार परिषदेत राहूल गांधी म्हणाले की, चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे लोक असतात. चहाच्या टपरीवर दलितांसोबत भेदभाव होतो. तसेच खरेगेंचे भाशण झाल्यावर शुद्धीकरण करतात असंही ते भाषणात म्हणाले.
स्मशानभूमीच्या मागणीसाठी स्वतःचे सरण रचून एका सामाजिक कार्यकर्त्याने आंदोलन सुरू केलं आहे.नांदेडच्या निपाणी सावरगाव येथील आकाश कोकणे या सामाजिक कार्यकर्त्याने हे आंदोलन निपाणी सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलं आहे.
जालन्याच्या आंतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणामध्ये महिलांनी देखील सहभाग नोंदवला आहे उपोषणात सहभागी झालेल्या महिलांनी सरकारवर आक्रोश व्यक्त करत थेट इशाराही दिला आहे.
लोटे अतिरिक्त एमआयडीसीतील कोकाकोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा प्रकार आज सकाळी समोर आला. या सांडपाण्यामुळे शेती आणि पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नाले तसेच चार ते पाच हजार लोकवस्तीच्या नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. वारंवार तक्रारी करूनही एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. प्रकार तातडीने न थांबल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
नवी मुंबईत वाशीतील मिनी शिशोर मध्ये तरुणाची हत्या
19 वर्षीय सुजलकुमार महातो याची हत्या
पहाटे 4 वाजताच्या सुमारास हत्या केल्याचा अंदाज..
सुजलकुमार कोपरखैरणे मध्ये चायनीज हॉटेल मध्ये काम करतो
डोक्यात कोयत्याने वार करून केली निघृण हत्या
हत्या करून मारेकरी फरार...
फॉरेन्सिकच पथक, क्राईम ब्रांच आणी वाशी पोलीस घटनास्थळी दाखल...
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना
पुण्याप्रमाणे नवी मुंबईतही कोयता गँग सक्रिय होत असल्याची भीती
हिंगोली पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अमोल गांगणवाड यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांगणवाड हे हिंगोली पोलीस नियंत्रण कक्षात नियुक्त होते. त्यांनी कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू
नेपाळपासून पटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक समन्वय आणि मदत
महाराष्ट्रात सुखरूप परतण्यासाठी रेल्वे प्रवासाची व्यवस्था
आज सकाळी 7:36 वाजता रेल्वे क्र. 17609 ने पटणाहून नागपूरकडे सर्व भाविक सुखरूप रवाना
संकटाच्या काळात तातडीने मदत केल्याबद्दल सर्व भाविकांकडून समाधान..
मनोज जरांगे आजपासून उपोषणावर
मनोज जरांगे यांची नवी मागणी
जात पडताळणी समिती कायमची रद्द करा
देशात जात पडताळणी समिती नको
बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा तात्पुरता आंदोनला स्थगिती
बाभुळगांव वरून अमवराती करिता विद्यार्थी रवाना,1 तारखेला मुंबईत येथे होणार बैठक
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात आश्वासन
आंदोलन थांबून विद्यार्थी अमरावतीकडे परत जाणार
मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा...
अंबड चे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांनी मनोज जारंगे पाटील यांच्याशी चर्चा केली...
राज्यभरातून मराठा बांधवांनी सराटीत दाखल होत आहे त्या अनुषंगाने वाहतुकीच्या नियोजनाबाबत दोघांमध्ये चर्चा...
- कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर पाठोपाठ, आता कुंभासाठी बोगस भरतीचा प्रकार उघड
- सिंहस्थ कुंभमेळ्यात आरोग्य विभागात बंपर भरती असल्याचे भासवून बेरोजगार तरुणांची केली फसवणूक
- सोशल मीडियावर खोटी जाहिरात प्रसारित करून बेरोजगारांना घातला गंडा
जात पडताळणी समिती रद्द करा मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी...
इतर राज्यात जात पडताळणी समिती नसेल तर मग महाराष्ट्रात कशासाठी जरांगे यांचा सवाल..
तर इतर राज्यांमध्ये जात पडताळणी समिती नाही हे विखे पाटलांनीच मला सांगितलं असल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा दावा
पुण्यातील गंज पेठ परिसरामध्ये दहीहंडीचे बॅनर रस्त्यावर कोसळले
मंगल क्लब दहीहंडीच्या स्पॉन्सरशिपचे लावलेले बॅनर चक्क कोसळले
जीवित हानी नाही
पुण्यातील गंज पेठ येथील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पञाद्वारे मागणी
पनवेल महानगरपालिकेच्या कारभारावर आणि कंत्राटदारांच्या अनागोंदी कामावर पुन्हा एकदा तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कामोठे शहरामध्ये हा प्रकार दिसून आला
प्रत्यक्ष गटार अस्तित्वात नसताना किंवा नवीन गटारांचे काम अपूर्ण असतानाच त्यावर झाकणे बसवण्याचा विचित्र आणि भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आजपासून सुरुवात
विखे पाटील रात्रीपासूनच संभाजीनगरात दाखल
उदय सामंत, विखे पाटील यांची बैठक झाल्यानंतर आजच जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती
खेड तालुक्यातील वेताळे येथे अज्ञात इसमाने रात्री शेतकऱ्याच्या उभ्या पिकावर विषारी तणनाशकाची फवारणी केल्याचा प्रकार समोर आलाय.
या नुकसानीचा अंदाज ३ ते ४ लाख रुपये असल्याची माहिती आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला असून, अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी आहे.
धाराशिवमध्ये पावसाची दडी सोयाबीन करपले
शेतकऱ्यांसाठी आतापासूनच उपाययोजना करा अन्यथा शेतकरी आत्महत्या वाढतील; आमदार कैलास पाटलांनी व्यक्त केली भीती
बुलढाण्यातील वानखेड गावात ७३५ वर्षांपासून रक्षाबंधन साजरे होत नाही...
पूर्वजांच्या हत्येच्या निषेधार्थ ‘निषेध दिन’; राखीऐवजी साजरा होतो ‘एकता दिन’
नेपाळच्या दुर्घटनेत राज्यातील ६० नागरिक बेपत्ता
पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांतील नागरिकांचा समावेश
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मनोज जारंगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता...
मनोज जरांगे पाटील आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणार....
या पार्श्वभूमीवर मराठा उप समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.